Fodder Cultivation |अशी करा चारा पिकाची शाश्वत लागवड

Fodder Cultivation In Marathi:

Fodder Cultivation:जनावरे हि प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा भाग असतो.त्यांना उत्तम प्रकारचा चारा उपलब्ध करून देणे ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे.आपल्या पश्चिम महाराष्ट्रात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केला जातो.हि जोडधंद्ये शेतकऱ्याला आर्थिक स्थेर्य व अधीक प्रमाणात उत्पन्न मिळवून देते.यंदाच्या खरीप हंगामात Fodder Cultivation चारा पिकाची लागवड ही अभ्यासात्मक पद्धतीने शेतकऱ्याने करावी त्यासाठीचा हा लेख कृषी विद्यापीठच्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी बांधवास घेऊन येत आहोत. आपल्या जनावरांचे आरोग्य शेतकऱ्याच्या हातात असते कारण ते आपल्याला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. आपल्या शेतीसोबतच आपल्या पशुची देखील निगा राखणे हे आपले कर्तव्य आहे.

असे करा कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन

शेतकरी बांधवाना विनंती आहे कि आपल्या जनावर खातीर हा लेख संपूर्ण वाचा व यावेळी खरीप हंगामात चारा पिकांची लागवड हि लेखात दिलेल्या माहितीनुसार करावी, संपूर्ण माहिती हि कृषी विद्यापीठाच्या नामंकित संशोधकांनी दिली असून शेतकऱ्यांनी ह्याचा १०० % वापर चारा पिक लागवड पद्धतीत करावा यातून निश्चितच जनावरांचे आरोग्य सुधारेल व त्यांची कार्यक्षमता दुप्पट पटीने वाढेल याची मला खात्री आहे.चला सुरवात करूया !

कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची यादी

fodder cultivation

उन्हाळी भुईमुग

खरीप हंगामामध्ये जून – ऑगस्ट आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी – मार्च दरम्यान चारा पिकाची लागवड करता येते.भारतामध्ये वाढलेली लोकसंख्या,वाढते शहरीकरण आणि राहणीमानाचा दर्जा ह्या सर्व बाबी वाढत चालल्या आहे त्यामुळे माणसाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी दुध,मास,अंडी या सारखे गोष्टींचा मागणीत सातत्याने वाढ होत आहे.दुग्ध व्यवसायाचे उत्पादन हे जनावराच्या अनुवांशिकता व त्याला दिला जाणारा संतुलित आहार ह्यावर अवलंबून असतो परंतु आपल्या कडील शेतकऱ्यांचे चारा पिकाची लागवड करत Fodder Cultivation असताना अभ्यासात्मक पद्धत व सुधारित वाणे न वापरल्याने कित्येक भागात चाऱ्याची कमतरता हि ४० % पर्यंत दिसून आली आहे.

पिक उत्पादनात ५० % वाढ करा

जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे महत्व:

जनावरांची वाढ उत्तम होण्यासाठी तसेच त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी जनावरांच्या आहारात हिरवा चारा देणे गरजेचे असते.जनावरांसाठी हिरवा चारा हा चवदार व पचनास हलका असल्यामुळे पशूच्या कोणत्याही अवयवावर ताण पडत नाही व त्यांचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत मिळते.हिरवा चार दिल्याने आहारामध्ये असलेले महत्वाचे घटक नैसर्गिक स्वरुपात जनावरांना उपलब्ध होतात.

ड्रोन फवारणी

हिरव्या चाऱ्याची कमतरता जर जनावरांच्या आहारात असेल तर कितीही चांगली खुराक देऊन सुद्धा जनावरांची कार्यक्षमता वाढत नाही. यातूनच उत्पादन व जनावराचे या दोन्ही बाबी वर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम पडत असतो.

गाभण गायीला जर हिरव्या चाऱ्याची कमतरता होत असेल तर रोगट वासरे जन्माला येण्याची शक्यता अधिक वाढते.जनावराच्या आहारात अतिप्रमाणात खुराक व हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमी असल्यास हे जर सातत्याने अधिक काळ राहिल्यास पशूच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम हुत असतो.

Fodder Cultivation

जनावराच्या आहाराचे नियोजन:

भाजीपाला पिकांचे नियोजन

उदाहरणार्थ: पूर्ण वाढ झालेली गाय( वजन ४०० किलो )

fodder cultivation

२० ते २५ किलो हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते.

  • अर्ध एकदल चार त्यामध्ये ज्वारी,मका,बाजरी,नेपिअर किंवा गवते या पद्धतीने आणि अर्ध द्विदल चारा त्यामध्ये लसणाची घास, चवळी,स्टायलो बरसीम त्याच बरोबर ५ – ६ किलो कोरडा चारा त्यामध्ये वाळलेले गवत, कडबा,गव्हाचा भुसा ,सरमाड इत्यादी बाबी पूर्ण वाढलेल्या गाई साठी आवश्यक असते.याच सोबत २ किलोच्या जवळ पास खुराक व ३० -४० ग्राम खनिज मिश्रण द्यावे जनावराला दोन ते तीन वेळा पाणी पाजावे.
  • चारा नेहमी कट्टी करून द्यावा असे केल्यास चारा वाया जात नाही त्याच बरोबर जनावराला चाऱ्याचे पचन करण्यास त्रास होत नाही व चारा खाण्यासाठी उर्जा देखील कमी लागते.

Fodder Cultivation महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी सुधारित चारा वाणांची निर्मिती केली आहे.ह्या बियाणांची उपलब्धता fodder crop माफक प्रमाणात असून शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांसाठी पुढे दिलेल्या पिकांनुसार वाणांची लागवड केल्यास निश्चितच दर्जेदार हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करून व्यवसायात यशस्वी वाटचाल स्थापित करावी.

सुधारित चारा पिके लागवड पद्धती:

Animal Fodder Crop

कृषी शेत्रात रोजगाराच्या संधी


१) मका

fodder cultivation
  • मक्या मध्ये भरपूर प्रमाणात शर्करायुक्त पदार्थ असतात त्याच बरोबर मका हे वेगाने वाढणारे ,मोठ्या प्रमाणात पाला, सकस, रुचकर असून हे अधिक प्रमाणात उत्पादनक्षम असते.मक्या पासून उत्कृष्ट दर्ज्याची मुरघास तयार होते. ११ % पर्यंत प्रथिनांची पूर्तता हिरवी चारे करत असतात
  • मक्याची लागवड करण्यासठी जमीन हि सुपीक , कसदार व निचरायुक्त निवडणे गरजेचे असते.सर्वात आधी जमीन भूसभूशीत करावी त्यासाठी २ – ३ पाळ्या नागराट व कुळव्याच्या देणे गरजेचे आहे. ५ टन / हेक्टरी शेणखत पूर्वमशागत करताना जमिनीला द्यावे.
  • शेतकरी बंधूनी मक्या साठी सुधारित जातीच्या वाणांची निवड करावी त्यामध्ये आफ्रिकन टोल ,मांजरी कंपोस्ट, विजय, या वाणांची लागवड Fodder Cultivation साठी १०० % करू शकता.
  • पेरणी साठी बियाणे ७५ किलो / हेक्टरी लागतात.पेरणी आधी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणे फायद्याचे ठरते त्यासाठी २५० ग्राम अ‍ॅझोटोबॅक्टर प्रती दहा किलो बियाणास वापरावे.
  • ३० सेमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. जून – जुलै महिन्यात हि पेरणी करावी.
  • पेरणीच्या वेळी प्रती हेक्टरी ५० किलो नत्र , ५० किलो स्फुरद व ५० किलो पलाश द्यावे.पुढे एका महिन्यानंतर फक्त ५० किलो नत्र हा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

मक्या वरील अळीचे व्यवस्थापन असे करा:

  • शेती जर कीड ग्रस्त पिकाची असेल तर शेती मध्ये खोल नागरणी करणे गरजेचे आहे.
  • पिकावर जमा झालेली अंड्यांची समुहे जमा करून नष्ट करून घ्यावे.
  • प्रकाश सापळे व कामगंध सापळे शेतीमध्ये लावावीत यातून किडीचा पतंग आकर्षित करता येतो. पिकांचे नियमित सर्वेषण करत राहणे गरजेचे आहे.
  • fodder crop संध्याकाळच्या वेळी कीटक नाशकाची फवारणी करावी त्यासाठी मेटाऱ्हीझीयम ऑनोस्लोपी या जैविक कीटक नाशकाचा वापर करावा.(प्रमाण ५ ग्राम एक लिटर पाणी)
  • Fodder Cultivation पिकांचे सर्वेक्षण करत असताना अळीचा प्रादुर्भाव हा ५ टक्के आढळल्यास निबोळी अर्क ५ % अथवा अझाडीरेक्टीन १५०० PPM ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात एकजीव करून फवारणी केल्यास उत्तम फायदा मिळतो.
  • पेरणी नंतर किमान ६५-७० दिवसात पिके कापणी साठी येतात ह्यावेळी पिक ५० % फुलेरा अवस्थेत असताना कापणी करावी.
  • ह्या पद्धतीने मक्याचे नियोजन असल्यास ५०० – ६०० क्विंटल प्रतीहेक्टर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

२) ज्वारी

Animal fodder crop management

fodder cultivation

Fodder Cultivation आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि पारंपारिक चार पिकामध्ये ज्वारीचा समावेश होतो. दुष्काळग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत सुद्धा तग जमवून ठेवण्याची क्षमता ज्वारी पिकात असल्यामुळे निश्चित चाऱ्याचे उत्पादन देनारे पिक म्हणून ह्या पिका कडे बघितले जाते.

जनावरांना चारा म्हणून ज्वारीचा कडबा देता येतो.Fodder Cultivation साठी कृषी विद्यापीठांनी ज्वारीची चाऱ्यासाठी विकसित केलेली वाणांची उंची हि तीन ते चार मीटर असते.वाणांची वैशिष्टे असे कि पिकांची ताटे हिरवीगार असतात. पालेदार रसाळ त्याच बरोबर रुचकर आणि पोष्टिक असल्यामुळे जनावरे आवडीने खात असतात.८- १० % प्रथिने हे ज्वारीच्या चाऱ्यात असते.

  • ज्वारीच्या चारा पिकासाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा उत्तम होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीची मशागत करत असताना हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कम्पोस्ट खत यासारख्या भरखताचा वापर करावा.
  • Fodder Cultivation खरीप हंगामातील पेरणी साठी कृषी विद्यापिठाच्या वाणांची निवड करणे फायद्याचे ठरते MPKV तील या वाणांची निवड करू शकता त्यामध्ये रुचिरा, फुले अमृता किंवा फुले गोधन या जातीची निवड केली तरी चालेल
  • पेरणीचे अंतर ३० सेमी ठेऊन पाभरीने पेरणी करणे फायद्याचे ठरते.
  • ज्वारी चारा पिकाची पेरणीसाठी किमान ४० किलो प्रती हेक्टार बियाणे लागतात.
  • पेरणी करण्याआधी जीवाणू संवर्धक चोळणे बंधनकारक आहे.( प्रमाण: २५० ग्राम अ‍ॅझोटोबॅक्टर प्रती १० किलो बियाणास वापरावे.)
  • पेरणीच्या वेळी प्रती हेक्टरी ५० किलो नत्र , ५० किलो स्फुरद व ५० किलो पलाश द्यावे.पुढे एका महिन्यानंतर फक्त ५० किलो नत्र हा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

Fodder Cultivation ज्वारीच्या पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव जाणवत असतो त्यासाठी पुढील उपाय करावा:

  • पेरणी करत असताना थायोमेथोक्झाम २ ग्राम हे एक किलो बियाणास चोळावे किंवा क्विनाल्फोस २५ EC ७०० मिली + ५०० लिटर पाणी हे मिश्रण प्रती हेक्टरी पिकांची उगवण झाल्यानंतर १० दिवसांनी फवारणी करावी त्यानंतरची दुसरी फवारणी हि पहिल्या फवारणीच्या दहा दिवसांनी करणे आवश्यक आहे.
  • ज्वारीचे पिक हे ६५-७० दिवसांनी फुलेरा अवस्थेत येतात ज्वारीचे पिक ५० % फुलेर अवस्थेत असताना पिकाची कापणी करणे गरजेचे आहे.
  • ह्या पद्धतीने ज्वारीचे नियोजन असल्यास ५०० – ५५० क्विंटल प्रतीहेक्टर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

३) बाजरी

Fodder Crop

fodder cultivation

हलक्या ते मध्यम जमिनीची निवड बाजरी पिकासाठी शेतकरी बंधूनी करावी.तृणधान्य म्हणून बाजरी ह्या चारा पिकाची ओळख आहे.बाजरी मध्ये प्रठीण्याचे प्रमाण हे ८ टक्के असते.खरीप हंगामात ह्या चारा पिकाची लागवड करत असल्यास जून-जुलै महिन्यात करावी.

प्रती दहा किलो बियाणे पेरणी करताना ३० सेमी अंतरावर पाभरीने पेरावी. पेरणी आधी २५० ग्राम अ‍ॅझोटोबॅक्टर १० किलो बियाणास चोळावे.हे एक जीवाणू संवर्धक असून पिक उत्पादनासाठी फायदेशीर ठरते.

Fodder Cultivation हेक्टरी ४५ किलो नत्र,४० किलो स्फुरद आणि ३० किलो पलाश द्यावे.४५ किलो नत्र पेरणी नंतर १ महिन्यानंतर द्यावे.

बाजरीचे पिक हे ५५-६० दिवसांनी फुलेरा अवस्थेत येतात बाजरीचे पिक ५० % फुलेर अवस्थेत असताना पिकाची कापणी करणे गरजेचे आहे.

ह्या पद्धतीने बाजरीचे नियोजन असल्यास ४५० – ५०० क्विंटल प्रतीहेक्टर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते


४) चवळी

fodder cultivation

चवळी ह्या चारा पिकासाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते.चवळी हे द्विदलवर्गीय चारा पिका मध्ये मोडल्या जातो. ह्या पिकाची पेरणी पावसाळा चालू होताच करावी म्हणजे जून – ऑगस्ट च्या दरम्यान चवळीची पेरणी करू शकता.

  • Fodder Cultivation महाराष्ट्रातील त्या भागानुसार असलेल्या कृषी विद्यापीठातून वाणांची निवड करू शकता. वाणांची पेरणी करत असताना ३० सेमी ह्या अंतराने पाभरीने पेरणी करणे गरजेचे आहे.चवळी साठी ४० किलो बियाणे प्रती हेक्टरी लागतात. २५० ग्राम रायझोबियम हे जीवाणू संवर्धक प्रती दहा किलो बियाणास चोळावे
  • पेरणीच्या वेळी चवळीस २० किलो नत्र ४० किलो स्फुरद देणे गरजेचे आहे.
  • चवळी ह्या पिकासाठी खरीप हंगामात १५ दिवसाच्या अंतराने पाणी देत राहावे.शक्यतो शेत तनविरहीत ठेवावे.
  • चवळीची पेरणी झाल्याच्या ६०-६५ दिवसांनी हे चारा पिक कापणीस तयार होते प्रती हेक्टारी २५०-३०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पन मिळते जनावरांना चवळी चाऱ्या मधून १३-१५ % प्रथिनांची उपलब्धता मिळते.

५) नेपिअर

fodder cultivation

हे अत्यंत पोष्टिक व जनावरांच्या आवडीचे चारापिक आहे. नेपिअर मध्ये ऑक्झीलीक ऑसिड चे प्रमाण कमी असल्यामुळे ह्याचा जनावरांवर कुठलाही अपाय होत नसतो त्याशिवाय हे चारा पिक खाण्यास मऊ,पालेदार असून भरपूर प्रमाणात रसाळ असतात.

  • नेपिअर हे अत्यंत कमी खर्चात फायद्याचे पिक असून ३- ४ वर्ष सलग हिरव्या चाऱ्याची कापणी एकदाच लागवड केल्यावर करता येते.नेपिअर मधून ९ – १० टक्के प्रथिनांची पूर्तता होते.
  • Fodder Cultivation संकरित नेपिअर ची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा व्यवस्थित होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवडी आधी ३ – ४ कुळ्याच्या पाळ्या द्याव्या व उभी आणि आडवी नागरणी करावी असे केल्यास जमीन भुसभुशीत होऊन नेपिअर साठी तयार होते (नोट:४ थ्या कुळनीच्या वेळेस कुजलेले शेणखत १० टन / हेक्टार जमिनीत एकजीव करावे. )
  • ज्या वाणांची नेपिअर साठी निवड करत आहात त्याच्या Guidelines नुसार लागवडीचे अंतर सुनिचीत करावे.
  • संकरीत नेपिअर लागवडीच्या वेळी प्रती हेक्टार ७५ किलो नत्र ,३५ किलो स्फुरद आणि ३० किलो पलाश बंधनकारक आहे.ज्या वेळी पिकाच्या चार कापण्या पूर्ण होतात त्यावेळी पिक बांधणीच्या वेळेस ३० किलो नत्र,३५ किलो स्फुरद व ३० किलो पलाश पिकांना द्यावे.
  • प्रत्येक कापणी झाल्यानंतर ३० किलो नत्राची मात्रा प्रती हेक्टरी देणे बंधनकारक आहे.
  • नेपिअर ची पहिली कापणी ही लागवडीच्या ६० दिवसांनी करावी व नंतर ४० – ५० दिवसांनी पुढील कापण्या कराव्या
  • कापणी करत असताना १५ – २० सेमी जमिनीपासूनचा भाग सोडून कापणी करावी.असे केल्यास फुटव्याची संख्या वाढते.
  • वर्ष भाऱ्यात संकरीत नेपिअरचे १२०० – १५०० क्विंटल प्रती हेक्टार हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न मिळते.

६) बागायती मारवेल

या मारवेल गवतासाठी मध्यम ते भारी त्याच बरोबर कसदार आणि पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवडीचे नियोजन करत असताना ४५ x ३० सेमी या प्रमाणे दोन डोळ्याची एक कांडी अशा ७५ हजार कांड्यांची लागवड जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाळ्याच्या कालावधीत करावी.

  • ह्या चारा पिकासाठी जमिनीची मशागत महत्वाची ठरते त्यासाठी १५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळवावे.बागायती मारवेल ची लागवड करत असताना ६० किलो नत्र ४० किलो स्फुरद आणि २० किलो पलाश प्रती हेक्टरी द्यावे.
  • Fodder Cultivation मोठ्या प्रमाणात चारा उत्पादन करण्यासाठी प्रत्येक कापणी झाल्यानंतर २५ किलो नत्राची मात्रा देत राहावी.पिके वाढीच्या अवस्थेत असताना शेत ते तनविरहीत ठेऊन खुरपणी करत रहावी.
  • ह्या चारा पिकाची पहिली कापणी हि ६० दिवसांनी करता येते. पुढील कापण्या ह्या ४५ – ५० करता येतात.ह्या हिरव्या चाऱ्याचे एका वर्षात ७-८ कापण्या घेतात त्यामधून एका वर्षभरातून ६०० – ७०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.

७) स्टायलो

Fodder Production

जनावरासाठी स्टायलो हे द्विदल बहुवार्षिक चारा पिक आहे. हलक्या ते मध्यम जमिनीत हे पिक चांगले उत्पादन देते.ह्या चारा पिकाची पेरणी हि जून – जुलै महिन्यात करणे गरजेचे आहे.हे चारा पिक दुष्काळग्रस्त भागात देखील तग धरून रहाते.

  • तुमच्याकडे फळबाग असेल तर हि पिक आंतरपीक म्हणून उत्तम फायदेशीर ठरते.जमिनीची धूप कमी करण्यासाठी ह्या पिकला शेत तळया जवळ लावल्यास जमिनीची धूप न होण्यास भरपूर फायदा मिळतो.स्टायलो या गवतात प्रथिनांचे प्रमाण १२ ते १४ % उपलब्ध होते.
  • ह्या पिकाची बी फेकून पेरणी करू शकता( महत्वाचे:पेरणी झाल्यावर बी मातीने झाकणे टाळावे). प्रती हेक्टार १० किलो बियाणे पेरणी साठी पुरेशे असते.पेरणी आधी २५० ग्राम रायसोबियम हे जीवाणू संवर्धक प्रती दहा किलो बियाणास चोळावे.
  • पेरणी आधी प्रती हेक्टार २० किलो नत्र ४० किलो स्फुरद आणि २० किलो पलाश देणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षात स्फुरदाची जुलै ऑगस्ट महिन्यात प्रती हेक्टरी मात्रा देत रहावे.
  • ह्या चारा पिकाची कापणी हि पिके फुलोरा अवस्थेत येण्याच्या आधीच करावी. कारण कापणीस उशीर केल्यास चारा पिकाची गुणवत्ता ढासळते. एका वर्षात दोन कापण्या करता येतात त्यातून २५० – ३०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न मिळू शकते.

Visit कृषी विभाग महाराष्ट्र शासन