Namo Drone Didi Yojana 2025 | महिलांना ८ लाखाचे अनुदान संधी सोडू नका ! नमो दीदी ड्रोन योजना

Namo Drone Didi Yojana In Marathi :

Namo Drone Didi Yojana 2025:बचत गटांच्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येते आहे.भारत सरकारने २०२५-२६ ह्या कालावधीसाठी महिला स्वयं सहायता गटांना शेती मध्ये खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन भाड्याने देण्यासाठी Namo Drone Didi Yojana 2025 सुरु केली असून याद्वारे महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी शेत्रात महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिन दयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत भारत सरकारने नमो ड्रोन दीदी योजनेला १२६१ कोटी खर्चासह मंजुरी दिली आहे. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण व कृषी आधुनिकीकरण ह्या तिन्ही शेत्राना Namo Drone Didi Yojana 2025 एकत्रित जोडते.

Namo Drone Didi Yojana 2025

नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत ड्रोन च्या किमतीच्या ८० % पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. ड्रोन ची किमत जास्तीत जास्त ८ लाखापर्यंत असलेल्या ड्रोनला अनुदान दिले जाते.देशातील महिलांनसाठी हि सुवर्ण संधी आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांच्या महिलांना आव्हान करण्यात येत आहे. हि महिलांसाठी एक महत्वाकांशी योजना आहे जी ग्रामीण भागातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली.

लवकर जाणून घ्या : माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल !


Namo Drone Didi Yojana Features :

१) महिलांसाठी ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती करून आर्थिक समावेशान वाढवण्यास भर देणे. न्यानो खतांचा वापर कृषी शेत्रात वाढवणे. ड्रोनच्या सहाय्याने न्यानो खतांचा वापर शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी करणे.

२) महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन सेवा प्रदान करण्यास सक्षम बनविणे. महिलांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करणे या द्वारे ग्रामीण भागातील महिलांना वार्षिक १.५ लाखापर्यंतचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.

३) पिकांचे निरीक्षण , खतांचा व कीटकनाशकांचा सम प्रमाणात वापर होऊन फवारणीचा अतिरेक थांबवणे. बियाणे पेरणी या सारख्या कामामध्ये सुधारणा करून कृषी शेत्रात क्रांती घडवणे.

४) ग्रामीण भागातील महिलांना कृषी शेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण देऊन नवीन वैशिष्टे आत्मसात करण्यास प्रोत्साहन देऊन महिलांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करणे.

हेही वाचा :सोयाबीन उत्पादन खर्चात वाढ


Namo Drone Didi Yojana Benefits :

Namo Drone Didi Yojana 2025
  • Namo Drone Didi Yojana 2025 अंतर्गत महिलांना १५ दिवसाचे तांत्रिक प्रशिक्षण देणे त्यामध्ये ड्रोन चालवणे , डेटाचे विश्लेषण करणे ड्रोन ची देखभाल आणि दुरुस्ती इत्यादी बाबींचा समावेश होतो. दिले जाणारे प्रशिक्षण हे सरकारद्वारे मान्यता प्राप्त केंद्रावर देण्यात येईल.
  • बचत गटाच्या महिला व स्वयं साहायता गटांना ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ड्रोन च्या एकून किमतीच्या ८० % पर्यंतचे किंवा जास्तीत जास्त आर्थिक मदत ८ लाखापर्यंत दिली जाते.
  • अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ड्रोन किमतीच्या रक्कमेसाठी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत ३ % व्याजदराने कर्ज देखील पुरविले जाते.यामुळे ड्रोन खरेदीसाठी निधी उभारण्यास सर्वतोपरी मदत होते.
  • प्रशिक्षणाद्वारे महिला ड्रोन पायलटला रोजगाराची संधी उपलब्ध होते याद्वारे ती ड्रोन प्रशिक्षित महिला काम करून किमान सुमारे १५००० प्रती महिना कमाई करू शकते.
  • Namo Drone Didi Yojana 2025 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची हि सुवर्णसंधी आहे. याद्वारे त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनण्यास मदत मिळते.

latest News: ५ लाखापर्यंत कर्ज ! किसान क्रेडीट कार्ड ठरणार वरदान लगेच अप्लाय करा!

  • वाढत्या मजुरीच्या दरांमुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक भार वाढत चालला आहे. कृषी शेत्रात ड्रोन चा वापर हे यावरील उत्तम उपाय आहे. शेतातील कामाची कार्यक्षमता हि ड्रोनच्या वापरामुळे वाढते याद्वारे पिक उत्पादन वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते व शेतकऱ्यांचा पैसा व वेळ दोन्हीची बचत होते.
  • ग्रामीण भागातील महिलांना हि योजना नवीन कौशले आणि साधने प्रदान करते महिलांचा कृषी शेत्रात सक्रीय प्रमाणात सहभाग वाढवण्यासाठी मदत करेल ड्रोन च्या वापरणे कृषी शेत्रातील उत्पादकता वाढवून अतिरिक्त उत्पन्नाची हमी देते व गरिबी दूर करण्यास प्रोत्साहन देते.
  • रोजगाराच्या निर्मितीस चालना देते ड्रोन चा वापर करत असताना एक ड्रोन पायलट व एक सहाय्यकाची आवश्यकता असते या योजनेंतर्गत महिला बचत गटातील ३०००० पेक्षा अधिक लोकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहे.यामुळे कृषी शेत्रात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या रोजगार उपलब्ध होईल.
  • Namo Drone Didi Yojana 2025 अंतर्गत कृषी शेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार असून याद्वारे अभिनव कृषी पद्धतीना प्रोत्साहन देण्यास हि योजना सक्षम आहे.
  • आत्मनिर्भर भारत अभियान च्या विविध स्तंभांना चालना देण्यासाठी हि योजना राबविली जात असून घरघुती गरजासारख्या बाबीमध्ये हस्तक्षेप करून शेतीच्या वेगवेगळ्या पैलूंचा समावेश ह्यात होतो.
  • Namo Drone Didi Yojana 2025 योजनेद्वारे देशांतर्गत ड्रोन च्या उत्पादनाला चालना मिळेल.

हेही वाचा : सेंद्रियशेती जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी


Namo Drone Didi Yojana 2025 पात्रता निकष :

Namo Drone Didi Yojana apply

१) अर्जदार महिला भारताची नागरिक असावी.

२) स्वयं सहाय्यता गटाची ती महिला सक्रीय सभासद असणे गरजेचे आहे.

३) अर्जदार महिलांचे वय १८ ते ५० वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे.

४) अर्जदार महिलेने किमान १० वी उतीर्ण केलेली असावी.

५) महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असावी व प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असावी.


Namo Drone Didi Yojana 2025 अर्ज प्रक्रिया :

Namo Drone Didi Yojana Apply Online

  • सध्या तरी नमो ड्रोन दीदी योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याची कुठलीच सरकारी पोर्टल किंवा प्रक्रिया अस्तित्वात नाही.
  • हि योजना मुख्यतः महिला स्वयं सहाय्याता गटांमार्फत (SHGs) राबविण्यात येत आहे.
  • तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास स्थानिक महिला स्वयं सहाय्याता (SHGs) गटाना भेट द्या.
  • हे बचत गट योजनेशी संबंधित सरकारी विभागाशी किंवा नोडल एजन्सी शी संपर्क साधून आवश्यक ती अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देऊ शकतात.
  • राज्य स्तरावर या योजनेच्या अमलबजावणीसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून, ह्या समित्या महिला बचत गटाची निवड करून आवश्यक ते संपूर्ण मार्गदर्शन करतात.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुढील हप्ता लवकरच ?

ड्रोन विषयी अधिक माहिती :

Namo Drone Didi Yojana 2025

१) ड्रोन च्या माध्यमातून शेतकरी ऊस व इतर मोठ्या पिकांवर अत्यंत कमी वेळात कीड नियंत्रणासाठी फवारणी करता येते. ड्रोन एका वेळी दहा लिटर औषध वाहून नेऊ शकतो,ड्रोनचे स्वत:चे वजन १९ किलो असते.

३) ड्रोनच्या भोवताल सेन्सेर्स असतात फवारणी करत असताना ड्रोन ला अडथळा येत असल्यास या सेन्सर्सद्वारे तो जाणून घेतो.

४) औषधाचे व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर ड्रोन हवेत गेल्या पासून तो अवघ्या आठ – दहा मिनटात एक एकरातील फवारणी पूर्ण करतो

५) फवारणी पंपमध्ये जाणारे प्रत्येक न्यानो औषध ड्रोन वाहून नेण्यास सक्षम आहे

६) सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनला हायटेक कॅमेरे बसवले असतात

७) ड्रोन बॅटरी वर चालत असल्यामुळे बॅटरी चार्ज करणे गरजेचे असते .एका चार्ज मध्ये दहा ते बारा एकर शेत्र फवारता येते

८) ड्रोन फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे

Namo Drone Didi Yojana 2025

९) एका एकराला कमाल ६०० रुपये खर्च येतो.

१०) ड्रोन च्या किमती ७-८ लाखापासून सुरु होतात त्यावर शासना कडून ८० % सबसिडी Namo Drone Didi Yojana 2025 अंतर्गत मिळते.

११) ड्रोन ला Remote Control , Antina ,GPS बसवलेले असतात.

१२)ड्रोन ला सहा पंखे असतात.

१३) चार स्प्रयिंग नोझल ज्याच्या एका थेंबातून २४० न्यानो पार्टीकल तयार होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते

१४) ड्रोनला एक UNI NO असतो (Unique Identification Number) यामुळे ड्रोन वर लक्ष ठेवणे अधिक सोपे होते


ड्रोन फवारणीचे वैशिष्टे :

  • Namo Drone Didi Yojana 2025 मानव विरहीत वायू यान (ड्रोन) हा एक बचतीचा पर्याय शेतकरी बांधवांसाठी तंत्रज्ञान दिला असून याद्वारे आपण अल्प खर्चात कमी वेळेत drone favarni करू शकतो
  • शेतीचे उत्पन वाढवण्यासाठी जितके महत्व खात ,पाणी ,बियाणांचे यांचे आहे त्याच प्रमाणे पिकावर पडणाऱ्या रोगांच व्यवस्थापन करणे हा सर्वात मोठा घटक आहे
  • पारंपारिक फवारणी पंपामध्ये पाण्यचे थेब मोठे असतात यामुळे पाणी व कीटकनाशके गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरावी लागतात ,पाण्याचा अतिरेक होऊन नुकसानीला समोर जावे लागते, ड्रोन फवारणीमुळे मुळे अचूक प्रमाणात औषध पिकांवर फवारले जाते याचा फायदा उत्पन वाढीसाठी होतो
  • Namo Drone Didi Yojana 2025 शेतकरी बांधवानो, कीटकनाशकाच्या किमती मध्ये सातत्यने होणारी वाढ बघता त्याचा वापर कमी करता आला तर यातून सुटका करता येते . कीटकनाशक आणि पाण्यचा वापर कमी करण्यासाठी ड्रोन हा उत्तम पर्याय आहे
  • ड्रोन मध्ये असलेले अरीअल म्यापिंग पद्धतीमुळे पिकांची जमिनीची तपासणी करता येते त्यनुसार औषधाचे प्रमाण किती असले पाहिजे यासंबंधित माहित ड्रोन आपल्याला देत असते.
  • जमिनीची सुपीकता , पिकांचे वाढीचा , पिकांवरील रोगाचा डेटा मोबाईल मध्ये संग्रहित केला जातो त्यनुसार औषध व पाण्यचे प्रमाण ठरवता येते.
  • ४ स्प्रेइंग नोझल असतात त्यांच्या १ थेंबातून २४० न्यनो पार्टीकल तयार होत असल्यमुळे पाण्यचा वापर कमी होतो त्याचा फायदा पिकांना कीटकनाशक चांगल्य प्रकारे एकसलग सोषुन घेण्यत होतो
  • ड्रोन फवारणी चा वेग पारंपारिक फवारणी पेक्षा ५० पट अधिक असतो म्हणून कमी वेळेत जास्त क्षेत्र फवारता येते . या तंत्रज्ञाणामुळे एका एकरातील फवारणीसाठी दहा ते वीस लिटर द्रावणात फवारणी पूर्ण होते त्यामुळे ९० % पाण्यची तसेच ४० % ते ५०% कीटकनाशकाची बचत होते
  • ड्रोन फवारणी  करण्यासाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते . ड्रोन चालवणे हे एक कौशाल्यचे काम आहे त्यसाठी सरकारद्वारे  Drone Pilot Program राबविला जात आहे .हे १५ दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतरच ड्रोन खरेदी करता येते .अनुदानावर ड्रोन खरेदी करायचे असल्यास Drone pilot परवाना सोबत जोडणे अनिवार्य आहे

Namo Drone Didi Yojana 2025

Namo Drone Didi Yojana 2025
  • ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण विद्यापीठात उपलब्ध देखील आहे. या प्रशिक्षणात पायलट ला सर्व ड्रोन बद्दल संपूर्ण माहिती नियमावली सांगितली जाते
  • ड्रोन चालवताना आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन हाताळण्याचे संपूर्ण प्रशिक्षण देले जाते .प्रशिक्षण शिवाय ड्रोन चालवणे धोक्याचे ठरू शकते
  • प्रत्येक ड्रोन चा एक unique identification number असतो, त्याची नोंद डीजीसीए (Digital Sky Platform) करणे आवश्यक आहे
  • मजूर टंचाई वरती नवीन तंत्रज्ञानातून उपाय शोधले जाऊ शकतात फवारणी साठी करत असलेली पारंपारिक पद्धत आता बदलून, एका प्रशिक्षित ड्रोन पायलट कडून कमी खर्चात आपण फवारणी करू शकतो.
  • यातून मजूर टंचाईची समस्या पूर्ण पणे आपण घालवू शकता.नवनवीन तंत्रज्ञान युवा शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आता महत्वाचे झाले आहे