Pik Spardha 2025-26 | शेतकऱ्यांनो ५०,००० पर्यंतचे बक्षीस जिंका ! पात्रता, नियम, आणि अर्ज प्रक्रिया

Pik Spardha Maharashtra :

Pik Spardha 2025-26:कृषी शेत्रामध्ये पिकांची उत्पादकता वाढवणे व राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पिक स्पर्धा योजना संपूर्ण राज्यात लागू केली असून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रवृत्त करणे, त्यांचे मनोबल उचावाने त्याचबरोबर यशस्वी प्रयोगाचे मार्गदर्शन त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे हा या Pik Spardha 2025-26 योजनेचा मुख्य उद्दिष्टे आहे. पिक स्पर्धा २०२५ मुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनात वाढ होऊन राज्याच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. महाराष्ट राज्य पिक स्पर्धा २०२५-२६ साठी एकूण १६ पिकांचा समावेश करण्यात आला असून ज्यामध्ये खरीप हंगामासाठी ११ पिकांचा व रब्बी हंगामासाठी ५ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी पिकांची निवड हि फक्त आर्थिक मूल्यावर आधारित न ठेवता, अन्न सुरक्षा व पोषण मुल्यावारही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Pik Spardha 2025-26

महाराष्ट्र शासनाने (Pik Spardha 2025-26) पिक स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्यांना बक्षिसांची लक्षणीय रक्कम ठेवण्यात आली असून ५०,००० रुपयापर्यंतचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे. हि रक्कम केवळ आर्थिक प्रोत्साहनच नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीला दिला जाणारा मोठा सम्मान आहे. शेतकऱ्यांना अधिक परिश्रम घेण्यासाठी व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी हि रक्कम प्रोत्साहित करेल याद्वारे कृषी शेत्रात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे.

ह्या लेखात आपण महाराष्ट्रातील पिक स्पर्धा २०२५-२६ चे सुधारित नियम , समाविष्ट पिके ,पात्रता, अर्ज प्रक्रिया, आकर्षक बक्षिसे जाणून घेणार आहोत. चला सुरवात करूया !

Pik Spardha 2025-26 सुधारित नियम :

Crop Competition In Marathi

शेतकरी बंधुनो, राज्यात या आधीहि पिक स्पर्धेचे आयोजन केले जात होते. परंतु त्यावेळी शेतकऱ्याला राज्यस्तरावर सर्वोच्च पारितोषिक मिळवण्यासाठी शेतातातील तेच पिक सलग तीन वर्ष घेऊन उत्पादकतेत सातत्यता सिद्ध करावी लागत होती. परंतु नैसर्गिक आपत्ती किंवा अवकाळी पाऊस ह्या सारख्या संकटांमुळे उत्पादकतेत घट झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे शेतकऱ्यांच्या मनोधैर्यचे खचीकारण होताना दिसून आले.

यावर तोडगा काढण्यासाठी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे योजनेच्या अमलबजावणीसाठी महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. आता केवळ एकाच वर्षातील उत्पादक्तेवर शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होता येईल. याव्यतिरिक्त यापुढे हि स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता फक्त तालुकास्तरावर आयोजित करून विजेत्या शेतकऱ्याची निवड हि तालुका, जिल्हा व राज्य या तीनही स्तरावर तालुकास्तरावरील उत्पादकता विचारात घेऊनच केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनो आता स्पर्धा अधिक सोपी व त्रुटीमुक्त करण्यात आली आहे. योजनेचा आवश्य लाभ घ्या हि शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. अतिरिक्त उत्पन्नाचा चांगला स्त्रोत हि योजना उपलब्ध करून देते.

महाराष्ट्र राज्य पिक स्पर्धेतील समाविष्ट पिके :

Pik Spardha 2025-26 च्या शासन निर्णयात नमूद केल्या प्रमाणे वंचित / दुर्लक्षित त्याचबरोबर पोष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात तंत्रज्ञानात आणि शेत्रात वाढहोण्यासाठीची गरज लक्षात घेऊन पुढील पिके समाविष्ट करण्यात आली आहे.

  • खरीप पिके: यामध्ये एकूण ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, ज्वारी, बाजरी, भात, नाचणी, मका इत्यादी पिकांचा समावेश होतो.
  • रब्बी पिके: या मध्ये एकूण ५ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू, करडई, जवस, हरभरा इत्यादी पिकांचा समावेश होतो.

नाचणी, ज्वारी व बाजरी ह्या सारख्या पोष्टिक तृणधाण्याचा समावेश हा फक्त उत्पादन वाढवण्यासाठी केला गेला नसून महारष्ट्रातील कृषी धोरणांना पोषक सुरक्षा व पिकांच्या वैविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता इतर पोष्टिक पिकांच्या लागवडीसाठी योजनेंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.

विशेषतः ज्वारी हे पिक दोन्ही हंगामासाठी ( खरीप / रब्बी ) निवडण्यात आले असून यामुळे शेतकरी बंधूना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य हंगामात ज्वारीची लागवड करता येईल व Pik Spardha 2025-26 स्पर्धेत सहभागी होण्याचा पर्याय देखील मिळेल. यामुळे योजनेची लवचिकता वाढेल व जास्तीत जास्त शेतकऱ्याना सहभागी होता येईल.

पिक स्पर्धा बक्षिसांचे स्वरूप आणि वितरण :

महाराष्ट्र राज्य पिक स्पर्धेतील (Pik Spardha 2025-26) विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी व त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहित करण्यासाठी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येते, दिली जाणारी बक्षिसे हि सर्वसाधारण प्रवर्गातील व आदिवासी प्रवर्गातील अशा दोन्ही गटांना समान ठेवण्यात आली आहे.

बक्षिसांची रचना ( सर्वसाधारण व आदिवासी गट )

१) राज्य पातळी

  • पहिले बक्षीस: रक्कम ५०,००० रु.
  • दुसरे बक्षीस : रक्कम ४०,०००/- रु.
  • तिसरे बक्षीस : रक्कम ३०,०००/- रु

२) जिल्हा पातळी

  • पहिले बक्षीस: रक्कम १०,००० रु.
  • दुसरे बक्षीस : रक्कम ७,०००/- रु.
  • तिसरे बक्षीस : रक्कम ५,०००/- रु

३) तालुका पातळी

  • पहिले बक्षीस : रक्कम ५,००० रु.
  • दुसरे बक्षीस : रक्कम ३,०००/- रु.
  • तिसरे बक्षीस : रक्कम २,०००/- रु

खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील जिल्हा व तालुका पातळीवरील पिक स्पर्धक विजेत्या शेतकऱ्याला सन्मानपूर्वक बक्षीस वितरण हे जिल्हापातळीवर केले जाईल.

खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील राज्य पातळीवरील पिक स्पर्धक विजेत्या शेतकऱ्याला सन्मानपूर्वक बक्षीस वितरण हे राज्य पातळीवर केले जाईल.

शेतकरी बंधुनो, बक्षिसे हे फक्त पैसे देण्यापुरते मर्यादित नसून पिक स्पर्धेतील विजेत्याच्या शेतकऱ्याला सार्वजनिकरीत्या गौरवण्याची संधी हि योजना उपलब्ध करून देते. यातून विजेत्या शेतकऱ्यांना समाजात मान्यता मिळते त्याचबरोबर ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श सुद्धा बनतात.


Pik Spardha 2025-26

Pik Spardha Maharashtra पात्रता निकष :

Pik Spardha 2025-26 योजनेचा लाभ योग्य आणि पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी योजनेत काही मुलभूत पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे:

  • पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे व ती जमीन तो शेतकरी स्वतः कसत असणे गरजेचे आहे.
  • किमान लागवडीचे शेत्र हे “भातासाठी” किमान २० आर ( ०.२ हेक्टर )
  • “इतर पिकांसाठी” किमान ४० आर ( ०.४ हेक्टर ) सलग लागवड असणे गरजेचे आहे.

योजनेचा लाभ समाजातील मोठ्या घटकांपर्यंत पोहचावा ह्यासाठी भात पिकासाठी २० आर व इतर पिकासाठी ४० आर शेत्राची अट ठेवण्यात आली आहे. याद्वारे लहान व मध्यम शेतकऱ्यालाही स्पर्धेत सहभागी होता येईल व फक्त मोठ्या व्यावसाईक शेतकऱ्यापुरती योजना मर्यादित राहणार नाही.

एका पेक्षा जास्त पिकांचा सहभाग (Pik Spardha 2025-26) :

शेतकरी बंधुनो, आता एकाच वेळी एका पेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. याद्वारे शेतकऱ्यांना विविध पिक पद्धतीनुसार स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते.

ह्या योजनेचे वैशिष्टे असे कि, पिक स्पर्धेत जेवढे अर्ज प्राप्त होतील त्या सर्व शेतकऱ्यांना स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात येईल.

मागील विजेत्यासाठीचे निर्बंध :

Pik Spardha 2025-26 योजनेमध्ये समान संधी व व्यापक सहभाग टिकून ठेवण्यासाठी मागील विजेत्यासाठी काही निर्बंध लादण्यात आले आहे. जसे कि,

राज्य स्तरीय प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास पुढील वाच वर्षासाठी त्याच पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

इतर विजेत्या संबंधी :

तुम्हाला ज्या स्तरावर ( उदा: तालुका / जिल्हा ) किंवा ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. त्यापेक्षा खालच्या स्तरावर किंवा क्रमांकासाठी तुम्ही पाच वर्षासाठी पात्र ठरणार नाहीत.

नोट: तुम्ही जिंकलेल्या ज्या स्तरावर किंवा क्रमांकावर जिंकले आहात त्यापेक्षा उच्च स्तरावर किंवा उच्च क्रमांकासाठी स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

Pik Spardha 2025-26 अर्ज प्रक्रिया :

महाराष्ट्र राज्य पिक स्पर्धेत २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विहित कार्यपद्धतीनुसार शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे. त्यांनी नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राची पूर्तता तालुक्यातील संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे करावी.

महाराष्ट्र राज्य पिक स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे :

अर्ज सादर करताना पुढील कागदपत्राची करावी.

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क भरल्याचे चलन.
  • ७/१२ उतारा ( जमिनीचा मालकी हक्क दर्शवण्यासाठी )
  • ८-अ उतारा
  • जात प्रमाणपत्र ( फक्त अनुसूचित जमातीचे असल्यास )

पिक स्पर्धा २०२५-२६ साठीचे प्रवेश शुल्क :

पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिक निहाय प्रवेश शुल्क आकारले जातात. म्हणजेच, प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारले जातील.

  • सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारास : रक्कम ३००/- रु.
  • आदिवासी प्रवर्गातील अर्जदारास : रक्कम १५०/- रु.

हे शुल्क स्वतः सहभागी शेतकऱ्याने शासकीय कोषागारात विहित मुदतीत जमा करणे बंधनकारक राहील. पिक स्पर्धेसाठीचे प्रवेश शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

पिक स्पर्धा अर्ज करण्याची अंतिम तारीख :

वेगवेगळ्या हंगामासाठी Pik Spardha 2025-26 अर्ज दाखल करण्यासाठी पुढीलप्रमाणे अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहे.

हंगामपिकेअर्ज करण्याची अंतिम तारीख
१) खरीप मुग , उडीद३१ जुलै
२) खरीप भात, ज्वारी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, सुर्यफुल आणि भुईमुग३१ ऑगस्ट
३) रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस३१ डिसेंबर

पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या :

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यावर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुनिश्चित करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे.(Pik Spardha 2025-26)

१) माहिती सादर करणे :स्पर्धेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्याने ज्या पिकासाठी स्पर्धेत भाग घेतला आहे त्या पिकांच्या पेरणी पासून ते पिकांच्या काढणीपर्यंतची सर्व माहिती संबंधित विहित प्रपत्रामध्ये भरून पिक कापणीच्या वेळी कापणी समितीच्या सचिवाकडे जमा करणे बंधनकारक आहे. उत्पादकतेच्या अचूक मूल्यांकनासाठी हि माहिती अत्यंत गरजेची आहे.

२) पिकांची कापणी तयारी व सूचना: पिक कापणीच्या कमीत कमी १५ दिवसा अगोदर संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पिकांच्या कापणीची तारीख कळवण्याची जबाबदारी सहभागी शेतकऱ्याची असेल. पिकांच्या कापणीच्या वेळी कापणी व मळणीच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी व त्याकरिता आवश्यक खर्चाची जबाबदारी हि स्पर्धक शेतकऱ्याची असेल.


Pik Spardha 2025-26

निष्कर्ष:

Pik Spardha 2025-26

महाराष्ट्र राज्य पिक स्पर्धा योजना हि फक्त बक्षीस वाटपांची योजना नसून, शेती मध्ये उत्पादकतेची वाढ घडवून आणण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी प्रवृत्त करते.हि योजना कृषी शेत्रात नवोपक्रम रुजवण्यासाठीचे महत्वाचे मध्यम आहे त्याच बरोबर हि योजना शेतकऱ्यांचे मनोबल वाढवते व इतर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयोगशील पद्धतीमुळे उत्पादकता वाढवण्यास प्रेरणा देते. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ह्या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहान कृषी विभाग करत आहे. शेतकऱ्यानो तुमच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांनी आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही नक्कीच विजेतेपद गाठू शकता आणि राज्यातील कृषी विकासात आपले योगदान देऊन आपले नाव उज्वल कराल असा आम्हाला विश्वास आहे.धन्यवाद !


योजनेत यशस्वी होण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशी :

१) जाणून घ्या कीडमुक्त सोयाबीन चा यशस्वी मंत्र !

२) सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा !

३) खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

४) खरीप पिकांचे आपत्कालीन परिस्थितीत असे करा नियोजन

visit कृषी विभाग