Birsa Munda Krushi Kranti Yojana 2025-26
Birsa Munda Krishi Kranti Yojana:नमस्कार आदिवासी बंधुनो,बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हि महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या जीवनात समृद्धी आणण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली.आदिवासी बांधवांसाठी हि एक महत्वाकांशी योजना आहे. सन १९९२ पासून हि योजना आदिवासी उपयोजना ह्या नावाने राबविल्या जात होती.परंतु अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याचे उत्पन्न आणि जीवनमान उंचावण्यासाठी २०१७ पासून ह्यात विशेष बदल करून ती अधिक प्रभावी व शेतकरी केंद्रित बनविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी Birsa Munda Krishi Kranti Yojana च्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून ह्या लेखात योजने संबंधित संपूर्ण तपशील आपण बघणार आहोत.

आदिवासी शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीसाठी लागणारे शेती अवजारे, आवश्यक सिंचन सुविधा व इतर सलग्न बाबीसाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास नक्की मदत होईल.योजने संबंधित माहिती जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवा व योजनेचा आवश्य लाभ घ्या. चला सुरवात करूया !
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली गेली असून महाडीबीटी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यापासून ते अनुदान वितरणापर्यंतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.
हेही वाचा :सौर फवारणी पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ! असा करा अर्ज

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील प्रमुख घटक :
२०२५-२६ या वर्षासाठी Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत १२ प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे.
- नवीन सिंचन विहीर : अनुदान ४,००,०००/- (४ लाख )
- जुन्या विहिरीचे दुरुस्तीकरण : अनुदान १,००,०००/- ( १ लाख)
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : अनुदान २,००,०००/- ( २ लाख )
- इनवेल बोअरिंग : अनुदान ४०,०००/-
- वीज जोडणी : अनुदान २०,००० /-
- पंप संच (डीझेल / विद्युत : क्षमता १० अश्वशक्ती ): अनुदान ४०,०००/-
- सोलर पंप ( वीज जोडणी/ पंप संच ऐवजी ) : अनुदान ५०,०००/-
- HDPE / PVC पाईप : अनुदान प्रत्यक्ष खर्चाच्या १०० % किंवा ५०,०००/-
सुश्म सिंचन संच अनुदान: ( पूरक अनुदानासह )
सिंचन प्रकार | भूधारक प्रकार | प्रती थेंब अधिक पिक योजना | मुख्यमंत्री शाशाव्त सिंचन योजना | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | एकूण अनुदान टक्केवारी | कमाल अनुदान रक्कम |
---|---|---|---|---|---|---|
१) तुषार सिंचन संच | अल्प/अत्यल्प | ५५ % | २५ % | १० % | ९० % | ४७,०००/- |
बहुभूधारक | ४५% | ३०% | १५% | ९०% | ४७,०००/- | |
२) ठिबक सिंचन संच | अल्प/अत्यल्प | ५५% | २५% | १०% | ९०% | ९७,०००/- |
बहुभूधारक | ४५% | ३०% | १५% | ९०% | ९७,०००/- |
Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत मिळणारे अनुदान हे नमूद केलेल्या एकून टक्केवारी नुसार किंवा कमाल अनुदान रक्कमेपैकी जे कमी असेल ते दिले जाईल.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील पॅकेज स्वरूपातील लाभ :
आदिवासी बंधुनो, Birsa Munda Krishi Kranti Yojana मध्ये पॅकेज स्वरूपात लाभ दिला जातो. योजनेमध्ये तीन मुख्य पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.त्यापैकी कुठल्याही एका पॅकेजचा लाभ शेतकऱ्याला घेता येईल.
नोट: ज्या शेतकरी बांधवाणी याआधी नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्तीचा लाभ कोणत्याही शासकीय योजनामार्फात घेतला नसेल त्यांनाच ह्या पॅकेजचा लाभ दिला जाईल.
पॅकेज क्रमांक १. नवीन विहीर पॅकेज :
या पॅकेज मध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नवीन विहीर , इनवेल बोअरिंग , वीज जोडणी आकार, विददूत पंप संच / डीझेल इंजिन ( सोलर पंप ) , HDPE / PVC पाईप , सुश्म सिंचन संच , यंत्र सामग्री व पारसबाग इत्यादी घटकांचा समावेश होतो. यासाठी एकूण अनुदान हे ६,४२,००० ते ६,९२,००० पर्यंत दिले जाते.
पॅकेज क्रमांक २. विहीर दुरुस्ती पॅकेज
या पॅकेज मध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग , वीज जोडणी आकार, विददूत पंप संच / डीझेल इंजिन ( सोलर पंप ) , HDPE / PVC पाईप , सुश्म सिंचन संच , यंत्र सामग्री व पारसबाग इत्यादी घटकांचा समावेश होतो. यासाठी एकूण अनुदान हे ३,४२,००० ते ३,९२,००० पर्यंत दिले जाते.
पॅकेज क्रमांक ३. शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज
या पॅकेज मध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शेततळ्याचे अस्तरीकरण, वीज जोडणी आकार , विददूत पंप संच / डीझेल इंजिन किंवा सोलर पंप HDPE / PVC पाईप , सुश्म सिंचन संच , यंत्र सामग्री व पारसबाग इत्यादी घटकांचा समावेश होतो. यासाठी एकूण अनुदान हे ४,०२,००० ते ४,५२,००० पर्यंत दिले जाते.
पॅकेज क्रमांक ४. वन शेत्रातील आदिवासी शेतकऱ्यासाठी विंधन विहीर पॅकेज
या पॅकेज मध्ये वन शेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना विंधन विहीर व सोलर पंप सह एकूण अनुदान हे १,००,००० /- पर्यंत दिले जाते.
ज्या शेतकरी बंधूनी आधीच शासकीय योजनेतून विहीर घेतली आहे. किंवा विहीर स्वखर्चाने बांधली आहे त्यांना वीज जोडणी, इनवेल बोअरिंग , सुश्म सिंचन संच, पंप संच , सोलर पंप , PVC/ HDPE पाईप, यंत्रसामुग्री व परसबाग इत्यादी घटकांसाठी Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत अनुदान दिले जाते.
घटकनिहाय अनुदानाचा तपशील :
नवीन विहीर :
- Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत नवीन विहिरीसाठी योजनेंतर्गत ४,००,००० चे अनुदान दिले जाते.
- Birsa Munda Krishi Kranti Yojana २०२५-२६ च्या मार्गदर्शक सूचना नुसार विहिरीची खोली हि १२ मीटर असणे हि अट आता रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी आता ४ लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खोली करू शकता.
- केंद्र, राज्य, जिल्हा परिषद किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून लाभार्थ्याने याआधी नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा.
- शासकीय योजनेतून घेतलेल्या अपूर्ण किंवा राहिलेल्या विहिरीचे काम करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लाभार्थी व्यक्तीच्या ७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद असल्यास किंवा शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीर या घटकाचा लाभ घेता येणार नाही.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील (GSDA) पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जर वयैक्तिक प्रमाणपत्र उपलब्ध होत नसतील तर गावासाठी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जोडू शकता.
- अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी सदर योजना असल्यामुळे, दोन सिंचन विहिरीमधील ५०० फुट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.
- नवीन विहिरीच्या कामासाठी कृषी विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता अंदाजपत्रकावर घ्यावी लागते आणि काम पूर्ण होताच जिल्हा कृषी अधिकारी ह्यांच्या कडून पूर्णत्वाचा दाखला घेणे गरजेचे असते.
- पूर्णत्वाचा दाखला , विहिरीचा लाभार्थ्यासह GPS लोकेशन सह फोटो व मुल्याकन सादर केल्याशिवाय कामाच्या शेवटच्या हप्त्याचे अनुदान देय राहणार नाही.
जुनी विहीर दुरुस्ती
- Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत स्वतःची विहीर दुरुस्त करावयाची असल्यास जुनी विहीर दुरुस्ती ह्या घटकासाठी १,००,००/- पर्यंत अनुदान दिले जाते.
- ज्यांनी नवीन विहीर घेतली आहे अशा लाभार्थ्यांना २० वर्षानंतर दुरुस्तीचा लाभ घेता येईल.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर जुनी विहीर दुरुस्ती घटकाचा लाभ घेण्यासाठी विहिरीची नोंद असणे बंधनकारक राहील.
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून कृषी विकास अधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहील
- जुनी विहीर दुरुस्ती साठी अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च होत असल्यास तो लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे.
इनवेल बोअरिंग :
- नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती ह्या दोन्ही घटकांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास इनवेल बोअरिंग साठी मागणी केल्यास ४०,००० पर्यंत अनुदान मिळते.
- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून कामासाठी खर्चाचे अंदाजपत्रक व ठिकाणाचा योग्यता अहवाल प्राप्त करून घ्यावा.
पंप संच :
पंप संच ( डीझेल/ विददूत ) १० अश्वशक्ती क्षमतेचा पंप संचसाठी ९० % अनुदान दिले जाते किवा ४०,००० पर्यंत (जे कमी असेल ते)
Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत कुठल्याही घटकासाठी निवड झाल्यास पंप संच हा प्राधान्यक्रमाने मजूर केला जातो.
सोलर पंप ( वीज जोडणी आकार व पंप संच ऐवजी ) :

ज्या शेतकऱ्याला महावितरण कंपनी कडून सोलर पंप मजूर झाला आहे अशा लाभार्थ्याला वीज जोडणी आणि पंप संच अनुज्ञेय अनुदान मर्यादेनुसार ५०,००० एवढा लाभार्थी हिस्सा आदिवासी विकास विभागाकडून दिला जाईल.
वाचा :Magel Tyala Shettale Yojana 2025 | मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आता घरबसल्या करा अर्ज !
Birsa Munda Krishi Kranti Yojana पात्रता निकष
आदिवासी बंधुंसाठी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे.
१) अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
२) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
३) अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर ७/१२ उतारा व ८-अ उतारा असणे बंधनकारक राहील.
४) अर्जदार शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असावे व ते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
५) आदिवासी बंधुंसाठी ह्या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- मर्यादेची अट आता रद्द करण्यात आली आहे. ( उत्पन्न मर्यादेची अट नाही, चांगली संधी आहे )
६) अर्जदार शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर पर्यंत शेतजमीन असणे गरजेचे आहे.
७) आता हे व्यवस्थित लक्षात घ्या: दुर्गम भागातील ०.४० हेक्टर पेक्षा कमी जमीन धारण केलेले शेतकरी दोघे किंवा अधिक अर्जदार एकत्र आल्यास आणि त्यांची जमीन (सर्वांची) मिळून ०.४० हेक्टर होत असल्यास त्यांना सुद्धा Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत लाभ मिळू शकतो. (अट फक्त त्यांनी करारनामा लिहून देणे आवशक राहील)
८) Birsa Munda Krishi Kranti Yojana साठी अर्जदार दारिद्र रेषेखालील असल्यास कमाल ६ हेक्टर जमीन धारणेची अट लागू असणार नाही.
९) ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ आधीच घेतला आहे अशा लाभार्थ्यास किंवा कुटुंबातील सदस्यास पुढील पाच वर्षासाठी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
१०) योजनेंतर्गत नवीन विहीर घटकाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास पुढील २० वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती ह्या घटकासाठी लाभ मिळू शकतो.
११) Birsa Munda Krishi Kranti Yojana चा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर त्याबाबतची नोंदणी केली जाईल.
लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम :
- दारिद्र रेषेखालील लाभार्थी
- आदिम जमाती लाभार्थी
- वैयक्तिक वन हक्क पट्टेधारक
या व्यतिरिक्त वैयक्तिक लाभार्थ्याची निवड करत असताना महिला व अपंग लाभार्थ्यास प्राधान्य दिले गेले आहे.योजने अंतर्गत एकून मंजूर झालेल्या निधी पैकी ५ % निधी हा अपंग लाभार्थ्यासाठी व ३० % निधी हा महिला लाभार्थ्यासाठी खर्च केला जाईल.
Latest News: फळपिक विमा योजना:फायदे अर्ज प्रक्रिया संरक्षित रक्कम आणि महत्वाच्या अंतिम तारखा
Birsa Munda Krishi Kranti Yojana आवश्यक कागदपत्रे :
- ७/१२ उतारा
- ८-अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते
सर्व घटकांसाठी योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी जास्तीत जास्त ३० दिवसाचा कालावधी दिला जाईल.या कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांची निवड महाडीबीटी पोर्टल मधून आपोआप रद्द होईल.
योजनेसाठीची पूर्वसंमती :
नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या घटकासाठी निवड झालेल्या लाभार्थ्याच्या शेतात्त कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या मार्फत स्थळाची पाहणी केली जाईल यातून तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाते.
प्रस्तावातील तपशील तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यास कृषी विकास अधिकारी अंदाजपत्रक मंजूर करतील. कागदपत्रे अपलोड केल्या नंतर कमाल ३० दिवसामध्ये प्रस्तावांना पूर्व संमती दिली जाईल.
स्थानिक पाहणीच्या वेळी ज्या लाभार्थ्याचे प्रस्ताव तांत्रिक दृष्ट्या अयोग्य असतात त्यांची निवड रद्द केली जाईल.
नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या घटकांशिवाय इतर घटकांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्याला कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त ३० दिवसाच्या आत पुर्वसंमती दिली जाईल.
Birsa Munda Krishi Kranti Yojana अंतर्गत विहित कालावधीत अमलबजावणी न करणाऱ्या लाभार्थ्याची पूर्व संमती रद्द केली जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष :
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हि आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे एक प्रभावी माध्यम ठरताना दिसत आहे.आदिवासी शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीसाठी लागणारे शेती अवजारे, आवश्यक सिंचन सुविधा व इतर सलग्न बाबीसाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत असून आता ती अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे.” प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर योजना राबविली जात असून अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत Birsa Munda Krishi Kranti Yojana चा लाभ मिळत आहे.ह्या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणी मुळे आदिवासी शेतकरी नक्कीच कृषी क्रांतीच्या प्रवाहात सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे.योजनेचा आवश्य लाभ घ्या. धन्यवाद !
कृषी विद्यापीठाच्या शिफारशी
फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी