Crop Insurance |फक्त १ रुपयात पिक विमा २०२५

Crop Insurance In Marathi:

Crop Insurance:सन २०२१-२२ पासून सुरु झालेली प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२५-२६ पर्यंत सुरु ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.या योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण काळासाठी ६९,५१२.२० कोटी खर्चाला मान्यता दिली आहे या अभूतपूर्व निर्णयामुळे २०२५-२६ मध्ये देखील शेतकऱ्याना नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या धोक्या पासून पिकांचे सौरषण होण्यास मदत मिळेल.Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२५-२६ महाराष्ट्रात लागू राहणार असून १ रुपयात पिक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे त्यासाठी www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारल्या जात आहे.

ड्रोन फवारणी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील नवीन बदल २०२५

crop insurance

हेही वाचा:सेंद्रियशेती जागतिक बाजारपेठेत

योजनेच्या अंमलबजावणी मध्ये पारदर्शकत्ता टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे YES-TECH तंत्रज्ञान प्रणाली यावेळी उत्पन्ननाचा अंदाज घेण्यासाठी वापरण्यात येत आहे.२०२३-२४ मध्य प्रदेश मध्ये १००% तंत्रज्ञानाचा वापर करून Crop Insurance योजनेची मोहीम राबविण्यात आली होती इतर राज्यात देखील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आव्हान केंद्र सरकार कडून होत आहे.

मागील वर्षी नव्याने खारीप हंगामासाठी १४ पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता.त्यामध्ये, कापूस,सोयाबीन,तूर,मुग,उडीद,मका,बाजरी,भात,ज्वारी,नाचणी,कांदा,,कारले,भुईमुग इत्यादी पिकांचा समावेश योजनेत करण्यात आला.


प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्टे :

pmfby Crop Insurance

१) सन २०२३-२४ पासून फक्त १ रुपयात शेतकरी बांधवाना पिक विमा योजनेचा लाभ घेता येईल.

२) शेत मालका व्यतिरिक्त कुळाने भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला देखील या योजनेचा लाभ घेता येईल,त्यासाठी अट फक्त शेतकऱ्याला पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे बंधनकारक आहे.

३) या योजनेतून रोग,कीड,नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबीमुळे होणारे पिकांच्या नुकसानापासून शेतकरी वर्गाला विमा सौरक्षण मिळणार आहे.

४) या योजनेची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांचे १२ समूह तयार करण्यात आले असून एका समूहातील जिल्ह्यांसाठी एक विमा कंपनी या प्रमाणे नियोजन आखण्यात आले आहे.

५) कप आणि कॅप मॉडेल नुसार या वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येईल त्या मध्ये एकूण जमा झालेल्या विमा हप्याच्या २०% पेक्षा जास्त असणारी रक्कम विमा कंपनी राज्य शासनाला परत करेल(शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिल्यानंतरची रक्कम)

६) एका वर्षात विमा कंपनी कडे जमा झालेली विमा हप्त्याच्या जास्तीत जास्त ११०% पर्यंतची नुकसान भरपाई विमा कंपनी शेतकऱ्याना देईल उर्वरित नुकसानभरपाई चा भर राज्य शासन आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांना देणार आहे.

^उदाहरणाद्वारे समजून घेऊ:

१) समजा, एका वर्षात शेतकऱ्यानकडून विमा हप्त्याची रक्कम १०० कोटी रुपये कंपनीकडे जमा झाली असे आपण मानु, या १०० कोटीतून समजा ७५ कोटी रुपये नुकसानभरपाई विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिली असल्यास,उर्वरित २५ कोटी पैकी २० कोटी रक्कम विमा कंपनी स्वत: जवळ ठेवेल व ५ कोटी रुपये राज्य शासनाला परत करेल.

२) समजा, एका वर्षात शेतकऱ्यानकडून विमा हप्त्याची रक्कम १०० कोटी रुपये कंपनीकडे जमा झाली असे आपण मानु, या १०० कोटीतून समजा ९५ कोटी रुपये नुकसानभरपाई विमा कंपनी शेतकऱ्याला देत असेल तर उर्वरित ५ कोटी रुपये कंपनी स्वतःजवळ ठेवेल

३) Crop Insurance विमा कंपनीना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची रक्कम जर ११५ कोटी रुपये होत असेल तर विमा कंपनी ११० कोटी रुपये देईल व उर्वरित ५ कोटी रक्कम राज्यशासन शेतकऱ्याना देईल.


योजना पुढील पिकांसाठी लागू आहे:

Crop Insurance

  • खरीप हंगामातील पिके :-कापूस,कांदा,सोयाबीन,भात,ज्वारी,बाजरी,नाचणी,सुर्यफुल,भुईमुग,कारले,उडीद,मका,तूर,मुग.
  • रब्बी हंगामातील पिके :- बागायती गहू, हरभरा, उन्हाळी भात,उन्हाळी भुईमुग,रब्बी कांदा,रब्बी ज्वारी.

योजनेचा लाभ कोणकोणत्या बाबीमध्ये मिळू शकतो :

१) नैसर्गिक असंतुलनामुळे जर पिकांची पेरणी किवा लागवड झाली नसल्यास:

पावसाचे प्रमाण कमी असल्यास ,हवामानातील इतर विरुद्ध बदलांमुळे फक्त अधिसूचित पिकांची अधिसूचित शेत्रात जर का मोठ्या प्रमाणात पेरणी/लावणी किवा उगवण झाली नसल्यास हे शेत्र संपूर्ण शेत्राच्या ७५% पेक्षा जास्त शेत्रात अशीच परिस्थिती बघावयास मिळत असल्यास विमा संरक्षनातून नुकसानभरपाई देण्यात येईल.विमा संरक्षण हे फक्त अधिसूचित शेत्रातील अधिसूचित पिका पुरते मर्यादित राहील.

२) हंगामातील असंतुलनामुळे जर पिकांचे नुकसान झाले असल्यास:

(pmfby Crop Insurance) हंगामातील असंतुलांमुळे जर पिकांचे नुकसान होत असल्यास(अट -पिक काढणीच्या १५ दिवसा आधी पर्यंत) जसे कि पूर,दुष्काळ,पावसाचा खंड इत्यादी कारणांमुळे नुकसान होत असल्यास अधिसूचित विमा शेत्रातील जे हि पिकांचे अपेक्षित उत्पन्न असेल.त्यासाठी नुकसानभरपाई मिळेल परंतु येथे देखील अट घालण्यात आली आहे,अपेक्षित उत्पन्न हे जर का मागील ७ वर्षाच्या सरासरीच्या ५०% पेक्षा कमी येत असल्यास नुकसान भरपाई हि सर्व अधिसूचित शेत्रासाठी पात्र राहील.

त्याच बरोबर २५% जास्तीची रक्कम विमाधारक शेतकऱ्याला देण्यात येईल हि २५% रक्कम अंतिम नुकसानभरपाई सोबत शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल.हंगामातील असंतुलित परिस्थिती जर काढणीच्या सर्व सामान्य वेळेच्या १५ दिवसा अगोदर येत असल्यास वरील नुकसानभरपाई लागू होणार नाही.

३) स्थनिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान :

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये गारपीट,ढगफुटी,वीज,नैसर्गिक आग ,त्याच बरोबर विमा संरक्षित शेत्रामध्ये जर पावसाचे पाणी साचून राहिल्यास, विहिरी जर ओसंडून वाहत असताना विहिरीचे पानी शेतात दीर्घकाळ साचून राहिल्यास इत्यादी बाबीमध्ये व्ययक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास ७२ तासाच्या अट विमा कंपनी ,बँक व कृषी विभागास पूर्वसूचीत करणे गरजेचे आहे.स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जर शेतकऱ्याला नुकसानभरपाई दावा करावयाचा असल्यास विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे त्यामध्ये ७/१२ ,विमा हप्त्याची पावती,पिकांची नोंद पावती इत्यादी गोष्टी जोडने गरजेचे आहे.

४) नैसर्गिक कारणामुळे पिकांचे काढणीपश्चात झालेले नुकसान:

पिके काढणी नंतर १४ दिवसाच्या आत शेतात ठेऊन असलेल्या मालाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असल्यास उदाहरणार्थ: गारपीट,वादळ,चक्रीवादळ, अवकाळी पाऊस ,बिगर मोसमी पाऊसमुळे नुकसान होत असल्यास स्थानिक स्थरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येईल.

या तरतुदी मध्ये अवकाळी पाऊस म्हणजे त्या जिल्ह्यात त्या महिन्यातील दीर्घकालीन पावसाच्या सरासरीच्या २०% पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास व व्यायाक्तिक स्तरावर नुकसान आढळून आले असल्यास हि तरतूद लागू असेल.

प्रधानमंत्री पिक विमा योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • ७/१२
  • आधार कार्ड प्रत
  • बँक पासबुक प्रत
  • भाडेपट्टा करार असल्यास करारनामा /सहमती पत्र.

योजनेचा हप्ता कुठे भरलं:

१) आपले सरकार सेवा केंद्र

२) बँक

३) प्राथमिक कृषी पत पुरवढा सहकारी संस्था

४)www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने

विमा हप्ता किती भरावा :

२०२३-२४ पासून पिक विम्यासाठी १ रुपया भरावा

योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख :

खरीप पिकांसाठी २०२५-२६ :- १५ जुलै

रब्बी पिकांसाठी २०२५-२६ :-

१) रब्बी ज्वारी ह्या पिकासाठी – ३० नोव्हेंबर

२) गहू बागायत, हरभरा, कांदा -१५ डिसेंबर

३) उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग -३१ मार्च

विमा कंपनी जिल्ह्यानुसार :

Visit krushi Vibhag

pmfby प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फायदे:

१) नैसर्गिक अपत्ती,पिकांवरील रोग कीड व काढणीनंतरच्या नुकसानापासून कमी दरात संरक्षण प्रदान करते.

२)खरीप पिकांसाठी २% आणि रब्बी पिकांसाठी १.५ % दरात प्रीमियम उपलब्द आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक व जलद गतीने पिकांचे नुकसान मोजता येते.

३) हि योजना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करते तसेच शेतकऱ्यांना पिक उत्पनात स्थेर्य प्रदान करते,नुकसान भरपाई जलद गतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.