Kamgar Mofat Bhandi Yojana :
Mofat Bhandi Yojana:महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबविल्या जात असून त्यापैकी एक योजना म्हणजे “गृह उपयोगी वस्तू संच योजना” हि योजना सध्या कामगारवर्गा मध्ये अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. Mofat Bhandi Yojana आर्थिक मूल्याच्या दृष्टीने जरी इतर योजनांच्या तुलनेत लहान दिसत असली तरी कामगारांना ती तात्काळ लाभ देत असल्यामुळे त्याचा थेट लाभ कामगारांना मिळतो आहे. ह्या लेखामध्ये आपण योजनेचा लाभ घेण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत. चला सुरवात करूया !

जानेवारी २०२१ पासून महाराष्ट्र सरकारने Bandhkam Kamgar Yojana Maharashtra हि योजना शासन निर्णयाद्वारे “गृहपयोगी वस्तू संच” योजनेस मजुरी दिला. हि योजना कामगार वर्गामध्ये ” Mofat Bhandi Yojana” ,” किचन सेट योजना” किंवा “भांडे योजना” ह्या नावाने अत्यंत लोकप्रिय ठरली असून कल्याणकारी योजनांपैकी एक असली तरी तिच्या मूर्त स्वरूपातील लाभामुळे कामगार वर्गामध्ये तिची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.
Bandhkam Kamgar Yojana In Marathi :
बांधकाम कामगार म्हटले तर स्थलांतरित जीवन, कामगार वर्गाला नेहमीच त्यांचे काम पूर्ण झाल्यावर अनेकदा नवीन ठिकाणी स्थलांतरित व्हावे त्यामुळे त्यांना नेहमीच नवीन निवासस्थान , मुलांचे शिक्षण आरोग्य सुविधा , व जेवणा – खाण्याच्या व्यवस्थेशी संपूर्ण कुटुंबाला जुळवून घ्यावे लागते. अशा वेळी कामगारांच्या स्थलांतरित जीवनात मदतीचा हात समोर करण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने Mofat Bhandi Set Yojana गृहपयोगी वस्तूंचा संच पुरवून हि योजना कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत करते आहे.
Latest News: महिलांना मिळत आहे सरकारकडून ७.५ लाखाची आर्थिक मदत! लगेच तपासा!
Bandhkam Kamgar Yojana bhandi list :
गृहपयोगी वस्तू संचामधील वस्तूंची यादी:
Mofat Bhandi Yojana अंतर्गत गृहपयोगी वस्तू संचामध्ये एकूण १७ प्रकारच्या वस्तूचे ३० नाग समाविष्ट आहे
किचन मधील भांडी:
- ताट- ४ नग
- वाट्य -८ नग
- पाण्याचे ग्लास -४ नग
- पातेले झाकणासह -३ सेट (विविध आकाराचे)
- मोठा चमचा (भातासाठीचा) -१ नग
- मोठा चमचा (वरनासाठीचा)- १ नग
- पाण्याचा जग- २ लिटर क्षमतेचा
- मसाला डब्बा – ७ भागाचा १ नग
स्टोरेज आणि कुकिंग उपकरणे:
- डब्बे झाकणासह -३ नग ( १४, १६, १८ इंच )
- परात १ नग
- प्रेशर कुकर ५ लिटर ( स्टेनलेस स्टील)
- स्टीलची कढाई १ नग
- स्टीलची टांकी (मोठी) झाकणासह व वगराळासह – १ नग
gruh upyogi vastu sanch yojana अतिरिक्त वस्तू:
- तवा १ नग (लोखंडी किंवा नॉनस्टिक)
- तांब्या – पितळेचे पाणी पिण्याचे भांडे
- चमचे सेट
- कप बशी संच
- भाजी चिरण्यासाठी चाकू व खराटे (झारी)
- गॅस लाईटर
हेही वाचा: आदिवासी शेतकऱ्यांसाठी ७ लाखाचे अनुदान, संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा !
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Eligibility Criteria: मोफत भांडी योजना पात्रता निकष:
गृहपयोगी वस्तू संच योजनेचा किंवा मंडळामार्फत येणाऱ्या इतर विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आणि त्याची हि “नोंदणी सक्रीय” असणे गरजेचे आहे.
मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी पुढील पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक राहील.
१) कामगाराचे वय हे १८ ते ६० वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
२) मागील १२ महिन्यामध्ये किमान ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे गरजेचे आहे.
३) निवासी दर्जा : महाराष्ट्राचा स्थायी रहवासी असणे गरजेचे राहील.
४) कामगाराची नोंदणी हि रिन्युअल केलेली असावी.
५) एकदा योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.
६) फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
Mofat Bhandi Set Yojana : आवश्यक कागदपत्रे
- वयाचा पुरावा ( शाळा सोडल्याचा दाखला )
- मागील ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- ओळखपत्र ( आधार कार्ड / पॅन कार्ड)
- राहवासी पुरावा
- अर्जदाराचे बँक पासबुक प्रतीचा तपशील
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- नॉमिनीचे आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
- स्वयंघोषणा पत्र ( योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसल्याचे प्रमाणपत्र )

Bandhkam kamgar yojana form online apply : mofat bhandi yojana online registration
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
Gruh upyogi vastu yojana online Apply
पहिली पायरी :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा येथे क्लिक करा.
दुसरी पायरी :- येथे तुम्हाला गृह उपयोगी वस्तू संच वितरणाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
तिसरी पायरी:- तुमचा १४ अंकी BCOW कामगार नोंदणी क्रमांक टाका.
चौथी पायरी:- नवीन अपोईटमेट घ्या किंवा आधीची अपोईटमेट प्रिंट करा.येथे क्लिक करा (mofat bhandi yojana)
पाचवी पायरी:- सर्व आवश्यक माहिती भर व कागदपत्रे अपलोड करा.
ऑफलाईन अर्जप्रक्रिया
- तुमच्या आसपासच्या स्थानिक कामगार कार्यालयातून मागणी अर्जाचा फॉर्म मिळवा.
- अर्ज डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा
- सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
- सादरीकरण- अर्जातील माहिती अचूक भरल्यानंतर व कागदपत्रासह अर्ज कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात किंवा ग्रामपंचायत / महानगरपालिका कार्यालयात जमा करा.
मोफत भांडे वितरण प्रक्रिया : गृहपयोगी वस्तू संच मिळवण्यासाठी लाभार्थी कामगाराने निर्धारित दिवशी वेळेवर कम्पमध्ये उपस्थित असणे गरजेचे आहे. वस्तू संच थेट हातात दिले जातात. पैसे खात्यात जमा होत नाही ह्याची दक्षता घ्यावी.
वेळेची मर्यादा: mofat bhandi yojana मधील पात्र कामगारांना भांडी संच सामन्यात ३० दिवसाच्या आत वितरीत केला जातो.
योजनेचे फायदे: हि योजना कामगार बांधवांसाठी अत्यंत महत्वाची ठरत असून या योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबाला मुलभूत गृहपयोगी वस्तू खरेदीवरील खर्च देखील वाचतो आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते.
बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क करू शकता :
Mofat Bhandi Yojana
संपर्क | महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे स्थानिक कार्यालय |
---|---|
कार्यलयीण अधिकृत मदत क्रमांक | १८००-८८९२-८१६ |
फोन नंबर | (०२२) २६५७-२६३१ (०२२)२६५७-२६३२ |
ई- मेल | support@mahabocw.in bocwwboardmaha@gmail.com |
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra :
Mofat Bhandi Yojana गृह उपयोगी वस्तू संच योजनेव्यतिरिक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अनेक महत्वाच्या कल्याणकारी योजना राबवित असते ह्या तील काही महत्वाच्या योजनाचा थोडक्यात आढावा पुढे सांगितलेला आहे.
१) शैक्षणिक योजना : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार मंडळ मुलांना शिष्यवृत्ती पुरवते. ह्या योजने अंतर्गत
- इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या मुलांना वार्षिक २५०० रुपये पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
- इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना ५००० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
- ११ व १२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना वार्षिक १०,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
- पदवी शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना २०,००० रु वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
- पद्वुत्तर पदविकेसाठी वार्षिक २५,००० पर्यंतची आर्थिक मदत मंडळाकडून दिली जाते.
- वैद्यकीय पदवी अभ्यास क्रमासाठी अर्थ सहाय्य दिले जाते.
- अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना देखील शिष्यवृत्ती दिली जाते.
२) आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा योजना :
- बांधकाम कामगारांचा कामावर अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत वारसदाराना मंडळ प्रदान करते.
- कामावर नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत वारसदाराना मंडळ प्रदान करते.
- त्याच बरोबर कामगारांच्या मृत्यू नंतर अंत्यसंस्कारासाठी देखील १०,००० रुपयाचे अर्थ सहाय्य दिले जाते.
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत घराच्या खरेदी किंवा बांधणीसाठी २ लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.
- कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी रुपये ३०,००० ची आर्थिक मदत दिली जाते.
३) आरोग्य विषयक योजना: हि योजना विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा ह्या नावाने प्रचलित असून ती फिरत्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कामगारांची आरोग्य तपासणी करत असते.
कामगारांना कुठल्याही गंभीर आजारावर उपचाराची गरज असल्यास ह्या योजनेंतर्गत आर्थिक मदत पुरविली जाते. त्याच बरोबर महात्मा जोतीराव फुले. जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचाही लाभ मंडळ कामगारांना मिळवुन देते.
निष्कर्ष : Mofat Bhandi Yojana
“गृहपयोगी वस्तू संच योजना” हि एक केवळ कल्याणकारी योजना नसून ती बांधकाम कामगारांच्या जीवनात एक आमुलाग्र्ह बदल घडवून आणणारी योजना आहे. कामगारांच्या जीवनातील दैनंदिन अडचणीचा सामना करण्यासाठी एक प्रभावी योजना म्हणून समोर येत आहे तिच्या मूर्त स्वरूपामुळे आणि तत्काळ लाभामुळे Mofat Bhandi Yojana हि कामगारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
गृहपयोगी वस्तू संच योजना हि कामगारांमध्ये मंडळाच्या इतर मोठ्या व दीर्घकालीन योजनाचा लाभ घेण्यासाठीचे प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. परंतु माहितीचा अभाव आणि डिजिटल साक्षरतेचे आव्हान या सारख्या अम्ल्बाजाव्नीतील त्रुटीवर लक्ष देण्याची गरज मंडळाला आहे.Mofat Bhandi Yojana द्वारे मंडळाच्या इतर सर्व योजनाचे फायदे अधिक प्रभावीपणे व सर्व्सामावेशाकपणे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहचू शकतील ज्यामुळे त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडण्यात नक्कीच मदत होईल.