ladki bahin yojana news:
Majhi Ladki Bahin Yojana 2025:महिलांना रोजगार निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य देणे हा प्रमुख उद्देश माझी लाडकी बहिण योजनेच असून २०२४ पासून महाराष्ट्र सरकारने ह्या योजनेची सुरवात केली.योजना यशस्वीरीत्या राबविली जात असून महाराष्ट्रातील महिलांना व मुलींना आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यास मदत करते.राज्यातील माता बहिणीना स्वावलंबी बनविण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे.महिलांचे आरोग्य व पोषणासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २८ जून २०२४ पासून यशस्वीरीत्या राबविल्या जात आहे.ह्या Majhi Ladki Bahin Yojana २०२५ योजने मार्फत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये प्रमाणे आर्थिक साहाय्य दिले जाते.

Majhi Ladki Bahin Yojana २०२५ काही विशिष्ट बाबींमध्ये महिलांना वगळण्यात आले असून माहिती पुढे दिलेली आहे.माहिती पूर्ण वाचा व अशाच योजना संबंधित माहितीसाठी whatsaap group ला join करा,चला सुरवात करूया !
ladki bahin yojana news:
Majhi Ladki Bahin Yojana २०२५
लाडकी बहिन योजनेमध्ये २१ – ६५ वर्ष वयाच्या महिलांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येईल.महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ह्या योजनेची सुरवात केली.महाराष्ट्र राज्यातील २०२४ च्या अर्थसंकल्पात मा.वित्त मंत्री अजित पवार ह्यांनी ४६ हजार कोटी रुपयाचा निधी राज्यातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचे सांगितले होते.ह्या मार्फत राज्यातील माता भगिनींना त्याच्या सर्वोत्तम विकासासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना द्वारे महाराष्ट्रातील महिलांना व मुलीना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या सशक्ती कारणास चालना देण्यासाठी हि योजना यशस्वी रित्या चालवली जात आहे. महारष्ट्रातील महिलांसाठी हि योजना अतिशय उपयुक्त ठरत असून ह्या योजने मार्फत आतापर्यंत अधिकृत वेबसाईट नुसार १ कोटी १२ लाख महिलांनी अर्ज सादर केले आहेत त्यापैकी १ कोटी ६ लाख महिलांना ह्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरविले आहे.
लाडकी बहिण योजना पात्रता निकष २०२५
Ladki bahin yojana eligibility
१) योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व मुलीना महाराष्ट्राच्या रहवाशी असणे बंधनकारक आहे.
२) महाराष्ट्र राज्यातील विवाहित महिला, विधवा महिला , घटस्फोटीत महिला , परित्यक्ता व निराधार असलेली महिला त्याच बरोबर कुटुंबातील फक्त एकच अविवाहित महिला ह्या योजनेस पात्र आहे.
३) ह्या योजनेसाठी महिलांचे वय कमीत कमी २१ वर्ष पूर्ण असलेले असावे व जास्तीत जास्त ६५ वर्ष पर्यंत असणे बंधनकारक आहे.
४) ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड शी लिंक केलेले असावे.
५) महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक नसणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अपात्रता निकष २०२५
१) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक असल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
२)Majhi Ladki Bahin Yojana २०२५ लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य आयकरदाता असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
३) ज्या महिला कुटुंबातील सदस्य हे सरकारचे नियमि/कायम कर्मचारी असल्यास किंवा सरकारी विभाग/उपक्रम मंडळ किंवा भारत सरकारचे त्याच बरोबर राज्य सरकारच्या संस्था किंवा स्थानिक संस्थे मध्ये कर्मचारी असल्यास अशा महिलांना योजनेचा लाभार्थी म्हणून २०२५ च्या नवीन बदलानुसार वगळण्यात आले आहे.
४) लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य हे सेवानिवृती वेतन घेत असल्यास अशी महिला योजनेस अपात्र राहील.परंतु या मध्ये २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेला बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार त्याच बरोबर कत्राटी कामगार असल्यास ह्या योजनेचा लाभ घेता येतो
५) लाभार्थी महिला जर महाराष्ट्र राज्याच्या इतर कुठल्याही विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या आर्थिक योजनेमध्ये प्रती महिना 1500 रुपये किंवा त्या पेक्षा अधिक रक्कमेचा लाभ घेत असल्यास त्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आले आहे.
६) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा माजी खासदार असल्यास त्या महिलांना लाभ घेता येणार नाही.
७)ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा माजी आमदार असल्यास त्या महिलांना लाभ घेता येणार नाही.
८) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार च्या बोर्ड किंवा कोर्पोरेशन किंवा भारत सरकारच्या उपक्रमामध्ये अध्यक्ष /उपाध्यक्ष /संचालक किंवा सदस्य असल्यास ह्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
९) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे राज्य सरकार च्या बोर्ड किंवा कोर्पोरेशन किंवा भारत सरकारच्या उपक्रमामध्ये अध्यक्ष /उपाध्यक्ष /संचालक किंवा सदस्य असल्यास ह्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
१०) जर महिला कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहनाची नोंदणी असल्यास त्यां महिलांना लाभ घेता येणार नाही तथापि ट्रक्टर असल्यास त्यांना लाभ घेता येईल.
Majhi Ladki Bahin Yojana २०२५ अर्ज प्रक्रिया:
ladki bahin yojana form
१) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
२) महिलांना अर्ज करावयाचा असल्यास पुढील ठिकाणी अर्ज करता येईल:त्यामध्ये अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका /मुख्यसेविका/यांच्या कडे महिला आपली कागदपत्रे जमा करू शकतात.
३) त्याचबरोबर, सेतू सुविधा केंद्र /ग्राम सेवक/समूह संसाधन व्यक्ती /आशा सेविका / वार्ड अधिकारी/सिटी मिशन म्यनेजर /महानगरपालिका बालवाडी सेविका /मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सरकार सेवा केंद्र कडे देखील महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
४) वर सांगितलेल्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
५) अर्ज करणाऱ्या महिलेने स्वतःचे नाव /जन्म तारीख /रहवासी पत्ता इत्यादी माहिती आधार कार्ड वर असल्याप्रमाणे अचूक भरावी.
६) बँकेचा तपशील आणि मोबईल नंबर अचूक भरल्याची खात्री करून घ्यावी.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रे:
Majhi Ladki Bahin Yojana २०२५
१) आधार कार्ड (अर्ज करताना आधारकार्ड नुसार नाव नमूद करा)
२) अधिवास प्रमाणपत्र
- प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पुढील निकष पाळावे:
- रेशनकार्ड (१५ वर्ष पूर्ण झालेले) / मतदार ओळखपत्र (१५ वर्ष पूर्ण झालेले)/जन्माचा दाखला /शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.यापैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राची पूर्तता करावी.
२.१) अर्जदार महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास: रेशनकार्ड (१५ वर्ष पूर्ण झालेले) / मतदार ओळखपत्र (१५ वर्ष पूर्ण झालेले)/जन्माचा दाखला /शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.यापैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राची पूर्तता करावी.
३) वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा अधिक नसावे. जर अर्जदार महिलेकडे शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही (पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका बंधनकारक).शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
४) अर्जदार महिलेकडे कुठलीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न हे २.५० लाख असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
५) अर्जदार महिला हि नवविवाहित असल्यास तिच्या पतीचे रेशनकार्ड(उत्पन्न दाखला म्हणून) विवाह प्रमाणपत्र सह जोडणे बंधनकारक राहील.
६) बँक खात्याचा संपूर्ण तपशील(बँक खाते आधार लिंक असणे बंधनकारक).
७) अर्जदार महिलेचे हमीपत्र व फोटो आवश्यक.
लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी अशी करा:
Majhi Ladki Bahin Yojana Registration Process 2025

पायरी १ – योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या .येथे क्लिक करा
पायरी २ – अर्जदार लॉगिन हे बटन दाबा व त्यानंतर खाते तयार करा हे बटन दाबा.
पायरी ३ – ह्या पायरी वर तुम्हाला नोदणी फॉर्म दिसेल त्यामधील तपशील अचूक भरा.त्यामध्ये: आधार नंबर >> मोबईल नंबर >>पासवर्ड >>पासवर्ड परत टाकून पुष्टी करा >>जिल्हा >>तालुका>>गाव>>महानगरपालिका/परिषद >>अधिकृत व्यक्ती आणि अटी व शर्ती स्वीकारा वर क्लिक करा.
पायरी ४ – दिसत असलेला Captcha कोड लिहा व नंतर साईन अप हे बटन दाबा. हि प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला एक OTP प्राप्त होईल.
पायरी ५ – परत तो OTP आणि Captcha जसाच्या तसा प्रविष्ट करा.
पायरी ६ – आता तुमचे लॉगिन यशस्वी झाले असल्याचे पुष्टी करावी त्यासाठी OTP सत्यपीत करावर क्लिक करावे.
येथे तुमची नोदणी प्रक्रिया पूर्ण होते.
लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

पायरी १ – सर्वप्रथम लॉगीन करावे त्यासाठी मोबईल नंबर ,पासवर्ड व कॅप्चा जसाच्या तसा प्रविष्ट करा.
पायरी २ – “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज” ह्या वर क्लिक करा व आधार क्रमांक आणि कॅप्चा नमूद करा.
पायरी ३ – वैध आधार वर क्लिक करा आणि अर्जदार महिलेचे नाव ,बँकेचा तपशील व कायमचा राहवाशी पत्ता प्रविष्ट करा व नोंदणी फॉर्म भरून घ्या
पायरी ४ – आधार कार्ड , अधिवास प्रमाणपत्र ,रेशनकार्ड इत्यादी बाबीची स्कॅन कागदपत्रे अपलोड करा.
पायरी ५ – तुम्ही केलेल्या अर्जाचा आयडी एसएमएस द्वारे मिळवण्यासाठी समाविष्ट करा ह्या बटनावर क्लिक करा.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना FAQ
सतत विचारले जाणारे प्रश्न:
१) मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना कशाशी संबंधित आहे ? उत्तर – आर्थिकदृष्ट्या कुमकुवत महिलांसाठी हि योजना आहे.हि फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी असून आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या महिलांना आर्थिक व सामाजिक बळ देण्याचे कार्य करते.
२) ह्या योजनेचा लाभ कोणाला घेता येतो ? उत्तर – महारष्ट्रातील महिला राहवाशी त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या कुमकुवत घटकातील महिला ह्या योजनेस पात्र आहे.तत्पूर्वी पात्र निकष पूर्ण केलेले असावे.
३) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया निशुल्क आहे का ? उत्तर – हो,Majhi Ladki Bahin Yojana २०२५ मध्ये संपूर्ण अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने निशुल्क ठेवली आहे.अर्ज करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही.
४) योजनेसाठी निवड झाली असल्याचे कुठे कळवले जाईल ? उत्तर – निवड झालेल्या लाभार्थी महिलेला एसएमएस द्वारे कळवण्यात येईल व अंतिम यादी हि स्थानिक पातळीवर देखील बघावयास मिळेल.
५) योजनेचा लाभ वितरीत कसा केला जातो ? उत्तर – लाभार्थी महिलेला थेट बँक खात्यात पैसे (DBT )वितरीत केला जाईल.
६) लाभार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर आहे का ? उत्तर – हो लाभार्थी महिलेला योजने संबंधित अडचण आल्यास १८१ ह्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधू शकता.
७) योजनेसाठी अर्ज कसा करावा ? उत्तर – अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करता येतो सर्वप्रथम महिलेला नोंदणी करावी लागेल.आवश्यक माहितीची पूर्तता करून सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
८) अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ? उत्तर – आधार कार्ड ,अधिवास प्रमाणपत्र ,उत्पन्न प्रमाणपत्र ,विवाह प्रमाणपत्र त्याच बरोबर बँक खात्याच्या तपशील इत्यादी.
माझी लाडकी बहिण योजना मार्गदर्शक तत्वे
इतर:
फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी