Namo Shetkari Yojana In Marathi :
Namo Shetkari Yojana 2025:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट शासनाने २०२३-२४ मध्ये सुरु केली.ह्या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रु तीन समान हप्त्यामध्ये प्रदान केले जाते.प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना व नमो शेतकरी सम्मान निधी योजना ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत.महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे आर्थिक स्थेर्यतेसाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट शासनाने नमो शेतकरी महासम्मान निधी योजना सुरु केली.Namo Shetkari Yojana 2025 प्रामुख्याने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पूरक असलेली योजना आहे.त्यामुळे राज्यातील पात्र शेतकरी वर्गाला दोन्ही योजनेद्वारे आर्थिक लाभ घेता येतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी व त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या योजनेद्वारे आर्थिक पाठबळ पुरविले जाते.योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना कर्जबाजारी पाणातून मुक्त करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.

Namo Shetkari Yojana 2025 पात्र शेतकरी कुटुंबाना(कुटुंब=पती,पत्नी व अल्पवयीन अपत्ये) या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षाला ६०००/- रुपयाची आर्थिक मदत पुरविली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हि रक्कम प्रत्येकी २००० रु च्या तीन समान हप्त्यामध्ये दरवर्षी प्रदान केली जाते. शेतकरी बंधूना हि रक्कम प्रधानमंत्री किसान योजनेच्या ६००० रु च्या अतिरिक्त रक्कम असून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार मिळून प्रत्येक वर्षाला १२०००/- (PM-KISAN 6000 + NSMNY 6000) रुपयाची आर्थिक मदत मिळते.
हेही वाचा : प्रधानमंत्री किसान सम्मान योजना पुढील हप्ताची तारीख जाहीर
Namo Shetkari Yojana Installment date 2025 :
Namo Shetkari Yojana 2025 चा सहावा हप्ता लवकरच वितरीत केला जाईल, काही शेतकऱ्यांचा हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे.नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेशी जोडला असल्यामुळे ह्या योजनेचा १९ वा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ मध्ये वितरीत केला गेला त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता देण्यास सुरवात झाली आहे.
डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठीचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता होता व तो मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिल २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला.तुम्हाला हप्ता मिळाला नसल्यास तुम्ही पुढे सांगितल्या प्रमाणे तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता.
पुढील सातवा हप्ता हा जून २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जो कि एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ ह्या कालावधीसाठीचा आहे.कारण प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जून महिन्यातच वितरीत केला जातो.
महत्वाचे: आता राज्य सरकार देणार शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्री
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचे हप्ते वर्षातून ३ वेळा दिले जातात.
- पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै
- दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर
- तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्च
हेही वाचा: ५ लाखापर्यंत कर्ज ! किसान क्रेडीट कार्ड ची हि पद्धत वापरा
Namo Shetkari Yojana Status :

आपण नमो शेतकरी सम्मान निधी योजनेच्या लाभाची स्थिती अधिकृत वेबसाईट वर तपासू शकतो.लाभार्थी स्थिती तपासणीसाठी पुढील स्टेप्स फॉलो करा !
पायरी १- अधिकृत वेबसाईट( nsmny.mahait.org ) ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
पायरी २- आता “Beneficiary Status” हे बटन दाबा.
पायरी ३ – तुमचा मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा
पायरी ४ – कॅपचा कोड टाका व “Get Mobile OTP” हे बटन दाबा.,
पायरी ५ – आता तुमच्या नोंदणीकृत मोबईल क्रमांकावर एक OTP आला असेल तो टाका आणि “Submit” बटन वर क्लिक करा.
पायरी ६- आता तुमच्या स्क्रीन वर नमो शेतकरी योजनेच्या हपत्याची माहिती दिसेल.
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचे फायदे :
- नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेप्रमाणेच शेतकरी कुटुंबाना प्रती हप्ता २००० रु दिला जातो.
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो.
- भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या योजनेचा फायदा नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल.
- नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या १४ व्या हप्त्यातील समाविष्ठ पात्र शेतकरी कुटुंबान प्रमाणे दिला जाईल व समोर त्याच प्रमाणे अर्थसहाय्य पुरविले जाईल.
- PM-KISAN व Namo Shetkari Yojana 2025 द्वारे प्रत्येकी २००० /- पात्र शेतकरी कुटुंबाना प्रदान केले जाईल.
- PM-KISAN व NSMNY या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकरी कुटुंबाना वर्षाला १२०००/- प्रदान केले जातील.
- पात्र शेतकरी कुटुंबाना लाभ हा DBT (Direct Benefit Transfer) द्वारे पुरविला जाईल.
- नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याला जमा करण्यात आलेली रक्कम हि प्रधानमंत्री किसान सम्मान च्या SoP नुसार वसूल केली जाईल.
वाचा : फळबाग योजनेवर १०० % सबसिडी संधी सोडू नका
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना पात्रता निकष :
१) प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
२) ज्या शेतकरी कुटुंबाकडे (कुटुंब=पती,पत्नी व अल्पवयीन अपत्ये) १ फेब्रुवारी २०१९ रोजी शेती योग्य जमीनधारक शेतकरी कुटुंबाना ह्या योजनेचा लाभ घेता येतो.
३) प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या सर्व अटी शर्ती ह्या योजनेला लागू राहील.
कृषी विद्यापीठ: केळी लागवडीत यशस्वी व्हायचंय ? हे नक्की वाचा
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना अपात्रता निकष :
Namo Shetkari Yojana 2025 योजनेंतर्गत उच्च आर्थिक स्थिती असलेले शेतकरी कुटुंबे पुढे दिलेल्या श्रेणीत असल्यास योजनेंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
१) संस्थात्मक सर्व जमीन धारक.
२) शेतकरी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती जर संविधानिक पद धारण केलेली असल्यास किंवा माजी असल्यास लाभ घेता येणार नाही.
३) सरकारी मंत्रालय,कार्यालय,किंवा विभागात सेवा देत असलेली व्यक्ती अपात्र राहील.
४) केंद्र किंवा राज्यामधील सार्वजनिक शेत्रातील उपक्रमामध्ये काम करत असलेली व्यक्ती.
५) सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून नोकरी करत असलेली व्यक्ती
६) स्थानिक सरकारी संस्थामधील नियमित कर्मचारी.
Namo Shetkari Yojana 2025
७) केंद्र व राज्य सरकारचे मंत्री आणि माजी मंत्री.
८) लोकसभा सदस्य ,राज्यसभा सदस्य ,दोन्ही सभागृहातील माजी सदस्य
९) विधानसभा सदस्य ,विधानपरिषदेचे सदस्य ,दोन्ही सभागृहातील माजी सदस्य
१०) जिल्हा पंचायत समिती अध्यक्ष किंवा माजी अध्यक्ष.
११) महानगरपालिका महापौर किंवा माजी महापौर
१२) मागील वर्षी कर भरलेला कोणताही व्यक्ती किंवा कुटुंब सदस्य ह्यांना PM किसान योजनेचा लाभार्थी म्हणून वगळण्यात येईल.
१३) सरकारी सेवेतून निवृत्त झालेला त्याच बरोबर महिना १०,००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची पेन्शन धारक व्यक्ती अपात्र राहील.परंतु जर पेन्शन धारक वर्ग चतुर्थ ,गट ड कर्मचारी किंवा बहु कर्मचारी असल्यास सांगितलेल्या निकष लागू होणार नाही.
१४) Namo Shetkari Yojana मध्ये डॉक्टर,अभियंते,चार्टर्ड अकाऊंटट,त्याच बरोबर वकील,आर्किटेक इत्यादी व्यवसायात असलेली व्यावसायिक व त्याचे कुटुंबाना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
१५) अनिवासी भारतीय (NRI)
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना आवश्यक कागदपत्रे :
नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी
१) आधार कार्ड- बँकशी लिंक असणे बंधनकारक आहे.
२) मोबाईल नंबर -आधार शी लिंक असणे बंधनकारक
३) ७/१२ उतारा
४) ८अ उतारा
५) फेरफार
६) रेशनकार्ड
७) बँक खात्याचा तपशील
हेही वाचा : पिक उत्पादनात ५०% वाढ करा
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया :
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र पणे अर्ज करण्याची गरज राहत नाही.तुम्हाला जर का प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे हप्ते मिळत असतील म्हणजे जर तुम्ही PM-KISAN योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेसाठी आपोआपच पात्र ठरता.
तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी PM-KISAN योजनेची अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पायरी १- PM-KISAN योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
पायरी २- येथे “New Farmer Registration” हे बटन दाबा.
पायरी ३ – तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा
पायरी ४ – आता तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल ह्यात वयक्तिक माहिती व जमिनीचा तपशील अचूक प्रविष्ट करा.
पायरी ५ – माहिती अचूक प्रविष्ट केल्यावर “Submit” बटन दाबा व भविष्यातील स्थिती तपासण्यासाठी नोंदणी क्रमांक सांभाळून ठेवा.
Namo Maha Shetkari Yojana | सतत विचारले जाणारे प्रश्न |FAQ
प्रश्न १- Namo Shetkari Yojana चा हप्ता कधी मिळतो ?
उत्तर- एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर,डिसेंबर ते मार्च.
प्रश्न २- नमो शेतकरी योजनेत लाभ मिळणारी रक्कम किती आहे ?
उत्तर – प्रत्येक वर्षी दर तीन समान हप्त्यामध्ये ६००० रुपये रक्कम वितरीत केली जाते.
प्रश्न ३- नमो शेतकरी योजनेसाठी बँक खाते आवश्यक आहे का ?
उत्तर – DBT सक्षम बँक खात्यातच योजनेचा लाभ जमा केला जातो.
प्रश्न ४- बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे का ?
उत्तर- हो,नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधार शी लिंक बंधनकारक आहे.
प्रश्न ५- नमो शेतकरी योजनेसाठीचे पात्रता निकष काय आहेत ?
उत्तर- लाभार्थी हा प्रधानमंत्री किसान निधी साठी पात्र असावा.
प्रश्न ६- नमो शेतकरी योजनेसाठी नोंदणी कशी केली जाते ?
उत्तर- नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र पणे अर्ज करण्याची गरज राहत नाही.तुम्ही PM-KISAN योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र आहात.
प्रश्न ७- नमो शेतकरी योजनेत शेतकरी गटाला लाभ मिळतो का ?
उत्तर- नाही, हि योजना फक्त पात्र शेतकरी कुटुंबासाठीच आहे.
प्रश्न ८- नमो शेतकरी योजनेसाठी कुठल्या कागदपत्राची आवश्यकता आहे ?
उत्तर – कुठल्याही कागदपत्राची गरज नाही फक्त प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
प्रश्न ९- Namo Shetkari Yojana चा ७ वा हप्ता कधी वितरीत केला जाईल ?
उत्तर- सातवा हप्ता हा जून २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Namo Shetkari Yojana gr