Drone Favarni|फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी

Drone Favarni Yantra In Marathi

Drone Favarni : नमस्कार शेतकरी मित्रानो ,जग जसे तंत्रज्ञानात प्रगती करत आहे .तसेच, शेती विषयात तंत्रज्ञानाचा वापर कारण हि देखील नव्या क्रांतीची सुरवात आहे . आजपर्यंत पारंपारिक शेती पद्धती मध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कृषी शेत्रात याचा वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे , शेतकऱ्यांसाठी सुद्धा तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी drone favarni च्या माध्यमातून तंत्रज्ञानाने शेतकरी बांधवाना अनोखी भेट दिलेली आहे . मजुरांची अडचण दूर करण्यासाठी आपण ड्रोन च्या माध्यमातून अवघ्या १० मिनिटात १ एकर फवारणी करू शकतो , तंत्रज्ञानाच्या मदतीने आता हे शक्य झाले आहे . फवारणी साठी मजूर भेटत नसल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे नुकसान वाढत चालले आहे, त्याचा परिणाम उत्पनावर होत असून ड्रोन फवारणी च्या रुपात शेतकर्यांना याचा फायदा होताना दिसत आहे .

हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन

drone favarni

वाचा :सेंद्रियशेती जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी

Drone favarni हे अल्प खर्चात आणि कमी वेळेत फवारणी करते , शेतीत असे नवनवीन प्रयोग युवा शेतकऱ्यांकडून होणे अपेक्षित तसेच गरजेचे देखील आहे यातून बऱ्याच समस्या सुटतात कमी कष्टात उत्पादनात वाढ देखील यातून करता येते.

शेतकरी मित्रानो , मजुराची वाट न पाहता एकत्रित येऊन ड्रोन ची खरेदी करू शकता . कृषी विभाग कडून या प्रकल्पात प्रोत्साहन देण्यात येत आहे . ड्रोन पिकांची तसेच जमिनीच्या आरोग्याची तपासणी/मुल्यांकन करून आपल्यला माहिती देते

ऊस ,मक्का ,तूर ,गहू ,कोबी ,फ्लोवर यासोबतच वेगवेगळ्या फळबागावरही योग्यवेळी फवारणीसाठी ड्रोन चा वापर अनेक भागात होताना दिसत आहे.


Drone favarni चे फायदे :

१) ड्रोन च्या माध्यमातून शेतकरी ऊस व इतर मोठ्या पिकांवर अत्यंत कमी वेळात कीड नियंत्रणासाठी फवारणी करता येते.

२) ड्रोन एका वेळी १० लिटर औषध वाहून नेऊ शकतो,ड्रोनचे स्वत:चे वजन १९ किलो असते.

३) ड्रोन च्या भोवती सेन्सेर्स असतात फवारणी करत असताना ड्रोन ला अडथळा जाणवल्यास या सेन्सर्स द्वारे तो जाणून घेतो.

५) औषधाचे व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर ड्रोन हवेत गेल्या बरोबर तो अवघ्या ८ – १० मिनटात एक एकरातील फवारणी पूर्ण करतो

४) फवारणी पंपमध्ये जाणारे प्रत्येक औषध ड्रोन वाहून नेण्यास सक्षम आहे

६) सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी Drone ला हायटेक कॅमेरे बसवले असतात

७) ड्रोन बॅटरी वर चालत असल्यामुळे बॅटरी चार्ज करणे आवश्यक असते .एका चार्ज मध्ये १० ते १२ एकर शेत्र फवारता येते

८) Drone favarni साठी शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे

९) एका एकराला जास्तीत जास्त ६०० रुपये खर्च येतो

१०) ड्रोन च्या किमती १0 लाखापासून सुरु होतात त्यावर शासना कडून ५०% सबसिडी मिळते

११) ड्रोन ला Remote Control , Antina ,GPS लावलेले असतात

१२) सहा पंखे

१३) चार स्प्रयिंग नोझल ज्याच्या १ थेंबातून २४० Nano particles तयार होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते

१४) ड्रोन ला एक UNI NO असतो (Unique Identification Number) यामुळे ड्रोन वर लक्ष ठेवणे सोपे होते


कृषी विभागमार्फत यंत्रीकरण उपअभियान हि योजना चालवली जाते त्या मध्ये आता ड्रोन शी संबंधित योजनाचा समावेश करण्यत आला आहे. २०२२-२३ पासून ड्रोन साठी अनुदान देण्यास सुरवात झाली आहे.ड्रोन ची योजना महाडीबीटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे . भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त उपक्रमातून ड्रोनचा या योजनेत समावेश करण्यत आला आहे


कृषी ड्रोन अनुदान योजना :

  • PM Kisan Drone Yojna कृषी विभागांतर्गत सुरु करण्यत आली आहे . या अंतर्गत देशातील सर्व शेतकरी बांधवाना लाभ घेता येईल .
  • या योजने अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम हि लाभार्थी शेतकर्याच्या बँक खात्यात जमा होईल
  • या योजने अंतर्गत ड्रोन खरेदी साठी अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना ड्रोन सहज रित्या विकत घेता येणार आहे .
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आली आहे , महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करू शकता

Drone Favarni अनुदान योजनेचे वर्गीकरण :

  • वयक्तिक शेतकरी,कंपनी,बचत गट,शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदानावर ड्रोन खरेदी करता येतो
  • विद्यापीठ व सरकारी संस्था यांना १००% अनुदान देण्यात येईल
  • शेतकरी उत्पादक संस्था यांना ७५% अनुदान देण्यात येईल
  • शेतकरी उत्पादक संस्था यांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रती हेक्टरी ६००० रुपये अनुदान प्राप्त होते
  • अवजारे सेवा सुविधा केंद्र असल्यास ड्रोन खरेदी करताना ५०% अनुदान (५ लाखापर्यंत ) देण्यात येईल
  • कृषी पदवीधारक यांनी अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास ५ लाखापर्यंत अनुदान मिळते
  • इयत्ता दहावी उतीर्ण ड्रोन pilot प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कोणत्याही ग्रामीण भागातील युवकाला या योजने अंतर्गत ४ लाखापर्यंत अनुदान मिळते

ड्रोन अनुदान योजनासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक खाते पासबुक
  • कृषी पदवी प्रमाणपत्र
  • संस्थेचे नोदणी प्रमाणपत्र
  • पूर्व संमतीपत्र
  • स्वयंघोषणा पत्र
  • ड्रोन चे कोटेशन बिल
  • ड्रोन प्रशिक्षण चे licence

ड्रोन अनुदान latest News :

अनुदानित ड्रोन विकत घेण्यसाठी महाराष्ट्र शासनातर्फे खालील चार कंपनीची निवड केली असून त्या पुढील प्रमाणे :

१) Garuda Aerospace

२ ) IoTech

३ ) MARUT

४ ) DAKSH’S

महाराष्ट्र सरकारने राज्यात राबवणारी ड्रोन अनुदानित योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली आहे .ड्रोन ची योजना महाडीबीटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


ड्रोन फवारणीची वैशिष्टे :

drone favarni
  • मानव विरहीत वायू यान (ड्रोन) हा एक बचतीचा पर्याय शेतकरी बांधवांसाठी तंत्रज्ञान दिला असून याद्वारे आपण अल्प खर्चात कमी वेळेत drone favarni करू शकतो
  • शेतीचे उत्पन वाढव्ण्य्साठी जेवढे महत्व खात ,पाणी ,बियाणांचे यांचे आहे त्याच प्रमाणे पिकावर पडणार्या रोगांच व्यवस्थापन करणे हा सर्वात मोठा घटक आहे
  • पारंपारिक फवारणी पंपामध्ये पाण्यचे थेब मोठे असतात त्यामुळे पाणी व कीटकनाशके गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरावी लागतात ,पाण्यचा अतिरेक होऊन नुकसानीला समोर जावे लागते, drone favarni मुळे अचूक प्रमाणात औषध पिकांवर फवारले जाते याचा फायदा उत्पन वाढीसाठी होतो
  • शेतकरी बांधवानो, कीटकनाशकाच्या किमिति मध्ये सातत्यने होणारी वाढ बघता त्याचा वापर कमी करता आला तर यातून सुटका करता येते . कीटकनाशक आणि पाण्यचा वापर कमी करण्यासाठी drone हा उत्तम पर्याय आहे
  • ड्रोन मध्ये असलेले अरीअल म्यापिंग पद्धतीमुळे पिकांची जमिनीची तपासणी करता येते त्यनुसार औसाधाचे प्रमाण किती असले पाहिजे यासंबंधित माहित ड्रोन आपल्याला देत असते
  • जमिनीची सुपीकता ,पिकांचे वाढीचा , पिकांवरील रोगाचा डेटा मोबाईल मध्ये संग्रहित केला जातो त्यनुसार औषध व पाण्यचे प्रमाण ठरवता येते
  • ४ स्प्रेइंग नोझल च्या १ थेंबातून २४० न्यनो पार्टीकल तयार होत असल्यमुळे पाण्यचा वापर कमी होतो त्याचा फायदा पिकांना कीटकनाशक चांगल्य प्रकारे एकसलग सोषुन घेण्यत होतो
  • ड्रोन फवारणी चा वेग पारंपारिक फवारणी पेक्षा ५० पट अधिक असतो त्यमुळे कमी वेळेत ज्यास्त क्षेत्र फवारता येते . या तंत्रज्ञाणामुळे एका एकरातील फवारणीसाठी १० ते २० लिटर द्रावणात फवारणी पूर्ण होते त्यामुळे ९० % पाण्यची तसेच ४० % ते ५०% कीटकनाशकाची बचत होते
  • Drone favarni करण्यासाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते . ड्रोन चालवणे हे एक कौशाल्यचे काम आहे त्यसाठी ड्रोन कंपनीने Drone pilot program राबविला जात आहे .हे दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतरच ड्रोन खरेदी करता येते .अनुदानावर ड्रोन खरेदी करायचे असल्यास Drone pilot परवाना सोबत जोडणे अनिवार्य आहे
  • ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण विद्यापीठात उपलब्ध देखील आहे. या प्रशिक्षणात pilot ला सर्व ड्रोन बद्दल संपूर्ण माहिती नियमावली सांगितली जाते
  • ड्रोन उडवताना आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन हाताळण्याचे संपूर्ण प्रशिक्षण देले जाते .प्रशिक्षण शिवाय ड्रोन चालवणे धोक्यचे ठरू शकते
  • प्रत्येक ड्रोन चा एक unique identification number असतो त्याची नोंदणी डीजीसीए (Digital Sky Platform) करणे आवश्यक आहे
  • मजूर टंचाई वरती नवीन तंत्र्धानातून उपाय शोधले जाऊ शकतात फवारणी साठी करत असलेली पारंपारिक पद्धत आता बदलून, एका प्रशिक्षित ड्रोन pilot कडून कमी खर्चात आपण फवारणी करू शकतो
  • यातून मजूर टंचाईची समस्या पूर्ण पणे आपण घालवू शकता.नवनवीन तंत्रज्ञान युवा शेतकर्यांनी आत्मसात करणे आता महत्वाचे झाले आहे

Drone favarni करते वेळी घ्यवयाची काळजी:

  • सुरक्षित कपडे घालावे .मास्क चा वापर करावा
  • फवारणी करताना कुठलेही खाद्य पधर्थ सेवन करू नये
  • वातावरणाचा अंदाज घ्यावा : वाऱ्याचा वेग , तापमान .तपासून घ्यावे
  • ड्रोन ची उंची व वेग सुनिचीत करावी
  • कीटक नाशकांचा वापर त्यावर देलेल्या माहिती नुसार करावा

Drone favarni नंतर घ्यावयाची काळजी :

  • ड्रोनच्या रसायनाची टाकी पूर्णपणे साफ करावी
  • ड्रोन फवारणी च्या उडणाबाबत वेळो वेळी डीजीसीए ला माहिती देणे अनिवार्य आहे
  • वापरलेल्या रसायनाची योग्य ती विलेवाट लावणे गरजेचे आहे
  • ड्रोन कंपनी ने देलेल्या सुचणे नुसार ड्रोन च्या सर्विसेस वेळोवेळी करणे गरजेचे आहे

नोट: > महिलांसाठी कृषी ड्रोन योजना देखील राबवली जात आहे

> युवा शेतकरी बंधूना ड्रोन पायलट बनून रोजगाराची नवीन संधी निर्माण झाली आहे