Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025

Pradhan Mantri Krishi sinchai yojana Maharashtra :

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025:शेतकरी बंधुनो, जगात कृषी प्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. शेती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु हवामानातील सततच्या बदलांमुळे अनियमित पाऊस , पावसातील खंड,पाण्याची टंचाई व सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे आपला शेतकरी कित्येकदा अडचणीत सापडतो. शेतकऱ्याच्या ह्याच समस्येवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्याची आर्थिक स्थिरता व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होण्यासाठी केंद्र सरकारने १ जुलै २०१५ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना देशभरात सुरु केली हि Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 मध्ये सुद्धा यशस्वीरीत्या चालविली जात असून ह्या योजनेचा उद्देश “प्रत्येक शेताला पाणी” व “प्रती थेंब अधिक पिक” या तत्वावर शेती मधील सिंचनाच्या कार्यक्षम वापरला प्रोत्साहन देण्यास मदत करते.

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025

“प्रती थेंब अधिक पिक” हि संकल्पनाच ह्या योजनेचा मुख्य आधारस्तंभ आहे. म्हणजेच प्रत्येक पाण्याचा थेंब जपून वापरण्यात यावा.व त्यातून अधिकाधिक उत्पादन घेता आले पाहिजे. म्हणूनच योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुश्म सिंचन पद्धतीचा वापर शेतामध्ये करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 योजनेमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा समावेश करण्यात आला आहे.सुश्म सिंचन पद्धतीचा वापरामुळे केवळ पाण्याची बचत होत नसून खतांचा वापर हा अधिक कार्यक्षम पद्धतीने पिकांसाठी होतो. सुश्म सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यास खते पिकांच्या थेट मुळा पर्यंत पोहचवली जातात.याद्वारे पिकांची वाढ चांगली होते व उत्पादन वाढी साठी मदत मिळते.

ह्या लेखात आपण Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 योजेने संबंधित नियम ,अटी ,अनुदानाचा तपशील, अर्ज प्रक्रिया,महत्वाच्या बाबी, इत्यादी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. माहिती पूर्ण वाचा व योजनेचा आवश्य लाभ घ्या. चला सुरवात करूया !

हेही वाचा : मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आता घरबसल्या करा अर्ज !


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना द्वारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ % पर्यंत अनुदान दिले जाते व इतर शेतकरी बांधवाना ४५ % अनुदान दिले जाते.योजनेद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्याना ५ हेक्टर शेत्राच्या मर्यादेत लाभ दिला जातो. शेतकरी बंधुनो, लक्षात घ्या- सन २०१४ – १५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाद्वारे लाभ घेतला आहे त्याच शेत्रावर पुन्हा लाभ घेण्यासाठी १० वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागेल व सन २०१५ – १६ पासुन ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता किंवा घेतील अशा शेतकऱ्याना त्याच शेत्रावर लाभ घेण्यासाठी ७ वर्षाचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक राहील. म्हणजेच अनुक्रमे १० व ७ वर्षाचा कालावधी पर्यंत अनुदान अनुज्ञेय असणार नाही.


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचनासाठी प्रती हेक्टर खर्च मर्यादा तपशील :

  • १.२ x ०.६ मी साठी >>रु. ११२२३७/-
  • १.५ x १.५ मी साठी >>रु. ८५६०३/-
  • ५ x ५ मी साठी >>रु. ३४६६४/-
  • ६ x ६ मी साठी >>रु. ३०५३४/-
  • १० x १० मी साठी >>रु. २३०४७/-

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत तुषार सिंचनासाठी प्रती हेक्टर खर्च मर्यादा तपशील :

  • ७५ मिमि पाईप साठी >>रु. २१९०१/- प्रती हेक्टर.
  • ६३ मिमी पाईप साठी >>रु. १९५४२/- प्रती हेक्टर.

हि खर्चाची मर्यादा आहे. या नुसार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत केली जाते.


हे पण वाचा :फळपिक विमा योजना २०२५-२६ वर्षाकरिता-फायदे ,संरक्षित रक्कम आणि महत्वाच्या अंतिम तारखा

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana Eligibility :

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 पात्रता निकष :

१) अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड

  • आधार कार्ड उपलब्ध नसल्यास- आधार नोंदणीची पावती/ मतदार ओळखपत्र / रेशनकार्ड / पासपोर्ट / प्यानकार्ड / किसान फोटोकार्ड / मनरेगा कार्ड /बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक यापैकी कोणताही पुरावा सदर करून योजनेचा लाभ घेऊ शकता

२) अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर ८-अ उतारा व ७/१२ उतारा असणे बंधनकारक राहील.

३) सिंचन सुविधा असावी.

  • ७/१२ उताऱ्यावर सिंचनाची सोय असल्याची नोंद असणे गरजेचे आहे.(उदा: विहीर, बोरवेल,कालवा ) नोंद असल्यास पुरावा ग्राह धरला जातो
  • ७/१२ उताऱ्यावर सिंचनाची नोंद नसेल,पण विहीर, शेततळे, कालवा यासारखी सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास तुमच्या कडे सिंचनाची सोय असल्याचे स्वंयघोषणापत्र सदर करावे लागेल.
  • या व्यतिरिक्त नदी वरील उपसा सिंचन, सरकारी कालव्याचे पाणी, सामुदायिक सिंचन व्यवस्था इत्यादी द्वारे सिंचनाची सोय असल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील.

४) विद्युत बिलाची प्रत

  • जर तुम्ही सिंचनासाठी विद्युत पंपाचा वापर करत असल्यास तुमच्याकडे कायम स्वरूपी विद्युत जोडणी असणे बंधनकारक राहील.ह्याच्या पुराव्यासाठीच अलीकडील विद्युत बिलाची प्रत जोडणे गरजेचे आहे.

५) सोलर पंपाची सुविधा असल्यास

  • हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे.त्यामध्ये खरेदीची मूळ पावती/बिल (पंपाची किमत, GST , नमूद असणे गरजेचे आहे)
  • पंपाचे हमी पत्र, पंपाचा तांत्रिक तपशील,
  • कंपनीचे प्रमाणपत्र.
  • पंप बसवल्याचा फोटो

Latest News: नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती


Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana Documents :

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे प्रस्तावा सोबत जोडणे गरजेचे आहे.

  • ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत:- महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुढे सांगितली आहे.
  • पूर्वसंमती पत्र
  • ७/१२ उतारा ( मालकी हक्क दर्शविणारा )
  • ८-अ उतारा (एकूण शेत्राच्या माहिती साठी )
  • आधार कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे खाते ( बँक खाते आधारलिंक असणे बंधनकारक )
  • सुश्म सिंचन आराखडा प्रमाणपत्र ( कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला )
  • सुश्म सिंचन संचाच्या बिलाची मूळ प्रत
  • शेतकऱ्याचे हमीपत्र

रेशीम शेती योजना देईल शाश्वत नफा ! संधी सोडू नका

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana Registration Process :

pradhan mantri krishi sinchai yojana ऑनलाईन अर्जप्रक्रिया

पायरी १) महाडीबीटी शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.

पायरी २) येथे तुम्हाला नोंदणी प्रक्रिया करायची आहे.

  • वेबसाईट च्या मुखपृष्ठावरील “शेतकरी योजना हे” बटन दाबा.
  • पायरी २.१ – शेतकरी बंधुंनो,तम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हला आधी नोंदणी करावी लागेल.
  • त्यासाठी “नवीन अर्जदार नोंदणी” हे बटन दाबा.ह्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबईल क्रमांक प्रविष्ठ करावा लागेल.एकदा का नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली कि तुम्ही अर्ज करण्यासाठी तयार आहात.
  • आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.

पायरी ३) आता तुमचा “युझर आयडी” आणि “पासवर्ड” टाकून लॉगीन करून घ्या.

पायरी ४) अर्ज भरणे

  • “शेतकरी” या भागात संबंधित वर्ष निवडा.
  • आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व अर्ज भरा
  • अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती (७/१२ व ८-अ उताऱ्या नुसार), सिंचन सुविधेची माहिती. प्रविष्ठ करा.
  • सिंचनाचा घटक निवडा (ठिबक सिंचन / तुषार सिंचन )

पायरी ५) कागदपत्रे अपलोड करा

  • कागदपत्रांची यादी तुम्हाला दिली आहे. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.स्कॅन प्रत नमूद केलेल्या आकारमानानुसार असणे गरजेचे आहे.

पायरी ६) अर्ज सबमिट करा

  • संपूर्ण माहिती अचूक भरल्या नंतर आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर,एकदा पूर्वावलोकन करणे गरजेचे आहे.त्या नंतरच अर्ज सादर करा ह्या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज शुल्क भरा.(साधारण २३.६० रुपये)

पायरी ७) पुढील प्रक्रिया

  • अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच ,तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.योजनेसाठी पात्र ठरल्यावारच तुम्हाला पूर्व संमती दिली जाईल. त्यानंतर तुम्ही सिंचन संच खरेदी करून बसवू शकता.
  • सिंचनाची उभारणी झाल्यानंतर सिंचन संचाच्या बिलाची मूळ प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून अनुदानाची मागणी करता येईल.

शेतकरी बंधुनो, पूर्व सूचना दिल्याशिवाय सिंचन संचाची उभारणी केल्यास अनुदानासाठी पात्र ठरणार नाही.त्याचबरोबर अशा आशयाचे स्वयं घोषणा पत्र अर्ज करताना जोडणे गरजेचे राहील.

अंतिमतः अर्ज शासनाच्या निर्देशानुसार करणे बंधनकारक राहील.अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.

अर्ज केल्यापासून ते बँक खात्यात अनुदान जमा होईपर्यंतची संपूर्ण माहिती हि लाभार्थी व्यक्तीच्या मोबईल वर SMS द्वारे कळविण्यात येते.

त्याचबरोबर अर्जाची स्थिती तुम्ही महाडीबीटी वेबसाईट वर तपासू शकता त्यासाठी

पायरी १) वेबसाईट च्या अधिकृत पोर्टल वर “शेतकरी” ह्या घटकाची निवड करून “अर्जाची स्थिती” हे बटन दाबा.

  • येथे तुम्हाला अर्ज नोंदणी क्रमांक / लाभार्थी क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहता येईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत संचाची खरेदी :

नोंदणीकृत उत्पादन कंपनीची निवड: शेतकरी बंधुनो, सिंचन संचाची खरेदी तुम्ही ज्या उत्पादक कंपनी कडून करणार आहेंत ती कंपनी कृषी विभागातील नोंदणीकृत कंपनी असावी.नोंदणीकृत वितरण/उत्पादक कंपनीची यादी तुम्हाला ई-ठिबक अज्ञावलीच्या मुखपृष्ठावर बघावयास मिळेल.येथे तुम्हाला कंपनीनिहाय घटकांचे दर सुद्धा बघावयास मिळेल.


Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana 2025 | FAQ

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना | सतत विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर- सुश्म सिंचन प्रणालीद्वारे शेतात पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे. ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे ‘प्रती थेंब अधिक पिक” हे उदिष्ट साध्य करणे.

प्रश्न २) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे प्रमुख घटक कोणते ?

उत्तर – जल स्त्रोताचा विकास करणे : मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी अनुदानाद्वारे आर्थिक सहाय्य पुरवणे.

  • प्रत्येक शेतात पाणी : नवीन जलस्त्रोताची निर्मिती करणे, जुन्या स्त्रोताना पुनरुज्जीवन करणे. जल वितरण प्रणाली सुधारून सिंचनाखालील शेत्र वाढवणे.
  • पाणलोट शेत्राचा विकास : पावसाच्या पाण्याच्या संवर्धन जास्तीत जास्त करून भूजल पातळी वाढवणे व जमिनीची धूप थांबवणे.
  • प्रती थेंब अधिक पिक : जास्तीत जास्त पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सुश्म सिंचनाला प्रोत्साहन देणे.

प्रश्न ३) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी का महत्वाची ?

उत्तर – ह्या योजनेतून सिंचानासाठी पाण्याची खात्रीशीर उपलब्धता होते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. सुश्म सिंचना द्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो. ह्यातून पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत मिळते.उत्पादन वाढले कि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते व ह्यातून आर्थिक स्थिरता राखण्यास मदत मिळते.ह्या योजनेद्वारे सुश्म सिंचन प्रणाली बसवण्याकरिता आर्थिक अनुदान शेतकऱ्याला दिले जाते. ज्यामुळे सिंचन प्रणालीचा आर्थिक भार कमी होतो.

प्रश्न ४) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये अनुदानाचे प्रमाण किती आहे ?

उत्तर – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना द्वारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ % पर्यंत अनुदान दिले जाते व इतर शेतकरी बांधवाना ४५ % अनुदान दिले जाते. केंद्र सरकारचा ६० % आणि राज्य सरकारचा ४० % वाटा असतो.(ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी हा वाटा ९०:१० या प्रमाणात आहे.)

प्रश्न ५) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच लाभ घेण्यासाठी कोठे संपर्क करावा ?

उत्तर- आपल्या गावातील ग्रामपंचायत ब्लॉक किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क करावा.


कृषी विद्यापीठाचे शेती नियोजन संबंधित लेख :

उत्कृष्ट सोयबीनच्या उत्पादनासाठी हे नक्की करा

असे करा कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन

१०० % कापसाची किड नियंत्रण पद्धती

आपत्कालीन परिस्थितीत असे करा नियोजन

पिक उत्पादनात ५०% वाढ करा