Adsali Sugarcane I ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!

Adsali Sugarcane In Marathi:

Adsali Sugarcane:शेतकरी मित्रानो,ऊस उत्पादन वाढवण्यासाठी काही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या,त्या म्हणजे सुधारित जातीचे निरोगी बियाणे,जमिनीच्या आरोग्याचे नियोजन,रोपांची लागवड(५ फुट सरी मध्ये),ठिबक सिंचनामधून पाणी व खतांचे नियोजन, आंतरमशागत व तन नियंत्रणाचे व्यवस्थापन हि उसाची उत्पादकता वाढवण्यासाठीची पंच सूत्री तंत्रज्ञान आहे.ह्या लेखात आपण ह्याच पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करून Adsali Sugarcane उसाची लागवड हि शाश्वत पद्धतीने कशी करावी हे बघणार अहोत, पुढील सर्व माहिती हि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडून सांगितली जात असून संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या ऊस पिक उत्पादनात निश्चित वाढ होण्यासाठी घेऊन येत आहोत.

वाचा:कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन

शेतकरी बंधूनी हि ऊस लागवड तंत्रज्ञानाची अभ्यासात्मक पद्धत वापरण्याचे आव्हान ऊस संशोधन केंद्र करीत आहे.कृषी संशोधक शाश्वती देतात कि, हि अभ्यासात्मक पद्धती ऊस लागवड तंत्रज्ञानात वापरल्यास एकरी ९० ते १०० टन ऊस उत्पादन मिळू शकते माहिती पूर्ण वाचा व अशाच दर्जेदार महिती साठी आमच्या WhatsApp group ला join करा,चला सुरवात करूया !

वाचा :खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

Adsali Sugarcane

हेही वाचा:भाजीपाला पिक नियोजन

जमिंची निवड कशी करावी:

सुधारित चारा पिके लागवड पद्धती:

  • पाण्याचा नीच्र उत्तम असणारी मध्यम ते भारी जमिनीची निवड ऊस लागवडी साठी करावी.उत्पादनाची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी जमिनीचा सामू हा ६.०० ते ८.०० पर्यंत असणे आवशयक असते.
  • Adsali Sugarcane जमिनीतील सेंद्रिय कार्ब चे कमीतकमी प्रमाण हे ०.५ पेक्षा अधिक नसावा.
  • ऊस इतर पारंपारिक पिका पेक्षा जास्त काळ शेतात्त उभा राहणार आहे त्यामुळे ऊस ह्या पिकाची कार्यक्षम मुळे २ फुटाच्या जवळपास खोल पसरत जातात.म्हणूनच जमिनीची खोल नांगरट करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • भारी जमिनीमधील १.५ – २ फुट खोलीवर कठीण थर असतो तो फोडण्यास अवघड असल्यामुळे त्याला उत्पादित ठेवण्यासाठी ३ वर्षातून एकदा सब सॉईलरणे (मोल नागर) नागरणी करून नगराची तास हि मुख्य चरापर्यंत काढावीत.

जमिनीची मशागत अशी करा:

  • उसाची लागवड करण्याआधी हिरवळीच्या खतची पिके घ्यावीत.त्यामध्ये धैच किंवा ताग हि खताची पिके घेऊ शकता. नत्राची मात्रा हि ९० किलो च्या जवळपास ठेवावी त्यासाठी २०-२५ टन बायोमास गाळावे.
  • हिरवळीच्या खताचे नियोजन करावयाचे नसल्यास ३० टन कुजलेल्या शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळवावे.सुश्म अन्नद्रव्याचे जमिनीतील प्रमाण मोजून घ्यावे.
  • लोह,जस्त,म्याग्नीज,बोरॉन या सारख्या सुश्म आन्द्रव्याची कमतरता आढळून आल्यास पुढील उपाय करावा: फेरस सल्फेट २५ किलो,झिंक सल्फेट २० किलो,म्याग्नीज सल्फेट १० किलो व बोरॉन ५ किलो व्यवस्थित कुजलेल्या शेणखतात (१०:१ या प्रमाणे ) ५ ते ६ दिवस मुरून ठेवावे व नंतर लागवडीच्या आधी सरी मधून हे मिश्रण द्यावे.
  • लागवड करत असताना निंबोळी पेड २ टन प्रती हेक्टर मिसळणे असे केल्यास हुमणी चा प्रादुर्भाव कमी होतो.

उसाच्या वाणांची निवड:

Adsali Sugarcane Variety

शेतकरी बंधुनो,महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने उसाच्या वानांमध्ये उत्कृष्ट प्रकारच्या वाणांची निर्मिती केली आहे.आज पर्यंतच्या शेती शेत्रातील इतिहासात उसाच्या लागवडी मध्ये ९० % शेत्रावर फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ व ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ह्यांनी विकसित केलेल्या वाणांची लागवड झाली आहे.ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन पातळी हि शेतकरी वर्गाने गाठली आहे.

Adsali Sugarcane ऊस लावण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी ने विकसित केलेली उत्कृष्ट ऊस वाणांची यादी खाली दिली आहे.त्यातून तुम्हाला सविस्तर वाणे वाचता येईल

बेण्याची प्रक्रिया अशी करा:

सुरवाती पासूनच व्यवस्थापन करावे कारण आडसाली ऊस हा लागवडी पासून पुढील १८ महिने शेतात उभा राहतो त्यामुळे व्यवस्थापन सुरवाती पासुन करा.

आडसाली उसाची लागवड करत असताना काणी रोगाचा, उसाच्या कांडी वरील खवले कीड आणि पिठ्या ठेकून हा सारखी रोग येत असतात ह्या साठी पुढील उपाय करावा (प्रती हेक्टरी): कार्बेडायझिम १०० ग्राम + डायमेथोएट ३०० मिली + पाणी १०० लिटर ह्याचे एकजीव मिश्रण करून बेणे १० – १२ मिनिटे मिश्रणात बुडवून ठेवावे.

महत्वाचे: वरील प्रक्रिया झाल्या नंतर ऑसिटोबॅक्टार १० किलो + जीवाणू खात स्फुरद १.२५ किलो(विरघळणारे) + पाणी १०० लिटर ह्या द्रावणामध्ये टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करायची असते.ह्या जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५० % नत्र व २५ % स्फुरद इत्यादी प्रमाणात खताची बचत होते.

ऊस लागवड कधी करावी:

Adsali Sugarcane

Sugarcane Planting Time

  • Adsali Sugarcane १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीतच आडसाली उसाची लागवड करावी. सरी पाडत असताना जमिनीच्या प्रकारानुसार सऱ्या पाडाव्या त्यामध्ये १५० सेमी पर्यंत रिजरच्या सहायाने भारी जमिनीत व १३० सेमी पर्यंत मध्यम भारी जमिनीत सऱ्या पाडाव्या
  • २० ते ४० मीटर पर्यंत उतारानुसार सरीची लांबी ठेवावी.
  • टिपरी जर दोन डोळ्यांची वापरात असाल तर अर्धाफुट अंतर टिपरी मध्ये ठेवावे.(डोळा वरच्या बाजूस) आणि जर एक डोळ्याची पद्धत वापरात असल्यास अंतर हे १ फुट ठेऊन लागवड करावी.
  • ह्या मध्ये जोडओळ पद्धत वापरली जाते ह्या पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास २.५ फुट मध्यम जमिनीसाठी तर ३ फुट भारी जमिनीसाठी सलग सऱ्या पाडाव्या.

आडसाली उसामध्ये घ्यावयाची आंतरपिके:

Adsali Sugarcane खरीप हंगामातील आडसाली उसामध्ये पुढील आंतरपिके घेऊ शकता त्यामुळे सोयाबीन,भुईमुग,चवळी,आणि भाजीपाला देखील घेऊ शकता.हिरवळीच्या पिकामध्ये ताग आणि धैच हि आंतरपीक घेता येईल.जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीची पिके बाळबांधणीच्या वेळी सरी मध्ये गाळून बाळ बांधणी करता येईल.

आडसाली उसाला खताची मात्रा व वेळ:

Adsali Sugarcane

किलो प्रती हेक्टार

खात मात्रा देण्याचा कालावधी युरियासि.सु.फॉ.म्यु.ऑ.पो.नत्रस्फुरदपलाश
१)लागवडीच्या वेळी ८८५३२१४३४०८५८५
२)लागवडी नंतर ६ ते ८ आठवड्यांनी३४८————१६०————
३)लागवडी नंतर १२ ते १६ आठवड्यांनी८८————४०————
४) बांधणीची वेळ (मोठी)३४८५३२१४३१६०८५८५
एकूण८७२१०६४२८६४००१७०१७०

ठिबक सिंचन व पाण्याचे नियोजन:

Sugarcane Irrigation Management

Adsali Sugarcane ३५० लाख लिटर हेक्टरी पाण्याची आवश्यकता उसाला असते.पाण्याच्या पाळ्याचा विचार केल्यास ४० पाळ्या लागतात.त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत हि ५० % पर्यंत होत २५ % पर्यंत खतामध्ये बचत होते आणि २० % उत्पादनात वाढ देखील होते. ठिबक सिंचनाचा वापर करत असताना जमिनीची भोव्तीक तपासणी करणे फायद्याचे ठरते.सरीच्या दोन्ही बाजूस ठिबक सिंचनाचा ओलावा पोहचत असल्याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.

ऊस वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन :

ऊस वाढीच्या अवस्थापूर्वहंगामी(महिने)आडसाली(महिने)एका पाळीला पाणी(हे.से.मी.)
१) उगवण अवस्था१.५ ते २१.५ ते २
२) फुटवाची अवस्था२ ते ४२ ते ४८ ते १०
३) पूर्ण वाढची अवस्था४ ते ६४ ते ६८ ते १०
४) जोमदार वाढीची अवस्था६ ते १२६ ते १४१० ते १२
५) पक्वता१२ ते १४१४ ते १६७ ते ८

उसाला लागणारी पाण्याची आवश्यकता व ठिबक सिंचन चालविण्याची वेळ:

Adsali Sugarcane

महिनेउसाला पाण्याची गरज
(लिटर/दिवस)
दररोज ४ लिटर चा ड्रीपर चालवण्याची वेळ
१) जानेवारी२.२५० तास ३४ मिनिटे
२) फेब्रुवारी३.२८० तास ५० मिनिटे
३) मार्च६.०७१ तास ३२ मिनिटे
४) एप्रिल७.२२१ तास ४९ मिनिटे
५) मे९.३३२ तास २२ मिनिटे
६) जून५.६९१ तास ३० मिनिटे
७) जुलै४.३४१ तास ५ मिनिटे
८) ऑगस्ट३.९९१ तास ० मिनिटे
९) सप्टेंबर३.६३१ तास ९ मिनिटे
१०) ऑक्टोबर४.१३१ तास २ मिनिटे
११) नोव्हेंबर३.२०० तास ४९ मिनिटे
१२) डिसेंबर२.१७० तास ३४ मिनिटे

तन नियंत्रण व बांधणी:

Adsali Sugarcane

Adsali Sugarcane ऊस लागवडीनंतर तनाचा त्रास सुरवातीला चार महिन्यापर्यंत असतो.ह्याचा परिणाम उसाच्या वाढीवर होत असतो.प्रामुख्याने फुटावे येताना व कांडी लागत असताना तनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो.त्यासाठी पुढील उपाय करावा:

ग्लायफोसेट ह्या तननाशकाचा वापर करावा (उसावर तननाशक पडू देऊ नये त्यासाठी(राउडअप) प्लास्टिक हूड नोझल वर बसवावे) त्याचबरोबर WFN 62 ह्या तणनाशक नोझल चा वापर करू शकता.

तन नियंत्रण परिणामकारक होण्यासाठी ऊस लागवड झाल्यानंतर ४ – ५ दिवसांनी हात पंपाने फवारणी करणे फायद्याचे ठरते. शक्यतो HTP पंप तन नियंत्रणासाठी वापरू नये.

बाळ बांधणी व मोठी बांधणी हि उसाचे पिक २-४ महिन्याचे झाल्यावर करावी. ऊस पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी त्यासाठी मोठी बांधणी केल्यानंतर उसाचे कट दाबून टाकावे.

उसा वरील प्रमुख रोग:

Adsali Sugarcane आपल्या फक्त महाराष्ट्राचा विचार केल्यास एकूण ३० रोगांच्या जवळपास रोग आढळतात. त्यामध्ये बेणे हवा आणि जमिनिद्वारे होणाऱ्या रोगांचा समावेश होतो

  • बेण्याद्वारे येणाऱ्या रोगामध्ये गवताची वाढ, चाबूक काणी,खोडकुज आणि लालकुज
  • हवेद्वारे > पोक्का बोईग, ताबेरा, आणि पानावर येणारे तपकिरी ठिबके
  • जमिनिद्वारे > अननस रोग , मर ,लालकुज
  • किडीद्वारे > मोज्यक व गवताची वाढ

इत्यादी प्रकारच्या रोगांच आडसाली उसावर प्रादुर्भाव होत असतो.

उसावर येणारे रोग व उपाययोजना:

रोगरासायनिक व्यवस्थापनफवारणीचे प्रमाण
(पाणी प्रती १० लिटर)
१) मर,मूळकुज,लालकुजट्रायकोडर्मा आणि प्यासिलोमायसीसबीजप्रक्रिया ५० ग्राम आणि २०ते२५ कि.ग्र.प्रती हेक्टार जमिनीत
२) चाबूक काणी,लालकुज,गवताची वाढबेणे उष्ण बाष्प प्रक्रिया ५४ डिग्री सें. अडीच तास—–
३) पोक्का बोईगकार्बेन्डीझम ०.१ % किवा
म्याक्नोझेब ०.३० %
१० ग्राम
३० ग्राम
४) चाबूक काणीकार्बेन्डीझम ०.१ %बीजप्रक्रिया १० ग्राम
५) तांबेरा व पानावरील ठिपकेऑझोऑक्सिस्ट्रोबिन १८.२५ % +डायफेनकोन्याझोल ११.४ % S.C. ०.१ %३० ग्राम
१० मिली
१० मिली

उसा वरील महत्वाच्या किडी:

Adsali Sugarcane महाराष्ट्रात उसावरील खोड कीड, कांडी कीड, शेडे कीड,हुमणी,पाकोळी,पाढरा लोकरी मावा,पिठ्या ढेकुण,वाळवी आणि पंढरी माशी इत्यादी प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो किडीचे व्यवस्थापन तक्त्यानुसार देलेल्या माहितीच्या मदतीने करा:

कीडऔषधीपाणी १० लिटर व हेक्टरी
१) मूळ पोखरणारी अळीफिप्रोनील ०.३ %(दाणेदार)
२) खोड कीडक्लोरण्त्रेनीलीप्रोल १८.५ % SCपिकावर फवारणी ४ मिली
३) शेंडे कीडफिप्रोनील ०.३ %(दाणेदार)चळीतून २५ किलो सारीमधून द्यावे.
४) खवले कीडमोनोक्रोटोफॉंस ३६ % SLपिकावर फवारणी २० मिली
५) पिठ्या ढेकुणमोनोक्रोटोफॉंस ३६ % SLपिकावर फवारणी २० मिली
६) हुमणीफिप्रोनील ४० % + इमिडाक्लोप्रीड ४० % WGपाण्यात मिसळून (१०लि) फवारणी हेक्टरी ४ ग्राम(पंपाची तोडी कडून सरीतून देणे)
७) वाळवीक्लोथीआनिडीन ५० % WDGपाण्यात मिसळून(१०लि) फवारणी हेक्टरी २.५ ग्राम(पंपाची तोडी कडून सरीतून देणे)
८) लष्करी अळीस्पीनेटोरम ११.७ % SCपिकावर फवारणी ५ मिली
९) उंदीरझिक फ्यॉसफाईड २ %झिक फ्यॉसफाईड, भरडधान्य व थोडे गोडतेल बिळात टाकून बीळ बुजवणे.

ऊस उत्पादन:

Adsali Sugarcane सांगितलेली संपूर्ण माहिती तंतोतंत पालन केल्यास व वाणाची निवड हि कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची असेल त्यामध्ये फुले २६५ ,फुले ऊस १५०१२ ,को ८६०३२ तर हमखास ९० ते १०० टन ऊस उत्पादन घेता येते.

Visit MPKV website