Sugarcane Harvester Subsidy Scheme 2025

Sugarcane Harvester Subsidy Scheme In Maharashtra :

Sugarcane Harvester Subsidy Scheme:ऊस कापणी यंत्र हा एक अत्यंत महत्वाचा घटक महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बनलेला आहे.मजूर टंचाई वाढलेला तोडणी खर्च व वेळेवर ऊस गाळपासाठी पोहचवण्याची समस्या इत्यादी बाबीसाठी यांत्रिक ऊस तोडणी हे एक प्रधावी साधन ठरत आहे.देशातील राज्ये हे केंद्र शासनाच्या सहकार्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ऊस कापणी यंत्र खरेदी करण्यासाठी Sugarcane Harvester Subsidy Scheme. २०२५-२६ ह्या आर्थिक वर्षासाठी ऊस कापणी यंत्र अनुदान योजनेला मुदतवाढ आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून केंद्र शासनाच्या “राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हि योजना राबविण्यात येणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा ६० % निधीचा वाट व उर्वरित ४० % निधी हा राज्य सरकारचा असेल.

महत्वाचे: २०२५-२६ नंतर ह्या योजनेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे शासने स्पष्ट नमूद केले आहे. हि शेवटची संधी आहे तरी इच्छुक शेतकरी व उद्योजकांनी योजनेचा आवश्य लाभ घ्या, योजने संबंधित संपूर्ण मार्गदर्शन आम्ही सोप्या भाषेत सांगितले आहे. चला सुरवात करूया !

Sugarcane Harvester Subsidy Scheme

महाराष्ट्रात साखर उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु ऊस तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातून मजुरांचे वाढते शहराकडील स्थलांतर यामुळे पारंपारिक पद्धतीने ऊस तोडणी करणे कठीण होत चालले आहे. ह्यावर तोडगा काढण्यासाठी ऊस कापणी यंत्राचा वापर करणे हि आता काळाची गरज बनली आहे परंतु हि यंत्रे अत्यंत महागडी असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व लहान साखर कारखाने ह्यांना यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. म्हणूनच, राष्टीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊस कापणी यंत्र खरेदी साठी अनुदान योजनेला सुरवात केली आहे. २०२५-२६ ह्या वर्षासाठी २३२.४३ कोटी रुपयांची तरतूद ह्या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे.

Latest News: पिक विमा २०२५ | मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करा ! संपूर्ण प्रक्रिया, समाविष्ट पिके आणि अंतिम तारखेचे सविस्तर मार्गदर्शन.


ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लाभार्थी पात्रता (Sugarcane Harvester Subsidy Scheme eligibility criteria) :

१) वैयक्तिक शेतकरी : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणीचा ठेका घेऊ इच्छिणारे शेतकरी.

२) उद्योजक : शेती संबंधित सेवा पुरवणारे उद्योजक व ऊस कापणी – खरेदी करून सेवा देणारे उद्योजक.

३) सहकारी व खाजगी साखर कारखाने : अशी कारखाने जी स्वतःच्या कार्यक्षेत्रातील ऊस कापणीसाठी यंत्र खरेदी करू इच्छितात.

४) शेती सहकारी संस्था : गावातील शेतकरी गटांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली सहकारी संस्था.

५) शेतकरी उत्पादक संस्था : शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था किंवा कंपनी.


ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची उदिष्टे (Sugarcane Harvester Subsidy Scheme 2025 objectives) :

  • ऊस तोडणी साठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता भरून काढणे हे या योजनेचे प्रमुख उदिष्टे असून ऊस कापणी यंत्राच्या वापरामुळे मजुरांची अडचण दूर होते आणि उपलब्ध मनुष्यबळा वरील ताण कमी होण्यास मदत मिळते.
  • ऊस कापणी यंत्रामुळे उत्पादकता वाढते व आर्थिक नुकसान टाळता येते, वेळेवर उसाची कापणी झाल्यामुळे उसाचे वजन व साखरेचा उतारा हा व्यवस्थित राहण्यास मदत होते. ह्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते व उसाला भाव उत्तम मिळतो.
  • शेती मध्ये आधुनिक यंत्र सामग्री वापरला प्रोत्साहन मिळते , फक्त ऊस कापणीच नाही तर एकूणच शेती मधील यांत्रिकी कारणाचा वापर वाढतो व शेती अधिक सोपी व फायदेशीर व्हावी ह्यासाठी ह्या योजनेतून प्रेरणा मिळते.
  • ऊस तोडणीचा खर्च कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते व उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांना निव्वळ नफा अधिक प्रमाणात मिळतो.
  • महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. कारखान्यांना वेळेवर ऊस मिळाल्याने त्यांचे उत्पादन वाढून त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते.
  • ऊस कापणी यंत्रामुळे मजुरांची समस्या सुटत असली तरी यंत्र चालवण्यासाठी व यंत्राची देखभालीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज पडते ह्यातून अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागामध्ये नवीन रोजगाराची संधी निर्माण होते.

Sugarcane Harvester Subsidy Scheme

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे : (Sugarcane Harvester Subsidy Scheme Documents )

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८-अ उतारा
  • बँक पासबुक
  • यंत्राचे कोटेशन
  • जात प्रमाणपत्र ( आवश्यकता असल्यास )

कृषी विद्यापीठीय मार्गदर्शन : ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!


ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अर्ज प्रक्रिया (Sugarcane Harvester Subsidy Scheme Registration Process) :

Sugarcane Harvester Subsidy Scheme 2025

Sugarcane Harvester Subsidy Scheme चा लाभ घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली असून इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची सुविधा मिळते.

पायरी १- महाडीबीटी अधिकृत पोर्टल वर जा किंवा येथे क्लिक करा.

पायरी २-येथे तुम्हाला नोंदणी प्रक्रिया करायची आहे.

  • वेबसाईट च्या मुखपृष्ठावरील “शेतकरी योजना हे” बटन दाबा.
  • पायरी २.१ – शेतकरी बंधुंनो,तम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हला आधी नोंदणी करावी लागेल.
  • त्यासाठी “नवीन अर्जदार नोंदणी” हे बटन दाबा.ह्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबईल क्रमांक प्रविष्ठ करावा लागेल.एकदा का नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली कि तुम्ही अर्ज करण्यासाठी तयार आहात.
  • आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.

पायरी ३) आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.

पायरी ४) आता “अर्ज करा” हे बटन दाबा.

  • येथे तुम्हाला “कृषी यंत्रीकरण” हे बटन दाबायचे आहे.
  • आता तुम्हाला ‘कृषी यांत्रीकरण” या घटका अंतर्गत बरेच पर्याय दिसतील त्यामधून “ऊस तोडणी यंत्र “ घटक निवडायचा आहे.

पायरी ५) आवश्यक माहिती भरा.

  • वैयक्तिक माहिती — तुमचे नाव, पत्ता , मोबईल क्रमांक , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक.
  • जमिनीची माहिती — ७/१२ उताऱ्या वरील जमिनीची माहिती.
  • ऊस लागवडीची माहिती द्या.
  • यंत्राचा तपशील — तुम्हाला येथे यंत्राचे कोटेशन अपलोड करावयचा पर्याय मिळू शकतो.
  • उत्पन्नाचा स्त्रोत
  • घोषणापत्र — सर्व अटी व शर्ती वाचा आणि सहमती असल्याचे नमूद करा.( आटी व शर्ती आम्ही तुम्हाला पुढे सांगितल्या आहे.

पायरी ६) कागदपत्रे अपलोड करा

कागदपत्रांची यादी तुम्हाला दिली आहे. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.स्कॅन प्रत नमूद केलेल्या आकारमानानुसार असणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड (पत्याचा पुरावा म्हणून)
  • ७/१२ उतारा व ८-अ उतारा
  • बँक पासबुक ची प्रत
  • जातीचा दाखला ( आवश्यकता असल्यास )
  • उत्पन्नाचा दाखला
  • कोटेशन (अंदाजित खर्चाचा तपशील.)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वयं- घोषणापत्र

पायरी ७) अर्ज सबमिट करा आणि शुल्क भरा

  • अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री करा.
  • अर्ज सबमिट करा हे बटन दाबा.
  • अर्ज शुल्क भरा ( साधारणता २०-३० रुपयाच्या दरम्यान अर्ज शुल्क आकारले जाते.)
  • पोचपावती सांभाळून ठेवा. (Sugarcane Harvester Subsidy Scheme चे भविष्यात अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ह्याची आवश्यकता असते).

हि प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही ऊस कापणी यंत्रा साठी अनुदान मिळवू शकता. व आपल्या शेताला आधुनिकीकरणची जोड देऊन उत्पादनात वाढ करू शकता.

Sugarcane Harvester Subsidy Scheme अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संगणकीय सोडत पद्धतीने अर्जदारांची निवड करण्यात येते यामुळे निवड प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप कमी होतो व पारदर्शकता टिकून राहते.

लाभार्थ्याला मंजूर झालेली अनुदानाची रक्कम हि थेट बँक खात्यात जमा केली जाते. ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका नाहीशी होते.


ऊस कापणी यंत्र अनुदान योजना अटी व शर्ती (Sugarcane Harvester Subsidy Scheme In Maharashtra ) :

ऊस कापणी यंत्र अनुदान योजना प्रमुख अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :

  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ऊस कापणी यांत्रासाठी अनुदान दिले जाईल. म्हणजे एका कुटुंबाला एकच यंत्र दिले जाईल.
  • सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना योजनेंतर्गत जास्तीत जास्त तीन यंत्रासाठी अनुदान दिले जाईल.
  • पात्र लाभार्थ्यास यंत्राच्या एकूण किमतीच्या २० % रक्कम हि स्वभांडवल म्हणून गुंतवावी लागेल. हि रक्कम स्वतः लाभार्थ्याची किंवा बँकेकडून कर्ज घेतलेली असू शकते.
  • अनुदानावर मिळालेल्या यंत्राचा वापर हा फक्त महाराष्ट्रातच करता येईल.
  • यंत्राची खरेदी केल्यानंतर किमान ६ वर्षापर्यंत यंत्राची विक्री करता येणार नाही. जर तुम्हाला यंत्राची विक्री करावयाची असल्यास शासनाची पूर्व संमती घेणे बंधनकारक राहील. अशा परिस्थितीत अनुदानाची रक्कम हि परत करावी लागू शकते.
  • यंत्राची नियमित दुरुस्ती व देखभाल हि स्वतः लाभार्थ्याला करावी लागेल. लाभार्थी व्यक्तीला यंत्राची खरेदी हि शासनाने प्रमाणित व मान्यता दिलेल्या उत्पादकाकडूनच करावी लागेल.
  • व्ययक्तिक शेतकऱ्याकडे ठरवून दिल्याप्रमाणे ऊस लागवडी खाली शेत्र असणे बंधनकारक राहील किंवा ऊस कापणीच्या सेवा इतरांना पुरवू शकतील हे त्यांना सिद्ध करावे लागेल.

वर सांगितलेल्या सर्व अति व शर्ती चे पालन करणे बंधनकारक राहील. जर पालन न केल्यास दिलेले अनुदान रद्द होऊ शकते व ते परत वसूल केले जाईल ह्याची संबंधितानी दक्षता घ्यावी.


Sugarcane Harvester Subsidy Scheme

ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा तपशील (Sugarcane Harvester Subsidy Scheme) :

शेतकरी बंधुनो, ऊस कापणी यंत्राची साधारणतः किमत हि १ कोटीच्या जवळपास आहे. ह्या योजनेअंतर्गत ऊस कापणी यंत्राच्या एकूण किमतीच्या ४० % किंवा जास्तीत जास्त ३५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाईल.

शेतकऱ्यानो व्यवस्थित समजून घ्या. सुरवातीला सांगितल्या प्रमाणे ६० % वाटा हा केंद्र सरकारचा व ४० % वाटा हा राज्य सरकारचा असेल म्हणजे हा वाटा (Sugarcane Harvester Subsidy Scheme) योजनेच्या एकूण उपलब्ध असलेल्या निधीच्या तरतुदी बद्दल सांगितलेला आहे. समजा, ह्या योजनेवर १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर त्यासाठी ६० % केंद्र सरकार देणार व ४० % राज्य सरकार देणार हे फक्त योजनेच्या अमलबजावणीसाठी जमा केले जातील.

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार ?

समजा, जर ऊस कापणी यंत्राची किमत १ कोटी रुपये आहे.

  • १ कोटीचे ४० % म्हणजे ४० लाख रुपये होतील.
  • परंतु कमाल मर्यादा हि ३५ लाख रुपये आहे.
  • म्हणूनच लाभार्थी शेतकऱ्याला ३५ लाख रुपये अनुदान दिले जाईल.

उर्वरित रक्कम कोण भरणार ?

  • यंत्राची किमत होती १ कोटी रुपये
  • लाभार्थी शेतकऱ्याला ३५ लाख रुपये अनुदान मिळाले.
  • उर्वरित ( १ कोटी – ३५ लाख ) ६५ लाख रुपये हे लाभार्थी शेतकऱ्याला स्वतः भरावयाचे आहे किंवा बँकेकडून कर्ज घेऊन भरावे लागतील .

निष्कर्ष :

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना एक महात्वाकाशी योजना म्हणून समोर येथे आहे. वाढत्या मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी त्याच बरोबर वेळेत उसाच्या गाळपासाठी मोलाचे कार्य बजावत आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून हि योजना बळीराजाला नक्कीच बळकटी देईल. ह्या योजनेच्या अमलबजावणी मध्ये आव्हाने असली तरी शेतकऱ्यांच्या व लहान उद्योजकांच्या सक्रीय सहभागामुळे निश्चितच योजना यशस्वीरीत्या पार पडली जाईल.

ऊस तोडणी यंत्रामार्फत आपण आपल्या शेतीमध्ये आधुनिकीकरणाचा स्वीकार करतो आहे. ह्यातूनच आपण शेतीला अधिक शाश्वत व किफायतशीर बनवु शकतो. हि योजना महाराष्टाच्या ऊस शेतीला एका नवीन पर्वाची सुरवात करून देईल. शेतकऱ्यांना फक्त पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता उद्योजक होण्याची संधी हि योजना प्रदान करते. धन्यवाद !


महत्वाची माहिती :

हेही वाचा :सौर फवारणी पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ! असा करा अर्ज

हेही वाचा :महिलांना ८ लाखाचे अनुदान संधी सोडू नका ! नमो दीदी ड्रोन योजना