Reshim Sheti Yojana | रेशीम शेती योजना देईल शाश्वत नफा ! संधी सोडू नका

Reshim Udyog Yojana :

Reshim Sheti Yojana:रेशीम उद्योग विकास कार्यक्रम हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येत असून रेशीम संचनालयसह कृषी विभाग व पंचायत विभाग ह्यांच्या संयुक्त उपक्रमातून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. बेरोजगार व युवा शेतकऱ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. दरमहा शाश्वत उत्पन्न Reshim Sheti Yojana तून मिळू शकते.फक्त एकदाच लागवड केल्या नंतर १२-१५ वर्षापर्यंत लागवडीसाठी कुठलाही खर्च होत नाही.त्याच बरोबर एकदाच रेशीम कीटक संगोपनगृह तयार करायचे आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा गृह व साहित्यावर खर्च होत नाही. पारंपारिक शेती व इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुती पिकला पाण्याची गरज देखील कमी आहे. रेशीम अळ्यांची वाढ हि तुतीच्या पाल्यावर होत असल्यामुळे तुती पिकासाठी कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारणीची आवश्यकता जास्त प्रमाणात राहत नाही.ह्यातून मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च वाचतो.

reshim sheti yojana

शेतकरी कुटुंब म्हटले कि गाय,म्हैस,बकरी ह्या सारखी दुधाळ जनावरे कुटुंबात बघावयास मिळतच असते. रेशीम अळ्यांनी खाऊन राहिलेला हा तुतीचा पाला जनावरांना चाऱ्या सोबत दिल्यास त्यांच्या दुधात वाढ होते व दुधामध्ये फट्स चे प्रमाण देखील वाढते. रेशीम अळ्यांचे संगोपन करत असताना निघणारा कचरा काड्या, अळ्यांनी खालेला पाला, अळ्यांची विष्ठा ह्या पासून उत्तम दर्जाचे खात तयार करता येते. ह्या खतामध्ये गांडूळ सोडल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खात यापासून तयार होते.

शेतकरी बंधुनो, महाराष्ट्रातील कृषी हवामान व जमीन विषयक परिस्थिती हि रेशीम कोष व तुती लागवडीसाठी सर्वाधिक प्रमाणात अनुकूल आहे. Reshim Sheti Yojana हि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १ एकरातील तुती लागवड आणि जोपासनेसाठी त्याच बरोबर आवश्यक साहित्य खरेदी त्यामध्ये रोपे, खते,औषधी इत्यादी बाबी साठी एकूण २००१७६ रु. इतक्या प्रमाणात अनुदान दिले जाते. हे अनुदान ३ वर्षा मध्ये विभागले गेले आहे.रेशीम उद्योगामध्ये कीटकांचे संगोपन करावयाचे असते त्यासाठी गृह संगोपनाची आवश्यकता असते. ह्याच योजनेअंतर्गत कीटक संगोपनगृह बांधकामासाठी एका वर्षात ९२२८९ रुपये अनुदान देण्यात येते.

हेही वाचा: २०२५ शेतीसाठी आधुनिक यंत्रसामाग्री पुरवणारी योजना


Reshim Sheti Rates :

reshim sheti yojana

शेतकरी बंधुनो, सध्या परिस्थितीत कोषाचे दर हे २०२५ मध्ये ५३५ रु.प्रती किलो मिळत आहे. दर हे कोषाच्या गुणवत्तेवर आधारित असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार बघावयास मिळतो.मागील काही वर्षाचा विचार केल्यास हे दर रु.९०० प्रति किलो पर्यंत पोहचले होते.कोषाची गुणवत्ता बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्यानुसार वेगवेगळ्या बाजार समितीनुसार दर बदलू शकतात.

शेतकरी मित्रानो, रेशीम उद्योगात पाउल ठेवताना Reshim Sheti Rates (दर) मध्ये होणाऱ्या चढ उताराचा व बाजारातील धोक्यांचा संपूर्ण अभ्यास करूनच पाउल ठेवावे त्याच बरोबर कीटक संगोपनाचे संपूर्ण प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.सध्या परिस्थिती पाहता मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे एखादी घरातली व्यक्ती ह्या उद्योगात पूर्णवेळ काम करणारी असल्यास जास्त फायदा होतो.


जाणून घ्या: शेतकऱ्यानो उद्योजक होण्याची सुवर्ण संधी ५० लाखाचे अनुदान मिळणार

Reshim Udyog In Maharashtra :

reshim sheti yojana

Reshim Udyog Yojana अंतर्गत महाराष्ट्रात रेशीम उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असून आता पर्यंत २०२४-२५ नुसार महाराष्ट्रात १८६०० एकर पेक्षा अधिक क्षेत्रात तुतीची लागवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महारेशीम अभियान चालवले जात असून महाराष्ट्रात एकूण २७ जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योगाची यशस्वीरीत्या प्रगती सुरु आहे.यामध्ये मराठवाडा विभाग (बीड,जालना,उस्मानाबाद,औरंगाबाद) अव्वल स्थानी येत असून येथील शेतकरी Reshim Sheti Udyog मध्ये अग्र्सेर आहेत.दुसऱ्या स्थानी पुणे विभाग रेशीम उद्योगात प्रगती करीत असून तिसऱ्या स्थानी नागपूर विभागाचा क्रमांक लागतो.


हेही वाचा: फळबाग योजनेवर १०० % सबसिडी

Reshim Sheti Udyog :

reshim sheti yojana

तुती लागवड केल्याचे फायदे हे शेतकऱ्यास आर्थिक स्वायत्तता निर्माण करतात.दुधाळ जनावरांसाठी तुतीचा पाला जनावरांच्या प्रथिनांची पूर्तता करतात २५ % पर्यंत तुतीच्या पाल्यात प्रथिनांचे प्रमाण असते. बंधिस्त बकरी पालनासाठी देखील तुतीचा पाला अत्यंत उपयुक्त मानला जातो.सुरवातीला जनावरे तुतीचा पाला खाण्याचे टाळतात म्हणून इतर गवतासोबत तुतीचा पाला जनावरांना द्यावा.एकदा का जनावरांना सवय झाली कि नंतर मात्र कुठल्याच चारा जनावराना द्यायची गरज भासत नाही.यातूनच जनावरांच्या चाराच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.


वाचा: जाणून घ्या कीडमुक्त सोयाबीन चा यशस्वी मंत्र !

रेशीम उद्योग विकास योजनेमधील समाविष्ट बाबी :

Reshim Sheti Marathi

रेशीम उद्योग विकास कार्यक्रम हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येत असून रेशीम संचनालयसह कृषी विभाग व पंचायत विभाग ह्यांच्या संयुक्त उपक्रमातून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे

वृक्ष लागवड (तुती,ऐन व अर्जुन)

जमीन तयार करणे – तुमची जमीन नापीक असल्यास जमिनीस लागवडीसाठी उपयुक्त करणे गरजेचे आहे.शेतात असलेला कडी कचरा, झाडी झुडपे साफ करुन वृक्ष लागवडीसाठी तयार करावी.

खड्डे खोडणे – रोपांची लागवड करण्यासाठी खड्यांचा आकार हा मानकानुसार निश्चित असणे बंधनकारक राहील. दोन खड्यामधील अंतर सुनिचीत असले पाहिजे रोपांची लागवड करत असताना रोपांचे वय हे ३ – ५ महिन्यापेक्षा जास्त असणे गरजेचे राहील.

जमिनीची मशागत – जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ह्याची काळजी घ्यावी. जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षित खडा व बांध तयार करणे गरजेचे आहे. वेळोवेळी आंतरमशागत करावी. पाण्याचे नियोजन नियमित असावे. निंदन करत राहावे.

भरखते – वृक्षाची लागवड केल्यानंतर मानकानुसार झाडाना गांडूळ खात कंपोस्ट खत, जैविक खात, शेणखत इत्यादी खाते द्यावीत सुरवातीला हि भरखते देणे गरजेचे आहे. प्रती झाड ४०० ग्राम गांडूळ खताची आवश्यकता असते व नत्र:पलाश:स्फुरद ७५:२५:२५ किलो ह्या प्रमाणात लागवडी नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या वर्षी देणे गरजेचे असते.

रोगांचे व्यवस्थापन – हि वृक्ष खाद्य वृक्ष असल्यामुळे ह्यांना रोग विरहीत ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे. वृक्षाच्या वाढीसाठी व निरोगी ठेवण्यासाठी त्यांना रोग ,कीड लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी ह्यासाठी केंद्र /राज्य संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जैविक खते, निमयुक्त खत व कीटकनाशक वापरावे.

साहित्य अवजारे – रेशीम उद्योगाची उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारी रोपे, खाते रसायने इत्यादीची पूर्तता योजनेंतर्गत रोपवनाला केली जाते. त्याच बरोबर रेशीम कोष उत्पादन काढण्यासाठी आवश्याक प्रमाणात कीटक संगोपन साहित्य देखील पुरवले जाते.

वृक्ष लागवडीची पद्धत – केंद्रीय रेशीम मंडळाच्या निकषानुसार वृक्षांची लागवड हि तुतीसाठी पट्टा पद्धती अनिवार्य केली आहे. एका एकरातील तुती लागवडीसाठी ५५०० रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. व इतर टसर, ऐन व अर्जुन वृक्षाची लागवड करावयाची झाल्यास प्रचलित पद्धतीचा अवलंब करावा व अंतर मानकानुसार सुनिचीत करावे प्रती हेक्टर १८५२ झाडी असावीत.

कीटक संगोपनगृहाचे बांधकाम

Reshim Udyog Yojana :

reshim sheti yojana
  • वृक्ष लागवडीचे क्षेत्र हे कितीही असले तरी लाभार्थ्याने संगोपनगृहाचे बांधकाम हे ५० फुट लांब व २२ फुट रुंदीचे करणे बंधनकारक राहील.

जागेची निवड – किटक संगोपंगृह हे तुती बागेच्या जवळ असणे बंधनकारक राहील.शेतामध्येच संगोपनगृहाचे बांधकाम करावे.बांधकाम करण्यासाठी जागेचे सपाटीकरण असणे गरजेचे आहे.बांधकामाच्या जागेतील झाडी झुडपे काढून टाकलेली असावी.

पाया खोदणे – संगोपनगृहाचे मॉडेल्स वेगवेगळी असून ज्या पद्धतीच्या मॉडेलसाठी मंजुरी दिली आहे त्याच्या आकारमानानुसार आराखड्यात निर्देशित केल्याप्रमाणे पाया खोदणे बंधनकारक राहील.पाया भरून झाल्या नंतर जमिनीपासून २ फुट उंचीवर संगोपानगृहासाठी प्लीथ तयार करावे व कोबा करावे.

संगोपनगृहाचे बांधकाम – महाराष्ट्रातील विविध भागातील भौगोलिक स्थिती व हवामानाचा सखोल अभ्यास करून संशोधकांनी मॉडेल त्या भागानुसार वेगवेगळी तयार केली आहे.त्याच मॉडेल /नकाशानुसार संगोपनगृहाचे बांधकाम करणे अनिवार्य राहील.

संगोपंनगृह उभारणीकरिता साहित्य – संगोपंगृहाच्या निश्चित मॉडेल नुसार व आराखड्यामध्ये दर्शविल्या प्रमाणे आवश्याक त्या साहित्याची खरेदी करावी शेड उभरणी करावी.शेडच्या दोन्ही बाजूने २.५ फुट भिंत उभारून शेडनेट उभारणी करावी. रेशीम अळीच्या संगोपनासाठी रॉकची उभारणी करावी.


अनुदान तपशील वर्षनिहाय तक्ता :

Reshim Udyog In Maharashtra

तपशीलपहिले वर्षदुसरे वर्षतिसरे वर्षएकूण
१)तुती लागवड व जोपासनेचा मजुरी खर्च २८२ x २०३/-
= ५७२४६
२०० x २०३/-
= ४०६००
२०० x २०३/-
= ४०६००
६८२ x २०३/-
= १३८४४६
२) साहित्याच्या खरेदीसाठी ४११६०/-१०२८५/-१०२८५/-६१७३०/-
एकूण (१+२)९८४०६/-५०८८५ /-५०८८५ /-२००१७६
३) किटक संगोपन गृह(अकुशल) ४३२३९/-४३२३९/-
४) किटक संगोपन गृह(कुशल) ४९०५०/-४९०५०/-
एकूण १९०६९५/- ५०८८५५०८८५२९२४६५ /-

योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष :

लाभधारक खालील प्रवर्गातून निवडण्यात येईल

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • भटक्या विमुक्त जमाती
  • दारिद्र्य रेषे खालील कुटुंबे
  • महिला प्रधान कुटुंबे
  • शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे
  • भूसुधार योजनेचा लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचा लाभार्थी
  • परंपरागत वन्य निवासी अधिनियमा नुसार (२००६) पात्र व्यक्ती
  • २००८ च्या कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्पभूधारक(१ ते २ हेक्टर जमीन) व सीमांत शेतकरी (१ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र)

Reshim Udyog Yojana सर्वप्रथम ग्रामपंचायत उपरोक्त क्षेत्रातील प्रवर्ग १ ते १० मधील लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल व नंतर अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्याला लाभ दिला जाईल.

Reshim Sheti Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्ड धारण केलेला असावा. त्याच बरोबर त्याला स्वत:च्या लागवडीवर व कीटक संगोपनगृह बांधकामावर अकुशल कामगार म्हणून काम करणे बंधनकारक राहील.


योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे :

  • ७/१२ उतारा
  • ८अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती/जमातीचा असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • अर्जदार दिव्यांग असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • खरेदी समितीचे प्रमाणपत्र

योजनेचा लाभ घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया :

Reshim Sheti Yojana

भाग १

सर्वप्रथम रेशीम संचानालयाच्या अधिकृत वेबसाईट वर नोंदणी करावी त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पायरी १) – रेशीम संचानालयाची वेबसाईट तुमच्या वेब ब्राउझर मध्ये उघडा किवा येथे क्लिक करा (https://mahasilk.maharashtra.gov.in/mr/)

पायरी २) – नवीन वापरकर्ता म्हणून साईन अप करा/बटन दाबा.

येथे तुम्हाला “New Users” बटना वर क्लिक करायचे आहे.

पायरी ३) – अटी व शर्ती स्वीकारा

येथे घोषणापत्र किवा अटी व शर्ती दिसतील त्या काळजीपूर्वक वाचा व “I Agree ” ह्या बटनावर क्लिक करा.

पायरी ४ ) – भागधारक निवडणे

वरील प्रक्रिया पूर्ण होताच आता तुम्हाला “Stack Holder” निवडण्याचा पर्याय दिसेल.

तुम्ही शेतकरी असल्यामुळे येथे तुम्हाला “farmer” हा पर्याय निवडायचा आहे.

पुढे रेशीम शेती संबंधित उपप्रकार दिसेल “Mulberry/Tasar (तुती/टसर)” यापैकी तुमचा पर्याय निवडा.

पायरी ५ ) – माहिती प्रविष्ट करा

येथे तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज दिसेल त्यामध्ये नाव>>पत्ता>>संपर्क क्रमांक >>गाव सर्व माहिती अचूक भरा.

पायरी ६)-आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

वरील माहिती अचूक भारतच तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायला सांगितले जाईल त्यामध्ये

  • स्वतःचा पासपोर्ट साईझ फोटो
  • आधार कार्डची फोटो कॉफी
  • बँक पासबुकची फोटो कॉफी

पायरी ७) – अर्ज सबमिट करा

सर्व माहिती अचूक भरल्या नंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर “Submit” बटनावर क्लिक करा.

पायरी ८)- नोंदणीची पुष्टी करा

अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर, तुमच्या काम्पुटर स्क्रीन/मोबाईल स्क्रीनवर एक SMS दिसेल. जो तुमच्या ऑनलाईन नोंदणीची पुष्टी करेल.

भाग २-

पुढील प्रक्रिया हि जिल्हा रेशीम कार्यालयात जाऊन करायची आहे.

ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर Reshim Sheti Yojana ची प्रक्रिया पूर्ण होत नाही.तुम्हाला संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयात जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

पायरी १) जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा.

पायरी २) आवश्यक कागदपत्रांची मूळ व झेरोक्स प्रत सोबत ठेवा.

  • ७/१२ उतारा
  • ८अ उतारा
  • बँके पासबुकच्या पहिल्या पानाची झेरोक्स
  • जॉब कार्ड(मनरेगा किंवा इतर संबंधित योजनेचा)
  • इतर आवश्यक कागदपत्रे कार्यालयाने मागितलेली

पायरी ३) नोंदणी शुल्क

नोदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले नोंदणी शुल्क कार्यालयात भरा

पायरी ४) नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर व नोंदणी शुल्क भरल्यानंतर संबधीत कार्यालयीन अधिकारी तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करेल.

शेतकरी बंधुनो, सांगितलेल्या प्रत्येक टप्प्याचे पालन केल्यास तुमची Reshim Udyog Yojana साठीची रेशीम संचानलायकडे नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होते.

धन्यवाद !