Farmer ID Registration In Marathi :
Farmer ID Registration:शेतकरी बंधुनो जग जसे तंत्रज्ञानात प्रगती करत आहे.त्याच प्रमाणे शेती शेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे.शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.तंत्रज्ञानाचा वापर कृषी शेत्रामध्ये करता यावा म्हणून भारत कृषी शेत्रात डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.शेतकरी मित्रानो,ह्याचे अनेक फायदे आहेत.योजनेचा लाभ पिक विमा, अनुदान ह्या सारख्या बाबी मध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये व लाभार्थी शेतकऱ्याला त्याचा लाभ फसवणूक न होता त्याच्या पर्यंत पोहचवणे हे ह्या कृषी शेत्रातील डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रमुख उद्देश आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुढील हप्ता लवकरच
Farmer ID Registration शेतकऱ्यांनी घेतलेल्या योजनाचा लाभ किंवा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना समोर जावे लागणार ह्या साठी केंद्र सरकार एक डीजीटल डेटाबेस तयार करते आहे. शेतकरी वर्गाचे सातत्याने होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकार हा उपक्रम राबवीत आहे.ज्याचा फायदा वेगवेगळ्या सरकारी योजनामध्ये, पिक विमा व शेतकऱ्याला मिळणारी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी एक विशिष्ट पोर्टल केंद्र सरकार तयार करत आहे ज्याचे नाव ऑग्री स्टॅक पोर्टल असे आहे.
सध्या परिस्थिती बघता आता ह्या पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्देश नुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपले Farmer ID तयार करणे बंधनकारक केले आहे.कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच बरोबर पीक विमाचा लाभ घेण्यासाठी Farmer ID Registration अनिवार्य करण्यात आली आहे.२५ जुलै पासून शेती मध्ये नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची farmer id असणे बंधन कारक राहिल. नैसर्गिक आपत्ती मध्ये दुष्काळ,वादळ किंवा अतिवृष्टी ,गारपीट आणि इतर सर्वच नैसर्गिक बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
वाचा:माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल !
म्हणूनच ह्या farmer id कडे आता गांभीर्याने बघणे अत्यंत गरजेचे झाले आहे.farmer id नसल्यास तुम्हाला योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवण्यात येईल.ह्या लेखात आपण farmer id म्हणजेच शेतकरी ओळखपत्र कसे तयार करायचे ह्या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. सांगितलेली प्रत्येक माहिती अचूक पद्धतीने follow करा व आपले id कार्ड स्वतः बनवून घ्या.चला सुरवात करूया !
Farmer Id का गरजेची ?
महाराष्ट्र शासंव केंद्र सरकारने कृषी शेत्रामधील सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी आता (Farmer ID Registration) शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. मदत व पुनर्वसन विभाग देखील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्राची पूर्तता पूर्ण करण्याची शिफारस करत आहे.पुढील येणाऱ्या खरीप हंगामामध्ये होणाऱ्या नुकसानीचा लाभ मिळवायचा असल्यास हे ओळखपत्र आता बंधनकारक केल्याचे प्रसिद्धी पत्रक नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केले.
Farmer Id काय आहे ?
आधार कार्ड प्रमाणेच शेतकऱ्याचे Farmer ID Registration हे एक डीजीटल ओळखपत्र आहे.याद्वारे सरकारला शेतकऱ्या बद्दल संपूर्ण तपशील सुचवला जातो.शेतकऱ्याचे नाव,शेतकऱ्याच्या मालकीची जमीन,शेतकऱ्याचे गाव,जिल्हा,राज्य इत्यादी बाबीची माहिती मिळते.त्याचबरोबर शेतकरी कोणत्या योजनेस पात्र आहे,कोणत्या योजनेचा लाभार्थी आहे पिक विमा,अनुदान वितरण इत्यादी बाबीचा तपशील एकाच ठिकाणी सरकारला मिळत असतो.यामुळे शेतकरी व सरकार ह्याच्यातील दलाल नाहीशे होतात व लाभार्थी म्हणून लाभ घेण्यात शेतकरी कोणत्याही अडचणी शिवाय पात्र राहतो.
Farmer Id चे महत्व :
- केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ घेता येतो
- केंद्र व राज्य सरकारच्या योजना संबंधित कागदपत्राची वारंवार पूर्तता करणे गरजेचे राहणार नाही.
- सरकारचे डिजिटली पोर्टल सहज उपलब्ध होईल.
- योजना व कृषी अनुदानाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहील.
- शेतकऱ्याची माहिती एकाच ठिकाणी राहील.
Farmer Id साठी आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड(मोबईल नंबर लिंक असणे बंधनकारक)
२) शेत जमिनीचा ७/१२ (७/१२ नसल्यास सर्वे नंबर आवश्यक)
३) बँक खात्याचा संपूर्ण तपशील
४) एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
५) पॅन कार्ड
६) मोबईल क्रमांक ( आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक)
Farmer ID Registration process 2025 :

पायरी १ – Agri Stack ह्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.येथे क्लिक करा
पायरी २ – नवीन शेतकरी नोंदणी हे बटन दाबा.
पायरी ३ – आधार क्रमांक अचूक टाका व OTP टाकून पुष्टी करा. (आधार क्रमांक टाकल्यानंतर verify हे बटन दाबा>> verify हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला मोबईल वर एक one time password मिळेल>>आता OTP प्रविष्ट करा)
पायरी ४ – भविष्यात स्थिती तपासणीसाठी. वापरकर्ता नाव (username) व पासवर्ड (password) टाका. शेतकऱ्यानो password विसरलात तर “तुमचा पासवर्ड विसरलात ” हे बटन दाबून परत password मिळवू शकता.
पायरी ५ – येथे वयक्तिक आणि जमिनीची माहिती भरा. शेतकऱ्याचे नाव >>जन्म तारीख >>पत्ता >>शेतीची माहिती प्रविष्ट करा. सर्वे क्रमांक>>गावाचे नाव >> जमिनीचे क्षेत्रफळ इत्यादी जमिनीच्या नोंदी देणे गरजेचे आहे.
पायरी ६ – आवश्यक कागदपत्राची स्कॅन प्रत अपलोड करा. आधार कार्ड ,जमिनीचा तपशील ,बँक संबंधित तपशील आणि पासपोर्ट फोटो अपलोड करा.
पायरी ७ – ई साईन पडताळणी सबमिट करा. संपूर्ण तपशील प्रविष्ट केल्यानंतर OTP टाकून ई साईन पडताळणी पूर्ण करून बघा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी “सबमिट करा” हे बटन दाबा.
पायरी ८ – शेतकरी ओळख पत्राची पुष्टी करा. संपूर्ण माहिती हि अचूक पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक शेतकरी ओळखपत्र प्राप्त होईल.
नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी बंधुनो,जुलै २०२५ पासून शेतकरी ओळखपत्र हे कृषी शेत्रातील सर्व योजनासाठी बंधनकारक करण्यात आले असून हि डीजीटल युगातील मुलभूत ओळख होणार आहे.म्हणूनच ह्याची पुर्तता आवश्यक आहे त्यासाठी अर्ज करावा हि विनंती तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अवघड वाटत असल्यास तुम्ही जवळच्या CSC सेन्टरवर जाऊन शेतकरी ओळखपत्र तयार करू शकता त्यासाठी सरकारने कुठलेही शुल्क आकारले नाही.
CSC केंद्राद्वारे नोंदणी प्रक्रिया :
Farmer ID Registration

१) तुमच्या गाव जवळील CSC सेंटर ला भेट द्या.
२) आवश्यक कागदपत्राची पूर्तता करा व CSC ऑपरेटर कडे प्रविष्ट करण्यास द्या.
३) CSC ऑपरेटर त्याच्या अधिकृत account वरून लॉगीन करतो व माहिती प्रविष्ट करतो.
४) यशस्वी सबमिशन झाल्यानंतर तुम्हाला एक अद्वितीय शेतकरी ओळखपत्र मिळेल.
CSC द्वारे Farmer Id काढण्याचे फायदे :
- बिना इंटरनेट पद्धतीने नोंदणी प्रक्रिया होते
- कागदपत्राचे स्कॅनिंग व पडताळणी अचूक पद्धतीने होते.
- जलद गतीने ओळख पत्र तयार होते.
- शेतकऱ्यांना जटील ऑनलाईन प्रक्रियेमधून जाण्याची गरज नसते.
Farmer ID नसल्यास पुढील लाभ घेता येणार नाही :
- पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार नाही.(६०००/वर्ष)
- प्रधानमंत्री पिक विमा योजना मिळणार नाही.
- नमो शेतकरी अनुदान योजना मिळणार नाही.
- खात, बियाणे,यंत्रे,यावरील सबसिडी मिळणार नाही.
- नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास लाभ घेता येणार नाही.
शेतकरी आयडी प्रमुख फायदे काय आहेत ?
Farmer ID Registration शेतकरी ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमत (MSP) व किसान क्रेडीट कार्ड ह्या सारख्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. शेतकऱ्यांचा वेळ वाचतो व त्रासमुक्त फायदेशीर सेवांचा लाभ घेता येतो.
डीजीटल सार्वजनिक सुविधांमध्ये Agri Stack चा समावेश होत असून शेतकऱ्यांना जलद योजनांचा लाभ प्रदान करण्यास सक्षम आहे. २८१७ कोटी रुपये केंद्रीय मंत्रिमंडळाने डीजीटल कृषी अभियानासाठी मंजूर केले आहे. आर्थिक वर्ष २०२६ -२०२७ मध्ये सरकारने ११ कोटी शेतकऱ्यांना डीजीटल ओळख प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे.
देशातील शेतकऱ्यांसाठी हा एक क्रांतीकारक बदल ठरणार आहे.शेतकऱ्याची कुठलीही फसवणूक न होता लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात दिला जाईल.
Farmer Id PDF Download
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
What is farmer id ?
1) शेतकरी आयडी म्हणजे काय ? उत्तर -हे एक डीजीटल शेतकऱ्याचे ओळखपत्र असून केंद्रीय मंत्रालयाद्वारे कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचा नोंदणी प्रक्रियेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. जमिनीच्या नोंदानीसोबत हे जोडलेले डीजीटल ओळखपत्र १ जानेवारी पासून सर्वच नवीन अर्जदारकानां बंधनकारक करण्यात आले आहे.
२) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ओळखपत्राची स्थिती कशी तपासावी ? उत्तर-महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट वर जा( mhfr.agristack.gov.in) व application status यावर क्लिक करा ,तेथे तुमचा आधार क्रमांक टाका किंवा आयडी टाका.
३) शेतकरी ओळख पत्राची गरज कोणाला आहे ? उत्तर- सर्व जमीनधारक शेतकरी व भाडेतत्वावर शेती करणारी व्यक्ती दोघानाही शेतकरी ओळखपत्र बंधनकारक आहे.
४) शेतकऱ्याला पॅन कार्ड ची आवश्यकता आहे का ? उत्तर – हो, पॅनकार्ड गरजेचे आहे. शेतकरी करदाता असो किंवा नसो पॅनकार्ड जोडणे गरजेचे आहे.
५) शेतकरी ओळख पत्राचा फायदा काय ? उत्तर – किमान आधारभूत किमत व किसान क्रेडीट कार्ड नुसार मिळणाऱ्या विविध योजनाचा लाभ घेतला जाऊ शकतो
६) शेतकरी ओळखपत्र तयार झाल्यावर त्यात बदल करता येईल का ? उत्तर – हो, हे ओळखपत्र गरज पडल्यास अपडेट करता येते.
७) शेतकरी ओळख पत्रासाठी दिलेली माहिती गोपनीय राहील का ? उत्तर – हो , माहिती गोपनीय ठेवली जाईल.कारण राज्य शासनाच्या सर्वरवर माहिती संग्रहित केली जाते.
८) कोणत्या राज्याने आतापर्यंत अमलबजावणी केली आहे ? उत्तर – उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र ,छतीस्गढ हि राज्ये यशस्वी रित्या अमलबजावणी करत आहे.
९) शेतकरी मृत पावल्यास ओळखपत्राचे काय होते ? उत्तर – संबंधित शेतकऱ्याचा आयडी निष्क्रिय केला जातो.तथापि फार्म आयडी सक्रीय ठेवला जातो व कायदेशीररीत्या वारसाशी जोडला जातो.
१०) शेतकरी ओळख पत्र किती काळ वैध राहील ? उत्तर – शेतकरी ओळखपत्र व्यक्तीचा मृत्यू होत पर्यंत वैध असतो.
११) ओळख पत्र तयार करण्यासठी काही मदत मिळते का ? उत्तर- हो, जिल्हा व राज्य पातळीवर मदत केंद्रे उभारली गेली आहेत
कृषी व्यवस्थापसाठी आमचे इतर लेख वाचा
सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा !
ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!
१०० % कापसाची किड नियंत्रण पद्धती