Kisan Credit Card Yojana 2025 | ५ लाखापर्यंत कर्ज ! किसान क्रेडीट कार्ड ठरणार वरदान लगेच अप्लाय करा!

Kisan Credit Card Yojana In Marathi :

Kisan Credit Card Yojana 2025 :देशात सुरु झालेली किसान क्रेडीट कार्ड योजना कित्येक शेतकरी बांधवाना अडचणीच्या काळात मदत करताना दिसत आहे.शेतकरी वर्गाला शेती करत असताना नगदी पिकाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे बराच काळ काटकसर करण्यात जातो.अशा परिस्थितीत शेतकरी बऱ्याचदा सावकार व बँकेच्या कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला बघावयास मिळतो.भारतात शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे जास्तीत जास्त अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सतत केंद्र व राज्य सरकार करत असते.

त्यातलीच हि एक योजना ज्याचे नाव Kisan Credit Card Yojana 2025 असून आतापर्यंत ह्या योजनेसाठी देशात ७.७ कोटी किसान क्रेडीट कार्ड खाते उघडण्यात आले.परंतु महाराष्ट्रातील शेतकरी बरेच श्रीमंत असल्यामुळे आपल्या राज्यात ह्या योजनेचा लाभ कमी प्रमाणात शेतकरी घेत असल्याचे निदर्शनास आले.असे भरपूर शेतकरी आहेत ज्यांना ह्या योजनेसंबंधी अचूक माहिती नसल्यामुळे किंवा ऑनलाईन प्रक्रिया जाचक वाटत असल्यामुळे ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे.

Kisan Credit Card Yojana 2025 |

शेतकरी बंधुनो,Kisan Credit Card Yojana 2025 लाभ घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मार्गदर्शन ह्या लेखात करणार आहोत.योजनेचा लाभ नक्की घ्या व योजना संबंधित माहिती साठी आमच्या WhatsApp group ला join करा !

वाचा :पीएम किसान सम्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच


What is kisan credit card yojana ?

शेतकरी बंधुनो,सावकाराच्या तावडीतून सोडवण्यासाठी केंद्र सरकारने १९९८ पासून ह्या योजनेची सुरवात केली.शेती हा हंगामी व्यवसाय असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा हा एका विशिष्ट काळामध्येच उपलब्ध होतो.त्यामुळे वर्षभरात अनेक अडचणींना शेतकऱ्याला समोर जावे लागते.शेती साठी लागणाऱ्या खाते,बियाणे,औषधी इत्यादी बाबी साठी पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो.यातूनच शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज घेण्याची वेळ येत असते.कर्जाची परतफेड वेळेवर नकरता आल्यामुळे शेतकरी चक्रवाढ व्याजाच्या दुष्टचक्रात अडकला जातो. ह्याच परिस्थितीतून शेतकऱ्याला काढण्यासाठी हि योजना आपल्या देशात राबविली जात आहे.

Kisan Credit Card Yojana 2025 मुळे शेतकऱ्याला कमीतकमी व्याजदरात लोन उपलब्ध करून दिले जाते.ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याना लोन वरील व्यादार फक्त ४ % असतो.KCC योजनेचा मुख्य उद्देश हा शेतीमधील बाबीसाठी अल्प आणि वेळेवर लोन उपलब्ध करून देणे हा असून भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ह्याचा फायदा घेत आहेत.केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला २ % ची व्याज सवलत देत ३ % त्वरित परतफेड करत असल्यास एकूण वर्षभरामध्ये ४ % प्रमाणे कमीत कमी सवलतीच्या दराने लोन उपलब्ध करून देत आहे.

वेळोवेळी आवश्यकतेनुसार बऱ्याच प्रमाणात ह्या योजनेत बदल करण्यात आले.जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ पोहचवणे ह्या हेतूने हे बदल आखण्यात आले.सलग्न व बिगर शेती उपक्रमासाठी देखील शेतकऱ्याच्या गुंतवणुकीच्या कर्जासाठी सुद्धा २००४ पासून ह्या योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला.


किसान क्रेडीट कार्ड योजनेचे उदिष्ट:

Kisan Credit Card Yojana 2025 द्वारे शेतकरी बंधूना पुढील बाबींमध्ये कर्ज पुरवठा प्रदान केला जातो.

  • कोणत्याही हंगामातील पिकांच्या लागवडी करीता अल्पकालीन कर्ज सहज उपलब्ध करून देणे.
  • कापणी नंतर होणाऱ्या खर्च साठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • उत्पादन विपणनाचे कर्ज
  • हंगामी काळात किंवा बिगर हंगामी काळात शेतकरी कुटुंबासाठीच्या उपभोगी गरजासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • शेतीच्या मालमत्तेच्या देखभाली करिता कर्ज उपलब्ध करून देणे,त्याचबरोबर शेती संबंधित उपक्रमासाठी खेळते भांडवल उपलब्ध करणे.
  • शेती आणि शेती संबंधित कामासाठी गुंतवणूक कर्जाची आवश्यकता असल्यास कर्ज उपलब्ध करून देणे.

किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी पात्रता निकष :

kisan credit card eligibility in Marathi

१) शेतकरी(अर्जदार) भारताचा नागरिक असावा.

२) मालक शेतकरी व सर्व शेतकरी असलेले व्यक्ती

३) भाडेकरू शेतकरी ,तोंडी भाडेपट्टीदार आणि भागधारक शेतकरी.

४) बचत गट (SHG) किंवा शेतकऱ्याचे संयुक्त दायित्व गट (JLGS ).


किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • ओळखपत्र (त्यामध्ये आधारकार्ड / ड्रायविंग लायसन्स /मतदार ओळखपत्र/पासपोर्ट)
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो
  • अर्जाचा नमुना
  • रहवाशी पुरावा(आधारकार्ड /ड्रायविंग लायसन्स)
  • जमीन मालकीचा पुरावा महसूल अधिकाऱ्याने प्रमाणित केलेला.
  • १.६० लाख / ३ लाख पेक्षा जास्त कर्जाची आवश्यकता असल्यास सुरक्षा कागदपत्रे.
  • ६७५ पेक्षा अधिक सिबिल स्कोर गरजेचा.

किसान क्रेडीट कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया :

Kisan Credit Card Yojana 2025 ऑनलाईन पद्धती

पायरी १ – सर्वप्रथम ज्या बँकेचे तुम्हाला कर्ज घ्यावयाचे आहे त्या बँकेच्या वेबसाईट/सांकेतिकस्थळाला भेट द्या.

पायरी २ – येथे तुम्हाला पर्यायाची माहिती दिसेल.या यादीतून किसान क्रेडीट कार्ड(अर्ज करा) ह्या पर्यायावर क्लिक करा

पायरी ३ – क्लिक केल्यावर वेबसाईट अर्ज पुष्ठावर येईल.

पायरी ४ – आवश्यक माहितीसह फॉर्म भरा व सबमिट करा हे बटन दाबा.

पायरी ५ – वरील संपूर्ण प्रक्रिया अचूक पद्धतीने केल्यास तुम्हाला एक अर्ज संदर्भ क्रमांक मिळतो.बँके कडून अर्जाची पुष्टी केली जाते.जर तुम्ही योजनेस पात्र असल्यास ३- ४ दिवसामध्ये पुढील प्रक्रियेसाठी बँकेकडून तुम्हाला बोलवण्यात येते.

Kisan Credit Card Yojana 2025 ऑफलाईन पद्धती

  • ज्या बँकेचे कर्ज घ्यावयाचे आहे त्या बँकेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता किंवा प्रत्यक्ष बँकेला भेट देऊन अर्जाची मागणी करू शकता.
  • बँकेच्या प्रतिनिधीच्या सहाय्यने किसान क्रेडीट कार्ड योजनेचा अर्ज भरून घ्यावा.

नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

SBI बँक ग्राहकांनी येथे क्लिक करा


शेतकरी बंधुनो,सुरवातीला पुढील वितरण चान्णेल स्थापन केले जातील ज्याद्वारे शेतकरी आपल्या किसान क्रेडीट कार्ड खात्याचा व्यवहार सहज व प्रभावीपणे करण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड चा वापर करता येईल.

KISAN CREDIT CARD YOJANA 2025

१) ATM /MICRO ATM मशीनद्वारे पैसे काढता येईल

२) बिसिद्वारे पैसे काढण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करता येईल.

३) IMPS क्षमतासह मोबईल बँकिंग चा वापर करता येईल.


किसान क्रेडीट कार्ड चे प्रकार :

Kisan Credit Card Yojana 2025

  • सर्वच प्रकारच्या बँकच्या ATM मशीन मध्ये चालणारे कार्ड उपलब्ध करून दिले जाते.ATM आणि MICRO ATM मध्ये हे कार्ड वापरले जाऊ शकते.कार्डला विशिष्ट व्यायाक्तिक ओळख क्रमांक दिला जातो.म्हणजेच गोपनीय पिन दिला जातो.हे कार्ड आंतरराष्ट्रीय मानक संघटना आंतरराष्टीय ओळख क्रमांक असलेले चुंबकीय कार्ड पट्टी सोबत पुरवले जाते.
  • ज्या बँकांना UIDAI नुसार केंद्रीकृत बायोमेट्रिक प्रमाणीकरणानुसार पायाभूत सुविधा वापरायच्या असतील अशा बँकांना UIDAI च्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणानुसार चुंबकीय पट्टी असलेले आणि ISO IIN पद्धतीने व्यायाक्तिक ओळख क्रमांक असलेले डेबिट कार्ड प्रदान केले जातील.
  • UIDAI व्यापक होत नसल्यास बँका त्यांच्या ग्राहकाच्या आधारावर चुंबकीय पट्टी व बायोमेट्रिक प्रमाणीकरण असलेले डेबिट कार्ड ग्राहकांना देऊ शकते त्याचबरोबर बँका त्यांच्या विद्यमान केंद्रीकृत बायोमेट्रिक पायाभूत सुविधाचा वापर करावयाचा असल्यास तशी परवानगी बँकांना दिली जाते.
  • बँका EMV आणि RUPAY अनुरूप चीप कार्ड ग्राहकांना पुरवू शकते.त्यामध्ये चुंबकीय पट्टी व ISO IIN सह व्यायाक्तिक ओळख क्रमांक दिला जातो.बँका पुढील प्रकारचे कार्ड ग्राहकांना पुरवते त्यामध्ये युरोपे,मास्टरकार्ड,VISA कार्ड देऊ शकते.

किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत क्रेडीट मर्यादा:

Kisan Credit Card Yojana 2025

Kisan Credit Card limit

शेती मालमत्तेसाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रस्तावित युनिट किमती,आधीपासून सुरु असलेल्या शेतीमधील सलग्न उपक्रम ,शेतकऱ्यावरील संपूर्ण कर्जाच्या एकूण रक्कमेसह परतफेड करावयाच्या क्षमतेनुसार बँक कृषी व सलग्न उपक्रमासाठी खेळत्या भांडवलाची आणि मुदतीची मर्यादा निश्चित करू शकते.

दीर्घकालीन मर्यादा: पाच वर्षाच्या काळात पात्र रक्कमेच्या गुंतवणुकीवर व शेतकऱ्याच्या परतफेडी नुसार बँकेच्या निकषावर आधारित असते.

कमाल परवानगीयोग्य मर्यादा: कमाल परवानगी योग्य मर्यादा हि पाच वर्षाची अल्पकालीन मर्यादा व अंदाजित दीर्घकालीन कर्जाची आवश्यकता यावर अवलंबून असते व ती किसान क्रेडिड कार्ड ची मर्यादा म्हणूनच गणली जाते.

व्याजदराचे नियम हे अल्पकालीन कर्ज व मुदत कर्ज यानुसार वेगवेगळी असतात.याव्यतिरिक्त सध्यापरिस्थितीत अल्पकालीन कर्ज व्याज सबसिडी / त्वरित परतफेड प्रोत्साहन योजनेमध्ये येत असते.

अल्पकालीन कर्ज व मुदत कर्ज परतफेडीचे वेळापत्रक आणि निकष वेगवेगळी आहेत.


सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ

1) किसान क्रेडीट कार्ड किती दिवस वैध राहतो ?

उत्तर- किसान क्रेडीट कार्ड ५ वर्षा साठी वैध राहत असून तुम्हाला मिळणारा कालावधी हा तुम्ही निवडलेल्या कोणत्या कामासाठी पैसे (कर्ज) घेत आहात यावर अलंबून असतो.

२) किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा आहे का ?

उत्तर- हो, योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय १८ वर्ष पूर्ण व कमाल वय ७५ वर्षापर्यंत असणे बंधनकारक आहे.जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर सह कर्जदार जो कि कायदेशीर रित्या वारस असणे गरजेचे आहे.

३) Kisan Credit Card Yojana 2025 किती व्याज दर लागू होतात ?

उत्तर- व्याजदर ठरवण्याचा अधिकार बँकेला दिला गेला असून बँकेने निकष पाळणे बंधनकारक असते.२०१२ च्या निर्देश्नानुसार ७ % प्रतीवर्ष व्याजदर अल्पकालीन कर्जावर आकारला जातो व कमाल ३ लाख रुपयाची मर्यादा हि मूळ रकमेवर आहे.

४) Kisan Credit Card Yojana 2025 कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे?

उत्तर – किसान क्रेडीट कार्ड व मुदत कर्ज वित्तपुरवठा करण्यासाठी उपलब्ध आहे.

५) ह्या योजनेचा वित्तपुरवठा करण्यासाठी काही सुरक्षा नियम आहेत का ?

उत्तर – हो केंद्र सरकारने ह्या संबंधित पत्रक अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध केले आहेत.

६) भारत सरकारने किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत वित्तपुरवठा सुधारण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत का ?

उत्तर-हो, Kisan Credit Card Yojana 2025 मध्ये २ % व्याज सवलत व त्वरित परतफेड प्रोत्साहनासाठी ३ % पर्यंत मदत दिली जाते.एकूण मर्यादेवर ३ लाख रुपये वार्षिक या प्रमाणे कर्ज उपलब्ध आहे.आणि फक्त पशुपालन आणि मत्सपालनातील उपक्रमासाठी कमाल २ लाख रुपया पर्यंतची मर्यादा ठेवली आहे.

७) योजनेसंबंधीत माहिती साठी हेल्पलाईन नंबर काय आहे ?

उत्तर-०११ – २४३००६०६


शेती लागवड संबंधी इतर लेख:

सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा !

अशी करा चारा पिकाची शाश्वत लागवड

१०० % कापसाची किड नियंत्रण पद्धती