Soybean Crop In Marathi|उत्कृष्ट सोयबीनच्या उत्पादनासाठी हे नक्की करा

Soybean Farming In Maharashtra:

Soybean Crop In Marathi:महाराष्ट्रातील गळीत पिकापैकी सोयाबीन हे प्रमुख पिक आहे.जवळपास ४५ते५० लाख हेक्टार शेत्रावर खरीप हंगामात सोयाबीन चे पिक घेतले जाते.इतक्या मोठ्या प्रमाणात पिकाची वाढ होण्याचे कारण,सोयबीन च्या उत्पादनाचा खर्च कमी असून भरपूर प्रमाणात उत्पन्न देणारे सोयाबीन हे एक नगदी पिक आहे.Soybean Farming In Maharashtra भारतात होणाऱ्या सोयाबीन च्या उत्पादनापैकी ९० % उत्पादन हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ह्या दोनच राज्यात होते.फक्त महाराष्ट्राचा विचार केल्यास सोयाबिनची उत्पादन क्षमता हि २५-३० क्विंटल प्रती हेक्टर एवढी आहे.परंतु आपल्या कडील बऱ्याचशा भागामध्ये सोयाबीनचे उत्पादन १२-१४ क्विंटल प्रती हेक्टर च्या जवळपास बघावयास मिळते.

ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!

soybean crop in Marathi

Soybean Crop In Maharashtra

उत्पादन कमी होण्याची प्रमुख करणे:

वाचा:सुधारित चारा पिके लागवड पद्धती

  • जास्तीत जास्त लागवड हि कोरडवाहू शेत्रात करणे
  • शेतीमधील तंत्रज्ञानाचा अल्प प्रमाणात वापर
  • हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात नसणे
  • लागवडी आधी बीजप्रक्रिया न करणे,वाणांची उगवण क्षमता न तपासणे
  • खताचा वापर जास्त प्रमाणात करणे किंवा शिफारशीनुसार खताचे प्रमाण नसणे.
  • किंड,रोग आणि तन इत्यादी बाबीचा अभ्यासात्मक बंदोबस्त न करणे.

हेही वाचा:कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन

वरील सर्व घटक सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम करत असतात,Soybean Crop In Marathi शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी अभ्यासात्मक पद्धतीचा वापर कसा करावा ह्या संबंधित संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत,पुढील सर्व उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या बाबींची माहिती हि कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सांगितली जात असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सांगितलेल्या अभ्यासात्मक पद्धतीचा अवलंब केल्यास १०० % सोयाबीन पिक उत्पादनात भरघोस वाढ करता येईल.अशाच दर्जेदार व उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला Join करा.चला सुरवात करूया !


Soybean Farming In Maharashtra:

हेहीवाचा: पिक उत्पादनात ५० % वाढ करा

soybean crop in Marathi

हवामान:

  • तापमान व सूर्य प्रकाशाला सहन करणारे सोयाबीन हे पिक सरासरी २५-३५ डिग्री सें. पर्यंत उत्तमरित्या संवेदनशील असते.सोयाबीनच्या पिक वाढीसाठी ७० % पेक्षा अधिक सापेक्ष आद्रता असल्यास सोयाबीनची वाढ उत्तम रित्या होते.परंतु ३५ डिग्री सें. पेक्षा अधिक तापमान हे उत्पादनात घट करते.
  • सोयाबीनच्या पीकाला २५-३० डिग्री सें तापमान दिवसा असल्यास उत्पादन वाढीस भरपूर फायदा होतो.१५ते १६ डिग्री तापमान जमिनीचे असायला पाहिजे त्यामुळे बियाणाची उगवण क्षमता वाढते व बियाणे चांगले येतात.
  • Soybean Crop In Marathi जमिनीचे तापमान हे ३२ डिग्री पेक्षा अधिक असल्यास पिकांच्या मुळावरील गाठी व नत्राचे स्थिरीकरण बिघडते.
  • ३८.७ डिग्री सें तापमान पांढऱ्या माशी करिता कोरडे वातावरण निर्माण करते.

कोणत्या जमिनीची निवड करावी:

Soybean Cultivation In Maharashtra

सोयाबीनचे पिक हे मध्यम ते भारी पाण्याचा निचरा चांगला होणारी त्याच बरोबर गाळाच्या जमिनीत सोयबीन चे उत्पादन अधिक होते.अशाच प्रकारच्या जमिनीची निवड सोयाबीन लागवडी साठी करावी.

सोयाबीन लागवडी साठी हलक्या जमिनीची निवड करू नये अशा जमिनीत उत्पादन कमी होते.शेतजमिनीमध्ये पाणी साठून राहत असल्यास सोयाबीनच्या उगवण क्षमते वर विपरीत परिणाम होत असतो यातून पिकांची उगवण क्षमता बिघडते.

सोयाबीनच्या लागवडी साठी जमिनीचा सामू हा ६- ८ च्या दरम्यान असावा सोयाबीन चे पिक अशा जमिनीत भरघोस उत्पादन देते.

जमिनिची मशागत:

Soybean Crop In Marathi जमीन भुसभुशीत करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी उभी व आडवी जमिनीची खोल नागरणी करावी(दोन पाळ्या) शेणखत (चांगले कुजलेले) किंवा कंपोस्ट खताचा हेक्टरी ३० गाड्याचा वापर करावा.


सुधारित जातीची वाणांची निवड:

Soybean Farming In Maharashtra

शेतकरी बंधूना विनंती आहे कि,कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या वाणांची निवड करावी.कृषी विद्यापीठांना त्या भागातील वातावरण,जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण यांचा पुरेपूर अभ्यास असतो.म्हणूनच ज्या भागात लागवड करत आहात त्या भागातील कृषी विद्यापीठाकडून वाणांची खरेदी करावी.हि एकच गोष्ट तुम्हाला पिक उत्पादन वाढी साठी लागणाऱ्या ९० % बाबींची पूर्तता करते.


बीज प्रक्रिया अशी करा:

सोयाबीन पिकाचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पुढील उपाय करावा:( १ किलो बियाणास ) कारबोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५ % DS २ ते ३ ग्राम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्राम भुकटी करून बियाणास चोळावे.

जीवाणू खते:

Soybean Farming In Maharashtra

द्विदलवर्गीय पिकामध्ये सोयाबीनचा समावेश होत असल्यामुळे नत्राचे स्थिरीकरण करणारे जीवाणू हे पिकाच्या मुळावर येत असतात यामुळे मुळावर गाठीचा दर्जा उंचावतो.यासाठी आपल्याला कृत्रिम रित्या जीवाणू संवर्धक बियाणास चोळणे आवश्यक असते.

त्यासाठी पेरणी आधी बियाणे थोडे ओलसर करून घ्यावीत व रायझोबियम २५ ग्राम, जीवाणू विद्राव्य स्फुरद २५ ग्राम आणि ४ ग्राम अमोनियम म्यलीब्डेट बियाणास एकजीव चोळावे.

हि प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे सावलीत वाळवावे व नंतर पेरणी करावी अशा पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास मुळावर गाठींची चांगली वाढ होण्यास फायदा होतो.


सोयाबीन पेरणी कशी करावी:

soybean crop in Marathi

Soybean Cultivation In Maharashtra

  • पावसाळा सुरु झाल्यानंतर जून महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याच्या सुरवातीला पेरणी करावी.ज्यावेळी जमिनीला ओलावा कायम असतो अशा वेळेस सोयाबीन बियाणाची पेरणी करावी.जमिनीला चांगला ओलावा असणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • पेरणी करून पाणी देण्याचे टाळावे असे केल्यास बियाणांची उगवण क्षमता कमी होते व उत्पादनावर ह्याचा विपरीत परिणाम होत असतो. Soybean Crop In Marathi सोयाबीन चे पिक घेत असताना वाफसा तयार होईल ह्याची दक्षता घ्यावी.वाफ्यावर पिकांची उगवण हि अधिक चांगल्या प्रकारे होत असते व रोपे सशक्त होतात म्हणूनच शक्यतो रोपांची उगवण हि वाफ्यावर होऊ द्या. रोपांची उगवण झाल्या नंतर फक्त गरज असल्यास पिकांना पाणी द्यावे.पेरणी वेळेवर होणे उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

असे करा भाजीपाला पिकाचे नियोजन

  • उप्तादन वाढी साठी दर हेक्टरी रोपांची संख्या हि ४ – ४.५ लाख एवढी असणे आवश्यक आहे.म्हणूनच त्यांचे नियोजन अभ्यासात्मक असणे गरजेचे असते.त्यासाठी पेरणी हि दोन ओळीत पाभरीने ४५ सेमी ह्या अंतराने करावी आणि दोन रोपांमधील अंतराचा विचार केल्यास हे अंतर ५ सेमी असावे.दोन रोपमधील अंतर हे ५ सेमी पेक्षा अधिक असू नये.
  • Soybean Farming In Maharashtra पेरणी करताना बियाणे हि खोल पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी बियाणे हि जास्तीत जास्त ४ सेमी पर्यंत जमिनीत पुरवावे.कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची निवड करावी.त्या भागानुसार बियाणे विद्यपीठ व कृषी संशोधन केंद्रात उपलब्ध आहे.वाणांची यादी वाचा

सोयबीन बियाणाचे प्रमाण:

इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनची अंकुर क्षमता हि अल्प प्रमाणात असते.यावेळी बियाणांची निवड महत्वाची ठरते.कमीतकमी ७० % बियाणांची उगवण क्षमता असणे गरजेचे आहे.त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेली बियाणे वापरल्यास उत्तम उत्पादकता साधण्यास मदत मिळते.

बियाणे प्रती हेक्टरी ६० ते ७५ किलो असणे पेरणीसाठी बंधन कारक आहे.शेतकरी बंधुनो,जर तुम्ही टोकन करावयाचा विचार करत असल्यास बियाणांची संख्या हि ४५-५० किलो एवढी ठेवावी.पेरणी आधी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी.घरी सुद्धा तपासू शकता.


सोयबीनला लागणारी भरखते:

सोयाबीन ची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पेरणीच्या आधी ५० किलो नत्र , ७५ किलो स्फुरद ,व पलाश ४५ किलो प्रती हेक्टरी देणे गरजेचे असते.ह्या खताच्या मात्रा जमिनीतून देणे गरजेचे आहे.


आंतरमशागत:

soybean crop in Marathi

उत्पादन वाढवण्यासाठीचा महत्वाचा घटक म्हणजे आंतर मशागत यामध्ये तनाचा बंदोबस्त कसा करायचा ते आपण बघू तनाचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्र पुढील शिफारशी करतात.पेरणी करत असताना क्रियाशील घटक पेंडीमेथायालीन १.५ किलो प्रती हेक्टर ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी जमिनीवर करावी.

Soybean Crop In Marathi सोयाबीन पिकाची उगवण झाल्या नंतर किमान २० दिवसांनंतर कोळपणी करून खुरपणी करून घ्यावीशेत तनविरहीत ठेवावे किंवा सोयाबीन पिकाची उगवण झाल्यानंतर बरोबर २१ दिवस पूर्ण झाल्यावर क्रियाशील घटकाची फवारणी करावी त्यामध्ये इम्यझेथायपर ०.१५ किलो ६०० लिटर पाण्यात मिसळवून( प्रती हेक्टर) तनावर फवारणी केल्यास अत्यंत लाभदायक फायदा मिळतो.


आंतर पिक:

Soya Plant In Maharashtra

सोयाबीन पिकासोबत आंतर पिकामध्ये तुरीची लागवड अधिक फायदेशीर असल्याचे संशोधनातून दिसून आले याचे प्रमाण ३ ओळी सोयाबीनच्या असल्यास १ ओळ हि तुरीची असावी.


पिक संरक्षण:

Soybean Farming In Maharashtra

आपल्या महाराष्ट्रात सतत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे पिकांवर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो.उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट यातून होत असते.म्हणूनच सोयाबीन पिक घेत असताना पिकावर येणाऱ्या किडींचे व रोगाचे संपूर्ण ज्ञान आपल्याला अवगत असणे खूपच गरजेचे आहे.

अभ्यासात्मक पद्धतीने किडींचे व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे यासाठीची माहिती आपल्या वेबसाईट व WhatsApp Group ला टाकली आहे.

फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी

शेतकरी बंधुनो,उत्पादनात वाढ करण्यासाठी पारंपारिक पद्धती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादन पातळी गाठू शकता.त्यासाठी लागवडीचे किडींचे व रोगाचे शास्त्रोत्र पद्धतीने नियोजन असणे खूप गरजेचे आहे.

उत्पादन वाढवायचे असल्यास कठोर परिश्रमा सोबतच हुशारीने काम करणे हि आजच्या काळाची गरज आहे.whatsapp group ला follow करा, कृषी संबंधित शास्त्रोत्र माहिती थेट विद्यापीठ व कृषी संशोधकांच्या मदतीने शेतकऱ्यान पर्यंत पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे.धन्यवाद !

Visit महाराष्ट्र शासन कृषी विभाग.