PM KISAN YOJANA IN MARATHI :
PM kisan nidhi yojana:भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना २०१८ पासून यशस्वी रित्या राबवली जात असून सर्वप्रथम हि योजना प्रामुख्याने सर्व लहान व सीमांत शेतकऱ्यासाठी असून सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.PM kisan nidhi yojana शेतकऱ्याची उत्पादन पातळी वाढवणे हे ह्या योजनेचा मुख्य उद्देश असून शेतकऱ्याच्या खात्यात आर्थिक सहाय्य प्रदान करून पिकांना लागणारी औषधे,शेती उपयोगी अवजारे.इत्यादी बाबीवर खर्च करण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेली हि प्रधानमंत्री किसान सम्मान योजनांतर्गत ६००० रुपये पर्यंत सर्वच जमीनधारक शेतकऱ्याना ह्या योजनेचा आर्थिक लाभ मिळतो.शेतकरी कुटुंबाना दरवर्षी ६००० रुपयाचा आर्थिक लाभ दर चार महिन्यनी २००० रुपये ह्या पद्धतीने विभाजित केला जातो.
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनां हप्ता वितरण तारीख २०२५

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल 2025
INSTALLMENT DATE OF PM KISAN
आता पर्यंत केंद्र सरकार ने १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असून देशातील विविध भागातील ९.८ करोड शेतकरी कुटुंबाना आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
१९ वा हप्ताच्या स्वरूपात केंद्र सरकारने २२००० करोड रुपयाचा निधी शेतकऱ्यांना वितरीत केला. PM KISAN YOJANA अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून ३ वेळा आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.नुकतीच योजनेची १९ वि किस्त प्रदान केली गेली असून पुढील ह्या वर्षाची दुसरी किस्त जी कि,संपूर्ण योजनेची २० वि किस्त असेल.
PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA २० वा हप्ता जून महिन्या पर्यंत जमा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने प्रशासनास दिले आहे.२०२५ ह्या वर्षातील तिसरा हप्ता हा, जो कि संपूर्ण योजनेचा २१ वा हप्ता असेल तो ऑक्टोबर २०२५ मध्ये दिला जाण्याची शक्यता आहे हप्त्याची नेमकी तारीख हि योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केल्या जाईल.
वाचा:प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील नवीन बदल २०२५
पंतप्रधान किसान योजनेची वैशिष्टे:
PM kisan nidhi yojana भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती,म्हणूनच आपल्या देशात शेतकऱ्याला देखील राष्ट्र निर्मिती मध्ये अनन्य साधारण महत्व आहे.भारतामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजीक व आर्थिक असमानता बघावयास मिळते त्यामुळे शेतकरी वर्गाला नियमितच उच्च उत्पादनपातळी गाठण्यास संघर्ष करावा लागतो.शेतकरी पाहिजे तसा आर्थिक समृद्ध नसल्यामुळे वारंवार तो कमी उत्पादनाच्या दृष्टचक्रात अडकलेला बघावयास मिळते.भारताला स्वतंत्र मिळाल्या पासून कित्येक समुदायाला ह्याच समस्याने घट्ट पकडून ठेवले आहे.
अशा प्रकारच्या गंभीर समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार योजण्याच्या मार्फत सातत्याने करण्याचा प्रयत्न करते आहे.ह्या योजने मध्ये शेतकरी समुदायाला २०१८ पासून आर्थिक मदत पुरवण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेची सुरवात केली.प्रामुख्याने सुरवातीला अल्पभूधारक शेतकर्यांना ह्या योजनेची सुरवात करण्यात आली असून १२५ दशलक्ष शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येईल.
वाचा:उन्हाळी भुईमुग शाश्वत लागवड पद्धती
पंतप्रधान किसान योजनेची पार्श्भूमी :
सर्वप्रथम हि योजना तेलंगणा सरकारने रयथू बंधू ह्या नावाने २०१८ मध्ये सुरु केली होती.तेलंगणा सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्याना उत्पादन वाढ करून घेण्यासाठी वर्षातून दोन वेळा आर्थिकदृष्ट्या सहाय्य करण्याचे ठरवले होते.त्यातून शेतकऱ्याला आपल्या शेती मध्ये गुंतवणूक करण्याचे आव्हान राज्य सरकार करत होते. राज्य सरकारची हि योजना यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे केंद्र सरकारने ह्या उत्कृष्ट उपक्रमाची दखल घेत संपूर्ण देशातील ह्या पद्धतीच्या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून PM kisan nidhi yojana (PM KISAN YOJANA) राबवण्यास सुरवात केली.
पीएम किसान सम्मान निधी योजनेची वैशिष्टे :
PM kisan nidhi yojana
- डिसेंबर २०१८ पासून केंद्र सरकारने हि योजना राबवण्यास सुरवात केली.
- पीएम किसान योजना हो १०० % केंद्र पुरस्कृत योजना आहे.
- शेतकरी कुटुंबाना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा मूळ उद्देश असून कुटुंबाच्या व्याखे मध्ये पती,पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो.
- राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन प्रधानमंत्री किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थी कुटुंबाची ओळख करेल.
- पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाना हा निधी सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
- केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ह्या योजनेसाठी दरवर्षी ७५००० कोटी रुपयाची आर्थिक मदत संपूर्ण शेतकरी वर्गात वितरीत केली जाईल.
- ह्या योजने अंतर्गत शेतकरी बंधूना किमान ६००० रुपये एका वर्षात दिले जाईल.हि रक्कम एकाच वेळी न वितरीत करता ४ महिन्याच्या अंतराने वर्षातून ३ वेळा दिली जाईल.
- योजनेंतर्गत प्रत्येक चार महिन्यानी २००० रुपये आर्थिक मदत दिली जाईल.हिअर्थिक मदत शेतकरी बांधवानी शेती मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरण्याचे आव्हान केंद्र सरकार करत आहे.
- मिळालेल्या निधीचा वापर करण्यासाठी कुठलेही बंधन केंद्र सरकाने ठेवलेले नाही.
- हि योजना १०० % केंद्र पुरस्कृत असल्यामुळे संपूर्ण निधी हा भारत सरकार कडून शेतकरी बांधवाना पुरविला जातो.
- PM kisan nidhi yojana यशस्वी रित्या पार पडण्यासाठी दरवर्षी ७५००० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.
हेही वाचा :सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा !
लाभार्थीची ओळख :
निधी वितरीत करण्याची संपूर्ण जबाबदारी हि केंद्र सरकारची असली तरी लाभार्थीची ओळख पटवणे हि राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे.
शेतकरी कुटुंबाना हा निधी दिला जात असून प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत शेतकरी कुटुंबाची व्याखेमध्ये पती,पत्नी आणि मुलांचा समावेश होतो.
पीएम किसान योजनेसाठी पात्रता निकष :
PM KISAN YOJANA
- देशातील सर्वच जमीनदार शेतकरी.
- शेतकरी कुटुंबे ज्यांच्या कडे शेतीयोग्य जमीन आहे. अशा कुटुंबाचा समावेश लाभार्थी म्हणून होतो.
- भारताचा नागरिक असणे गरजेचे.
PM kisan nidhi yojana त्याच बरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी प्रधानमंत्री किसान निधी योजनेस नोदणी करू शकता,परंतु योजनेच्या guidline नुसार काही विशिष्ट शेतकरी कुटुंबाना ह्यातून वगळण्यात आले आहे.
ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!
PMKSNY अपात्रता निकष :
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेबाबत विशिष्ट श्रेणी तील लोकांना वगळण्यात आले असून यादी पुढील प्रमाने आहे(PM kisan nidhi yojana):
१) जमीन धारक संस्थापक असल्यास लाभ मिळणार नाही.
२) साविधानिक पद धारण केलेली व्यक्ती.
३) सरकारी मंत्रालय,कार्यालय,किंवा विभागात सेवा देत असलेली व्यक्ती अपात्र राहील.
४) केंद्र किंवा राज्यामधील सार्वजनिक शेत्रातील उपक्रमामध्ये काम करत असलेली व्यक्ती.
५) सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून नोकरी करत असलेली व्यक्ती
६) स्थानिक सरकारी संस्थामधील नियमित कर्मचारी.
७) केंद्र व राज्य सरकारचे मंत्री आणि माजी मंत्री.
८) लोकसभा सदस्य ,राज्यसभा सदस्य ,दोन्ही सभागृहातील माजी सदस्य
९) विधानसभा सदस्य ,विधानपरिषदेचे सदस्य ,दोन्ही सभागृहातील माजी सदस्य
१०) जिल्हा पंचायत समिती अध्यक्ष किंवा माजी अध्यक्ष.
११) महानगरपालिका महापौर किंवा माजी महापौर
१२) मागील वर्षी कर भरलेला कोणताही व्यक्ती किंवा कुटुंब सदस्य ह्यांना PM किसान योजनेचा लाभार्थी म्हणून वगळण्यात येईल.
१३) सरकारी सेवेतून निवृत्त झालेला त्याच बरोबर महिना १०,००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची पेन्शन धारक व्यक्ती अपात्र राहील.परंतु जर पेन्शन धारक वर्ग चतुर्थ ,गट ड कर्मचारी किंवा बहु कर्मचारी असल्यास सांगितलेल्या निकष लागू होणार नाही.
१४) PM KISAN YOJANA मध्ये डॉक्टर,अभियंते,चार्टर्ड अकाऊंटट,त्याच बरोबर वकील,आर्किटेक इत्यादी व्यवसायात असलेली व्यावसायिक व त्याचे कुटुंबाना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान योजना नोदणी प्रक्रिया:
PM KISAN YOJANA IN MARATHI
वरील सांगितलेल्या निकषाचे पालन करून पात्र ठरलेल्या व्यक्तीस स्वतःची नोंदणी लाभार्थी म्हणून करता येते.२०२५ मध्ये पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेसाठी करावयाची नोंदणी प्रक्रिया:
१) देशातील प्रत्येक राज्य सरकारने PMKSNY अंतर्गत नोडल अधिकार्याची नियुक्ती करावी.पात्र व्यक्ती नोंदणी करण्यासाठी ह्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकते.
३) सामान्य सेवा केंद्रामध्ये अल्प शुल्क भरून योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करू शकतात.
२) त्या भागातील स्थानिक पटवारी त्या भागातील महसूल अधिकाऱ्याशी पात्र शेतकरी नोंदणी करण्यासाठी संपर्क साधू शकतात.
४) या व्यतिरिक्त, प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेसाठी अधिकृत वेबसाईट/पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने नोदणी करता येते.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
नोंदणी करण्यासाठी खालील योजनेची पूर्तता करावी:
१) आधार कार्ड
२) पात्र व्यक्तीचा नागरिकत्व पुरावा.
३) जमीन मालकीची असल्याचा पुरावा
४) बँक खात्याची संपूर्ण माहिती.
शेतकरी बंधुनो ऑनलाइन पद्धतीने नोदणी करत असल्यास वरील कागदपत्राचे स्क्यानिग प्रत देणे गरजेचे आहे.
PMKSNY लाभार्थी स्थिती कशी तपासाल:
केंद्र सरकारद्वारे लाभार्थी व्यक्तीस निधी बँक खात्यात जमा न झाल्यास पुढील प्रमाणे स्थिती ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता.

पायरी १ – पीएम किसान सम्मान योजनेच्या अधिकृत पोर्टल वर भेट द्यावी.
पायरी २ – वेबसाईट वरील शेतकरी कॉर्नर अंतर्गत ‘तुमची स्थिती जाणून घ्या option वर क्लिक करा.
पायरी ३ – आधार क्रमांक टाका, नोंदणीकृत मोबईल नंबर किंवा खाते क्रमांक टाका.
PM KISAN YOJANA | सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
PM KISAN YOJANA IN MARATHI
१) पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना कधी जाहीर केली जाते ? उत्तर- दरवर्षीतून ३ वेळा हि योजना जाहीर केली जाते.त्यामध्ये चार महिन्याच्या अंतराने २००० रुपये दिले जातात.एकूण ६००० एवढ्या रक्कमेचा लाभ दरवर्षी लाभार्थ्याला मिळतो.
२) PM किसान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत ? उत्तर- आधार कार्ड, नागरिकत्व पुरावा, जमीन मालकीची असल्याचा पुरावा.बँक खात्याची माहिती.
३) पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या खात्यात आर्थिक लाभ कसा मिळतो ? उत्तर-प्रत्येक हप्त्या मध्ये २००० रुपये शेतकरी कुटुंबाच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो.
४) PM किसान योजनेसाठी हेल्पलाईन नंबर काय आहे ? उत्तर – १५५२६१/०११-२४३००६०६
५) पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेंतर्गत लाभ फक्त लहान किंवा सीमांत शेतकऱ्यनाच मिळतो का ? उत्तर – नाही, सर्व शेतकरी कुटुंबासाठी हि योजना लागू आहे, लाभार्थीने फक्त पूर्ण निकषाची पूर्तता करणे गरजेचे आहे,शेतकऱ्याकडे कितीही जमीन असली तरी लाभ घेता येतो.
६) २ हेक्टर पेक्षा अधिक जमीन धारकास योजनेचा लाभ मिळतो का ? उत्तर- हो, हि योजना सर्व शेतीयोग्य जमीनधारकास उपलब्ध आहे, कितीही जमीन असली तरी नोंदणी करू शकता.
७) योजनेसाठी लाभार्थी कसे निवडले जातील ? उत्तर- लाभार्थी शेतकरी कुटुंबाची ओळख पटवण्याची संपूर्ण जबाबदारी हि पूर्णपणे राज्य व केंद्र्शाशित प्रदेश सरकारची राहील.
८) व्यावसायिक PMKSNY साठी पात्र आहेत का ? उत्तर- नाही , व्यावसायिक ह्या योजनेसाठी ग्राह्य धरले जात नाही.
९) कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास,योजनेचा लाभ मिळतो का ? उत्तर- नाही , असे कुटुंब योजनेस पात्र राहणार नाही.
१०) आयकर भरणार शेतकरी किंवा त्याचा पती / पत्नी योजने अंतर्गत लाभ मिळतो का ? उत्तर – नाही , शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मागील कर निर्धारित वर्षात आयकर भरला असल्यास अशी शेतकरी कुटुंबे योजनेस पात्र नाही.
११) योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थ्याने चुकीची घोषणा केली असल्यास कोणती कारवाई होऊ शकते उत्तर- PM KISAN NIDHI YOJANA चुकीची घोषणा करत असल्यास लाभार्थ्याला आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आलेली आर्थिक लाभाची वसुली केली जाते. व कायद्याच्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईस तो व्यक्ती जबाबदार राहू शकतो.
इतर:
हेही वाचा :अशी करा चारा पिकाची शाश्वत लागवड
अशाच दर्जेदार माहितीसाठी Whatsapp Group ला join करा !