ladki bahin yojana ekyc| लाडकी बहिण योजना e-kyc प्रक्रिया: स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शिका

ladki bahin yojana ekyc Maharashtra :

ladki bahin yojana ekyc:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाची आहे हि योजना महाराष्ट्रातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महत्वाचे पाउल उचलत असून आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक १८ सप्टेबर २०२५ पासून ladki bahin yojana ekyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना १५०० रुपये दर महा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. महिलांनो योजनेची पारदर्शकता आणि योजना गरजू महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता e-kyc सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. येथून पुढे e-kyc न करण्याऱ्या लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा योजनेचा पुढील हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येऊ शकतात.

ladki bahin yojana ekyc

त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी e-kyc (इलेक्ट्रोनिक ग्राहक पडताळणी) आताचा पूर्ण करून घ्यावी ladki bahin yojana ekyc करण्यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन ज्यामध्ये,आवशयक कागदपत्रे, प्रक्रिया आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत !

ladki bahin yojana ekyc last date :

ladki bahin yojana kyc last date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी e-kyc प्रक्रिया महाराष्ट्रातील महिलांसाठी बंधनकारक करण्यात आली असून हि प्रक्रिया अत्यंत सोपी, मोफत आणि सुरक्षित ठेवण्यात आली आहे.सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ च्या पूर्वी e-KYC पूर्ण करून घ्यावी.

लक्षात ठेवा ladki bahin yojana ekyc मुदत फक्त २ महिन्याची देण्यात आली आहे. e-KYC करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ असून १८ नोव्हेंबर नंतर मासिक 1500 रुपयाचे वितरण थांबेल मुदत चुकवल्यास गमावलेल्या महिन्याचे पैसे देखील मिळणार नाही.

Also Read :जाणून घ्या ई पिक पाहणीची नवीन मुदतवाढ


ekyc का महत्वाची आहे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे व्यापक सर्वेक्षण राज्यसरकारद्वारे केले असता असे लक्षात आले कि. सरकारच्या अधिकृत तपासणीनुसार एकूण २.३० कोटी लाभार्थी ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. या लाभार्थ्यापैकी २६.३४ लाख लोक अपात्र असल्याचे निदर्शनास आले. या अपात्र लाभार्थ्या मध्ये पुरुषांचा देखील समावेश आहे. जे या योजनेच्या मुलभूत तत्वाच्या विरुद्ध आहे.

ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यामुळे दरमहा सरकारला ३९५ कोटी रुपये अनावश्यक वितरीत करावे लागत होते. वार्षिक नुकसानीचा आकडा बघितल्यास वर्ष भरात सुमारे ४७४० कोटी रुपये आतापर्यंत अन्यायकारक वितरीत केले गेले.

E-kyc करण्याचे मुख्य उद्दिष्टे :

  • पारदर्शकता वाढवून योग्य लाभार्थ्याची निश्चित ओळख करणे.
  • बनावट त्याच बरोबर चुकीच्या अर्जांना थांबवून फसवणूक रोखणे.
  • योजनेच्या लाभाचे वितरण फक्त पात्र महिलांपर्यंत पोहचवणे.
  • अनावश्यक खर्च थांबवून राज्याचा निधी वाचवणे
  • वार्षिक पडताळणी प्रणालीची स्थापना करणे.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ladki bahin yojana ekyc हि फक्त तांत्रिकदृष्ट्या महत्वाची नसून लाडकी बहिण योजनेची पारदर्शकता टिकून ठेवण्यासाठी व योजनेचा लाभ हा प्रत्यक्षदर्शी गरजू महिलांपर्यंत पोहोचवता येईल. त्याचबरोबर अपात्र लाभार्थी वगळण्यात येईल आणि खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. e-kyc मुळे योजनेतील गैरप्रकार टाळता येईल आणि पात्र लाभार्थी महिलांना कुठल्याही अडचणी विना ladki bahin yojana ekyc Maharashtra चा लाभ घेता येईल

महिलानो भविष्यातील इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील हि e-kyc अत्यंत महत्वाची ठरू शकते. ladki bahin yojana ekyc चालू आर्थिक वर्षात २ महिन्याच्या आत पूर्ण बंधनकारक आहे.


ladki bahin yojana ekyc बद्दल महत्वाच्या बाबी :

घटकमाहिती
१) E-KYC प्रक्रिया सुरवात १८ सप्टेंबर २०२५
२) E-KYC अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५
३) वार्षिक E-KYC आवश्यकता दरवर्षी जून-जुलै महिन्यात e-kyc करणे गरजेचे.
४) मुदत चुकल्यास काय होईल.१८ नोव्हेंबर नंतर मासिक 1500 रुपयाचे वितरण थांबेल
५) लाभ पुन्हा सुरु करण्यासाठी Ekyc पूर्ण केल्यानंतर लाभ सुरु होईल
६) थक्कीत रक्कम मुदत चुकवल्यामुळे गमावलेल्या महिन्याचे पैसे मिळणार नाही
७) अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
८) योजना हेल्पलाईन नंबर १८१ ( २४ तास )
९) CM हेल्पलाईन नंबर १८०० १२० ८०४०

लाडकी बहिण योजनेची ekyc करत असताना पाळावयाची सावधगिरी आणि सुरक्षितता :

१) केवळ अधिकृत वेबसाईट वापरा, फर्जी वेबसाईट वर क्लिक करू नका.

२) ekyc प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून ,पैसे मागणाऱ्याना नकार द्या.

३) वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा. आधार क्रमांक इतरांना माहिती होऊ देऊ नका.

४) फर्जी वेबसाईट पासून वाचा आणि कुठल्याही थर्ड पार्टी एजन्सी ला पैसे देऊ नका.

५) फक्त अधिकृत चानेलद्वारेच ekyc करा.


ladki bahin yojana ekyc documents :

ladki bahin yojana documents : आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड

  • ladki bahin yojana e-kyc साठी हे अतिक्षय महत्वाचे दस्तऐवज असून आधार कार्ड वरील नाव आणि बँक खात्यावरील नाव हे एकसमान असणे गरजेचे आहे. जर नावामध्ये फरक असल्यास e-kyc प्रक्रिया रद्द होऊ शकते.

२) नवीनतम फोटो:

  • लाभार्थी महिलेने मागील ६ महिन्यातला रंगीत फोटो आवश्यक आहे. फोटो चा फोर्मट हा JPG किंवा PNG मध्ये ठेवावा. फोटो ची साईज हि २ MB पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

३) बँकेचा तपशील:

  • बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे गरजेचे आहे. बँकेचे नाव , शाखेचा IFSC कोड, खाते क्रमांक इत्यादी माहिती तयार ठेवावी.

४) अधिवास प्रमाणपत्र यादी ( कोणत्याही एका प्रमाणपत्राची पूर्तता करावी) ladki bahin yojana ekyc

४.१) अधिवास प्रमाणपत्र

  • तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित अधिवास प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र ३ वर्षा पेक्षा जुने नसावे.

४.२) जुने रेशन कार्ड:

  • १५ वर्षा पूर्वीचे रेशन कार्ड अधिवासाचा पुरावा म्हणून वापरता येते. कार्ड वरील पत्तां हा स्पष्ट आणि वाचनीय असणे गरजेचे आहे.

४.३) जुने मतदार ओळखपत्र:

  • १५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र देखील अधिवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाईल.

४.४) शालेय दस्तऐवज

  • शालेय दस्तऐवज मध्ये १० वी किंवा १२ वी चे गुणपत्रक किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अन्य शैषणिक प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाईल.

५) उत्पन्न पुराव्याचा तपशील: (कोणत्याही एका प्रमाणपत्राची पूर्तता करावी)

  • तहसीलदार ,नायब तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याकडून जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र. हे उत्पन्न प्रमाणपत्र एक वर्षा पेक्षा जुने नसावे.

५.१) रेशन कार्ड वर्गीकरण:-

  • पिवळे रेशन कार्ड (BPL) गरीब रेषेखालील कुटुंबासाठी.
  • केशरी रेशन कार्ड (APL) गरीब रेषेखालील कुटुंबासाठी.
  • पांढरे रेशन कार्ड ( स्वतंत्र उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक )

ladki bahin yojana ekyc अतिरिक्त आवश्यक कागदपत्रे:

६) विवाह प्रमाणपत्र:

  • हे प्रमाणपत्र नवविवाहित महिलांसाठी किंवा नावात बदल झालेल्या महिलांसाठी बंधनकारक राहील. हे प्रमाणपत्र निबंधक कार्यालयाकडून जारी केलेले असणे गरजेचे आहे.

७) पती किंवा वडिलांचे आधार कार्ड:

  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक गरजेचा आहे. e-kyc करताना हा क्रमांक आपल्याला वापरायचा आहे.

How to do e kyc for ladki bahin yojana :

ladaki bahin yojana ekyc kashi karaychi :

ladaki bahin yojana kyc kashi karavi यासाठी पुढील गोष्टी तयार ठेवा.

  • स्मार्ट फोन, टॅब्लेट ,कॉम्पुटर ( इंटरनेट कनेक्शनसह)
  • आधार कार्ड (क्रमांक आणि नाव तयार ठेवा )
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर.
  • पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक
  • पती किंवा वडिलांचा मोबईल नंबर (OTP साठी)

e-KYC ऑनलाईन कशी आणि कुठे करावी

पायरी १ :- अधिकृत वेबसाईट वर जा

  • ब्राउझर मध्ये वेबसाईट टाईप करा: किंवा येथे क्लिक करा
  • ( https://ladkibahin.Maharashtra.gov.in )
  • टाईप केलेली वेबसाईट अचूक असल्याची खात्री करा.
  • ENTER दाबा व वेबसाईट लोड होण्याची वाट पहा.
ladki bahin yojana ekyc

पायरी २:- येथे तुम्हाला ekyc बंनेर दिसेल त्यावर क्लिक करा.

  • पेज पूर्णपणे लोड होऊ द्या.

पायरी ३:- मुलभूत माहिती प्रविष्ट करा

  • येथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे.
  • १२ अंकी आधार क्रमांक सावधानीपूर्वक टाका. (परत पडताळणी करा)
  • “कॅप्चा कोड” अचूक प्रविष्ट करावयाचा आहे.
  • संमती चेकबॉक्स: आधार प्रमानीकरणासाठी संमती द्या.
  • SEND OTP बटनावर क्लिक करा.
  • OTP येण्याची प्रतीक्षा करा.

पायरी ४- OTP प्रविष्ट करा

  • आधार लिंक असलेल्या मोबाईल वर OTP आला असेल.
  • OTP इनपुट- OTP ६ अंकी असतो तो फिल्ड मध्ये टाका.
  • लक्षात ठेवा OTP फक्त १० मिनिटांसाठी वैध राहील.
  • आता सबमिट बटनावर क्लिक करा.

पायरी ५ – येथे तुम्हाला तुमची पात्रता स्थिती दर्शविली जाईल.

  • यशस्वी पात्रता: जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल म्हणजेच तुमचे नाव यादीत असल्यास तरच तुम्ही पुढील पायरी वर जाल.
  • अयशस्वी पात्रता: जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असाल तर तुम्हाला अपात्रता संदेश दिसेल.

नोट: जर तुमची ekyc आधीच पूर्ण झाली असेल तर तुम्हाला “आधीच पूर्ण” असा संदेश दिसेल.


येथून पुढे फक्त पात्र महिलांसाठी ladki bahin yojana ekyc मार्गदर्शन

पायरी ६ – येथे तुम्हाला कुटुंब सदस्याची माहिती द्यावयाची आहे.

  • पती / वडिलांचा आधार क्रमांक मागितल्यावर तो काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
  • आता त्याच्या मोबाईल वर OTP जाईल तो घेऊन प्रविष्ठ करा.

पायरी ७ – वयक्तिक माहिती भरा

  • नाव, पत्ता , जन्मतारीख इत्यादी माहिती तपासा व आवश्यकता असल्यास त्यात सुधारणा करा.

पायरी ८- सामाजिक वर्गीकरण

  • तुमचा जात प्रवर्ग निवडा ( त्यामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, इतर मागास बहुजन , सामान्य )

पायरी ९- घोषणापत्राला संमती द्या.

  • सरकारी नोकरी किंवा सरकारी सेवेत नसल्याची व इतर अटी पूर्ण केल्याची संमती दर्शवा.

पायरी १०- अंतिम सबमिशन

  • संपूर्ण माहिती अचूक प्रविष्ट केल्याची खात्री करा व अंतिम सबमिट बटनावर क्लिक करा.

येथे तुम्हाला “Success” ladki bahin yojana ekyc प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल .


EKYC FLOWCHART

ladki bahin yojana ekyc

लाडकी बहिण योजना पात्रता निकष तपासण्यासाठी येथे क्लिक करा


mazi ladki bahin yojana : निष्कर्ष :

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी माझी लाडकी बहिण योजना २०२४ मध्ये सुरु केली. २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी सुरु केली हि योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आहे. सध्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करीत असून योजनेंतर्गत पात्र महिलांना मासिक १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने प्रदान केले जाते.

ladki bahin yojana ekyc मुख्यमं त्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरवात करताना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करण्याचा व त्यांचा सामाजिक दर्जा उंचावण्याचा त्याचबरोबर गरीब कुटुंबातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ प्रदान करणे हा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने योजनेतील पारदर्शकतेवर प्रश्न उभा राहिल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकरने प्रत्येक लाभार्थी महिलेची e-kyc करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.