Magel Tyala Shettale Yojana :
Magel Tyala Shettale Yojana 2025:शेतकरी बंधुनो,”मागेल त्याला शेततळे” हि योजना २०२० मध्ये निधी च्या अडचणीमुळे बंद करण्यात आली होती.त्यानंतर २०२२-२३ पासून वैयक्तिक शेततळे ह्या घटकाच्या स्वरूपात ती मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुन्हा सुरु करण्यात आली. म्हणजेच, जरी योजनेच्या नावात बदल झाला असला तरी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा उद्देश व अमलबजावणी हि “मागेल त्याला शेततळे” योजने सारखीच आहे.सध्या परिस्थितीत ह्याच योजनेंतर्गत शेतकरी बांधवाना शेततळे तयार करण्यासाठी अनुदान दिले जाते. २०२२-२३ पासून ह्या योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम वाढविण्यात आली असून ती ७५०००/- पर्यंत करण्यात आळी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास “Magel Tyala Shettale Yojana 2025” आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वयक्तिक शेततळे ह्याचाच अद्यावत व विस्तारित भाग आहे.

शेतकरी बंधुनो,ह्या लेखात आपण २०२२-२३ पासून नवीन सुरु झालेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन वैयक्तिक शेततळेच्याच अनुशंगाने माहिती बघणार आहोत. तुमच्या शेतात १०० % शेततळे उभारणीसाठी आम्ही मदत करणार आहोत.माहिती शेवट पर्यंत वाचा व योजनेचा आवश्य लाभ घ्या.चला सुरवात करूया !
हेही वाचा : फळपिक विमा योजनेचा हंगामानुसार संपूर्ण तपशील
Magel Tyala Shettale Information In Marathi
Magel Tyala Shettale Yojana 2025 ,आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात कोरडवाहू शेती आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील ८२ % शेती हि सर्वस्वी पावसावरच अवलंबून आहे.मागील काही वर्षापासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. परिणामी महाराष्ट्राच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण, पावसाचा खंड ह्या प्रमुख नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम बघावयास मिळतो. शेतामध्ये सिंचनाची सोय नसल्यामुळे पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. ज्याठिकाणी पाण्याचा सर्वाधिक ताण पडतो तेथील पिके नष्ट होताना बघावयास मिळत आहे.म्हणूनच ज्यावेळी पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते.त्यावेळी वाहून जाणारे नदी, नाले, ओढ्यातील पाण्याचा उपसा करून त्यांची साठवणूक करणे हाच एक उत्तम पर्याय समोर येतो. शेतामध्ये शेततळया सारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हि आता काळाची गरज बनली आहे.
हवामानातील साततच्या बदलांमुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात कमालीची घट बघावयास मिळत आहे.परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाकीची होत चालल्यामुळे शेतामध्ये शेततळे खोदकामासाठीचा खर्च करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी यापूर्वी राज्य सरकारने शेततळे योजना अनुदानावर राबविली होती.त्यावेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास भरपूर मदत मिळाली. २०२० नंतर राज्य सरकारची कोणतीही योजना शेततळे खोदण्यासाठी कार्यन्वित नसल्यामुळे शासनाने २०२२ पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे घटकाचा (Magel Tyala Shettale Yojana 2025) समावेश ह्या योजनेत केला.
हेही वाचा :रेशीम शेती योजना देईल शाश्वत नफा ! संधी सोडू नका
योजनेचा उद्देश आणि प्रमुख वैशिष्टे :
१) महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे.अशा कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता करण्यात यावी.
२) शेतकरी बांधवांसाठी संरक्षित व शाश्वात सिंचन सुविधा निर्माण करण्यात यावी.
३) दुष्काळावर मात करत शेती उत्पादनात शाश्वतता टिकवणे.
४) शेततळे उभारणीसाठी सरकारकडून ह्या Magel Tyala Shettale Yojana 2025 योजनेंतर्गत शेतकऱ्याना अनुदान दिले जाते.अनुदानित रक्कम हि शेततळ्याच्या आकारमानानुसार निश्चित केली जाते.१४४३३ ते ७५०००/- पर्यंत अनुदान मिळते.

५) शेततळ्याचे आकारमान हे १५ x १५ x ३ मीटर पासून ते ३४ x ३४ x ३ मीटर पर्यंत अनुदानासाठी पात्र असेल. तथापि अधिक आकारमानाचे शेततळे बांधायचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा अधिकची रक्कम हि लाभार्थी शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल.

६) शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, दारिद्र रेषे खालील कुटुंबे (BPL) ह्यांना योजनेमध्ये प्राधान्य दिले गेले आहे. त्यानंतर शेततळ्या साठी आधी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना निवडले जाईल.
७) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत जमा केली जाईल.
Latest News: आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करणे झाले सोपे ! आता सरकार देणार १०० % अनुदान
Magel Tyala Shettale Yojana पात्रता निकष :
Magel Tyala Shettale Yojana 2025
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहवासी असणे बंधनकारक राहील.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर कमीतकमी ०.६० हेक्टर (दीड एकर) जमीन असणे बंधनकारक राहील ( कमाल जमिनीची मर्यादा नाही )
- शेततळे उभारणीसाठी जमिनीची निवड करत असताना जमीन हो मुरमाड , वाळूकामय ,दलदलीची ,संछिद्र नसावी. जमीन कमीत कमी ३ % पेक्षा कमी उताराची असणे गरजेचे आहे.
- Magel Tyala Shettale Yojana 2025 लाभ घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्याने घेतलेला नसावा(उदा: मनरेगा , आरकेव्हीवाय इत्यादी ) शेततळे किंवा सामुदायिक शेततळे किंवा विहिरी इत्यादी बाबींचा लाभ घेतलेला नसावा.
- शेततळ्याची उभारणी हि कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवकांनी ठरवून दिलेल्या जागेवरच करण्यात यावी.
- स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड हि शेततळ्याच्या बांधावर करणे बंधनकारक राहील.
- शेततळ्याची निगा राखणे आणि दुरुस्तीची जबाबदारी हि स्वतः लाभार्थ्याची असेल.
- पावसाळ्यात शेततळ्यामध्ये गाळ साठणार नाही ह्याची जबाबदारी हि लाभार्थी शेतकऱ्याची असेल.
- लाभार्थी शेतकऱ्याने ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे गरजेचे आहे.
- मंजूर झालेल्या आकारमानाचेच शेततळे खोदणे गरजेचे आहे.शेततळ्यात इनलेट व आउटलेटची सोय असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याला स्वखर्चाने शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करावे लागेल. ( यासाठी काही प्रमाणात ५० % अनुदान दिले जाते. कृषी विभागाशी संपर्क साधावा )
शेतकऱ्यांनो उद्दोजक होण्याची सुवर्ण संधी ! सरकार देणार ५० लाखाचे अनुदान
Magel Tyala Shettale Yojana आवश्यक कागदपत्रे :
- ७/१२ उतारा
- ८ अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरोक्स
- जातीचा दाखला
- हमीपत्र
- दारिद्र रेषे खालील असल्याल दाखला (असल्यास )
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला (असल्यास )
Magel Tyala Shettale Yojana अर्ज प्रक्रिया :
Magel Tyala Shettale Yojana 2025 चा लाभ घेण्यासाठी ची संपूर्ण अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीची ठेवण्यात आली असून महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
पायरी १- महाडीबीटी पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
- महाडीबीटी पोर्टल ची अधिकृत वेबसाईट https://mahadbtmahait.gov.in/
पायरी २- शेतकरी बंधुंनो,तम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हला आधी नोंदणी करावी लागेल.
- त्यासाठी “नवीन अर्जदार नोंदणी” हे बटन दाबा.ह्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबईल क्रमांक प्रविष्ठ करावा लागेल.एकदा का नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली कि तुम्ही अर्ज करण्यासाठी तयार आहात.
- आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.
पायरी ३- लॉगीन केल्या नंतर
- येथे तुम्हाला “अर्ज करा” किंवा “योजनेसाठी अर्ज करा” हे पर्याय दिसतील.ह्या पर्यायावर क्लिक करा.
पायरी ४- वरील प्रक्रिया करताच तुम्हाला सिंचन साधने व सुविधा निवडा हा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- सिंचन साधने व सुविधा मध्ये तुम्हाला “वैयक्तिक शेततळे” हा पर्याय निवडायचा आहे.
पायरी ५- शेततळ्याचा प्रकार
- तुम्हाला येथे दोन पर्याय दिसतील एक म्हणजे “इनलेट किंवा आउटलेटसह” आणि दुसरा म्हणजे “इनलेट किंवा आउटलेशिवाय” या पैकी एका उपघटकाची तुम्हाला निवड करावयाची आहे तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा.
पायरी ६- शेततळ्याचे आकारमान
- तुमच्या जमिनीच्या आकारमानानुसार शेततळे निवडा येथे तुम्हाला शेततळ्याचे आकारमान नमूद केलेले दिसेल उदा: २० x २० x ३ किंवा ३० x ३० x ३ )९ योग्य टो पर्याय निवडा.
पायरी ७- इतर संबंधित आवश्यक माहिती भरावयाची आहे.
- जसे कि, जमिनीची माहिती, बँकेचा तपशील, संपर्क माहिती हि माहिती अचूक भरा.
पायरी ७- कागदपत्रे अपलोड करा
- ७/१२ उतारा
- ८ अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरोक्स
- जातीचा दाखला
- हमीपत्र
- दारिद्र रेषे खालील असल्याल दाखला (असल्यास )
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला (असल्यास )
- इत्यादी कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावयाची आहे. स्कॅन प्रत नमूद केलेल्या आकारमानानुसार असणे गरजेचे आहे.
पायरी ८- अर्ज सबमिट करा
- संपूर्ण माहिती अचूक भरल्या नंतर आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर,एकदा पूर्वावलोकन करणे गरजेचे आहे.त्या नंतरच अर्ज सादर करा ह्या बटनावर क्लिक करा.
पायरी ९- अर्जाची पावती आणि अर्ज क्रमांक
- वरील प्रक्रिया पूर्ण होताच तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
- आता तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती व अर्ज क्रमांक SMS द्वारे पाठविला जातो.
- अर्जाची पावती आणि अर्ज क्रमांक ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित जतन करून ठेवणे गरजेचे आहे कारण ह्यांच्या आधारेच आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतो.
पायरी १०- अर्जाची स्थिती तपासणे
Magel Tyala Shettale application status
- तुम्ही अर्ज केला असल्यास आपल्या खात्यावर लॉगीन करून स्वतः अर्जाची स्थिती तपासू शकता त्यासाठी
- Application Status हा पर्याय निवडावा.
शेतकरी बंधुनो Magel Tyala Shettale Yojana 2025 साठी अर्ज करताना कुठलीही चूक होणार नाही ह्याची दक्षता घ्या वर सांगितलेल्या प्रक्रियेचे तंतोतंत पालन केल्यास कुठलीच अडचण येणार नाही.
शेततळ्याचे काम कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून ३ महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील. कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम योजनेंतर्गत दिली जात नाही.काम पूर्ण झाल्यावरच अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.
शेततळ्या साठीच्या प्लास्टिक अस्तारीकारणाचा खर्च लाभार्थ्याला स्वतः करावयाचा असतो.शेततळ्याची उभारणी हि कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवकांनी ठरवून दिलेल्या जागेवरच करण्यात यावी
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
प्रश्न १) मागेल त्याला शेततळे योजना अजूनही सुरु आहे का ?
उत्तर- हो,मागेल त्याला शेततळे योजना अजूनही सुरु आहे फक्त आता ती मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वयक्तिक शेततळे नावाने राबविली जाते.
प्रश्न २) शेततळे बांधण्यासाठी किती अनुदान मिळते ?
उत्तर- शेततळ्याच्या आकारमानानुसार वेगवेगळी अनुदान पुरविले जाते, १४४३३ ते ७५०००/- पर्यंत अनुदान मिळते.
प्रश्न ३) शेततळ्या साठी कोणत्या जागेची निवड करावी लागते ?
उत्तर- शेततळे उभारणीसाठी जमिनीची निवड करत असताना जमीन हो मुरमाड , वाळूकामय ,दलदलीची ,संछिद्र नसावी. जमीन कमीत कमी ३ % पेक्षा कमी उताराची असणे गरजेचे आहे.
प्रश्न ४) योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
उत्तर- संपूर्ण अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीची ठेवण्यात आली असून महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
प्रश्न ५) शेततळे बांधण्यासाठी वेळेची मर्यादा आहे का ?
उत्तर- शेततळ्याचे काम कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून ३ महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
प्रश्न ६) योजनेसाठी अर्ज केल्या नंतर निवड कशी होते ?
उत्तर- Magel Tyala Shettale Yojana मध्ये अर्ज केल्यानंतर संगणकीय सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड होते.निवड झालेल्या लाभार्थ्याचे कागदपत्रे तपासली जातात. जागेचे सर्वेक्षण केले जाते व नंतर काम सुरु करण्यास मंजुरी दिली जाते.
प्रश्न ७) शेततळे पूर्ण झाल्यानंतर अनुदान कधी पर्यंत मिळते ?
उत्तर- शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी कामाची पाहणी करतात व काम योग्य असल्याची खात्री झाल्यावरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानित रक्कम हस्तांतरित केली जाते.
magel tyala shettale gr