PM Kusum Yojana Maharashtra :
PM Kusum Maharashtra:महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक महत्वाकांशी योजना म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चालविली जात असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यशस्वीरीत्या योजनेची अमलबजावणी राज्यात सुरु आहे.हि योजना राज्यातील शेतकरी बांधवाना सौर उर्जावर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून देते.शेतकऱ्यांना वीज बिल व डीझेल खर्चातून मुक्त करणे व दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान उर्जा सुरक्षा एव उत्थान महाभियान योजनेंतर्गत महाराष्ट्रामध्ये (PM Kusum Maharashtra) राबविली जात आहे.शेतकरी बंधुनो, ह्या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत पुढे सांगितलेल्या माहिती नुसार अर्ज प्रक्रिया केल्यास १०० % सौर कृषी पंप आपल्या शेतात लागणार आहे.माहिती पूर्ण वाचा व योजनेचा लाभ आवश्य घ्या.चला सुरवात करूया !

शेतकरी बंधुनो,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हि PM Kusum Yojana अंतर्गत येत असल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी PM Kusum Maharashtra योजनेचे निकष फॉलो करणे बंधनकारक राहील. म्हणून आपण ह्या लेखात PM KUSUM योजनेला मध्यस्थी ठेउनच अर्जप्रक्रिया करणार आहोत.
Latest News:फळपिक विमा योजना फायदे, अर्ज प्रक्रिया,संरक्षित रक्कम व महत्वाच्या अंतिम तारखा
मार्च २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एव उत्थान महाभियान योजना नवीन आणि नवीकरण उर्जा मंत्रालयाने शेतकरी बांधवाना शेतीमध्ये सौर सिंचन पंप बसवण्याकरिता अनुदान देण्यासाठी सुरु केली.ह्या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवाला टयूबवेल पंप सेट उभारणीसाठी ६० % अनुदान दिले जाते आणि सरकार कडून एकूण खर्चाच्या ३० % कर्ज देखील मिळते. म्हणजेच सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या फक्त १० % वाटाच भरावा लागतो.
PM Kusum Yojana Maharashtra features :
Magel tyala saur krushi pump yojana in Marathi
१) शेतकरी बांधवाना आपल्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे त्याचबरोबर सिंचनासाठी डीझेलमुक्त कृषी शेत्राची उभारणी करणे हा योजनेचा प्राथमिक उद्देश आहे.
२) पर्यावरणपूरक सिंचनासाठी सौर पंप हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी अधिक प्रभावी मध्यम असून सुरक्षित उर्जा निर्माण करण्यास ह्याची मदत होते.
३) सौर कृषी पंप संचामध्ये एक प्रकारचे उर्जा पॉवर ग्रिड बसविले असल्यामुळे डीझेल वर चालणाऱ्या पंपा पेक्षा अधिक उर्जा निर्माण करण्यास पंप सक्षम आहे. ह्याचा फायदा शेतकरी बांधवांना उत्पन्न वाढी साठी करता येतो कारण सौर कृषी पंपा द्वारे निर्माण झालेली अतिरिक्त वीज शेतकरी थेट सरकारला विकू शकतात.

४) PM Kusum Maharashtra सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या फक्त १० % वाटाच भरावा लागतो. तर अनुसूचित जमाती (ST) व अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील शेतकऱ्यास हा वाटा केवळ ५ % भरावा लागतो. सौर पंपासाठी लागणारा उर्वरित खर्च हा केंद्र व राज्य सरकार कडून अनुदानित केला गेला आहे.
५) सौर कृषी पंपा मुळे शेतकऱ्यांना नियमित विजेच्या बिलातून पूर्णपणे मुक्तता मिळते ह्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.
६) सौर कृषी पंपा मुळे सकाळ ते संध्याकाळ पर्यंत अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेता मध्ये पाणी भरण्यास जाण्याची गरज राहत नाही. ह्यातून शेतकरी बांधवाची गैरसोय व सुरक्षिततेची समस्या आपोआप दूर होते.
७) डीझेल चा वापर सौर पंपात होत नसल्यामुळे कार्बन उत्सर्जन थांबते त्यामुळे पर्यावरण संरक्षणास मदत मिळते.
८) PM Kusum Maharashtra योजनेमध्ये सौर कृषी पंपाची दुरुस्ती व देखभालीसाठी ५ वर्षाची हमी ह्या योजनेंतर्गत समाविष्ट आहे. त्यासोबतच पंपाची चोरी व नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या पंपाच्या नुकसानासाठी ह्या योजनेंतर्गत विमा संरक्षण देखील दिले जाते.
९) शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारमानानुसार 3HP , 5HP व 7.5HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते.
- २.५ एकर शेत जमीनधारकासाठी 3HP पंप
- २.५१ ते ५ एकर जमीनधारकासाठी 5HP पंप
- ५ एकर पेक्षा जमीनधारकासाठी 7.5HP पंप
हेही वाचा : नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती
PM Kusum योजनेचा लाभ कोणाला मिळतो :
Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra
- वैयक्तिक शेतकरी
- शेतकरी गट
- एफपीओ किंवा शेतकरी उत्पादक संघटना
- पंचायत
- सहकारी संघटना
- पाणी वापरकर्ता संघटना
PM Kusum Yojana Maharashtra Eligibility :
Magel Tyala Krushi Pump Yojana

1) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
२) पाण्याचा स्त्रोत
- विहिरी, बोरवेल, नदी किंवा इतर कोणताही शाश्वत पाण्याचा स्त्रोत असणे बंधनकारक राहील.
- ७/१२ उताऱ्यावर पाण्याच्या स्त्रोताची नोंद असणे गरजेचे आहे.
३) वीज जोडणी नसलेले शेतकरी
- पारंपारिक वीज जोडणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नाही अशा शेतकऱ्याना ह्या PM Kusum Yojana Maharashtra मध्ये प्राधान्य दिले गेले आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून वीज जोडणीसाठी अर्ज केलेला आहे परंतु अध्याप वीज जोडणी मिळालेली नाही असे शेतकरी देखील पात्र ठरतील.
४) अपुरा वीज पुरवठा असलेले शेतकरी
- ज्या शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा किंवा कमी दाबाचा वीज पुरवठा होतो अशा शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण येत असल्यास योजनेचा लाभ दिला जातो.
५) आदिवासी व दुर्गम भागातील शेतकरी
आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
६) इतर कोणत्याही कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी
- अर्जदाराने इतर कुठल्याही योजनेचा लाभ कृषी सौर पंपासाठी घेतलेला नसावा. ( केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या योजनांचा )
७) एकच सौर कृषी पंप
- प्रत्येक शेतकऱ्यास ह्या PM Kusum Maharashtra योजनेतून केवळ एकच सौर पंप दिला जातो.
हे पण वाचा :रेशीम शेती योजना देईल शाश्वत नफा ! संधी सोडू नका
PM Kusum Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे :

१) ७/१२ उतारा
- विहिरी, बोरवेल, नदी किंवा इतर कोणताही शाश्वत पाण्याचा स्त्रोताची नोंद ७/१२ वर असणे बंधनकारक राहील
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक तपशील
- खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसणे गरजेचे आहे.
४) जात प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमितीचा अर्जदार असल्यास आवश्यक
५) ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- जर शेती संयुक्त रित्या नावावर असल्यास इतर भागधारकांचे २०० रु च्या स्टंप वरील ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
- पाण्याचा स्त्रोत ( उदा:विहीर ) असल्यास, इतर भागीदारांचे प्रमाणपत्र सामायिक नाहरकत प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- जर पाण्याचा स्त्रोत पाणी प्रभावित शेत्रातून घेत असल्यास किंवा कालवा / नदी तून पाणी घेत असल्यास संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
PM Kusum Yojana Maharashtra अर्ज प्रक्रिया :
Maharashtra Solar Pump Yojana Online Application

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीचा अर्ज महावितरण च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने केला जातो.
पायरी १- महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट वर जा किंवा येथे क्लिक करा.
- महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट > https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
पायरी २- येथे तुह्माला “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” किंवा “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” ह्या बटनावर क्लिक करा.
पायरी ३- येथे तुम्हाला नवीन अर्जदार “NEW APPLICANT” किंवा “LOGIN” हे पर्याय दिसतील.
- तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असल्यास NEW APPLICANT हे बटन दाबा.
नवीन अर्जदार म्हणून किंवा अर्ज करताना पुढील प्रमाणे तुम्हाला माहिती द्यायची आहे.
- वयक्तिक माहिती भरा त्यामध्ये : नाव , मोबाईल नंबर , आधार क्रमांक इत्यादी.
- शेतीची माहिती भरा त्यामध्ये : जमिनीचा पत्ता , गट क्रमांक ,सिंचनाखालील शेत्र व एकूण शेत्र.
- पाण्याच्या स्त्रोताची माहिती : विहीर ,नदी , बोरवेल ,ओढा
- पंप क्षमतेची निवड करा : तुमच्या जमिनआकारमानानुसार पंपाची निवड करा.
- इतर आवश्यक माहिती भरा : जसे कि अनुसूचित जाती / जमातीचे आहात का , वीज जोडणी आहे किंवा नाही इत्यादीचा तपशील अचूक भरा.
पायरी ४- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज भरत असताना वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- त्यामध्ये ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला ( SC / ST असल्यास )
- ना हरकत प्रमाणपत्र
पायरी ५- अर्ज शुल्क भरा
- काही बाबींमध्ये अर्ज करत असताना एक नाममात्र अर्ज शुल्क भरावा लागू शकतो. अर्ज करत असताना ह्या संबंधित माहिती तुम्हाला मिळेल.
पायरी ६- अर्ज सबमिट करणे.
- सर्व माहिती अचूक भरल्या नंतर आणि संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक किंवा अर्जाची पावती मिळते हा क्रमांक / पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे कारण ह्याद्वारेचा आपण भविष्यातील अर्जाची स्थिती तपासणार आहोत.
- शेतकरी बंधुनो येथे तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते
कृषी विद्यापीठाच्या शिफारसी : असे करा कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन
पायरी ७- पुढील प्रक्रिया
- महावितरणाचे फिल्ड ऑफिसर तुमच्या अर्जाची पडताळणी करतात व तुमच्या शेतातील पाण्याच्या स्त्रोताचे सर्वेक्षण करण्यासाठी भेट देतात.
- तुमची पात्रता निश्चित होताच तुम्हाला SMS द्वारे माहिती दिली जाते व तुमच्या वाट्याला येणाऱ्या भरणा ची पूर्तता करण्यास सांगितले जाते.
- सर्व ओपचारिकता पूर्ण झाल्यावरच सौर पंप बसवण्याची प्रक्रिया सुरु केली जाते.
वर सांगितलेल्या प्रत्येक पायरीचे तुम्ही अचूक पालन केल्यास तुमचा अर्ज सुरळीतपने स्वीकारल्या जाईल तरी सुद्धा तुम्हाला अर्ज करण्यास अडचण येत असल्यास आपल्या तालुका महावितरण कार्यालयात किंवा महावितरण ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | FAQ
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ

प्रश्न १- सौर कृषी पंप काय आहे ?
उत्तर- हा पंप सूर्याच्या किरणांन पासून म्हणजे सौर उर्जे पासून चालणारा पंप आहे.त्यामध्ये सोलर पंणेल , पाण्याचा पंप , पंप नियंत्रण उपकरणे बसविली असतात.
प्रश्न २- सौर कृषी पंपाचा उपयोग काय आहे ?
उत्तर- हा पंप विहिरी , शेततळे , नदी , बोरवेल इत्यादी पाण्याच्या स्त्रोतातून पाण्याचा उपसा करतो. पाईप लाईन द्वारे शेत मालाला पाणी देण्यासाठी मदत करतो.
कृषी विद्यापीठ: खरीप पिकांचे नियोजन आपत्कालीन परिस्थितीत असे करा नियोजन
प्रश्न ३- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?
उत्तर- ज्या शेतकरी बांधून कडे शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे परंतु वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्याना हि योजना सौर कृषी पंप पुरवते.
प्रश्न ४- यापूर्वी कोणती योजना सौर कृषी पंप पुरवीत होती ?
उत्तर- यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. ह्या दोन्ही योजनांचा प्रतिसाद लक्षात घेता राज्य शासनाने (PM Kusum Maharashtra योजनेंतर्गत ) मागेल त्याला सौर कृषी पंप योजना २०२४ पासून सुरु केली.
प्रश्न ५- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
उत्तर- ज्या शेतकऱ्यांकडे शाशाव्त पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता आहे व यापूर्वी कृषी पंपासाठी पारंपारिक वीज पुरवठा देण्यात आलेला नाही अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल. त्याच बरोबर महावितरणाकडे पैसे भरून वीज पुरवठा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्याना PM Kusum Maharashtra योजनेंतर्गत प्राधान्य दिले गेले आहे.
प्रश्न ६- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?
उत्तर-अर्ज भरत असताना वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतील. त्यामध्ये ७/१२ उतारा , बँक पासबुक , पासपोर्ट फोटो , जातीचा दाखला ( SC / ST असल्यास ) ,ना हरकत प्रमाणपत्र
प्रश्न ७- योजनेसाठी अर्ज केल्या नंतर अर्जासंबंधित माहिती कशी मिळेल ?
उत्तर- अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती आपण तपासू शकतो त्यासाठी तुम्हाला SMS द्वारे अर्ज क्रमांक किंवा अर्जाची पावती पाठविली जाते. महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आवश्यक ती माहिती देल्यास अर्जाची स्थिती दर्शिविली जाते.
प्रश्न ८- सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशी करायची ?
उत्तर- सौर कृषी पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी सूर्याची किरणे सोलर प्याणाल पडणे गरजेचे असते. त्यामुळे जागेची निवड करताना कुठल्याही प्रकारची सावली किवा आडोसा तयार होणार नाही ह्याची काळजी घ्यावी त्याच बरोबर धूळ गाळ बसणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.जमिनीचा भूभाग सम पातळीवर असणे गरजेचे आहे. पाण्याच्या स्त्रोत जवळ सौर पंप लावल्यास तो सहज स्वच्छ करता येईल.
प्रश्न ९- स्थापित केलेला सौर पंप दुसऱ्या ठिकाणी लाऊ शकतो का ?
उत्तर- नाही, सौर पंप दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. शासन शुद्धीपत्रकात नमूद केल्या प्रमाणे सौर पंपाची विक्री किवा पंप हस्तांतरित केल्यास महावितरण कंपनी द्वारे सदर लाभार्थ्यावर गुन्हा नोंदविला जातो.
प्रश्न १०- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी किती पैसे भरावे लागतील ?
उत्तर- सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या फक्त १० % वाटाच भरावा लागतो. तर अनुसूचित जमाती (ST) व अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील शेतकऱ्यास हा वाटा केवळ ५ % भरावा लागतो. सौर पंपासाठी लागणारा उर्वरित खर्च हा केंद्र व राज्य सरकार कडून अनुदानित केला गेला आहे
प्रश्न ११- किती क्षमतेचा सौर कृषी पंप घ्यावा हे कसे ठरवावे ?
उत्तर- शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारमानानुसार 3HP , 5HP व 7.5HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते. २.५ एकर शेत जमीनधारकासाठी 3HP पंप , २.५१ ते ५ एकर जमीनधारकासाठी 5HP पंप ,५ एकर पेक्षा जमीनधारकासाठी 7.5HP पंप.
प्रश्न १२- नैसर्गिक आपत्ती पासून सौर पंपास संरक्षण मिळते का ?
उत्तर- सध्या परिस्थितीतील सौर पंप हे आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असल्यामुळे क्वचितच पंपाचे नुकसान होते तरीसुद्धा हि परिस्थिती टाळण्यासाठी सोलर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसविण्यात येणार आहे.
प्रश्न १३- सौर कृषी पंप दुरुस्ती व देखभालीचा कालावधी किती आहे ?
उत्तर- सौर कृषी पंप दुरुस्ती व देखभालीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. ह्या कालावधीत समस्या उद्भवल्यास संबंधित एजन्सी कडे तक्रार करणे गरजेचे आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क एजन्सी ला द्यायची गरज राहत नाही. सौर कृषी पंप दुरुस्ती व देखभाल ५ वर्षा करिता विनामूल्य आहे.
प्रश्न १४- शेतकऱ्यांना कोणती देखभाल दैनंदिन करायची आहे ?
उत्तर- सौर कृषी पंपाला अत्यंत कमी देखभालीची आवश्यकता आहे, काडीकचरा , धूळ, गाळ सोलर वर साचणार नाही ह्याचीच दक्षता घ्यावी लागेल.
प्रश्न १५- सौर कृषी पंपाची चोरी किंवा नुकसान झाल्यास काय करावे ?
उत्तर- सर्वप्रथम पंपाच्या चोरीची प्रथम खबरी अहवाला द्वारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी व संबंधित ग्राहक सेवा एजन्सी केंद्राकडे व महावितरणाकडे ह्याची माहिती द्यावी.
प्रश्न १६- सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्याने काय करावे ?
उत्तर- शेतकऱ्यांनी महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे तक्रार करावी.त्यासाठी शेतकरी बांधवांनी महावितरणाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
प्रश्न १७-PM Kusum Maharashtra मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसंबंधी मदतीसाठी टोल फ्री क्रमांक काय आहे ?
उत्तर-महावितरणाचा टोल फ्री क्रमांक १८००- २३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५