Vegetable Crop Planning in marathi:
Vegetable Crop Planning: हवामानातील बदलामुळे होणाऱ्या समस्यांचा सर्वाधिक परिणाम हा शेती शेत्राला होत असून वारंवार उद्भवणारी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यत अशा परिस्थितीत पिकांच्या नियोजनाचे तंत्र शेतकऱ्यानपर्यंत पोहचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.पावसाळी हंगामातील पावसाचा अतिरेक होणे,पाऊस उशिरा पडणे,दोन पावसाच्या अंतरामध्ये वाढ होणे इत्यादी कारणांमुळे शेतीची कामे,पिकांचे नियोजन त्याचबरोबर पिकांची लागवड करताना निश्चितता साधता येत नाही.अशा परिस्थितीत पेरणी मध्ये बदल करणे गरजेचे असते.बागायती मध्ये भाजीपाला पिकांचा समावेश होत असून भाजीपाल्याचे दैनंदिन जीवनामध्ये किती महत्व आहे हे कोणालाच सांगायची गरज नाही.आपत्कालीन परिस्थिती मध्ये Vegetable Crop Planning भाजीपाला पिकांचे नियोजन करण्याची शाश्वत शेती पद्धती बदल आपण या लेखात माहिती बघणार आहोत
वाचा: खरीप पिकांचे नियोजन शाश्वत पद्धती

हेही वाचा: Vegetable Crop पाऊस कमी पडल्यास असे करा नियोजन
शेतकरी मित्रानो,जास्त तापमान व कोरडी उष्ण हवा दुष्काळातील परिस्थितीत बघावयास मिळते परंतु याच हंगामात भाजीपाला पिकांना पाण्याची टंचाई असल्यामुळे चांगले बाजारभाव मिळत असतात ह्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न पातळी गाठता येऊ शकते.शाश्वत नियोजन पद्धतीचा वापर केल्यास निश्चितच शेतकरी सहजरीत्या उत्पादनात वाढ करू शकतात.आपत्कालीन परिस्थती मध्ये भाजीपाला पिकवणे अवघड असते परंतु काही उपाययोजनांचा अवलंब केल्यास चांगल्या पद्धतीचा भाजीपाला पिकवण्यास मदत होते.
हवामानातील बदलामुळे पावसाची हजेरी वेळेवर लागणे कठीण आहे.कधी पाऊस जास्त पडतो तर कधी पाऊस कमी पडतो हि पावसामधील अनियमितता भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात फरक पडत असते.अशा आपत्कालीन परिस्थिती मध्ये कोणत्या उपाययोजना शेतकरी वर्गाने अवलंबल्यास ज्यातून पिक उत्पादनात स्थेर्य साधता येईल त्याबद्दलची माहिती आपण यालेखात बघणार आहोत.पुढे देलेली संपूर्ण माहिती हि कृषी विद्यापिठाच्या संशोधनातून देण्यात येत असून संशोधकांनी सुचवलेल्या उपाययोजनाचा १०० % वापर शेतकरी वर्गाने करण्याचे आव्हान कृषी संशोधक करत आहे.चला सुरवात करूया !
शेती पद्धती, पिकांची निवड पद्धती,पिकांचे नियोजन इत्यादी बाबीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बदल करणे महत्वाचे असते. ठराविक शेत्राचा विचार केल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये Vegetable Crop Planning भाजीपाला पिकांचे नियोजन ठरवायचे झाल्यास पावसाच्या आगमनापासून पावसाच्या आकडेवारीचा शास्त्रोत्र अभ्यास करणे गरजेचे आहे.पिकांचे नियोजन पावसाच्या आकडेवाडीपासून करण्यास सुरवात करावी.

वांगी, मिरची, टमाटर, कांदा, चवळी, गवार, वेगवेगळी वेलवर्गीय भाजीपाला ज्यामध्ये दोडका, कारले, ढेमसे, दुधीभोपळा, घोसाळी वाल आणि पालेभाज्या इत्यादींची लागवड हि प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते.
खरीप हंगामात भाजीपाल्याचे पिक घेताना अतिवृष्टी झाल्यास आपत्कालीन उपाययोजना:
भाजीपाला लागवड केलेल्या पिकांच्या वाफ्यामधून साचून असलेले पाणी शेताच्या बाहेर काढावे.
पिकांच्या अतिवृष्टीच्या भागात भाजीपाला प्र्शेत्राभोवती चढ तयार करून पाण्याचा निचरा करावा.
भाजीपाला पिकांच्या पानावर पिवळसर पण येत असल्यास ह्याचे मुख्य कारण पिकांना होणारी नत्राची कमतरता असते. असे होत असल्यास नत्र + पलाश युक्त खते वापरावीत हि खाते जमिनीतून किवा फवारणीतून पुरवावीत.
पिकांची अशा परिस्थितीत ऑक्सिजन घेण्याची क्षमता घटत असते. त्यामुळे रोगांच प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते अशा वेळी पोटॅशियम नायट्रेट या खताची फवारणी करावी यामुळे (भाजीपाला पिकांचे नियोजन) भाजीपाला पिकांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते व मर सारख्या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते.(नोट- अमोनियम युक्त खताचा वापर करू नये)
भाजीपाला पिकांमधील जी पाने जुनी असतात त्याची हरित द्रवे कमी होण्यास सुरवात होत असते.अशावेळी Vegetable Crop Planning संजीवकांचा वापर करावा, ६ बीएपी यामध्ये फायदेशीर ठरते.असे केल्यास पानांमधील उत्सर्जन कमी होऊन प्र काश संशेल्षणाची क्रिया जलद होते.
पिकांवर येणाऱ्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा ढगाळ वातावरण व सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे येत असतो अशा परिस्थितीत पुढील उपाय करावा: बुरशीनाशकाची फवारणी करणे त्यामध्ये मॅन्कोझेब,कार्बेंन्डझिम,क्लोरोथ्यलीनील इत्यादीचा वापर करावा. रस सोषण करणाऱ्या किडासाठी पुढील कीटकनाशकाचा वापर करावा त्यामध्ये डायमेथोएट,इमिडाक्लोप्रीड,थायमेथॉक्झम इत्यादीचा वापर करावा.
भाजीपाला पिक घेताना झाडाच्या भोवती रिंग पद्धतीची सदरहू बुरशीनाशकाची आवळणी केल्यास मूळकुजी पासून पिकांचे सरक्षण होते व इतर रोगांपासून देखील झाडांचे संरक्षण होते.गोगलगायी, शंखी यांचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसत असल्यास त्यांना गोळा करून नष्ट करावे.
पिकांनुसार करावयाच्या उपाययोजना:
१) कांदा:
- जर तुम्ही कांदा पिकाची लागवड सपाट वाफ्यात करत असाल तर आपत्कालीन परिस्थतीत सर्वप्रथम वाफ्यातील पाणी काढण्यासाठी त्याच बरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी लगेचच उपाययोजना करण्यास सुरवात करावी.
- (भाजीपाला पिकांचे नियोजन) Vegetable Crop Planning कांदा पिकाची लागवड करत असल्यास बियाणाची पेरणी झाल्यावर जास्त पाऊस झाल्यास अशा परिस्थतीत कीटकनाशक / बुरशीनाशक यांची फवारणी करणे गरजेचे असते.असे केल्यास कीड व बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे त्यासोबत बावीस्टीन १० ग्राम किवा एन-४५ ,२० ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून घेऊन बुरशीनाशकाची आळवणी करावी.
- रोप वाटीकेमध्ये तन नियंत्रित ठेवावे यामुळे पिकामधील वाफसा अवस्था टिकून राहण्यास मदत मिळते.
- कांदा पिकाची लागवड करत असताना सरी वरंबा पद्धती किवा रुंद गादी वाफा पद्धतीने लागवड करावी.
- कांदा पिकामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक फवारताना चिकट द्रव १० लिटर पाणी + १० मिली चिकट द्रव टाकावे
२) मिरची व वांगी:
- मिरची व वांगी ह्या पिकांची लागवड हि गादी वाफ्यावर करावी
- पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास वाफ्यातून पाणी बाहेर काढण्यास ताबडतोब प्रयत्न करावे.
- वाफसा अवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तनाची नियंत्रीतता ठेवावी असे केल्यास रोपवाटिकेमध्ये हवा खेळती राहते.
- वांगी व मिरची (भाजीपाला पिकांचे नियोजन) Vegetable Crop Planning ह्या भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करत असल्यास जर पावसाचे प्रमाण अतिप्रमाणात झाले असल्यास पाणी शेतातून बाहेर काढावे व चर खोदूवेत असे केल्यास जमिनीमध्ये पाण्याचा निचरा लवकर होतो व जमिनीत वाफसा लवकर तयार होतो.
- भाजीपाला पिकांची पुनर्लागवड केल्यास मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असते.त्यासाठी झाडाभोवताल बुरशीनाशकाची आवाळणी करणे गरजेचे आहे.
- युरिया सारख्या खतांची जमिनीतून मात्रा देणे आवश्यक आहे.
- विद्राव्य खतांची मात्रा उदा: १५:१५:१५ ,२०:२०:२० किवा १९:१९:१९ यापैकी एका खताची प्रती लिटर ५ ग्रम या प्रमाणात फवारणी करणे आवश्यक आहे.
- अतिवृष्टी मुळे बुरशीनाशकाची /कीटकनाशकाची फवारणी करणे शक्य होत नसल्यास ड्रोन फवारणी करावी.
- पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास तनाचा प्रादुर्भाव होत असतो.असे झाल्यास रोग व किडांचे प्रमाण देखील वाढते. तनाच्या बंदोबस्तासाठी पिका नुसार रासायनिक तननाशकाची फवारणी करावी.
३) भेंडी:

- भेंडी पिकाच्या बियाणाची लागवड केल्या नंतर अतिवृष्टी होत असल्यास बियाणांची उगवण क्षमता कमी होते.जर बियाणांची उगवण कमी झाल्यास नाग्या भरून टाकाव्या.
- भेंडी च्या लागवडी नंतर सतत ढगाळ वातावरण आणि जर जास्त पावसाचे प्रमाण असल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशावेळी बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्या
- अतिवृष्टी नंतर शेतात पाणी साचून राहत असल्यास शेतातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था ताबडतोब करावी किवा चर खोदून पाणी शेतातून बाहेर काढावे.
- (भाजीपाला पिकांचे नियोजन) Vegetable Crop Planning रस सोषण करण्याचा किडींचा प्रादुर्भाव हा जास्तीची आद्रता आणि ढगाळ वातावरणामुळे होत असते.त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्या.
- सततच्या पावसामुळे शेतात तनाचे प्रमाण वाढत असते.त्यासाठी पिकानुसार रासायनिक तननाशकाचा वापर करणे टन नियंत्रणासाठी फायद्याचे ठरते.
४) वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी उपाययोजना:

कारली,टरबूज,दोडका,पडवळ,घोसाळी,खरबूज,दुधीभोपळा,काकडी,या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवडी नंतर अतिवृष्टी होत असल्यास सर्वप्रथम पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.व शेतामध्ये चर खोदण्यास सुरवात करावी यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो.
- रोपांची उगवण झाल्यानंतर जास्त पाऊस झाल्यास पिकावर मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असते यावेळी बुरशीनाशकाची आवळणी करणे गरजेचे असते.
- अतिवृष्टी किवा ढगाळ वातावरणामुळे भुरी रोगाची लागण पिकांना होऊ शकते ह्यासाठी योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी कृषी संशोधकांच्या सल्ल्याने करावी.
- (Vegetable Crop Planning) अतिवृष्टीमुळे जमिनीतून पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. त्यामुळे अशा वेळी खरबूज, दुधीभोपळा या पिकांसाठी कीटकनाशक / बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- वेलवर्गीय पिकांवर अतिवृष्टी किवा दमट वातावरणामुळे डाउनी मिल्ड्रयु रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.ह्या रोगांचे वेळीस नियंत्रण न केल्यास ह्याचा मोठ्या प्रमाणात उत्पनावर परिणाम होतो.यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करने फायद्याचे ठरते.
- पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यास वेलवर्गीय पिकांसाठी मध्यम प्रकारच्या त्याच बरोबर पाण्याचा निचरा होणारी करावी. भाजीपाला पिकांची लागवड पावसाळ्या मध्ये करत असल्यास काळ्या जमिनीची निवड शक्यतो करू नये.
वाटाणा:
वाटणा पिकांची लागवड हि बरी जमिनीत करू नये .
वाटणा पिकासाठी मध्यम व पाण्याचा निचरा सुरळीत होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
अतिवृष्टी झाल्यास पाणी जमिनीत साचणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.व पावसाचे पाणी शेतातून बाहेर निघण्यास उपाययोजना कराव्यात अतिवृष्टी मुळे वाटाणा पिकावर मर रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यासठी बुरशीनाशकाची आवळणी करावी
टमाटर:

टमाटर लागवडीसाठी जमिनीची सुपीकता गरजेची असते (भाजीपाला पिकांचे नियोजन) Vegetable Crop Planning करताना त्यासाठी टमाटर लागवडी साठी चांगला निचरा होणारी मध्यम व काळ्या जमिनीची निवड करावी सुपीक आणि पाणी धरून ठेवणारी जमीन अशा जमिनीत टमाटर चे उत्पादन होते
सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात टमाटर लागवडी दरम्यान करावा असे केल्यास जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत मिळते.शेतीतील पाण्याचे व्यवस्थापन करत असताना जमिनीचा मगदूर आणि हवामान इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या.
६ ते ७.५ च्या दरम्यान जमिनीचा सामू टमाटर लागवडी साठी उत्तम असतो.पावसामध्ये टमाटर ची लागवड करत असल्यास काळ्या जमिनीची निवड करणे टाळावे.
पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्यासाठी हलक्या ते काळ्या जमिनीमध्ये व्यवस्थित उतार काढून घ्यावा. असे केल्यास उभ्या पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही. (भाजीपाला पिकांचे नियोजन) पाणी साचून राहत असल्यास झाडाची पाने पिवळी पडतात कारण मुळाना हवेचा पुरवठा व्यवस्थित होत नसतो झाडा भोवतालच्या वाफ्यातील पाणी काढावे त्यासाठी चर तयार करावा.
टमाटर ची लागवड झाल्यनंतर ३०-४५ दिवसांनी झाडांना मातीचा भर द्यावा.झाडाच्या खोडाला मातीचा आधार देणे गरजेचे असते त्यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सर फोडावी व खोडाला मातीचा आधार द्यावा असे केल्यास मुळ्या फुटायला चांगली मदत मिळते, मातीतील हवेचे प्रमाण सुरळीत राहण्यसाठी देखील मदत मिळते.
जमिनीत चार काढणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे शारयुक्त पाण्यातील क्षरांचा निचरा होत असतो त्याचबरोबर जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो.
रोपे तयार करण्यासाठी पावसाळ्यात प्रो-ट्रे चा वापर करावा.
जमिनीचा पोत व वातावरण या गोष्टीचा विचार करून पाणी व्यवस्थापन करावे. जर जमीन हलकी असेल तर पाण्याच्या पाळ्या जास्त ठेवाव्या व जमीन चांगली असल्यास पाण्याच्या पाळ्या कमी ठेवाव्यात.
सतत होणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत साचून राहिल्यास. (भाजीपाला पिकांचे नियोजन) Vegetable Crop Planning करताना हवेचा पुरवठा मुळाना होत नाही त्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता असते.त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडण्यास सुरवात होते व उत्पादनात घट दिसू लागते.
पावसाळी हंगामात पिकांना पाणी गरजेनुसार देणे गरजेचे असते.पिकांना आधार मिळण्यासाठी मांडव करावा.अतिवृष्टी मुळे मांडव कोलमंडणार नाही ह्याची दक्षता घ्यावी कारण अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.जमिनी लगतच्या पिकांच्या फांद्या काढून घ्याव्या.