mahadbt solar favarni pump yojana :
Solar Favarni Pump Yojana 2025:शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने सौर फवारणी पंप हि योजना राबवण्यास सुरवात केली आहे. शेतीमध्ये आधुनिक क्रांती व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कृषी शेत्रात व्हावा ह्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्त्याने प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी आधीच कर्जबाजारीपणात अडकतो त्यात आता डीझेल व विजेचे दर देखील अधिक वाढत चालले आहे.यामुळे फवारणीवरील खर्च सुद्धा वाढत जातो हा खर्च जरी सौम्य वाटत असला तरी खर्चाच्या अंतिम टप्याचे विश्लेषण करताना तो निदर्शनास येतो. यातच शेतकऱ्यांनी सौर उर्जेवर चालणारे पंप फवारणीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ह्यातून दिलासा मिळतो.Solar Favarni Pump Yojana 2025 या योजनेचा लाभ तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहो.

योजने संबंधित सविस्तर माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत. योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण योजनेचे सखोल मार्गदर्शन तुम्ही या लेखात वाचाल.योजनेचा अवश्य लाभ घ्या.चला सुरवात करूया !
पिक विमा : मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करा !
सौर फवारणी पंप म्हणजे काय ?
Solar Favarni Pump Yojana 2025 सौर फवारणी पंप हे एक सौर उर्जेवर चालणारे उपकरण आहे.सौर पॅनेलद्वारे सौर उर्जेचे रुपांतर विजेमध्ये करून ते एका बॅटरी मध्ये साठवले जाते. हा एक डीसी पंप असल्यामुळे दिवसभऱ्यातील सूर्य प्रकाशाच्या आधारावर उर्जा निर्माण करतो.हि उर्जा बॅटरी मध्ये साठवली जाते व फवारणीच्या वेळी फवारणी पंप चालवण्यास मदत करते. यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक खर्चात बचत होते व कार्बन उत्सर्जन देखील कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होते.त्याचबरोबर डीजेल किंवा विजे वरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करण्यास मदत मिळते.
हेही वाचा : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
Solar Favarni Pump Yojana अनुदान तपशील :
योजनेंतर्गत अनुदान किती मिळते ?
महाराष्ट्र सरकारद्वारे ह्या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे येथून सौर फवारणी पंपाची खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरते.
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ह्या Solar Favarni Pump Yojana 2025 अंतर्गत ९० % पर्यंत अनुदान मिळते. म्हणजेच सैर फवारणी पंपाच्या एकूण किमतीच्या ऐवजी शेतकऱ्याला फक्त १० % रक्कम भरावयाची आहे.
अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ह्या योजनेंतर्गत ९५ % पर्यंत अनुदान मिळते. म्हणजेच सैर फवारणी पंपाच्या एकूण किमतीच्या ऐवजी शेतकऱ्याला फक्त ५ % रक्कम भरावयाची आहे.
उदा: समजा, सौर फवारणी पंपाची रक्कम हि १०,००० रुपये असेल तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला १००० रु. स्वतः भरावे लागतील.अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हि रक्कम ५०० रुपये असेल.
सौर फवारणी पंपाची वैशिष्टे :
Solar Favarni Pump Yojana 2025
- सूर्य प्रकाशाचे सौर पॅनेलद्वारे विजेमध्ये रुपांतर करते.
- सौर उर्जा बॅटरीत साठवली जाते. यामुळे रात्री किंवा खराब वातावरणात देखील फवारणी करता येते.
- सामान्य पंपामध्ये बॅटरी अधिक प्रमाणात चार्ज होऊन खराब होण्याची शक्यता असते. सौर फवारणी पंपातील बॅटरी हि चार्ज कंट्रोल असल्यामुळे बॅटरी अधिक चार्ज होण्यापासून वाचते.
- पिकांवर औषधी फवारणीसाठी फवारणीचे नोझल व पाईप उच्च प्रतीचे वापरले जातात.
mofat solar favarni pump yojana फायदे :
१) डीजेल व विजे वरील खर्च पूर्णपणे बंद होतो.फवारणी पंप हि हंगामात वारंवार वापरली जाणारी महत्वाची गोष्ट असल्यामुळे फवारणी खर्च मध्ये लक्षणीयरीत्या आर्थिक बचत होते.
२) सौर उर्जा अत्यंत स्वच्छ आणि प्रदूषणरहित उर्जा स्त्रोत असल्यामुळे फवारणी पंपाच्या वापरातून शून्य प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत मिळते.
३) ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता अजून पर्यंत पोहचली नाही अशा दुर्गम भागात देखील सौर पंप अत्यंत फायदेशीर / उपयुक्त ठरतात. जो पर्यंत सूर्य प्रकाश उपलब्ध आहे. तो पर्यंत फवारणी पंप वापरता येतो.
४) हा फवारणी पंप वापरण्यास खूप सोपा असतो. त्यामुळे पंपाची पंपाची कार्यशामता चांगली असते. यामुळे कामकाजातील सुलभता वर्षानुवर्षे टिकून राहते.
५) Solar Favarni Pump Yojana 2025 द्वारे सौर फवारणी पंप खरेदी साठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक भार कमी होऊन शेतकरी सहजपणे हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतात.
Solar Favarni Pump Yojana पात्रता निकष :
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायम स्वरूपी रहवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतः च्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. पुरावा म्हणून ७/१२ उताऱ्यावर त्यांचा मालकी हक्क दर्शविल्या गेला पाहिजे.
- स्वतःचे बँक खाते राष्ट्रीयकृत किंवा इतर कोणत्याही सहकारी बँकेमध्ये असावे. हे बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे बंधनकारक असेल.
- अर्जदाराने याआधी कृषी यंत्रीकरण किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून फवारणी पंपा साठीचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. कारण Solar Favarni Pump Yojana 2025 संबंधित माहिती SMS द्वारे अर्जदारास कळविल्या जाते.
Solar Favarni Pump Yojana आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा -( जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा )
- ८-अ प्रमाणपत्र
- बँकेचा तपशील – (बँकेचे नाव, खाते क्रमांक , IFSC कोड इत्यादी बाबी स्पष्ट दिसणे आवश्यक.)
- पासपोर्ट साईझ फोटो.
- मोबईल क्रमांक – (आधारशी लिंक असणे बंधनकारक )
- जात प्रमाणपत्र – (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असल्यास आवश्यक )
- शपथ पत्र – गरज असल्यास
- ना हरकत प्रमाणपत्र – (संयुक्तरीत्या जमीन नावावर असल्यास )
वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने Solar Favarni Pump Yojana 2025 साठी अर्ज करत असताना अपलोड करावयाची आहे.
mofat solar favarni pump yojana अर्ज प्रक्रिया :
पायरी १) महाडीबीटी शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
पायरी २) येथे तुम्हाला नोंदणी प्रक्रिया करायची आहे.
- वेबसाईट च्या मुखपृष्ठावरील “शेतकरी योजना हे” बटन दाबा.
- पायरी २.१ – शेतकरी बंधुंनो,तम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हला आधी नोंदणी करावी लागेल.
- त्यासाठी “नवीन अर्जदार नोंदणी” हे बटन दाबा.ह्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबईल क्रमांक प्रविष्ठ करावा लागेल.एकदा का नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली कि तुम्ही अर्ज करण्यासाठी तयार आहात.
- आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.
पायरी ३) आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.
पायरी ४) अर्ज भरणे
- येथे तुम्हाला मुखपृष्ठावर “अर्ज करा” किंवा “योजनेसाठी अर्ज करा” असा पर्याय दिसेल. त्या बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर विविध योजनांची यादी दिसेल.त्यापैकी “कृषी यंत्रीकरण” हे बटन दाबा.
- आता यामधून “सौर चालीत फवारणी पंप” किंवा “सौर उर्जा फवारणी पंप” या पर्यायावर क्लिक करा.
- आता योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावयाची आहे,त्यामध्ये तुमची वयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, संपर्क माहिती इत्यादी बाबी अचूक भरा.
वैयक्तिक माहिती-
- संपूर्ण नाव ( आधार कार्ड प्रमाणे )
- तुमचा १२ अंकी आधार क्रमांक.
- राहवासी पत्ता
- मोबईल क्रमांक ( आधारशी लिंक असलेला )
- बँक खाते तपशील ( बँकेचे नाव , खाते क्रमांक , बँकेचा IFSC कोड )
- इमेल आयडी-
- जात प्रवर्ग
- लिंग
जमिनीचा तपशील –
- जमिनीचा प्रकार (बागायती/जिरायती)
- लागवडीचे एकूण शेत्र
- ७/१२ उतारा ( गट क्रमांक , जमिनीचे शेत्र , नावाचा उल्लेख असणे बंधनकारक )
- ८-अ उतारा
- पिकांचा तपशील
पायरी५) कागदपत्रे अपलोड करा
आता तुम्हाला वर सांगितलेली कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने Solar Favarni Pump Yojana 2025 साठी अपलोड करावयाची आहे.( त्यामध्ये
पायरी ६) अर्ज सबमिट करा
- संपूर्ण माहिती अचूक भरल्या नंतर आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर,एकदा पूर्वावलोकन करणे गरजेचे आहे.त्या नंतरच अर्ज सादर करा ह्या बटनावर क्लिक करा.
- अर्ज शुल्क भरा.(नाममात्र शुल्क आहे)
पायरी ६) पुढील प्रक्रिया
अर्ज केल्यानंतर अर्जदारांची निवड हि लॉटरी पद्धतीने केली जाते. हि प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवण्यात आली आहे.निवड झालेल्या लाभार्थ्याला संबंधित माहित SMS द्वारे कळविण्यात येते.व पुढील प्रक्रियेचा सविस्तर तपशील सुद्धा सांगितला जातो.
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर संबंधित कृषी कार्यालयातून बोलवण्यात येते व तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते.पडताळणी मध्ये कुठलेही त्रुटी नसल्यास योजनेसाठी पूर्व संमती दिली जाते.
पायरी ७) फवारणी पंपाची खरेदी
पूर्व संमती मिळाल्या नंतर तुम्हाला शासनाद्वारे अधिकृत असलेल्या सौर फवारणी पंप पुरवठादाराकडून पंपाची खरेदी करावयाची असते.पंपाची खरेदी झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतात पंपाची कार्यशामता तपासण्यासाठी येतात.
तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेसंबंधी लक्षात ठेवायच्या बाबी :
Solar Favarni Pump Yojana 2025 ह्या योजनेसाठी सध्यातरी अर्ज स्विकारणी चालू आहे. परंतु कालांतराने योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया थांबविली जाऊ शकते म्हणून शेतकरी बंधूनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारखेचे भान नक्की ठेवावे.
योजनेच्या अटी , शर्ती,अनुदानाची टक्केवारी यामध्ये बदल होऊ शकतो.तरी, शेतकरी बंधूनी अर्ज करत असताना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR वेबसाईट जाऊन अद्यावत माहिती तपासणे गरजेचे आहे.
अर्ज करीत असताना कुठलीही शंका किंवा अडचण येत असल्यास तुम्ही स्थानिक कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.अनुदानावर फवारणी पंप घेत असताना पंपाची गुणवत्ता आधी तपासा नंतरच खरेदी करा.
निष्कर्ष :
महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सौर कृषी पंप योजना अत्यंत उपयुक्त योजना आहे.या योजनेद्वारे शेतकऱ्याचा आर्थिक भार बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यातून स्वच्छ आणि शाश्वत उर्जा वापरण्यास मिळते.यातून पर्यावरणाचे रक्षण देखील होते. आधुनिक शेतीची रचना करताना अशाच योजनाची आवश्यकता असते. अनुदानाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक भर कमी केला आहे, योजनेचा आवश्य लाभ घ्या. कारण शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप हेच त्याचे उत्पादनवाढीचे हत्यार आहे.