Chana Crop Disease | हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन

Chana Crop Disease In Marathi :

Chana Crop Disease:शेतकरी बंधुनो ,महाराष्ट्रात हरभरा पिकाचे महत्व सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात रब्बी पिकातील महत्वाचे पिक म्हणून हरभरा पिकाचा समावेश होतो. कमी पाण्यात आणि कमी खर्चात हरभरा पिक उत्तमरीत्या उत्पादन शेतकऱ्याला देते. हरभरा हा मानवी आहारात महत्वाचा घटक असल्यामुळे बाजारात हरभऱ्याला नेहमीच चांगली मागणी असते. परंतु वातावरणातील सततच्या बदलांमुळे पिकांवर येणाऱ्या अळ्यांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.Chana Crop Disease हरभरा ह्या पिकावर प्रामुख्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवतो. हि अळी लहान असताना सुरवातीला पानावरील हरितद्रव्य खरवडून खात असते. ज्यामुळे पाने पांढरी पडण्यास सुरवात होते नंतर पाने वाळतात व गळून पडतात. आळी मोठी झाल्यावर शेंगाना शिद्र पाडून दाणे खाण्यास सुरवात करते. अळी साधारणतः ३० ते ४० शेंगांचे नुकसान करू शकते.

Chana Crop Disease

Chana Crop Disease ह्या लेखात आपण हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली बघणार आहोत शेतकरी बंधुनो, सांगितलेल्या माहितीचा आपल्या पिक व्यवस्थापनात समावेश केल्यास उत्पादनात ३० ते ४० % पर्यत वाढ करा, चला सुरवात करूया !

या वर्षी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे जमिनीतला ओलावा जास्त काळ टिकला त्यामुळे रब्बी पिक पेरणीला थोडा उशीर झाला. जमिनीतला ओलावा टिकल्यामुळे या वर्षी रब्बी पिकांचे शेत्र वाढीस आल्याचे दिसू लागले. हरभरा ,गहू , मोहरी ,ज्वारी,या पिकांची लागवड प्रामुख्याने सर्वत्र दिसू लागली आहे.अन्नधान्याचे उत्पादनासोबत शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कमी खर्चात करून शेती किफायतशीर कशी बनवता येईल यासाठी शेतकऱ्यांनी तज्ञांनचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.(Chana Crop Disease) हरभऱ्याची ओळख महाराष्ट्रतील अत्यंत महत्वाचे पिक म्हणून आहे. २०२२-२३ चा विचार केल्यास हरभऱ्याची उत्पादकता १०७४ किलो प्रतीहेक्टर दिसून आली. हरभऱ्याची उत्पादकता ठासळण्याचे कारण वेगवेगळी असून त्यापैकी मुख्य कारण म्हणजे हरभऱ्यावरील घाटे अळी.

ड्रोन फवारणी

Chana Crop Disease) या लेखात आपण डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी घाटे अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहे त्या पुढील प्रमाणे:

वाचा:सेंद्रिय शेतीची जागतिक बाजारपेठ

हेहि वाचा: सोयबीन मार्केट


हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन कसे करावे :

हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन, मागील काही दिवसापासून वातावरणातील बदल आपण अनुभवला आहे,ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीला पोषक वातावरण तयार झाले असून या किडांचे पतंग वातावरणात जास्त होत आहे.पिके जेव्हा वाढीस लागतात म्हणजे फुले व घाट्या अवस्थेत असतात त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागतो,घाटे अळीचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना पेरणीपूर्वी व नंतर करणे गरजेचे आहे.

घाटे अळीची ओळख कशी कराल:

  • फक्त हरभऱ्यावरच नाही तर हि अळी तुरीवर ,बोंडावर ,हिरव्या बोंडावर तसेच हरभऱ्याच्या घाटी वर आढळते म्हणून या हंगामात अळीला घाटे अळी म्हटल्या जाते हेलीकोव्हरपा असे या आळीचे मूळनाव आहे.
  • हि अळी कडधान्ये वाटणा ,मसूर ,तूर, हरभरा ,चवळी या पिकावर आढळते त्याचबरोबर कापूस ,कोबी ,एरंड व सुर्यफुल यात सुद्धा आढळते म्हणून हि अळी बहुभक्षी कीड म्हणून ओळखल्या जाते.
  • घाटे अळीच्या पतंगाचा रस पिवळसर राहतो,समोरील पंखाचा रंग तपकिरी राहतो व त्यावर काळे ठिपके असतात.
  • (Chana Crop Disease) हरभऱ्याच्या फुलांवर व कळ्यावर मादी पतंग अंडी घालत असते. खसखस सारखी हि अंडी दिसतात,अळी २-३ दिवसात अंड्यातून बाहेर निघते,अंड्यातून बाहेर निघाल्या ती १५-२० दिवसात घाटातील दाने खाऊन पूर्णपणे विकसित होते.
  • विकसित अळीची लांबी ३०-४० मिमी असते ,शरीरावर वेगवेगळ्या रंग छटा असतात,अंगावर बाजूला करड्या रंगाच्या तुटक रंगा असतात.
  • अळी अंड्यातून निघताच सर्वप्रथम पानावरील हिरवा पदार्थ खातात.त्यामुळे पानांना जाळीदारपणा येण्यास सुरवात होते.
  • अळी ५-६ दिवसांची झाल्यानंतर फुले,कळ्या,व घाट्यावर आक्रमण करते.
  • घाट्या खात असताना अळी पूर्णपणे घाट्यात शिरत नाही,तोंडाकडील भाग घाट्यात खुपसून असताना मागील भाग घाट्या बाहेर असतो.
  • अळी घाट्यातील दाने खात असल्यामुळे घाटे आतून पोकळ बनतात.

Chana sowing हरभऱ्याचे पिक जेव्हा कळी व फुलावर असते त्यावेळी सर्वात जास्त पिकांचे सौरक्षण करावे लागते.१ मीटरमध्ये जर २ अळ्या आढळत असेल किवां लागवडीच्या ५ % पिकांवर अळीचा उपद्रव दिसत असेल तर अळीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानाची पातळी ओलाडली असे समजावे व त्वरित पिक संरक्षणच्या उपाययोजना कराव्यात.


किंडीचे व्यवस्थापनअसे करा :

१) जमिनीतील घाटे अळीचा कोष नष्ट करणे महत्वाचे आहे. यासाठी उन्हाळ्यात शेत जमिनीची खोल नांगरणी करावी.

२) मिश्र पिकांचा अवलंब करावा हरभऱ्यासोबत गहू,जवस,कोथिंबीर,मोहरी यासारखी पिके लावावीत

३) अळीला पोषक असलेले तन शेतात्तील बंध्यावरून नष्ट करावे. यामध्ये रानभेंडी,पेटारी,कोळशी इत्यादी तन नष्ट करावे.

४) कामगंध सापळे फायदेशीर ठरतात,हरभरा कळी अवस्थेत असताना प्रतीहेक्टार ५ ते १० कामगंध सापळे १ फुट उंचीवर लावावीत

५) पक्षी खांबे उभारावीत प्रतीहेक्टार २० पक्षी खांबे उभारणे गरजेचे आहे.

६) ५% निंबोळी अर्क पिक कळी अवस्थेत असताना फवारावे.

७) मोठ्या अळ्या वरवर वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.

औषधाद्वारे नियंत्रण प्रक्रिया:

  • H A N P V 50LE प्रतीहेक्टर रोगग्रस्त अळ्याचा अर्क फवारणे, हा अर्क प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांना नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येतो.
  • औषधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याच बरोबर विषाणूंची कार्यक्षमता टिकून राहावी तसेच उन्हापासून सुरक्षितता वाढण्यासाठी (अर्धा लिटर पाण्यात राणीपाल/नीळ ५० ग्राम ) १ मिली प्रतीलिटर प्रमाणे फवारणीच्या द्र्वनात वापरावे.
  • Chana Crop Disease आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी किंड प्रतिबंधक वाणांचा वापर करावा. कनक,विजय,दिग्विजय वणामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी आहे.
  • तूर हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास पहिली निम कीटकनाशक फवारणी पुढील प्रमाणे करावी:(अझाडेरेक्टीन ३०० पिपी एम ५० मिली प्रती १० ली पाण्यात यांचे एकजीव मिश्रण करून फवारणी करावी.

Chana Crop Disease In Marathi

किंड नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करणे,कंपोस्ट खताचा वापर वाढवणे,जीवन द्रवेचे संरक्षण करणे हि काळाची गरज बनली आहे.

वरील सर्व माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी सुचविली असून शेतकऱ्यांनी याचा कीडव्यवस्थापनात समावेश केल्यास शेतकरी बांधवाना उत्पन्न वाढीसाठी याचा निश्चित फायदा होईल.


Chana Crop Disease

हरभऱ्या वरील कट वर्म अळीचे व्यवस्थापन :

Chana Crop Disease

कट वर्म अळीचे जीवनचक्र :

१) प्रोढ अवस्था: हि प्रोढ कीटक साधारणतः ७- १० दिवस जिवंत राहतो. ह्या किडीचा मादी पतंग साधारणता ३०० – ४५० अंडी घालते. हि अंडी मातीच्या आत किंवा मातीवर असतात.

२) अंडी व अळीची अवस्था: मादी पतंगाने घातलेली अंडी हि साधारणता १० ते ३० दिवसामध्ये फुटतात. त्यानंतर अंड्यातून एक छोटी आळी (Larva) बाहेर पडते. हि आळी १० ते ३० दिवसापर्यंत वाढत राहते. ह्या काळात ती आजूबाजूच्या पिकांची रोपे खाऊन मोठी होत असते.

३) कोषा अवस्था : अळीची वाढ पूर्ण होताच ती स्वतः भोवती एक कवच तयार करते. ज्याला कोष असे म्हणतात. कीटक ह्या अवस्थेत १० – ३० दिवसपर्यंत राहतो. ह्या काळात तो काहीच खात नाही आणि कट वर्म या कालावधीत पूर्णतः निष्क्रिय असतो. आत मध्ये त्याचे प्रोढ किटकामध्ये रुपांतर होत असते.

४) परत प्रोढ कीटक: कोष फुटून त्यातून एक नवीन कीटक बाहेर पडतो आणि हा नवीन प्रोढ कीटक पुन्हा अंडी घालतो व अशा प्रकारे हे जीवन चक्र चालू राहते.


कट वर्म अळीची ओळख:

Chana Crop Disease

  • कट वर्म अळी हि प्रामुख्याने हरभऱ्यावरील पाने, रोपे व शेंडे कुरतडणारी अळी आहे. कट वर्म हि एक बहुभक्षीय कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केल्यानंतर उदभवतो. कट वर्म मादी पतंग हा सुरवातीला पिकावर व तनावर त्याच बरोबर कोवळ्या शेंड्यावर समुहाने किंवा एक एक करून ३०० – ४०० अंडी घालत असते.
  • कट वर्म ची लांबी हि ०.२ ते १.५ इंचपर्यंत असते. कट वर्म चा रंग भुरकट हिरवा, काळपट , किंवा करडा असतो. त्याच बरोबर अळीच्या शरीरावर करड्या रंगाच्या दोन्ही बाजूने पट्टा असतो.
  • शेताचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास. पिकांची पाने, शेंडे, कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात. हि अळी बहुधा झाडाच्या बुंध्याला मातीच्या आत लपून बसते आणि मुख्यत्वे पिकांवर हि रात्रीच्या वेळी येऊन पाने आणि शेंडे कुरतडण्यास सुरवात करते.
  • कट वर्म अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास हि अळी दिवसा देखील पिकांवर निदर्शनास येते. कट वर्म ची पूर्ण वाढ झाल्यास १.५ – २ इंच लांबीची होते. कट वर्म अळीला स्पर्श झाल्यास ती “C” आकार करताना दिसून येते.

शेतकरी बंधुनो, पिकांच्या सर्व अवस्थेत मध्ये हि आळी आपला प्रादुर्भाव दाखू शकते. पिके रोपा अवस्थेत असताना किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे कुरतडणे आणि नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव आढळल्यास पाने व शेंडे देखील कुरतडते. ज्या अळीची पूर्ण वाढ झालेली आहे ती आळी जमिनीमध्ये कोषाअवस्थेत जात असते.


कट वर्म अळीचे व्यवस्थापन :

  • कचऱ्याचे ढीग त्याचबरोबर तण शेतामध्ये किवा शेताच्या बांधावर राहणार नाही. ह्याची दक्षता घ्यावी.
  • शेतामध्ये प्रती हेक्टर २० पक्षी खांबे उभाराने फायद्याचे ठरते त्यामुळे पक्षी ह्या अळ्या खाऊन फस्त करतात.
  • लष्करी आळी प्रमाणे ह्या अळीचा प्रादुर्भाव एकाच वेळी आढळून येत असतो. म्हणून शेतातील पिकामध्ये कट वर्म मादीचा पतंगाने अंडी घालून नये ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील उपाय करावा: निंबोळी आर्क ५ % अझाडीरोक्तीन ३०० PPM ५० मिली किंवा अझाडीरोक्तीन 1500 PPM २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव हा २ अळ्या प्रती मीटर दिसत असल्यास अळीने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्याचे समजावे व त्वरित पुढील उपाय करावा त्यासाठी, क्लोरयाट्रीनीलीप्रोल १८.५ % ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पिकांचे निरीक्षण करा व आवश्यकता असल्यास १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करू शकता.

VisitDr.PDKV Official Website