Soybean Crop In Maharashtra:
Soybean Crop Diseases:महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी सोयाबीन हे एक पिक आहे सोयाबीन चे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात होत असले तरी शेतकऱ्याच्या हातात मात्र पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही याला जबाबदार कोण आहे? शेतकरी बंधुनो तुम्ही आपल्या शेतीची उत्पादकता कशी वाढवता येईल यावर काम केल पाहिजे सोयाबीन वरील किडीनबाबतचा ह्या लेखातील माहिती कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली दिली जात असून ह्या अभ्यासात्मक पद्धतीचा वापर कीड नियंत्रण पद्धतीत १०० % करू शकता आणि कराच.Soybean Crop Diseases महाराष्ट्रातील सोयाबीन ची उत्पादकता हि २५-३० क्विंटल प्रती हेक्टर आहे परंतु आपल्याकडे १२ ते १४ क्विटल प्रती हेक्टर इतकेच उत्पन्न होताना दिसते.

वाचा:१०० % कापसाची किड नियंत्रण पद्धती
सोयाबीन वरील किडींचे नियोजन करत असताना त्याची ओळख समजणे अत्यंत महत्वाचे आहे.तरच आपण यशस्वी औषधोपचार करू शकतो यामध्ये किडींचा मार्ग, किडींच्या अवस्था,अंडी फुटण्याच्या वेळा आणि इतर बाबीचा अभ्यास असणे गरजेचे आहे तरच आपण ६० ते ७० टक्के उत्पादन वाढवू शकतो अशी शाश्वती कृषी संशोधक आपल्याला देत आहे अशाच दर्जेदार व उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला Join करा.चला सुरवात करूया !
हेही वाचा: खरीप कडधान्याची शाश्वत लागवड
सोयबीन वर येणाऱ्या किडी व उपाययोजना:
List of soyabean diseases:
१) खोडमाशी:
ह्या किडी प्रोध काळ्या रंगाची मादी माशी हि झाडाच्या पानावर आणि झाडाच्या देठावर फिक्कट पिवळसर रंगाचे अंडे घालत असते हि अंडी तीन – सात दिवसात फुटतात व त्यातून पाय नसलेली पांढऱ्या रंगाची अळी बाहेर पडत असते. ह्या अळीचा मार्ग हा पानाच्या देठातून सुरु होतो व हि पांढरी अळी हळूहळू झाडाच्या मुख्य खोडाकडे वाटचाल सुरु ठेवते. हि माशी खोडातील भाग पोखरून खाते.खोडमाशी फाद्यावर देखील आक्रमण करते.पांढऱ्या रंगाच्या अवस्थेत असताना ती फांद्याला छिद्र करून आतील भाग पोखरून खात असते.
Soybean Crop Diseases खोडमाशीचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात असतो कि रोपा अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास पिकाची परत पेरणी करायची गरज असते.म्हणूनच ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.कित्येक शेतकरी बांधवाना ह्या परिस्थितीला समोर जावे लागले आहे.म्हणूनच यावर उपाययोजना हि आधीपासूनच करावी.जेणेकरून उत्पादनातील घट आटोक्यात ठेवता येईल
उपाययोजना:
ह्या वर उत्तम उपाय म्हणजे बीजप्रक्रिया करणे.पेरणी आधीची बीज प्रक्रिया सर्वाधिक महत्वाची आहे.सोयाबीन बियाणासाठी बीज प्रक्रिया करावयाची झाल्यास ३० % थायोमीथाक्झाम FS १० मिली एक किलो बियाणास वापरावे.त्याचबरोबर काही फवारणी औषधी तुम्ही वापरू शकता.त्यासाठी पुढील उपाय करावा:
१) इथीऑन ५० EC २० – ३० मिली + १० लिटर पाणी
२) ल्यम्ब्डा सायह्यलोथ्रीन ४९ % CS (६ मिली) + १० लिटर पाणी
३) क्लोरनट्रोनीलीप्रोल १८.५ SC (३मिलि) + १० लिटर पाणी
Soybean Crop Diseases वरील पैकी कुठल्याही औषधाचा वापर खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
२)चंद्रभुंगा :
उत्पादन न वाढण्याचे कारण म्हणजे चंद्र्भुंगा कीड, हि कीड पिक अवस्थेच्या सर्वच बाबीवर विपरीत परिणाम करत असते.ह्या किडीचा प्रादुर्भाव सहसा लक्षात येत नाही कारण प्रादुर्भाव ग्रस्त झाडे देखील इतर झाडांसारखीच दिसत असतात. सर्वाधिक प्रमाणात पिकांचे नुकसान करणारी हि कीड झाडाला शेंगा प्रमाण ५५ % पर्यंत कमी करते,दाने भरण्याच्या संखेत ६० % पर्यंत घट करते व मालाचे वजन देखील ६५ % पर्यंत कमी करते.
Soybean Crop Diseases ह्या किडीचा उत्पादन वाढीशी थेट संबंध असतो म्हणूनच शेतकरी मित्रानो ह्या किडीचे नियोजन तुम्ही अभ्यासात्मक पद्धतीने करावे अशी शिफारस कृषी संशोधक करीत आहे.हि कीड प्रामुख्याने दोन चक्रकाप पानाच्या देठावर झाडाच्या फांदीवर व झाडाच्या खोडावर चक्रकाप तयार करत असते ह्या चक्रकापा मध्ये मादी भुंगा ३ छिद्र करत असते व त्या ३ छिद्र पैकी एका छिद्र मध्ये मादी अंडी घालत असते.
Soybean plant Diseases कालांतराने चक्राच्या वरचा भाग हा वळायला सुरवात होते.व ज्या वेळी हि अळी अंड्यातून बाहेर पडते तेव्हा ती पानाच्या देठावर झाडाच्या फांदीवर व झाडाच्या खोडावर पोखरण सुरु करते.तीनही ठिकाणी देठ,फांदीव खोड ह्यांना ती पोकळ करीत असते.पिकांसाठी हि एक slow poison असणारी कीड आहे. ह्या अळीची ओळख म्हणजे हि पिवळ्या रंगाची असते अळीची लांबी हि २० – २२ मिमी असते .दिसण्यास हि एकदम मुलायम व गुळगुळीत दिसते.
उपाययोजना:
ज्यावेळी कीड आपले आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडते म्हणजेच जेव्हा पिक फुलेरा अवस्थेत येणाच्या आधी पिकांच्या ओळीचे निरीक्षण करावे. जर एका ओळीत १ मीटर वर ४ ते ५ चक्रभुंगा अळी दिसत असेल तर पुढील औषधाची फवारणी करावी:
१) क्लोरनट्रोनीलीप्रोल १८.५ SC (३मिलि) + १० लिटर पाणी
२) इथीऑन ५० EC (२० – ३० मिली) + १० लिटर पाणी
३) थायक्लोप्रीड २९.७ SC + १० लिटर पाणी
४) प्रोफेनोफॉस ५० EC (२०मिलि) + १० लिटर पाणी
या पैकी कुठल्याही एका औषधाची फवारणी वर सांगितलेल्या बाबीमध्ये तत्काळ करणे गरजेचे आहे.(कुठल्याही एका औषधाची)
पाने खाणारी अळी:
१) उंट हिरवी अळी :

हिरवी उंट अळी रात्रीच्या वेळी अंडी घालत असते.ती रोज रात्री ४० अंड्याच्या जवळपास अंडी घालते असे ती एकूण ५ दिवस अंडी घालते ह्यातून आपल्याला अळीचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात होणार आहे हे लक्षात येते म्हणूनच शेतकऱ्यांनी उत्पादन वाढण्यासाठी कुठल्याच किडी कडे दूर्लक्ष करू नये. हि आळी झाडाच्या पानाच्या पृष्ठभागावर अंडी घालत असते.
अंड्यातून निघालेली हि अळी जास्तीत जास्त ४ दिवसामध्ये चालण्यास सुरवात करते अंड्यातून निघाल्यावर ह्या अळीचा रंग सुरवातीला फिक्कट हिरवा असतो आणि चालत असताना शरीराचा मध्य भाग उंच करून चालत असते म्हणूनच हिला उंट अळी असे संबोधले जाते.
Soybean plant Diseases हिरवी उंट अळी सर्वप्रथम पानाचा हिरवा भाग खरवडून खाण्यास सुरवात करते.खात खात ती संपूर्ण हिरवा भाग खाऊन पानावर फक्त शिरा शिल्लक ठेवते हि अळी सर्वाधिक प्रमाणात फुलांचे व शेंगांचे मोठ्या प्रमाणत नुकसान करते.
उपाययोजना:
सर्वप्रथम अळीची ओळख करून घ्यावी व नंतर पिकांची पाहणी करावी. ज्यावेळी अळी १ मीटर मध्ये ४ – ५ दिसत असेल तर अळीने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे असे समजावे व तात्काळ फवारणी करावी.
१) क्लोरनट्रोनीलीप्रोल १८.५ SC (३मिलि) + १० लिटर पाणी
२) प्रोफेनोफॉस ५० EC (२०मिलि) + १० लिटर पाणी
३) डेकोमथ्रीन २.८ % (१०मिलि) + १० लिटर पाणी
Soybean Crop Diseases या पैकी कुठल्याही एका औषधाची फवारणी करा ! शेतकरी बंधुनो जर तुम्ही सोयाबीन चे पिक घेत आहात त्यावेळी पिकाच्या कडेने सापळा पिकाची एका ओळीत लागवड करावी.एरंडी सारख्या सापळा पिके लावल्यास खूप फायदा होतो.
२) केसाळ अळी :

केसाळ अळीची पूर्ण वाढ जेव्हा होते तेव्हा ती ४० – ४५ मिमी पर्यंत लांब असते. हि आळी दोन्ही बाजुने काळी असते ह्या अळीचा मधला भाग हा गर्द पिवळसर असतो शरीरावर संपूर्ण केस असतात व ते नारांगी दाट केस असतात. हि केसाळ अळी हरितद्रव्य खाण्यास खूप उत्सुक असते अति प्रमाणात ते हरितद्रव्यचे सेवन करतात. केसाळ आळी पानाच्या खालच्या बाजूने हरितद्रव्य खाते.
ज्या पानावर अळीचे आक्रमण झाले आहे ती पाने पूर्णतः जाळीदार होत असतात.हि आळी इतकी अधाशी असते कि प्रादुर्भावाचे प्रमाण अति असल्यास ती फक्त झाडाची खोडच शिल्लक ठेवते. हिआळी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट निर्माण करते म्हणूनच पिकाचे सर्वेक्षण दररोज करत रहाणे गरजेचे आहे.ज्यामुळे उत्पादन वाढी साठीचे प्रयत्न सकारात्मक राहातील.
नुसतीच शेती म्हणजे शेती करू नका ! कठोर परिश्रमासोबतच हुशारीने काम करण्याच्या काळात आपण जगत आहोत.
उपाययोजना:
पिकांचे सर्वेक्षण करत असताना जी पाने अंडीग्रस्त झाली आहेत त्याच बरोबर झाडाची जी पाने जाळीदार झाली आहे.ती अळ्या सकट गोळा करा, थोडे केरोसीन व पाण्याचे मिश्रण तयार करा व पाने त्या मिश्रणात टाकून द्या.
Soybean Crop Diseases केसाळ अळी हि आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडण्यासाठी १० – १२ अळ्या प्रती मीटर एका ओळीत दिसणे गरजेचे आहे हि परिस्थिती आढळल्यास त्वरित फवारणीचे नियोजन करावे.त्यासाठी पुढील उपाय करावा.
१) क्लोरोपायरीफॉस २० EC (२०मिली ) + १० लिटर पाणी
हि औषधीय फवारणी केसाळ अळीचा संपूर्ण नायनाट करते.
३) तंबाखूची अळी :

स्पोडोप्तेरा लीटूरा हे या अळीचे सायनटीफिक नाव असून वेगवेगळ्या जातीच्या पिकांवर तसेच वाणांवर ह्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो,प्रामुख्याने सोयाबीन पिकावर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ह्या अळीचा प्रभाव पिकावर सर्वाधिक प्रमाणात असतो.
Soybean plant Diseases हि तंबाखू खाणारी आळी पांढुरकी व काळसर त्याच बरोबर हिरवी व थोड्या प्रमाणात पारदर्शकता आळीमध्ये असते. पिवळसर नारंगी रेषा आणि काळे ठिपके ह्या अळीच्या शरीरावर बघावयास मिळते. हि आळी पूर्णतः वाढ झाल्यावर ३० – ४५ मिमी पर्यंत लांब होते. झाडाच्या पानाच्या पुज्क्यात अंडी घालते.ह्या अळी अंड्यातून जास्तीत जास्त ४ दिवसात बाहेर पडते.
अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या समुहाने झाडाच्या पानानचा हिरवा भाग सातत्याने खात असतात.आळी प्रोढ अवस्थेत आल्यावर एकेकटी पानांच्या खालील भागामध्ये हरितद्रव्य खात राहते.सतत हरीतद्रव्याचे सेवन करणारी आळी पिकांच्या पानावर कालांतराने जाळी निर्माण करते.ह्या अळीचा प्रादुर्भाव अति प्रमाणात झाल्यास झाडाची संपूर्ण पाने गाळून पडतात व फक्त झाडाची खोडच शिल्लक राहते.
उपाययोजना:
सर्वप्रथम पिकांचे सर्वेक्षण करावे.प्रामुख्याने पिक फुलावर येण्याच्या आधीची पिकांची अवस्था ह्या अळीस प्रोत्साहित करते.किंवा या वेळेस अळीचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो.त्यामुळे पिकांच्या ह्या अवस्थेत अळींची संख्या १० अळ्या १ मीटर मध्ये आढळल्यास अळीने आर्थिक पातळी ओलांडली असे समजावे व उपाययोजना करण्यास सुरवात करावी.
Soybean Crop Diseases तत्पूर्वी शेतामध्ये कामगंध सापळे लावावीत त्यासाठी स्पोडोल्युरचा वापर करू शकता त्याचबरोबर शेतामध्ये प्रकाश सापळ्याचे देखील नियोजन करणे फायद्याचे ठरते.मागे सांगितल्या प्रमाणे शेतकरी बंधूनी सोयाबीनची पिके घेत असताना एक ओळ एरंड ह्या सापळा पिकाची लागवड नक्की करावी त्यामुळे उत्पादनात भरपूर प्रमाणात फायदा होतो.
Soybean plant Diseases हि औषधाची फवारणी करावी:
१) इडोक्झाकार्ब १५.८ EC (६-७मिली) + १० लिटर पाणी
२) फ्ल्यूबेंडामाईड २० % WG (६ग्राम) + १० लिटर पाणी
३) टेट्रानीलीप्रोल १८.१८ % SC (६मिलि) + १० लिटर पाणी
४) स्पिनेटोरम ११.७० % SC (९ मिली) + १० लिटर पाणी
वरील पैकी एका औषधाची फवारणी करू शकता.
महत्वाचे: सांगितलेली औषधे हि contain स्वरूपात आहेत. जेव्हा कृषी केंद्रातून औषध घेता तेव्हा हि contain तपासून औषध खरेदी करत चला.औषधाची कंपनी वेगवेगळी असतात परंतु त्यातील contain कधीच बदलत नसतो सांगितलेली औषधीमध्ये contain आहे कि नाही हे तपासून औषध खरेदी करा! धन्यवाद.
