Fal Pik Vima Yojana 2025 | फळपिक विमा योजना:फायदे अर्ज प्रक्रिया संरक्षित रक्कम आणि महत्वाच्या अंतिम तारखा

Fal Pik Vima Yojana Maharashtra :

Fal Pik Vima Yojana 2025:फळपिकांचे महत्व हे कृषी शेत्राच्या उत्पादनवाढीच्या दरामध्ये अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही. हवामानाच्या साततच्या बदलांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम घडत असून उत्पादनात घट होताना बघावयास मिळत आहे. केंद्र व राज्य सरकार ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून शेतकरी बांधवाना फळ पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी विविध उपाययोजना आखत असते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित Fal Pik Vima Yojana 2025 – 26 ह्या वर्षाकरिता राज्यशासना मार्फत आखण्यात आली असून ह्या योजने संबंधित संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत.

फळपिक विमा योजना हि २०२४-२५ मध्ये एकूण ५६ जिल्यासाठी लागू करण्यात आली असून त्यामध्ये मृग बहारसाठी २६ जिल्हे व आंबिया बहारासाठी ३० जिल्ह्यांचा समावेश करण्यांत आला आहे.

Fal Pik Vima Yojana 2025

शेतकरी बंधुनो, योनेंतर्गत विमा संरक्षण हे केवळ उत्पादनक्षम वयाच्या फळबागेवरच दिले जाते.फळ पिकांचे वय हे फळपिकानुसार वेगवेगळी असतात. Fal Pik Vima Yojana 2025 मध्ये फळपिकच्या उत्पादनक्षम वयाचा तपशील पुढील प्रमाणे डाळिंब व द्राक्षे साठी २ वर्ष , मोसंबी-पेरू व सिथाफळ साठी ३ वर्ष , लिंबूसाठी ४ वर्ष, आंबा -चिकू व काजू साठी ५ वर्ष.

नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत Fal Pik Vima Yojana 2025 चा समावेश होत असून फळ पिकांचे नैसर्गिक आपत्ती पासून झालेल्या नुकसानीस संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक योजना राबविली जात आहे.फळपिकांचे नुकसान त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, रोग व किंडीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्याना विमा संरक्षण व आर्थिक मदत पुरविली जाते.ह्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेऊन शेती मध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.


५ लाखापर्यंत कर्ज ! किसान क्रेडीट कार्ड ठरणार वरदान लगेच अप्लाय करा!

फळपिक विमा योजनेमध्ये समाविष्ट फळपिके :

मृग बहार मध्ये पुढील ८ फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये मोसंबी,संत्रा,डाळिंब,चिकू,सीताफळ,द्राक्ष,पेरू,लिंबू

आंबिया बहारा मध्ये पुढील ९ फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये मोसंबी,संत्रा,डाळिंब,काजू,आंबा,केळी द्राक्षे,स्ट्रोबेरी,पपई


फळपिक विमा योजना कशाप्रकारे कार्य करते :

Fal Pik Vima Yojana 2025

ह्या योजनेच्या पारदर्शक अमलबजावणीसाठी महसूल मंडळाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध भागातील प्रत्येक महसूल मंडळामध्ये महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.प्रत्येक महसूल मंडळ स्वतंत्रपणे हवामानाची आकडेवारी त्या विभागानुसार गोळा करतो त्यामुळे स्थानिक पातळीवर होणाऱ्या बदलांचा अंदाज घेता येतो व त्यानुसार विमा संरक्षण शेतकऱ्यांना दिले जाते.

स्वयंचलित हवामान केंद्रे हवामानातील घटकांची माहिती नोदावतात त्यामध्ये पर्जन्यमान (पाऊस) पावसाचे प्रमाण मोजणे, तापमान(कमाल व किमान), वाऱ्याचा वेग , आद्रता ह्या घटकांनुसार निष्कर्ष काढला जातो.

स्वयंचलित हवामान केंद्रावरील हवामानाची पूर्वनिर्धारित आकडेवारी हि मर्यादेपेक्षा कमी-जास्त प्रमाणात असल्यास विमाधारक शेतकऱ्यांना थेट नुकसानभरपाई दिली जाते.त्यामुळे शेतकरी बांधवाना व्ययक्तिकरित्या नुकसानीचा पंचनामा करण्याची सहसा गरज राहत नाही.हे ह्या योजनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.फळपिक विमा कंपन्या ह्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या डेटाच्या आधारे नुकसानभरपाई सुनिश्चित करते.

ह्या यंत्रणेमुळे Fal Pik Vima Yojana 2025 योजनेची अमलबजावणी पारदर्शक व वेगवान होते. हवामानाचा डेटा वस्तुनिष्ठ असल्यामुळे तो थेट नुकसानभरपाईशी जोडला जातो. म्हणूनच नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी बांधूना त्वरित आर्थिक सहाय्य पुरविले जाते.


फळपिक विमा योजनेचा हंगामानुसार संपूर्ण तपशील:

* मृग बहार फळपिक विमा योजनेंतर्गत हवामान धोके, विमा संरक्षित कालावधी/रक्कम २०२५- २६ वर्षाकरिता

Fal Pik Vima Yojana 2025-26

फळपिकेहवामान धोके(विमा संरक्षण कालावधी)विमा संरक्षण रक्कम
१) संत्राकमी पाऊस(१५ जून ते १५ जुलै) ,
पावसाचा खंड(१६ जुलै ते १५ ऑगस्ट)
१०००००/-
२) मोसंबीकमी पाऊस(१ जुलै ते ३१ जुलै)
पावसाचा खंड(१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट)
१००००/-
३) पेरूकमी पाऊस(१५ जून ते १४ जुलै)
पावसाचा खंड व अधिक तापमान(१५जुलै ते १५ ऑगस्ट)
७००००/-
४) चिकूअति आद्रता व जास्त पाऊस(१जुलै ते ३० सप्टेंबर)७००००/-
५) डाळिंबपावसाचा खंड(१५ जुलै ते १५ ऑक्टोबर)
जास्त पाऊस(१६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर)
१६००००/-
६) लिंबूकमी पाऊस(१५ जुन ते १५ जुलै)
पावसाचा खंड(१६ जुलै ते १५ ऑगस्ट)
८००००/-
७) द्राक्षपाऊस,आद्रता व किमान तापमान(१५ जून ते १५ नोव्हेंबर)३८००००/-
८) सीताफळपावसाचा खंड(१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर)
जास्त पाऊस(१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर)
७००००/-

* आंबिया बहार फळपिक विमा योजनेंतर्गत हवामान धोके, विमा संरक्षित कालावधी/रक्कम २०२५- २६ वर्षाकरिता

Fal Pik Vima Yojana 2025-26

फळपिकेहवामान धोके(विमा संरक्षण कालावधी)विमा संरक्षण रक्कम
१) संत्रा अवेळी पाऊस(१ डिसे ते १५ जाने)
कमी तापमान(१६ जाने ते २८ फेब्रु)
जास्त तापमान(१ मार्च ते ३१ मे)
गारपीट(१ जाने ते ३० एप्रिल=३३०००/-)
१०००००/-
२) मोसंबी अवेळी पाऊस(१ नोव्हें ते ३१ डिसें)
जास्त तापमान(१ मार्च ते ३१ मार्च)
जास्त पाऊस( १५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर)
१०००००/-
३) पेरू अवेळी पाऊस(१५ जाने ते ३१ मे)
जास्त तापमान(१ एप्रिल ते ३१ मे)
जास्त पाऊस(१ जून ते ३१ जुलै)
१६००००/-
४) काजू अवेळी पाऊस(१ डिसें ते २८ फेब्रु)
कमी तापमान(१ डिसें ते २८ फेब्रु)
१२००००/-
५) केळी कमी तापमान(१ नोव्हें ते २८ फेब्रु)
वेगाचा वारा(१ मार्च ते ३१ जुलै)
जास्त तापमान(१ एप्रिल ते ३१ मे)
१७००००/-
६) द्राक्ष अवेळी पाऊस(१६ ऑक्टो ते ३० एप्रिल)
कमी तापमान(१ डिसें ते २८ फेब्रु)
३८००००/-

गारपीट सारख्या हवामान धोक्यासाठी पिकांनुसार वेगवेगळा कालावधी व रक्कम निश्चित करण्यात आली आहे.


फळपिक विमा योजनेची वैशिष्टे :

  • Fal Pik Vima Yojana 2025 फळपिकाचे उत्पादन घेत असताना मृग बहार व आंबिया बहार ह्या दोन्ही हंगामासाठी २०२५ -२६ या वर्षाकरिता राज्यातील शेतकरी बांधव सहभागी होऊ शकतात.कर्जदार त्याच बरोबर बिगर कर्जदार शेतकरी देखील ह्या योजनेत एच्छिकरित्या सहभागी होऊ शकतात.
  • जास्तीत जास्त ४ हेक्टर शेत्रासाठी (१० एकर ) प्रत्येक शेतकऱ्याला सर्वच फळपिकांसाठी दोन्ही मृग व आंबिया हंगामासाठी फळपिक विमा काढता येतो.
  • फळपिक विमा योजना लागू होण्यासाठी कोकण विभागासाठी १० गुंठे किमान शेत्र व उर्वरित महाराष्ट्रातील विभागासाठी २० गुंठे शेत्र ठरवण्यात आले आहे.
  • फळ पिक योजनेचा लाभ घेण्यासाठी जिओ- ट्यांगिंग फोटो अपलोड करणे बंधनकारक राहील.(त्यासाठी NoteCam हे मोबाईल App वापरू शकता)
  • Fal Pik Vima Yojana 2025 मध्ये प्रत्येक पिकासाठी व हवामानामुळे होणाऱ्या धोक्यासाठी विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे.

फळपिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड

२) बँकेचा तपशील(नाव,खाते क्रमांक,IFSC कोड स्पष्ट दिसले पाहिजे)

३) ७/१२ उतारा (जमीन मालकीची नोंद असलेला )

४) फळबागेचा जिओ ट्यांगिंग फोटो

५) स्वयंघोषणापत्र (पीकपेरा)- पिकाच्या पेरणीची माहिती

६) संमतीपत्र ( सामाईक खातेदार असल्यास खातेदारांचे समतीपत्र )

७) शेतकरी ओळखपत्र क्रमांक `


फळपिक विमा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया :

Fal Pik Vima Yojana Registration Process

Fal Pik Vima Yojana 2025

ऑनलाईन अर्जप्रक्रिया

पायरी १– प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टल भेट द्या किंवा येथे क्लिक करा.

पायरी २– वेबसाईटच्या मुखपृष्ठावर “Farmer Corner” किंवा “Farmer Login” हे बटन दाबा

  • Fal Pik Vima Yojana 2025 साठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.त्यासाठी “New User Registration Here” हे बटन दाबा.
  • येथे तुमचे नाव ,मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी माहिती अचूक भरा.

पायरी ३- मोबाईल नंबर व कॅप्टचा प्रविष्ट करा व लॉगीन करून घ्या.

पायरी ४– येथे तुम्हाला विमा योजने संबंधित आवश्याक माहिती निवडायची आहे.

  • योजना- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना निवडा.
  • राज्य- “महाराष्ट्र” निवडा
  • वर्ष – ज्या वर्षासाठी विमा काढत आहात ते वर्ष निवडा( उदा:२०२५-२६ )
  • हंगाम – मृग किंवा आंबिया बहार निवडा.

पायरी ५– येथे तुम्हाला व्ययक्तिक माहिती भरावयाची आहे.

  • आधार क्रमांक
  • बँकेचा तपशील
  • शेतकरी प्रकार- कर्जदार शेतकरी किंवा बिगर कर्जदार शेतकरी निवडा.

पायरी ६- येथे तुम्हाला शेतीचा तपशील द्यावा लागेल.

  • जिल्हा > तालुका > गाव > जमिनीचा पत्ता प्रविष्ट करा.
  • ७/१२ उतारा ,गट क्रमांक, खाते क्रमांक अचूक प्रविष्ट करा.
  • एकूण लागवडी खालील शेत्र
  • पिकांचा प्रकार निवडा
  • फळबागेचे उत्पादनक्षम वय नमूद करा.
  • Fal Pik Vima Yojana 2025

पायरी ७- कागदपत्रे अपलोड करा

  • येथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल कागदपत्रे अपलोड करत असताना ती JPG/JPEG/PNG Format मध्ये असणे गरजेचे आहे.कागदपत्रांची साईज केल्याप्रमाणे ठेवावी.
  • ७/१२ उतारा ( जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा)
  • बँक पासबुक तपशील
  • पिक लागवड स्वयंघोषणापत्र
  • लागवडीचा पुरावा( पेरेपत्रक)

पायरी ८- विम्याचा हप्ता भरणे

  • सर्व माहिती अचूक भरल्या नंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विम्याचा हप्ता भरावयाचा असतो.
  • त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता.
  • आपले सरकार सेवा केंद्र(CSC) ,बँक ,प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्था ह्या ठिकाणी सुद्धा विमा हप्ता भरता येतो.

पायरी ९- अर्जाची स्थिती तपासणे.

Fal Pik Vima Yojana 2025
  • Fal Pik Vima Yojana 2025 तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता त्यासाठी “Application Status” हे बटन दाबा.
  • येथे तुम्हाला अर्जाचा क्रमांक द्यावा लागतो. तो तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण होताच SMS द्वारे पाठविला जातो.

नक्की वाचा:उत्कृष्ट सोयबीनच्या उत्पादनासाठी हे नक्की करा

फळपिकांचा विमा हप्ता भरण्याची तारीख :

Fal Pik Vima Yojana 2025

फळपिकेविमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख
मृग बहार
१) संत्रा,पेरू,लिंबू,द्राक्ष२४ जून २०२५
२) मोसंबी,चिकू३० जून
३) डाळिंब१४ जुलै
४)सीताफळ३१ जुलै
आंबिया बहार
१) स्ट्रोबेरी१४ ऑक्टोबर
२) द्राक्षे१५ ऑक्टोबर
३) मोसंबी,केळी,पपई३१ ऑक्टोबर
४) संत्रा,काजू,आंबा(कोकण)३० नोव्हेंबर
५) आंबा(इतर जिल्हे)३१ डिसेंबर
६) डाळिंब१४ जानेवारी

निष्कर्ष:

थोडक्यात सांगायचे झाल्यास Fal Pik Vima Yojana 2025 हि फक्त नैसर्गिक आपत्ती पासून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी नसून ती शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ म्हणून यशस्वी रित्या कार्यरत आहे.हि योजना आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना सहज आणि वेळेवर आर्थिक सहाय्य प्रदान करण्यास सक्षम आहे ह्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक शेतकरी बांधवांची होत नाही.हि योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती शेत्रात करण्यासाठी प्रोत्साहन देत असून हवामानाच्या अनिश्चितेतही आत्मविश्वासाने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देते.भविष्यात महाराष्ट्रातील फळबागा ह्या योजनेच्या अमलबजावणीमुळे, अधिक सुरक्षित होतील व फळ उत्पादक शेतकरी वर्ग अधिक समृद्ध जीवन जगतील अशी अशा आहे.