Soybean crop in Maharashtra:
Soybean Plant Diseases:महाराष्ट्रातील सोयाबीन हे प्रमुख नगदी पिक असून सुद्धा प्रती हेक्टरी फक्त १२- १४ क्विंटल उत्पादन देते ह्याची कारणे वेगवेगळी असून पिकानं वरील रोग उत्पादन वाढी साठी बाधा ठरत आहे मागील काही वर्षा पासून वातावरणातील बदलांमुळे रोगाचे प्रमाण वाढत असून लागवडी पासून ते पिक काढणी पर्यंत अभ्यासात्मक पद्धतीने पिकांचे नियोजन करणे आत्ता बंधनकारक झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागात उप्तादनाची पातळी हि २४- २५ क्विंटल प्रती हेक्टार असून शेतकरी बंधू ह्यातून चांगले उत्पन्न प्राप्त करतात.Soybean Plant Diseases सोयाबीन ची उत्पादन क्षमता वाढीचे तंत्रज्ञान तेथील शेतकरी वर्गाने अवगत केले आहे.सोयाबीन वर येणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन अभ्यासात्मक पद्धतीने कसे करावे ह्या संबंधीचा हा लेख असून कृषी संशोधकांच्या मदतीने संपूर्ण शास्त्रोत्र पद्धती आपण बघणार आहोत.
वाचा:कीडमुक्त सोयाबीन चा यशस्वी मंत्र

हेही वाचा: फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी
उत्पादन वाढी साठी रोगांचे नियोजन करत असताना रोगांची ओळख अचूक करणे बंधनकारक असते कारण त्यातूनच ९० % प्रश्न सुटत असतो.ह्या लेखात आपण विशेषतः रोगांची ओळख व उपययोजना बघणार आहोत.संपूर्ण माहित कृषी विद्यापिठाच्या तज्ञ संशोधकांच्या मदतीने दिली जात असून शेतकरी बंधूनी १०० % ह्या पद्धतीचा वापर सोयाबीन वरील पिकांच्या नियोजन मध्ये करावा व आपल्या उत्पादनात येत्या हंगामात वाढ करून घ्यावी. कृषी विद्यापीठाच्या नवनवीन तंत्रज्ञान तसेच पिकांच्या सुधारित वाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला join करा.चला सुरवात करूया !
हेही वाचा : सोयाबीन ची शाश्वत लागवड पद्धती
list of soybean diseases
सोयाबीन वरील रोगांचे व्यवस्थापन:

Soybean Crop In Maharashtra
१) कॉलर रॉट :
Soybean Plant Diseases पिकांवर बुरशीची वाढ करणारा हा रोग प्रामुख्याने झाडाच्या मुळा आणि खोडा ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे हा रोग पांढऱ्या बुरशीच्या स्वरूपात आढळत असतो, या ठिकाणी बुरशीचे बीजे सुद्धा आढळून येत असतात.ह्या बुरशीचे प्रमाण अधिक काळासाठी झाडावर चिटकून राहिल्यास कालांतराने झाडे सुकण्यास सुरवात होते व नंतर ती झाडे मरण पावतात.उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या उपाययोजना मध्ये ह्याचे व्यवस्थापन सर्वात आधी करणे गरजेचे असते.
उपाययोजना: soybean cultivation in Maharashtra
वाचा: ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!
- लागवडीआधी बीज प्रक्रिया महत्वाची असते बीज प्रक्रियेमुळे बियाणांची उगवण क्षमता त्याचबरोबर उत्पादकता आणि रोगप्रतिकारशक्ती वाढत असते.सोयाबीन बियाणाच्या बीज प्रक्रियेसाठी करबोक्झीन ३७.७ % + थायरम ३७.५ % DS प्रती किलो बियाणास ३-४ ग्राम चोळा वापरावे. ह्यांचे मिश्रण करून एकजीव बियाणास चोळावे.
- Soybean Plant Diseases लागवडीआधी जमिनीची खोल मशागत करणे गरजेचे आहे. खोल नागरणी करून जमिनीतला कडी कचरा वेचून घ्यावा व नष्ट करावा. मागील हंगामात घेतलेल्या पिकांच्या कडीकचऱ्यामध्ये बुरशीजन्य घटक अधिक काळ टिकून राहतात.त्यामुळे हि प्रक्रिया अत्यंत महत्वाचे आहे.
- ज्या झाडांना रोगांची लागण झालेली दिसत असेल अशी झाडे उपटून नष्ट करणे फायद्याचे असते कारण पिकांच्या अवशेषवर देखील हि रोगग्रस्त बुरशी कित्येक काळ जिवंत राहू शकते व इतर झाडांना रोगग्रस्त करण्याचे कारक बनते.त्यामुळे अशा रोगग्रस्त झाडांना जाळून टाकावे.
२) मुळ व खोडसड :
list of soybean diseases
हा रोग प्रामुख्याने पिके रोपावस्थेत असताना अति प्रमाणात निदर्शनास येत असतो ह्या रोगाची लक्षणे सर्वप्रथम मुळावर आणि जमिनीजवळील खोडावर दिसून येतात.रोगांची लागण झाल्यास काळपट अन भुरकट डाग मुळावर आणि खोडावर दिसू लागतात.
वाचा :अशी करा चारा पिकाची शाश्वत लागवड
Soybean Plant Diseases रोगाची लागण हि थेट मुळावर आणि खोडावर होत असल्यामुळे पिकांना अन्नपुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणूनच रोगांची रोगांची लागण झाल्यानंतर काही दिवसातच रोपांची पाने पिवळसर पडण्यास सुरवात होते वेळीच उपाययोजना न झाल्यास रोपे मरण पावतात किंवा जमिनीजवळील भाग कोलमडल्या जातो.ह्या बुरशीची बीजे रोगट खोडावर आणि मुळावर सुद्धा बघावयास मिळते ह्यातून रोगांची ओळख करू शकता.

उपाययोजना:
- सोयाबीन बियाणाच्या बीज प्रक्रियेसाठी करबोक्झीन ३७.७ % + थायरम ३७.५ % DS प्रती किलो बियाणास ३-४ ग्राम चोळा वापरावे. ह्यांचे मिश्रण करून एकजीव बियाणास चोळावे.
- जमिनीची मशागत करत असताना निंबोळीची ढेप एकत्रित मिसळून घ्यावी.सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा ह्यातून जमिनीला उत्तम प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध होते व रोपांना रोगप्रतिकार शक्ती प्रदान करते पावसाचे प्रमाण कमी असल्यास गरजेनुसार पिकांना पाण्याचे नियोजन करून ठेवावे.
Soybean Plant Diseases
३) पिवळा मोझ्यक :
Soybean crop in Maharashtra
ह्या रोगाची लागण झालेल्या झाडावर फिक्कट हिरव्या व पिवळ्या रंगाचे पट्टे दिसून येत असतात.पिकांची पाने हि शेंड्या कडून पिवळी पडण्यास सुरवात होते.पिकांना येणाऱ्या नवीन पानांचा आकार कमी कमी होत जातो ज्या झाडांना रोगाची लागण झालेली असते ती झाडे कमी प्रमाणात शेंगा उत्पादित करतात.
उपाययोजना:
वाचा :भाजीपाला पिकांची लागवड हि पद्धत वापरा
- पिवळा मोझ्यक हा रोग काही प्रमाणात अनुवांशिक पद्धतीचा असल्यामुळे सुधारित जातीच्या वाणांची निवड सोयाबीनच्या पिक लागवडीसाठी करावी.सुधारित वाणांमध्ये रोगप्रतिकार क्षमता उत्तम असते.त्यासठी पुढील वाणांची निवड करू शकता, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची निवड शेतकरी बंधूनी करावी.त्या भागातील वातावरणासाठी विकसित झालेली वाणे कृषी विद्यापेठे निर्माण करत असते.
- Soybean Plant Diseases रोगांचा प्रादुर्भाव झालेली झाडे सरळ उपटून जाळून टाकावी.शेत तनविरहीत ठेवावे.बांधावरील तन त्याचबरोबर रोगांना पूरक असणाऱ्या वनस्पती नष्ट कराव्यात.यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे आंतरपीकामध्ये मिश्र पिकाची लागवड करावी.
- सापळ्याचा वापर करावा. पिवळ्या रंगाचे चिकटद्रव्याचे सापळे प्रती हेक्टरी १५-२० लावावीत.आंतरप्रवाही कीटक नाशकाचा वापर केल्यास पंढरी माशी व पिवळा मोझ्यक रोगांचा बंदोबस्त एकाचवेळी करता येतो.
वाचा: Agriculture Education १०० टक्के रोजगाराच्या संधी
४) तांबेरा :
Soybean Diseases In Marathi
पश्चिम महाराष्ट्रात ह्या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असून महाराष्ट्रातील इतर भागात साधारण प्रादुर्भाव बघावयास मिळतो.ह्या बुरशीजन्य रोग ताबेरा पासून पिके दरवर्षी आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडतात Soybean Plant Diseases .ह्या रोगामुळे किमान ७०-८० % पिकाचे नुकसान हमखास होते म्हणूनच ह्याचे नियोजन उत्पादनवाढीसाठी अभ्यासात्मक पद्धतीने व्हावे हे खूप महत्वाचे आहे.

पिकांना रोगाची लागण झाल्यास पुढील प्रमाणे लक्षणे जाणवतात.
soybean cultivation in Maharashtra
- पानांच्या खालच्या बाजूने तपकिरी ठिपके दिसू लागतात व प्रामुख्याने जमिनी जवळील पानावर दिसतात.हळूहळू ह्या रोगाचा प्रसार जसा होत जातो तसे तसे झाडाच्या शेंड्यावर देखील हीच परिस्थती बघावयास मिळते.
- ह्या रोगांसाठ वातावरण सुलभ असल्यास झाडांची सर्वच पाने ताबूस होण्यास सुरवात होते पिक रोगग्रस्त झाल्यास मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते.ह्या रोगांचा प्रसार हवे मार्फत होत असतो त्यामुळे सर्वच भागावर ह्याचा प्रादुर्भाव जाणवतो.
- ह्या रोगाची वाढ हि हवेतील आद्रतेमुळे त्याच बरोबर उष्णता देखील या रोगासाठी कारणीभूत ठरते.बागायती शेत्राजवळ पिक घेत असल्यास ह्या रोगाचे प्रमाण त्या भागात सर्वाधिक प्रमाणात असते
- Soybean Plant Diseases ह्या रोगाचा प्रसार खरीप हंगामात सर्वाधिक प्रमाणात बघावयास मिळतो.दमट व अद्रतायुक्त वातावरण ह्या रोगास पोषक मानले जाते.रोगांचा प्रादुर्भाव मुख्यता झाडाच्या पानावर त्याच बरोबर नवीन शेंगावर व कोवळ्या खोडावरहि होत असतो.
उपाययोजना:
ह्या रोगाची नुकसान पातळी सर्वाधिक असल्यामुळे सुरवातीपासूनच नियोजन करणे फायद्याचे ठरते त्यामध्ये रोगप्रतिकारक्षमता असलेल्या वाणांची निवड हि रोगप्रतिबंधक म्हणून काम करते.कृषी विद्यापीठाने तांबेरा रोग प्रतिबंधक वाणे विकसित केली असून आपल्या जवळच्या विद्यापीठात अवश्य भेट द्या.
- रोग प्रतिबंधक वाणांची निवड हि उत्पादन वाढी साठी लागणाऱ्या ८० % गोष्टींची पूर्तता करून टाकते. Soybean Plant Diseases रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी झाल्यानंतर ४५-५० दिवसांनी कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्राम + १० लिटर पाणी हि फवारणी रोगास प्रतिबंधक म्हणून काम करते.
- रोगाची लागण झाली असल्यास पुढील फवारणी करावी.त्यासाठी
- १) प्रोपिकोन्याझोल २५ % EC (१०मिलि) + १० लिटर पाणी.
- २) क्रीसोय्कझीम मिथाईल ४४.३ % AC (१०मिलि) + १० लिटर पाणी
- यापैकी कुठल्याही एका औषधाची फवारणी करू शकता. हि औषधीय फवारणी तांबेरा रोगासाठी उत्तमरीत्या फायदेशीर ठरते.
५) बुरशीजन्य ठिपके :
list of soybean diseases
Soybean Plant Diseases ह्या रोगाची लागण झाल्यास बुरशीजन्य पानाला छिद्र पडण्यास सुरवात होते सर्कोस्पोरा आणि अल्टरनेरीया ह्या बुरशीच्या जातींमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो ह्या रोगासाठी लागण झाल्यानंतर सुरवातीला झाडाच्या पानावर आणि झाडाच्या खोडावर त्याच बरोबर शेंगावरती तपकिरी ठिपके दिसून येतात. ठिपक्याचा आकार विशिष्ट असतो त्यामुळे तेथे गडद वलय बघावयास मिळते.

उपाययोजना:
- बीजप्रक्रिया करबोक्झीन ३७.७ % + थायरम ३७.५ % DS प्रती किलो बियाणास ३-४ ग्राम चोळा वापरावे. ह्यांचे मिश्रण करून एकजीव बियाणास चोळावे.
- लागवडीसाठी उत्तम निरोगी जातीच्या वाणांची निवड करावी, तत्पूर्वी उगवण क्षमता तपासून घ्यावी.पायरेक्लोस्ट्रोबिन २० % WG या बुरशी नाशकाची १० ग्राम + १० लिटर पाणी हि औषधीय फवारणी बुरशीजन्य ठीपक्यासाठी फायदेशीर आहे.
६) शेंगावरील करपा :
ह्या रोगास पॉड ब्लाईट असे म्हटले जाते.या रोगामुळे पिकावर ओबडधोबड आकाराचे ठिपके झाडाच्या खोडावर आणि शेंगावर निर्माण होत जातात.हि ठिपके लालसर किंवा गडद तपकिरी रंगाचे दिसतात.रोगांची लागण झालेली झाडाच्या शेंगा पिवळसर तपकिरी होतात.
पिकावर ह्या रोगांचा परिणाम हा दाने भरण्यास विलंब होणे, बी व्यवस्थित तयार न होणे इत्यादी बाबीमध्ये होत असतो.
उपाययोजना:
Soybean Plant Diseases बीजप्रक्रिया करबोक्झीन ३७.७ % + थायरम ३७.५ % DS प्रती किलो बियाणास ३-४ ग्राम चोळा वापरावे. ह्यांचे मिश्रण करून एकजीव बियाणास चोळावे.
१) थायोफिनाईट मिथाईल ७० % WP (२०ग्रम) + १० लिटर पाणी
२) टेबुकोनाझोल २९.५ % EC (१०मिलि) + १० लिटर पाणी
३) हेक्झाकोनोझोल ५ % EC (१०मिलि) + १० लिटर पाणी
४) पायरोक्लोस्ट्रोबिन २० % WG (१०ग्रम) + १० लिटर पाणी
वरील पैकी कुठल्याही एका औषधाची फवारणी शेतकरी बंधूनी करावी.
७) सोयाबीन मोझ्यक :
महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षा पासून मोझ्यक ह्या व्हायरसमुळे ह्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन मोझ्यक हा विषाणू अति प्रमाणात नुकसान देत असून. बिगर हंगामी लागवडीमध्ये ह्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते.उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या बाबीमध्ये ह्या रोगाचे विषाणू विपरीत परिणाम टाकत आहेत.ह्या रोगाची लक्षणे पुढील प्रमाणे.
Soybean Plant Diseases ज्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या झाडाची पाने ओबडधोबड असतात.खालच्या भागातून पानाच्या कडा वाकतात पाने ऋष्क होऊन त्यामध्ये कडकपणा जाणवतो. रोगग्रस्त झाडाना येणारी नवीन पाने आकाराने लहान असतात आणि पानावर फिक्कट पिवळे व हिरवे पट्टे येतात.त्यामुळे झाडाची वाढ खुटण्याचे प्रमाण अधिक असते.
रोगाचा प्रसार :
Soybean Plant Diseases ह्या रोगाचा प्रसार किडी मार्फत होत असतो. प्रामुख्याने मावा किडीमुळे झाडे रोगग्रस्त होतात. त्याच बरोबर थोड्या प्रमाणात बियामार्फत देखील ह्या रोगास चालना मिळते.
उपाययोजना:
पेरणीपूर्वी बियाणाची तपासणी करून घ्यावी जसे कि उगवण क्षमता रोग प्रतिकारक्षमता असलेल्या बियाणाची निवड करावी.मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा.रोगास पूरक असलेली वनस्पती शेतातून काढून नष्ट करावी.सोयाबीनची बिगर हंगामात लागवड न करणे फायद्याचे ठरते.
पिक काढणीची पद्धत :

Soybean Diseases In Marathi
सोयाबीनचे पिक काढणीला आले असता झाडाची पाने हि पिवळसर होतात व झाडाची पाने गळायला सुरवात होते.शेंगा परिपक्व झाल्या कि त्यांना तांबूस काळसर रंग प्राप्त होतो.हि परिस्थिती शेतातील पिकांमध्ये बघावयास मिळत असल्यास पिक काढणीस तयार झाले आहे असे समजावे. सोयाबीनची काढणी हि योग्य वेळेतच होणे बंधनकारक आहे.
Soybean Plant Diseases काढणी हि वेळेच्या आधी केल्यास दाण्यांना अपक्वता राहू शकते व हीच काढणी उशिरा होत असल्यास पिकांच्या शेंगा फुटण्याचे प्रमाण वाढू शकते आणि ह्याचा परिणाम उत्पादनावर थेट होत असतो.म्हणूनच दोन्ही बाबीमध्ये समायोजन साधून पिकांची काढणी करणे महत्वाचे आहे.
पिके काढणीस तयार झाल्यावर ते विळ्यानी कापावे व त्यांना उन्हात व्यवस्थित वाळू द्यावे. पिकांची काढणी झाल्याबरोबर लगेचच त्यांचा ढीग बनणु नये कारण ह्याचा परिणाम हा बियाणाच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम करत असतो.
Soybean Diseases In Marathi
वाळलेल्या पिकांची खळ्यावर पसरवावे व नंतर त्याची मळणी करावी मळणी करते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे जर तुम्ही मळणीसाठी यंत्राचा वापर करत असाल तर ४०० RPM प्रती मिनिट इतक्याच पंख्याचा वापर करावा या पेक्षा जास्त RPM असू नये. मळणी नंतर लगेचच माल पोत्यात भरू नये बियाणांना चांगली उन दाखवणे गरजेचे असते.बियाणे उन्हात वाळवलेली असताना किमान त्यांच्या ओलाव्याचे प्रमाण १० टक्के शिल्लक राहिल्यावर बियाणांची पोत्यात साठवणूक करावी.
Soybean Plant Diseases
पोती पूर्णपणे कोरडी असावी ह्याची दक्षता घ्यावी भरलेल्या पोत्याची साठवणूक हि कोरड्या ठिकाणी सावलीत करावी पोती उन्हात ठेऊ नये.पोत्याची रचना करत असताना साठवणूक हि एका पोत्यावर दोन पोत्यापेक्षा अधिक पोती ठेऊ नयेत.दोन पोत्यापेक्षा अधिक पोती खालच्या मालाची क्वालिटी खराब करते.
अशाच दर्जेदार माहिती साठी आमच्या whatsapp ग्रुप ला join करा ! धन्यवाद.