Soybean Market|सोयाबीन उत्पादन खर्चात वाढ

soybean market in marathi:

soybean market:मागील ५ वर्षात सोयाबीन ची उत्पादकता ३० – ३५% घटली असून केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी घसरण केली आहे,सोबतच सोयबीन च्या ढेपे ची निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे सोयबीन ला हमीभाव मिळणार का असा प्रश्न शेतकरी वर्गात उत्पन होत आहे. soybean market मध्ये भारताची ओळख म्हणजे जगातील सर्वाधिक सोयाबीन खाद्यतेलाचा वापर करणारा तसेच आयात करणारा देश आहे .भारत ६० ते ६२% तेल आयात केले जाते ४०% खाद्य तेल देशात होते.सध्या परिस्थिती बघता आयात दिवसेंदिवस वाढत चालली आहे.महाराष्ट्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी साठी ८ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ दिली असून शेतकरी बांधूनी याकडे लक्ष द्यावे

soybean market

वाचा ड्रोन अनुदान योजना

ई-समृद्धी पोर्टल Official website

उत्पादन घटले खर्च दुप्पट झाला:

सातत्यने होणारा पाऊस ,मजुरांचे दर ,वातावरणातील दमाटपना ,सोयाबेअन च्या पिकावर आलेला रोग व किडींचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे या वर्षी (soybean market) सोयाबीन उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला आहे .रोगांचे व किडांचे व्यवस्थित पणे नियोजन न झाल्यमुळे उत्पादनात घट दिसू लागली आहे

मध्य प्रदेशात यावेळी सरासरी प्रती एकरी ७ – ८ क्विंटल उत्पादन झाले असून महाराष्ट्रला मात्र यावेळी प्रतिएकरी ३ – ४ क्विंटल वर सामाभान मानावे लागत आहे अशीच स्थिती देशातील सोयाबीन उत्पादक राज्यात पाहायला मिळत आहे.

सोयाबीन सोबत देशांतर्गत बाजारात इतर तेलबियाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या शक्ली वापरण्यात आल्या, याचाच परिणाम देशातील बाजारात सोयाबीनचे दर कायम दबावात राहाल्यचे दिसून आले, परिणामी शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी अर्ध्यावर येऊन पोहचले

बियाणे खर्च :

soybean Market
  • देशातील (soybean market) सोयाबीन च्या प्रमुख बाजारपेठ पैकी एक म्हणजे लातूर जाने २०२१ ते जून २०२२ पर्यंत सरासरी सोयबीन ला भाव ८००० रुपये होता आणि सोयाबीन बियाणाच्या किमती कमीतकमी १००० रुपये प्रती क्विंटल होत्या .
  • डीएपी खात प्रामुख्याने सोयाबिंन पिकासाठी शेतकरी प्रामुख्याने वापरतो, राज्यात सन २०२१ मध्ये डीएपी खताच्या बॅगे ची किमत १२०० रुपये होती ,त्यनुसार बघायचे झाल्यास एकरी ३००० रुपये खर्च यायचा.
  • सोयाबीन पिकासाठी कृषी विद्यापीठाने प्रती हेक्टरी १० ते १५ किलो सल्फर वापरण्याची शिफारस केली होती
  • खतांचा एकूण खर्च लक्षात घेता, त्यात सल्फर खताच्या खर्चाचा समावेश केल्यास.पुढील खरीप अहवालात सांगितलेल्या खर्चा पेक्षा जास्त खर्च झाल्यचे दिसून येत आहे.

सोयाबीन ला मिळालेला सरासरी दर

२०१९ -२०३४२० प्रतिक्विंटल
२०२० -२१४१६६ प्रतिक्विंटल
२०२१ -२२५४९१ प्रतिक्विंटल
२०२२ -२३४९५१ प्रतिक्विंटल
२०२३- २४४१५० प्रतिक्विंटल

सोयाबीन उत्पादन :

२०१९ -२०९३.०० लाख टन
२०२० -२११०४.५६ लाख टन
२०२१ -२२११८.८९ लाख टन
२०२२ -२३१२४.११ लाख टन
२०२३- २४११०.०० लाख टन

soybean sowing

उपाययोजना :

१) सोयाबीन चा सरासरी उत्पादन खर्च सध्या प्रतिएकर २० हजाराच्या जवळ पास आहे उत्पन मात्र १२ ते १५ हजार होताना दिसत आहे

२) भारतीय शेतकऱ्यांना GM सोयाबीन उत्पादनाला परवानगी द्यावी कारण भारत सरकारने GM सोयाबीन ढेपेला आयात करण्यची परवानगी दिली आहे.

३) शेतकऱ्यांचे उत्पन वाढीसाठी भारत सरकारने सोयाबीन सह इतर पिकला सी-2 अधिक ५०% नफा या प्रमाणे हमीभाव किमती देऊन शेतमालाच्या खरदेची शाश्वती द्यावी.

४) कमी दरात कृषी निविष्ठा करमुक्त करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


soybean sowing मागील वर्षापासून सोयाबीन चे दर किमान आधारभूत किमती च्या आसपास रेंगाळत आहे. भारत सरकारने यावर्षी सोयाबीन ची MSP किमत ४८९२ रुपये जाहीर करून सुद्धा दर मात्र ४७०० च्या आसपास आहे हा फरक सोयाबीन ढेप अयातामुळे होत असल्याचे सांगण्यात येते.

जातातील देश सोयाबीन उत्पादनात प्रगती करत असताना जगाच्या तुलनेत भारताचे सोयाबीन उत्पादनाची स्थिती चिंताजनक आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचे ची उत्पादकता अत्यंत कमी झाली आहे.

देशात सन २०२४ मध्ये १० क्विंटल प्रतिहेक्टरी सोयाबीन चे पिक घेण्यात आले ,म्हणजेच देशात ४०,००० रुपये प्रतीहेक्टर मिळाले. सर्वच पिकांच्या उत्पादन खर्चात जागतिक बाजारपेठेत वाढ झाली आहे.


कृषी विद्यापीठाच्या शिफारशी :

सोयाबीन चे उत्पादन कमी होण्याची प्रमुख करणे:

१) आपल्या भागात सोयाबीन ची जास्तीत जास्त लागवड हि कोरडवाहू शेत्रातच होते.

२) शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न होणे.

३) सोयाबीन ची लागवड करत असताना हेक्टरी झाडांची संख्या अचूक प्रमाणात नसणे.

४) सोयाबीन लागवडीच्या आधी बीज प्रक्रिया न करणे आणि बियांची उगवण क्षमता न तपासणे

५) पिकांच्या व्यवस्थापन करत असताना खतांचे ओरमान अत्याधिक असणे किंवा शिफारशी नुसार खाते न देणे.

६) कीड, रोग आणि तनाचा बंदोबस्त अभ्यासात्मक नसणे.

सोयाबीनच्या उत्पादनावर वरील सर्व घटक परिणाम करत असतात.सोयाबीन चे उत्पादन वाढवण्यासाठी आपण समोर कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन बघणार आहोत. ह्या सोयाबीन पिकाच्या व्यवस्थापनाचा अभ्यासात्मक वापर केल्यास नक्कीच शेतकरी बंधूना ह्याचा फायदा होईल. सांगितलेली संपूर्ण माहिती हि कृषी विद्यापीठाच्या संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली सांगितली जात असून शेतकऱ्यांनी माहिती पूर्ण वाचा व आपल्या पिकांच्या नियोजनामध्ये नक्कीच समावेश करा.! चला सुरवात करूया !

सोयाबीन पिकासाठी लागणारे हवामान:

सरासरी २५-३० सें तापमान व सूर्यप्रकाश हे सोयाबीन पिकासाठी उत्तमरीत्या संवेदनशील असते. ७०% पेक्षा अधिक सापेक्ष आद्रता हि सोयाबीन च्या वाढीसाठी उत्तम असते.परंतु, संशोधनातून असे निदर्शनास आले आहे कि तापमान हे ३५ % च्या वर असल्यास सोयाबीन ह्या पिकाची वाढ पाहिजे तशी होत नाही.

सोयाबीन पिकांच्या वाढीसाठी जमिनीचे तापमान हे १५ -१६ सें असायला पाहिजे. यामुळे त्यांची उगवण क्षमता सुधारते आणि पिके अधिक सक्षम होतात.

Soybean Market पांढऱ्या माशीसाठी ३८ डिग्री सें तापमान अनुकूल असते.

जमिनीची निवड करत असताना ह्या गोष्टी लक्षात घ्या.

सोयाबीनच्या पिकासाठी जमीन हि पाण्याचा निचरा वैवास्थित होणारी मध्यम ते भारी जमिनीची आवश्यकता असते. त्याच बरोबर गाळाच्या जमिनीत सोयाबीन चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यानो अशाच पद्धतीच्या जमिनीत सोयाबीन पिकाची लागवड करावी

हलक्या जमिनीची निवड हि सोयाबीन लागवडी साठी करू नये. हलक्या जमिनीत उत्पादन कमी होत असते. हलक्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकाची उगवण क्षमता ढासळते.

जमिनीचा सामू सोयाबीन च्या लागवडी साठी ६-८ च्या दरम्यान असल्यास उच्च उत्पादन घेता येते. सोयाबीन चे उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी जमीन भुसभुशीत करणे महत्वाचे आहे. उभी व आडवी जमिनीची खोल नागरणी केल्यास उत्तम फायदा होतो.

सोयाबीनसाठी सुधारित वाणांची निवड करणे :

Soybean Market

शेतकरी बंधुनो, सोयाबीन पिकाच्या लागवडी साठी वाणाची निवड हि कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहिती नुसार करावी किवा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची निवड केल्यास अधिक उतपादन घेता येईल, कारण कृषी विद्यापीठे त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करूनच वाणांची निर्मिती करत असतात.

सोयाबीनच्या पेरणी चा कालावधी:

साधारणता पावसाळा सुरु झाल्यावरच जून महीन्याच्य तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सोयाबीनची पेरणी करावी. ह्या काळात जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो त्यामुळे हा कालावधी उत्तम रित्या बियाणांछी उगवण क्षमता वाढवतो. Soybean Market सोयाबीन पिकासाठी जमिनीतला ओलावा उत्तम असणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधूनो, पेरणी करून पिकांना पाणी देण्याचे शक्यतो टाळावेच कारण पाणी दिल्यास त्यांची उगवण क्षमता कमी होती, शक्यतो वाफसा तयार करा आणि त्यामुळे पिकांची उत्पादकता व उगवण क्षमता देखील वाढते. वाफ्यावर पिके अधिक सक्षम होतात.

बीज प्रक्रिया कशी करायची :

Soybean Market

बुरशीजन्य रोगांपासून सोयाबीनचे सरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते. १ किलो बियाणासाठी पुढील उपाय करावा: कार्बोकझीम ३७.५ % + थायरम ३७.५% डीएस बुकटी करून बियाणास चोळावे.

बुरशीजन्य बीज प्रक्रिया झाल्यानंतर थायमिथोक्झाम ३० % ह्या कीटक नाशकाची देखील बीज प्रक्रिया करावी.

बियाणांचे प्रमाण किती असावे ?

Soybean Market

सोयाबीनची अंकुर क्षमता हि इतर पिकांच्या तुलनेत कमी असते त्यामुळे कमीत कमी ७० % उगवण क्षमता असलेल्या पिकांची निवड करावी. प्रती हेक्टर बियाणांचा विचार केल्यास हे प्रमाण ६० ते ७५ किलो च्या आसपास असावे.

सोयाबीन पिकासोबत आंतरपिकांमध्ये तुरीची लागवड अधिक फायदेशीर असल्याचे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. लागवड करत असताना ३ ओळी सोयाबीनच्या ठेवल्या तर त्यात १ ओळ हि तुरीची ठेवावी.

पिकांचे संरक्षण :

वातावरणातील सततच्या बदलानमुळे पिकावर विपरीत परिणाम होतो. यातून पिकांची उत्पादकता कमी होते व परिणामी आपल्याला उत्पन्न कमी मिळते ह्यासाठी कृषी विद्यापीठाने सविसात मार्गदर्शन केले आहे. ते तुम्ही नक्की वाचा.

उत्कृष्ट सोयबीनच्या उत्पादनासाठी हे नक्की करा

जाणून घ्या कीडमुक्त सोयाबीन चा यशस्वी मंत्र !

सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा