Farmer Foreign Tour | शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा | सरकार देणार ५० % खर्च

Farmer Foreign Tour scheme Maharashtra

Farmer Foreign Tour:जागतिक पातळीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्याना आधुनिक कृषी तंत्रज्ञान व पद्धतीची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने सन २०२५-२६ साठी राज्यातील शेतकरी बांधवाना देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना राबवण्यास सुरवात केली आहे. Farmer Foreign Tour हि योजना पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ह्या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना उच्च आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती मध्ये करून त्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढवून त्यांना शेतातील मालाची गुणवत्ता सुधारण्यास प्रवृत्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Farmer Foreign Tour

Farmer Foreign Tour योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रगत देशामध्ये वापरले जाणारे विकसित व आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची, कृषी मालाचे पणन त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेतील मागणी व कृषी मालाची प्रक्रिया इत्यादी बाबीची माहिती मिळवण्यासाठी संधी उपलब्ध होते. योजनेसंबंधित संपूर्ण माहिती जसे कि, योजनेची उद्दिष्टे , निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्य व इतर महत्वाच्या बाबीचा सविस्तर तपशील आपण ह्या लेखात बघणार आहोत.चला सुरवात करूया !

हेही वाचा :नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती

Farmer Foreign Tour scheme :

Farmer Foreign Tour

Farmer Foreign Tour Package

Farmer Foreign Tour 2025-26 मध्ये शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड्स, व्हियेतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रिया, सिंगापूर, जपान ,फिलिपाईन्स, चीन आणि दक्षिण कोरिया इत्यादी प्रगत देशांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्याना ह्या योजनेंतर्गत या देशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान व यशस्वी पद्धतीचे सखोल मार्गदर्शन दिले जाते.

अभ्यास दौऱ्या साठी निवडलेले देश कालावधी व वैशिष्टे:

Farmer Foreign Tour 2025-26

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना सन २०२५-२६

१) युरोप ( नेदरलँड्स, फ्रांस, जर्मनी, स्वित्झर्लंड ) : कालावधी १२ दिवस : ह्या दौऱ्याचा मुख्य उद्देश हा फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन या शेत्रावर केंद्रित असेल. युरोपमधील हे देश या शेत्रामध्ये जागतिक पातळीवर अव्वल स्थानी आहे.

२) इस्रायेल: कालावधी ९ दिवस : या दौऱ्यामध्ये तुम्हाला आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण इत्यादी बाबीचे सखोल मार्गदर्शन केले जाईल. इस्रायेल ह्या देशाने मर्यादित नैसर्गिक संसाधानामध्ये विशेषतः पाणी व्यवस्थापनात अव्वल दर्जाची प्रगती केली आहे.

३) जमान: कालावधी १० दिवस : जपान ह्या देशातील दौरा हा सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान या विषयावर लक्ष केंद्रित करेल. उच्च तंत्रज्ञान शेती व सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये ह्या देशाची कौशल्ये जगभरात प्रशंसनीय आहे.

४) मलेशिया, व्हियेतनाम, फिलिपाईन्स: कालावधी १२ दिवस : ह्या देशामध्ये फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान (Post Harvest Technology) आणि व्यवस्थापन प्रणाली (Management System) बाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल. ह्या आशियाई देशांनी काढणीपश्चात होणाऱ्या नुकसानी कमी करण्यात व मूल्यवर्धन करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

५) चीन : कालावधी ८ दिवस :हा चीनचा दौरा विविध कृषी तंत्रज्ञान, पिक उत्पादकता वाढीसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी EXPO इत्यादी बाबीवर आधारित असेल. चीनची कृषी शेत्रात प्रचंड प्रगती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर अभ्यासण्यासारखा आहे.

६) दक्षिण कोरिया: कालावधी ८ दिवस : या दौऱ्यामध्ये आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान अभ्यासले जाईल. दक्षिण कोरियाने अन्न प्रक्रिया उद्योगात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.


Farmer Foreign Tour योजनेची उद्दिष्टे :

१) या योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे फक्त राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे एवढ्या पुरते मर्यादित नसून, तर उत्पादित होणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता सुधारण्यास नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा ह्याचे प्रशिक्षण दिले जाते.

२) वरील देशामध्ये वापरण्यात येणारे आधुनिक कृषी तंत्रज्ञान व पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देणे त्याद्वारे पिक पद्धती , कृषी उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधीची उपलब्धता, कृषी प्रक्रियेतील अद्यावत पद्धती इत्यादी बाबींचा समावेश ह्या अभ्यास दौऱ्यात होतो.

३) विविध देशातील कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या मध्ये थेट सवांद साधने , कृषी शेत्रीय भेटी व संबंधित कृषी संस्थाना भेट देऊन आपल्या शेतकऱ्यांच्या ज्ञानात व क्षमतेत वाढ करणे.

४) प्रगत देशामधील आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतीचा अवलंब करण्यास शेतामध्ये जागरूकता निर्माण करणे. ज्यामुळे ते आपल्या शेतात ह्या पद्धतीचा अवलंब करू शकतील.

५) आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणे.

Latest News: रेशीम शेती योजना देईल शाश्वत नफा ! संधी सोडू नका


Farmer Foreign Tour scheme निवडीचे निकष :

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २०० लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदमहाराष्ट्र शासनाने केली आहे. या योजनेंतर्गत १८० शेतकऱ्याची निवड देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी केली जाईल. यापैकी १० शेतकरी राज्यस्तरीय समितीद्वारे शिफारशीसाठी राखीव ठेवण्यात आले असून उर्वरित १७० शेतकऱ्याची निवड जिल्हास्तरावरून केली जाईल.

  • लाभार्थी व्यक्ती स्वतः शेतकरी असावा.
  • चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा हा शेतकऱ्याच्या नावावर असावा.
  • शेतकऱ्याकडे AgriStack Farmer Id असणे बंधनकारक आहे.
  • आधार प्रमाणपत्राची प्रत आवश्यक
  • शेतकऱ्याचे शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असावे आणि हि बाब त्याने स्वयंघोषनापत्रावर नमूद करणे आवश्यक आहे.
  • शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला ह्या योजने अंतर्गत लाभ घेता येईल. ( कुटुंब संज्ञेत पती, पत्नी व १८ वर्षा खालील मुले/ मुली यांचा समावेश होतो )
  • हि योजना कुटुंबातील इतर सदस्यांना स्वखर्चाने सोबत नेण्याची परवानगी देत नाही.
  • लाभार्थी शेतकरी हा किमान १२ वि पास असणे हि अट आता रद्द करण्यात आली आहे .
  • अभ्यास दौऱ्यावर निघणाऱ्या दिवशी लाभार्थ्याचे किमान वय २५ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि (अभ्यास दौरा समाप्त होण्याच्या दिवशी लाभार्थ्याचे वय हे ६० वर्षा पेक्षा जास्त नसावे हि अट देखील आता रद्द करण्यात आली आहे, परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे.)
  • लाभार्थी शेतकऱ्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे. पुराव्यासाठी पासपोर्ट मुदत / वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरोक्स प्रत जोडणे गरजेचे आहे. पासपोर्टची वैधता मुदत हि दौऱ्यावर निघण्यापूर्वी कमीत कमी सहा महिन्याची असावी.
  • लाभार्थी व्यक्ती शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेमध्ये नोकरी करणारा नसावा त्याच बरोबर डॉक्टर , वकील , सीए , अभियंता, कंत्राटदार इत्यादी व्यवसाय करणारा नसावा. या बाबतचे स्वयंघोषनापत्र लाभार्थी व्यक्तीने अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र ( किमान MBBS डॉक्टरचे ) सादर करणे बंधकारक आहे. कोरोन विषयक तपासणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित्त कृषी आयुक्तालयात सादर करणे बंधनकारक राहील.
  • महिला शेतकऱ्याना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळावी ह्यासाठी त्यांना प्राधान्यक्रम दिला गेला आहे.

Farmer Foreign Tour Yojana अनुदानाचा तपशील :

१) सर्वसंवर्गातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कडून अभ्यास दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या ५० % रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देय राहील.

२) कृषी विभाग मार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या संपूर्ण १००% रक्कम हि प्रवासी कंपनीकडे आधीच भरणे बंधनकारक राहील.

३) अभ्यास दौऱ्यासाठी लागणारी रक्कम हि कॅशलेस व्यवहार पद्धतीने भरावी. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने हि रक्कम आधार कार्डशी सलग्न असलेल्या बँक खात्यातून NEFT, RTGS, IMPS, धनाकर्ष किंवा धनादेशाद्वारे संबंधित प्रवासी कंपनीस अदा करावी आणि देय रकमेचा पुरावा कृषी आयुक्त कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

४) अनुदानाची रक्कम हि थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येते. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने अभ्यास दौरा पूर्ण करून आल्यावर आवश्यक ती कागदपत्रे ज्यामध्ये विमानाचे तिकीट , बोर्डिंग पास , बँकेचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी अभ्यास दौऱ्यामध्ये सोबत असलेल्या अधिकाऱ्याकडे जमा करणे गरजेचे आहे. ( एकूण खर्चाच्या ५० % रक्कम अनुदान देय राहील ).


Farmer Foreign Tour

Farmer Foreign Tour अर्ज प्रक्रिया :

लाभार्थी निवडीची प्रक्रिया बहुस्तरावर असून पुढील प्रमाणे राबविली जाते.

तालुका स्तरावर अर्ज सादर करावा: इच्छुक शेतकऱ्याने प्रपत्र- ९ मधील अर्जामध्ये माहिती भरून द्यावी व संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करावा.

  • तालुका स्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून , जे शेतकरी निवडीचे निकष पूर्ण करतील अशा प्रस्तावनचा प्रपत्र ७ नुसार प्रमाणित केले जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्याचे प्रस्ताव हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कडे विहित कालावधीत पाठवणे गरजेचे आहे.

Farmer Foreign Tour Date


शेतकऱ्याने पाळावयाच्या अटी व शर्ती :

  • लाभार्थी शेतकऱ्याने देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यावर जाण्यापूर्वी शासनाने ठरून देलेल्या विहित प्रपत्रातील अर्जात माहिती भरणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यानो, आपण हा दौरा अभ्यासासाठी करतो आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या शेती व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी एकच लक्ष केंद्रित ठेऊन हा अभ्यास दौरा पूर्ण करावयाचा आहे. दौऱ्या दरम्यान मद्यपान करून इतरांना त्रास होईल असे वागणे टाळायचे आहे.
  • दौऱ्याच्या निश्चित वेळेचे पालन करायचे आहे, परदेशातील सार्वजनिक ठिकाणी व कृषी शेत्रीय भेटीच्या ठिकाणी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
  • धुम्रपान व मद्यपान यासारखे दुर्वर्तन करण्याचे टाळावे , परदेशातील अशा पद्धतीच्या नियमांचे उलंघन केल्यास व यातून कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई झाल्यास सर्वस्वी जबाबदारी हि संबंधित लाभार्थी शेतकऱ्याची राहील.
  • अभ्यास दौऱ्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेल्समध्ये वास्तव्यात थांबल्यानंतर रात्रीच्या वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये लाभार्थी शेतकऱ्यास वास्तव्याचा परिसर सोडता येणार नाही.
  • प्रवास कालावधी मध्ये लाभार्थी शेतकरी विदेशात असताना कोणत्याही वैद्यकीय कारणास्तव हॉस्पिटलमध्ये भरती करावयाची गरज पडल्यास त्यांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी हि स्वतः लाभार्थी शेतकऱ्यास घ्यावी लागेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे साठी सोबत गेलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने अभ्यास दौऱ्यासोबतच परत येणे बंधनकारक राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने अभ्यास दौरा मंजूर कालावधीनंतर कोणत्याही कारणास्तव परदेशात थांबता येणार नाही. या नियमांचे उलंघन केल्यास कृषी विभाग किंवा शासन जबाबदार राहणार नाही. व त्याला योजनेंतर्गत कुठलेही शासकीय अनुदान दिले जाणार नाही.
  • Farmer Foreign Tour सदर अभ्यास दौरा हा कृषी विभागाने निश्चित केलेला असल्यामुळे दौरा आधीच नियोजित केलेला असेल. म्हणून शेतकऱ्याला स्वतः कोणत्याही वेगळ्या शेत्रीय भेटीचा समावेश करता येणार नाही व नियोजित कार्यक्रमाव्यतिरिक्त दौऱ्याचा गट सोडून इतर ठिकाणी भेटी देता येणार नाही.
  • अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर विहित प्रपत्रात शेतकऱ्याने दौऱ्या संबंधित सविस्तर अभिप्राय देणे गरजेचे राहील. त्याचबरोबर अभ्यास दौऱ्या दरम्यान आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्ययक्तिक शेतात कशा पद्धतीने करणार आहात या बाबतची माहिती विहित प्रपत्रात भरून देणे बंधनकारक राहील.
  • अभ्यास दौऱ्याला निघण्यापूर्वी शेतकऱ्याला दौऱ्याच्या भेटीच्या ठिकाणाचा तपशील दिला जाईल. शेतकऱ्यांनी त्या त्या ठीकानाची माहिती इंटरनेटद्वारे आधीच स्वतः जवळ संकलित करून ठेवावी.

शेतकऱ्यानसाठी परदेशात अतिरिक्त वास्तव्याबाबतचे नियम :

Farmer Foreign Tour

( Extra Stay Rules) : Farmer Foreign Tour

1) जर निवड झालेल्या शेतकऱ्याला नियोजित दौरा कालावधी व्यतिरिक्त परदेशात काही अतिरिक्त दिवस राहण्याची इच्छा असल्यास लाभार्थी शेतकरी तसा लेखी अर्ज तात्काळ प्रवासी कंपनी व कृषी आयुक्तालयाकडे सादर करू शकता.

  • नोट: ह्या अर्जामध्ये अतिरिक्त वास्तव्याच्या दिवसाचे सविस्तर नियोजन नमूद असणे गरजेचे राहील.

२) कृषी आयुक्तालयाने हा अर्ज मान्य केल्यानंतरच निवड झालेल्या शेतकऱ्याला अधिकचे वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाईल.

३) या अतिरिक्त कालावधीत परदेशातील सुरक्षा, वैद्यकीय खर्च, दंडात्मक कारवाई व इतर सर्व व्यायाक्तिक खर्चाची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची स्वतःची राहील. शासनाद्वारे केला जाणारा अभ्यास दौऱ्यावरील खर्च हा फक्त निश्चित दौरा कालावधीसाठीच देय राहील.

४) जर तुमच्या वास्तव्याचा कालावधी वाढत असल्यामुळे परतीच्या तिकिटाच्या दरात वाढ झाली असल्यास तर ती वाढीव रक्कम प्रवासी कंपनीला देणे शेतकऱ्यास बंधनकारक राहील. कारण, प्रवासी कंपनीच शेतकऱ्याच्या परतीचा दिनांक विचारात घेऊन तिकीट आरक्षित करेल.

५) स्वदेशी परतल्याचा अहवाल : शेतकरी अतिरिक्त वास्तव्य करून स्वदेशी परतल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधित शेतकऱ्याने प्रवासी कंपनी आणि कृषी आयुक्तालयात सादर करणे बंधनकारक राहील.

निष्कर्ष :

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे” हि योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा उपक्रम ठरतो आहे. ह्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, त्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर शेतीत नवनवीन उपक्रम ( प्रयोग) करून त्यांचे उत्पन्न व जीवनमान उंचावण्यास नक्की मदत होईल. हि योजना केवळ राज्यातील शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर नसून राज्यातील कृषी शेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी देखील तितकीच महत्वाची आहे. ह्या योजनेद्वारे राज्यातील शेतकरी अधिक प्रगत आणि समृद्ध होईल असा आम्हाला विश्वास आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक शेतीत आपले वर्चस्व निर्माण करावे व राज्याच्या कृषी विकासाला मजबूत पाठबळ द्यावे. Farmer Foreign Tour योजनेचा आवश्य लाभ घ्या. धन्यवाद !


प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

Visit कृषी विभाग