Bhausaheb Fundkar Falbag Lagvad yojana Maharashtra
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes:महाराष्ट्र सरकारने फळाचे उत्पादन राज्यात वाढावे ह्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.फळबाग लागवड करत असताना शेतकऱ्यांचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी १०० % अनुदान राज्य सरकार देत आहे.महाराष्ट्र कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हि २०१८ पासून सुरु करण्यात आली असून पुरतः राज्य पुरस्कृत योजना आहे.शेतकऱ्यानो पारंपारिक शेती पद्धतीपेक्षा अधिक प्रमाणात उत्पन्न देण्याची क्षमता फळबाग लागवडी मध्ये आहे. Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes ज्यामध्ये खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड, पिक संरक्षण, नाग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे.इत्यादी बाबीचा आर्थिक भर १००% राज्य शासनाकडे असणार आहे.

ह्या योजनेमध्ये एकूण १६ बारमाही फळपिकांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये संत्रा ,मोसंबी ,आंबा ,पेरू ,काजू,सफरचंद ,डाळिंब ,अंजीर ,आवळा ,नारळ ,कोकम ,कागदी लिंबू ,फणस ,जांभूळ ,चिंच ,चिकू ,इत्यादी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. फळबागेची लागवड करत असताना महाराष्ट्र सरकारने कोकण विभागासाठी ०.१० हेक्टर ते १०.०० हेक्टर पर्यंत व उर्वरित महाराष्ट्रासाठी ०.२० हेक्टर ते ६.०० हेक्टर पर्यंत लागवडीच्या फळबागा लाभ घेऊ शकतात.Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ३४ जिल्ह्यांमध्ये ह्या योजनेची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा :असे करा फळगळती व्यवस्थापन
ह्या योजनेमध्ये १०० % अनुदान दिले जात असल्यामुळे अनुदान हे ३ वर्षाच्या कालावधीत मिळते.अनुदानाची रक्कम हि थेट बँक खात्यात दिली जाते.बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे बंधनकारक आहे.अनुदान हे कुठल्याही अडचणीविना बँक खात्यात स्वीकारण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्यावर्षी ८० % फळझाडे जिवंत ठेवणे व तिसऱ्या वर्षी किमान ९० % झाडे जिवंत असणे बंधनकारक राहील.
शेतकरी बंधुनो निव्वळ नफा मिळवून देण्यासाठी हि योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. हि एक उत्तम संधी आहे फळबागेचे व्यवस्थापन शास्त्रोत्र पद्धतीने असल्यास नक्कीच योजनेसाठी पात्र राहू शकता.ह्या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघणार आहोत.माहिती पूर्ण वाचा व संधीच सोन करा.शेती विषयक योजनांसाठी आमच्या WhatsApp group ला join करा.चला सुरवात करूया !
जे शेतकरी फळबाग लागवडी करिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत पात्र ठरू शकले नाही असे सर्व शेतकरी राज्य सरकारच्या स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी पात्र राहतील.कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची अमलबजावणी हि महाडीबीटी पोर्टलवर करण्यात आली असून Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes ह्या योजनेचा समावेश देखील पोर्टल वर करण्यात आला आहे.महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळण्यापर्यंतचा वर्क फ्लो (संपूर्ण तपशील) सह्पत्रीत केला गेला आहे.या संबंधित माहिती आपण पिढे बघणार आहोत.
Latest News: शेतकऱ्यांनो ५०,००० पर्यंतचे बक्षीस जिंका ! पात्रता, नियम, आणि अर्ज प्रक्रिया

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी समाविष्ट फळपिके:
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये १६ बारमाही फळपिकांचा समावेश करण्यात आला असून लाभार्थी शेतकरी आपल्या इच्छेनुसार सर्वच फळपिकांची कलमे/रोपांची लागवड करू शकतो.राज्य शासनाने योजनेची यशस्वीरीत्या अमलबजावणी होण्यासाठी कृषी हवामान शेत्र व कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुढील हप्ता लवकरच
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes
फळपिके (कलमे/रोपे) | लागवडीचे अंतर | हेक्टरी झाडांची संख्या |
---|---|---|
१) आंबा | १० x १० | १०० |
१.१) आंबा (सघन लागवड) | ५ x ५ | ४०० |
२) काजू | ७ x ७ | २०० |
३) पेरू (सघन लागवड) | ३ x २ | १६६६ |
३.१) पेरू | ६ x ६ | २७७ |
४) डाळिंब | ४.५ x ३ | ७४० |
५) कागदी लिंबू | ६ x ६ | २७७ |
६) मोसंबी | ६ x ६ | २७७ |
७) संत्रा | ६ x ६ | २७७ |
७.१) संत्रा (इंडो-ईझ्रेल) | ६ x ३ | ५५५ |
८) नारळ( बाणावली) | ८ x ८ | १५० |
८.१) नारळ टी/डी | ८ x ८ | १५० |
९) सीताफळ | ५ x ५ | ४०० |
१०) आवळा | ७ x ७ | २०० |
११) चिंच | १० x १० | १०० |
१२) जांभूळ | १० x १० | १०० |
१३) कोकम | ७ x ७ | २०० |
१४) फणस | १० x १० | १०० |
१५) अंजीर | ४.५ x ३ | ७४० |
१६) चिकू | १० x १० | १०० |
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad yojana 2025
योजनेंतर्गत कलमे/रोपे खरेदी लागवड कशी करावी :
महाराष्ट्र सरकारने कलमे/रोपांची निवड करण्याचे स्वतंत्र पूर्णतः लाभार्थी शेतकऱ्यास दिले असून राज्य सरकार पुढील रोपवाटिकांना खरेदी साठी प्राधान्य देत आहे.
१) कृषी विभाग रोपवाटिका
२) कृषी विद्यापीठ रोपवाटिका
३) कृषी विभागाच्या खाजगी परवानाधारक रोपवाटिका
४) खाजगी रोपवाटिका (फक्त राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित रोपवाटिका)
कृषी विभागाच्या परवानाधारक खाजगी रोपवाटिका किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिकेतून खरेदी करण्यात आलेल्या रोपे/ कलमांच्या दर्जा बाबतची संपूर्ण जबाबदारी हि संबंधित रोपवाटिका धारकाची असेल.अशा रोपवाटिकेमधून खरेदी करावयाची झाल्यास शेतकऱ्याने रोपे/कलमांची गुणवत्ता तपासून लाभार्थ्याने स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करावी
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes पात्र ठरल्यानंतर शेतकऱ्याला कृषी विभागाने देलेल्या परवान्यानुसार ७५ दिवसाच्या आत फळझाडांची उचलनी व लागवड करणे बंधनकारक राहील.
महत्वाचे: शेतकऱ्यानो लक्षात घ्या.पूर्व संमती शिवाय जर का फळबाग लागवड किंवा ठिबक सिंचनाची उभारणी केली असल्यास व नंतर अनुदानासाठीचा प्रस्ताव सबमिट करत असाल तर अशा लाभार्थ्याला अनुदान देण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहणार नाही.
योजनेसाठी लाभ क्षेत्र मर्यादा काय आहे ?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत लागवडी करिता निकष पुढील प्रमाणे:
कोकण विभागासाठी ०.१० हेक्टर ते कमाल १०.०० हेक्टर.
उर्वरित महाराष्ट्रासाठी ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर मर्यादा असेल.
- कमाल मर्यादा शेत्राचा विचार केल्यास लाभार्थी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार एका पेक्षा अधिक फळपिकांची लागवड करू शकतो.
- जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र असतील अशे शेतकरी सदर २ हेक्टर शेत्रापर्यंत लाभ घेतला असल्यास उर्वरित शेत्रासाठी ह्या योजनेमार्फत लाभ घेता येईल.
- अर्जदाराने जर राज्य हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड किंवा इतर कोणत्या योजनेंतर्गत लाभ घेतला असेल तर सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र असेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत अनुदान मर्यादा :
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad yojana Maharashtra
शेतकऱ्याने स्वताच्या खर्चातून करावयाची कामे | आर्थिक भार |
---|---|
१) जमीन तयार करणे. | १०० % शेतकरी |
२) माती व सेंद्रिय खात मिश्रणाने खडे भरणे | १०० % शेतकरी |
३) रासायनिक खते देणे | १०० % शेतकरी |
४) आंतर मशागतीचा खर्च | १०० % शेतकरी |
५) काटेरी झाडाची कुंपण करणे | १०० % शेतकरी |
राज्य शासन अनुदानित कामे | आर्थिक भार |
१) खड्डे खोदणे | १०० % राज्य सरकार |
२) कलमे / रोपे लागवड करणे | १०० % राज्य सरकार |
३) पिकाचे संरक्षण | १०० % राज्य सरकार |
४) नांग्या भरणे | १०० % राज्य सरकार |
५) ठिबक सिंचनाद्वारे पाणी | १०० % राज्य सरकार |
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी पात्रता निकष:
- जे शेतकरी फळबाग लागवडी करिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत पात्र ठरू शकले नाही असे सर्व शेतकरी
- फक्त व्यायाक्तिक शेतकऱ्यानांच ह्या योजने अंतर्गत लाभ घेता येईल.संस्थापक लाभार्थी ह्या योजनेस पात्र राहणार नाही.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाचा ७/१२ असणे बंधनकारक राहील. ७/१२ उताऱ्यावर संयुक्त खातेदाराची नावे असल्यास ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेदारांचे संमती पत्र आवश्यक असेल.
- ७/१२ उताऱ्यामध्ये कुळाचे नाव प्रविष्ट असल्यास व जमीन हि कुळकायद्याखाली येत असेल तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुळाचे संमती पत्र देखील आवश्यक राहील.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहवाशी असणे बंधकारक राहील.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे बंधनकारक राहील.
- शेतकऱ्याकडे ७/१२ सोबतच ८-अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आवश्यक कागदपत्रे:
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes
१) ७/१२ उतारा (मालकीहक्क दर्शविणारा)
२) ८-अ उतारा
३) सामाईक क्षेत्र असल्यास खातेदारांचे सहमती पत्र
४) आधारकार्ड
५) बँकेचा तपशील( आधार लिंक असणे आवश्यक)
६) अनुसूचित जाती,जमाती लाभार्थ्या साठी जात प्रमाणपत्र आवश्यक
७) कागदी लिंबू,संत्रा व मोसंबी ह्या फळपिकाची लागवड करत असल्यास माती परीक्षणाचा अहवाल बंधनकारक राहील.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad yojana Maharashtra

पायरी १ – आपले सरकार महाडीबीटी ह्या अधिकृत पोर्टला भेट द्या.येथे क्लिक करा.
पायरी २ – शेतकरी योजना ह्या बटनावर क्लिक करा.
पायरी ३ – नवीन अर्जदार नोंदणी हे बटन दाबा.
पायरी ४ – अर्जदाराचे नाव,आधार क्रमांक,मोबईल क्रमांक,इ-मेल इत्यादी व्ययक्तिक मुलभूत माहिती अचूक प्रविष्ट करा.
पायरी ५ – भविष्यातील लाभार्थी स्थिती तपासणीसाठी वापरकर्तानाव Username व पासवर्ड Password तयार करा.
पायरी ६ – येथे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते,आता परत तुमचे खाते लॉगीन करा व प्रोफाईल मध्ये मागितलेली माहिती अचूक प्रविष्ट करा( त्यामध्ये व्ययक्तिक तपशील,पत्ता तपशील,जमीन मालकी तपशील प्रविष्ट करा)
सतत विचरले जाणारे प्रश्न | FAQ
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes
प्रश्न १) कोणत्या पिकांचा समावेश ह्या योजनेत करण्यात आला आहे ?
उत्तर- ह्या योजनेमध्ये एकूण १६ बारमाही फळपिकांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये संत्रा ,मोसंबी ,आंबा, पेरू ,काजू,सफरचंद ,डाळिंब ,अंजीर ,आवळा ,नारळ ,कोकम ,कागदी लिंबू ,फणस ,जांभूळ ,चिंच ,चिकू ,इत्यादी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे
प्रश्न २) या योजनेत दोन पेक्षा जास्त फळपिकांसाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर – हो, एकच शेतकरी दोन पेक्षा जास्त फळपिकांसाठी अर्ज करू शकतो.
प्रश्न ३) योजनेचा फायदा घेण्यासाठी लागवडीचे अंतर किती असावे ?
उत्तर- वर दिलेल्या तक्त्याचे वाचन करावे.
प्रश्न ४) या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात का ?
उत्तर – होय, महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रश्न ५) हि योजना राज्य पुरस्कृत आहे का ?
उत्तर- होय,हि योजना १०० % राज्य पुरस्कृत आहे.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad schemes
प्रश्न ६) शेती सामाईक असल्यास शेतकरी अर्ज करू शकतो का ?
उत्तर – होय,योजेसाठी अर्ज करू शकता फक्त संमतीपत्र आवश्यक.
प्रश्न ७) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किती क्षेत्र असायला हवे ?
उत्तर – कोकण विभागासाठी ०.१० हेक्टर ते कमाल १०.०० हेक्टर.उर्वरित महाराष्ट्रासाठी ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर मर्यादा असेल.
प्रश्न ८) दिव्यांग व्यक्ती ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर – हो
प्रश्न ९) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?
उत्तर- हो, आपले सरकार महाडीबीटी ह्या अधिकृत पोर्टल वर अर्ज करू शकता.
प्रश्न १०) शेतकऱ्याचा बँकेचा तपशील महत्वाचा आहे का ?
उत्तर-होय,बँक तपशील अनिवार्य आहे बँक खात्यास आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे.
प्रश्न ११) ह्या योजनेसाठी अर्ज शुल्क किती आहे ?
उत्तर- अर्ज करण्यासाठी २३.६० रुपये द्यावे लागतील
स्त्रोत आणि संदर्भ
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना GR
शेती लागवडी संबंधी आमचे इतर लेख वाचा:
खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती
भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन शाश्वत पद्धती
कृषी शेत्रात १०० टक्के रोजगाराच्या संधी