Pik Vima 2025 | मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करा ! संपूर्ण प्रक्रिया, समाविष्ट पिके आणि अंतिम तारखेचे सविस्तर मार्गदर्शन.

Pik Vima 2025 Maharashtra :

Pik Vima 2025:आता १ रुपये पिक विमा योजना बंद करण्यात आली आहे खरीप हंगाम २०२५ साठी महाराष्ट्र सरकारने सुधारित पिक विमा योजना २०२५ चे शासन निर्णय जारी केले असून प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत हि योजना राबविली जात आहे. मागील काही वर्षापासून होणाऱ्या सततच्या हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती चे संकट दर वर्षी बघावयास मिळत आहे.शेतकऱ्यांच्या पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी हि योजना कृषी शेत्रात अत्यंत महत्वाची ठरते.Pik Vima 2025 साठी अर्ज करण्याची मुदत हंगामानुसार वेगवेगळी आली असून खरीप हंगामासाठी २०२५ मध्ये हि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ ठेवण्यात आली आहे.हि योजंना पिकांची पेरणीपासून ते काढणीनंतरच्या नुकसानीपर्यंत शेतकऱ्याना आर्थिक संरक्षण प्रदान करते.

Pik Vima 2025

pik vima 2025 योजने संबंधित संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत.शेतकरी बंधुनो अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.माहिती पूर्ण वाचल्यास तुम्ही स्वतः मोबईल वरून अर्ज करू शकाल.चला सुरवात करूया !

Latest :पिक विमा २०२५-२६ योजनेची अद्यावत माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा ( ऑगस्ट २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश )


Pik Vima 2025 योजनेची उद्दिष्टे :

हवामानातील सतत च्या होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्ती , कीड ,आणि रोगामुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान दरवर्षी वाढत चालले आहे. ह्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पादनावर होऊन उत्पन्न कमी होत चालले आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संरक्षण देणे हे पिक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य टिकून ठेवणे आणि पारंपारिक शेती पद्धतीसोबत आधुनिक कृषी पद्धती वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि कृषी शेत्रातील पतपुरवठा कायम ठेवणे हीच प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचे कार्य आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुढील हप्ता लवकरच ?


Pik Vima Yojana 2025 अंतर्गत समाविष्ट पिके :

पिक विमा योजनेत वेगवेगळ्या पिकांचा समावेश करण्यात आला असून शेतकऱ्याना प्रत्येक पिकासाठी भरावा लागणारा विमा हप्ता निश्चित केला गेला आहे.

  • खरीप हंगामातील पिके: त्यामध्ये तृणधान्य (भात, ज्वारी, बाजरी, मका), कडधान्य ( तूर,मुग,उडीद ) , तेलबिया (सोयाबीन, भुईमुग , तीळ, कारळे) व कांदा कापूस.
  • रब्बी हंगामातील पिके: त्यामध्ये गहू, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग इत्यादी पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
  • नगदी पिके त्यामध्ये, फळपिकांसारख्या नगदी पिकांचा समावेश करण्यात आला आहे. नगदी पिकांसाठी केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र विमा योजना आखल्या आहे.

हेही वाचा :फळपिक विमा योजना:फायदे अर्ज प्रक्रिया संरक्षित रक्कम आणि महत्वाच्या अंतिम तारखा


Pik Vima Yojana हप्ता किती भरावा :

  • खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्याला फक्त २ % विमा हप्ता भरावयाचा असतो.
  • रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्याना फक्त १.५ % विमा हप्ता भरावयाचा असतो.
  • नगदी पिकांसाठी(फळपिके) शेतकऱ्याना ५ % विमा हप्ता भरावयाचा असतो.

ह्या योजनेद्वारे खूप कमी हप्त्यात पिकांच्या नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसाणी साठी मोठे आर्थिक संरक्षण दिले जाते. नैसर्गिक आपत्ती मध्ये पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, कीड-रोग, या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाते.


Pik Vima Yojana Maharashtra अर्जची अंतिम मुदत :

हंगामानुसार पिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.

  • खरीप हंगाम २०२५ साठीची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे.
  • रब्बी हंगाम २०२५ -२६ साठीची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५.
  • उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग साठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५.

नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती

Pik Vima 2025

Pik Vima योजनेतील महत्वाचे बदल :

२०२५ मध्ये योजनेत महत्वाचे बदल करण्यात आले असून हे लक्षात घेणे अंत्यंत महत्वाचे आहे.

१) Pik Vima 2025 मध्ये पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्याना त्यांच्या हिश्याचा विमा हप्ता भरावा लागणार आहे. याआधी महाराष्ट्र सरकारने १ रु. मध्ये पिक विमा योजना लागू केली होती त्यावेळी राज्य सरकारच शेतकऱ्याचा हप्त्याचा प्रीमियम भरत होते. म्हणजेच आता १ रु.पिक विमा योजना बंद करण्यात आली आहे.

२) शेतकरी बंधुनो, आता ह्या योजनेत भाग घेण्यासाठी AgriStack नोंदणी क्रमांक आणि ई-पिक पाहणी मधील नोंद बंधनकारक करण्यात आली असून. ई-पिक पाहणी मध्ये नोंदविलेल्या पिकांचा व विमा घेतलेल्या पिकांमध्ये तफावत आढळून आल्यास विमा अर्ज रद्द केल्या जाऊ शकतो आणि तुम्ही भरलेल्या विमा हप्ता देखील जप्त केला जाऊ शकतो.

३) कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग आता एच्छिक करण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्याला योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र बँकेला सादर करावे. त्यांना योजनेतून वगळण्यात येईल.

४) नुकसानभरपाई व्यवस्थित समजून घ्या, पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंतचा कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती ( उदा: पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, कीड, रोग) ह्यामुळे झालेल्या पिकांचे नुकसान हे “पिक कापणी प्रयोगा” द्वारे येणारे सरासरी उत्पादन जर महसूल मंडळाच्या “उंबरठा उत्पादना” पेक्षा कमी असल्यास त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्याना ज्यांनी Pik Vima 2025 योजनेंतर्गत पिक विमा घेतला आहे त्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाईल.

  • पिक कापणी प्रयोग : पिक कापणी करण्यासाठी कृषी विभागाचे आणि विमा कंपनीचे अधिकारी तुमच्या महसूल मंडळातील वेगवेगळ्या शेतात जातात आणि उत्पादन किती झाले. ह्याचा तपशील नोंदवतात. ह्यालाच पिक कापणी प्रयोग म्हटल्या जाते.ह्याद्वारे त्या मंडळातील सरासरी पिकांचे उत्पादन काढले जाते.
  • उंबरठा उत्पादन : हे सरकारने आधीच ठरवलेले एक निश्चित उत्पादन असते. हे उत्पादन म्हणजे इतक्या प्रमाणात सरासरी उत्पादन व्हायलाच पाहिजे.

५) स्थानिक नैसर्गिक आपत्ती : त्यामध्ये भूस्खलन , ढगफुटी , गारपीट , वीज कोसळून होणारी नैसर्गिक आपत्ती झाल्यास स्थानिक स्तरावर पंचनामे करून वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई दिली जाईल.

६) काढणीपश्चात नुकसान : पिकांची काढणी झाल्यानंतर १२ दिवसाच्या आत शेतामध्ये वाळणीसाठी ठेवलेल्या पिकाचे अतिवृष्टी किंवा चक्रीवादळामुळे मालाचे नुकसान झाल्यास त्यानाही Pik Vima 2025 योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.


Pik Vima Yojana आवश्यक कागदपत्रे :

Pik Vima 2025

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक प्रत
  • ७/१२ उतारा
  • ८-अ उतारा
  • स्वयंघोषणापत्र (पीकपेरा ,सामाईक शेत्र असल्यास )
  • नोंदणीकृत भाडे करार ( भाडेपट्टीवर शेती करत असल्यास )

Pik Vima 2025 Maharashtra अर्ज प्रक्रिया :

Pik Vima 2025

ऑनलाईन अर्जप्रक्रिया Pik Vima Online Apply 2025

पायरी १प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (PMFBY portal) अधिकृत पोर्टल भेट द्या किंवा येथे क्लिक करा

पायरी २– वेबसाईटच्या मुखपृष्ठावर “Farmer Corner” किंवा “Farmer Login” हे बटन दाबा

  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.त्यासाठी “New User Registration Here” हे बटन दाबा.
  • येथे तुमचे नाव ,मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी माहिती अचूक भरा.

पायरी ३- मोबाईल नंबर व कॅप्टचा प्रविष्ट करा व लॉगीन करून घ्या.

पायरी ४- पिक विमा योजना शोधा

  • शेतकरी योजना” किंवा “कृषी विभाग” हे बटन दाबा.
  • येथे तुम्हाला “पिक विमा” किंवा “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” हे बटन दाबायचे आहे.

पायरी ५) येथे तुम्हाला अर्ज भरावयाचा आहे.

  • वयक्तिक माहिती त्यामध्ये : तुमचे नाव ,पत्ता , संपर्क माहिती ,बँक खात्याचा तपशील अचूक प्रविष्ठ करा.
  • ( बँक खाते आधारशी जोडलेले असणे बंधनकारक आहे कारण ह्या द्वारेच विमा रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते )
  • जमिनीचा तपशील त्यामध्ये : सर्वेक्षण क्रमांक , लागवडी खालील शेत्र , जमीन मालकीची माहिती.
  • पिक तपशील : चालू हंगामातील पिके निवडा , प्रत्येक पिकाचे शेत्र नमूद करा.

पायरी ६) कागदपत्रे अपलोड करा

  • येथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल कागदपत्रे अपलोड करत असताना ती JPG/JPEG/PNG Format मध्ये असणे गरजेचे आहे.कागदपत्रांची साईज केल्याप्रमाणे ठेवावी.
  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा ( जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा)
  • ८-अ उतारा
  • बँक पासबुक तपशील
  • पिक लागवड स्वयंघोषणापत्र

पायरी ७) विम्याचा हप्ता भरणे

  • Pik Vima 2025 साठी सर्व माहिती अचूक भरल्या नंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विम्याचा हप्ता भरावयाचा असतो.
  • त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता.
  • आपले सरकार सेवा केंद्र(CSC) ह्या ठिकाणी सुद्धा विमा हप्ता भरता येतो.

शेतकरी बंधुनो, Pik Vima 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लक्षात असू द्या कारण मुदत चुकल्यास तुम्ही त्या हंगामासाठी अर्ज करू शकणार नाही.अर्ज भारत असताना योग्य माहिती द्या कारण २०२५ मधील नवीन नियमानुसार माहिती मध्ये तफावत आढळ्यास विमा रद्द केला जाऊ शकतो.

तुमच्या अर्जाची पावती , पेमेंट पावती आणि सर्व सादर केलेल्या कागदपत्रांची एक प्रत तुमच्या जवळ असू द्या. तुमचे बँक खाते सक्रीय असल्याची पडताळणी करून घ्या कारण विमा रक्कम बँक खात्यातच जमा होणार आहे.

वरील संपूर्ण स्टेप्स अचूक फॉलो केल्यास तुमची अर्ज प्रक्रिया सहज पूर्ण होते.

ऑफलाईन अर्जप्रक्रिया :

ऑनलाईन अर्जानाच सामान्यतः प्राधान्य दिले जाते.कारण ऑफलाईन पद्धती नेहमी उपलब्ध असेलच असे नाही. ऑफलाईन अर्ज बाबतच्या संपूर्ण माहितीसाठी तुमच्या स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधा.

  • तुमच्या गावातील तालुका कृषी विभागाला भेट द्या.
  • ऑफलाईन अर्ज स्वीकारल्या जातात का ह्याची पुष्टी करा.
  • अर्ज स्वीकारल्या जात असल्यास, भौतिक अर्ज भरून घ्या.
  • सर्व आवश्यक माहिती भरून, कागदपत्रांची छायाप्रत जोडा.
  • संबंधित अधिकाऱ्याकडे फॉर्म सबमिट करा आणि पावती घ्यायला विसरू नका.

पिक विमा योजनेसाठी मोबईलद्वारे असा करा अर्ज :

Pik Vima 2025

Pik Vima 2025

पायरी १) ऑप डाऊनलोड करा

  • तुमच्या मोबईल मधील “GOOGLE PLAY STORE” मधून “CROP INSURANCE” हे ॲप डाऊनलोड करा.

पायरी २) APP उघडा व नोंदणी करा

  • ॲप उघडताच तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल.
  • तुम्ही नवीन पहिल्यांदा वापर करता असल्यास “New User Registration” किंवा “शेतकरी” म्हणून नोंदणी करा.
  • तुमचा मोबईल नंबर प्रविष्ठ करा आणि OTP टाकून Verify करून घ्या.
  • आता तुमचे नाव व इतर आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

पायरी ३) नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत एकदा मोबईल नंबर व OTP टाकून लॉगीन करून घ्या.

पायरी ४) लॉगीन केल्यावर “PMFBY INSURANCE” हे बटन दाबा.

  • हंगाम निवडा ( उदा: खरीप २०२५/ Pik Vima 2025 )
  • योजना PMFBY
  • चालू वर्ष निवडून “SUBMIT” आणि “NEXT” बटन दाबा.

पायरी ५) येथे वैयक्तिक माहिती भरा ( तुमचे नाव, पत्ता , बँक खाते क्रमांक , IFSC कोड इत्यादी )

पायरी ६) आता जमिनीचा तपशील भरा ( सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक , क्षेत्रफळ इत्यादी )

पायरी ७) पिकांची माहिती भरा

  • कोणत्या पिकाचा विमा काढत आहात ते पिक निवडा.
  • पिकांच्या पेरणीची तारीख प्रविष्ट करा व लागवडीचे शेत्र नमूद करा.

पायरी ७) कागदपत्रे अपलोड करा

  • येथे तुम्हाला वर सांगितलेली कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे.
  • कागदपत्रे स्कॅन करून किंवा कागदपत्रांचे फोटो अपलोड करू शकता.
  • सहसा आधार कार्ड , बँकेचा तपशील , ७/१२ उतारा अपलोड करावयाचा असतो.

पायरी ८) प्रीमियम भरणे

  • किती प्रीमियम भरावयाचा आहे हे APP मध्ये दिसेल.
  • तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रिमीयम भरू शकता.
  • नेट बँकिग , क्रेडीट कार्ड , डेबिट कार्ड द्वारे प्रीमियम भरू शकता.

पायरी ९) अर्ज Submit करा

  • सर्व माहिती अचूक आणि प्रीमियम भरल्या नंतर अर्ज सबमिट करा.
  • तुमच्या अर्जाची भविष्यातील स्थिती बघण्यासाठी अर्जाच्या पावतीचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा.

निष्कर्ष :

शेतकरी बंधुनो, तुम्ही Pik Vima 2025 साठी ह्या पद्धतीने घरबसल्या किंवा शेतातून अर्ज भरू शकता हि एक अत्यंत सोयीस्कर पद्धत आहे.यामुळे वेळेची बचत होते तुम्हाला CSC केद्र किंवा कृषी कार्यालयात जाण्याची गरज राहत नाही. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती मोबईल मध्येच तपासू शकता. धन्यवाद !