Pulses Market | खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

Kaddhanya In Marathi:

Pulses Market:मुग,तूर,उडीद,कुलथी,मटकी,चवळी,या सारखी कडधान्य पिके हि खरीप हंगामात घेतली जातात.मानवाच्या आहारात व शेती मध्ये कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे.”जमीन व मानवाच्या पोषणासाठी कडधान्य” असे जागतिक कडधान्य दिनाचे घोषवाक्य होते आणि ते तितकेच खरे देखील आहे उत्तम स्वास्थ ठेवण्यासाठी मानवाने रोजच्या आहारात कडधान्याचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे झाले असून मानवाचे दैनंदिन जीवन हे धावपळीचे झाले आहे.त्याच बरोबर आहारातून अन्नधान्यामध्ये रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाचे आयुर्मान दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला बघायला मिळते.Pulses Market खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती यावर्षीच्या जागतिक कडधान्य दिनाच्या परिषदेमध्ये मानवी जीवनात कडधान्याचे पिकाचे महत्व आणि कडधान्य पिकांच्या शाश्वत शेती पद्धती बद्दल माहिती सांगण्यात आली त्या संबंधित ह्या लेखात आपण माहिती बघणार असून शेतकरी बंधूनी ह्या पद्धतीचा १०० % अवलंब करण्याच्या शिफारशी कृषी संशोधक करत आहे.

वाचा:Vegetable Crop Management | पाऊस कमी पडल्यास असे करा नियोजन

pulses market

ड्रोन फवारणी

Pulses Market कडधान्यचे पिक घेत असताना करावयाच्या उपाययोजना कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात येत असून शेतकरी वर्गाने याचा पुरेपूर फायदा घ्यावा व शेतीतील उत्पादन बरोबर उत्पनात वाढ करून घेण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात करावे.

हेही वाचा:Groundnut Cultivation |उन्हाळी भुईमुग शाश्वत लागवड पद्धती

कडधान्याच्या पिकांचे वैशिष्ट म्हणजे हि पिके स्वतःला लागणारी नत्राची गरज परस्पर भागवत असतात.रायझोबियम नावाचा जीवाणू हा कडधान्य पिकाच्या मुळातील ग्रंथीमध्ये आढळतो.हा जीवाणू हवेतील नत्र स्वतः शोषून घेत असल्याने नत्राची गरज पिके स्वतः पूर्ण करून घेतात.Pulses Market वाढत्या हवामानातील बदलांमुळे मिश्र पिकांची त्याच बरोबर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आता काळाची गरज बनली आहे.हि बाब शेतकरी वर्गाने सर्वप्रथम आत्मसात करणे गरजेचे आहे.त्यातूनच उत्पन्नात १०० % वाढ करता येईल.

हेही वाचा:kharip Crop planning|आपत्कालीन परिस्थितीत असे करा नियोजन

आरोग्य संबंधित बोलायचे झाल्यास बदलते हवामान,वाढते प्रदूषण,अन्न धान्यात वाढता रासायनिक वापर इत्यादी बाबीमुळे मानवी शरीराची झीज होत असते हि झालेली झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज मानवी शरीरास लागते. कडधान्यमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांची उपलब्धता असते.२५ % पर्यंत प्रथिने हे १०० ग्राम कडधान्यमध्ये असतात. मानवी आरोग्याचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज भासते म्हणूनच कडधाण्याचे पिक घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Pulses Market देशातील कडधान्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे कडधान्य उत्पादनात अग्रगण्य असून महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकामध्ये तूर , मुग , उडीद यासारखी प्रमुख महत्वाची पिके घेतली जातात.

फळगळती व्यवस्थापन


Agriculture Education |१०० टक्के रोजगाराच्या संधी

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पिकांची वाणे:

kaddhanya list

शेतकरी मित्रानो, Pulses Market महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने संपूर्ण बाबींचा विचार करून प्रामुख्याने त्या शेत्रातील हवामान, पाण्याची उपलब्धता,जमिनीचा पोत या सारख्या सर्वच बाबींचा संशोधनात्मक अभ्यास करून कडधान्य पिकांची वाणे तयार केली आहेत. शेतकरी वर्गाने आपले शेतीतल उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानासोबत,नवीन विकसित वाण विद्यापीठाने तयार केलेली आहेत यांचा वापर शेतकरी बंधूनी केल्यास १०० % शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल व उत्पन्न हि वाढेल.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली वाणे:

पिकेविकसित वाण
१) मुगपि.के.वी ग्रीन गोल्ड , पि.के.वी. ए.के. एम.४
२ )तूरपि.के.वी तारा , पि.डी.के.वी अश्लेषा , एकेटी-८८११
३) उडीदपि.डी.के.वी Black Gold , T.A.U-1

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली वाणे:

पिकेविकसित वाण
१) मुगफुले चेतक,फुले सुवर्ण
२) उडीदफुले वसु , फुले राजन
३) तूरफुले राजेश्वरी , फुले तृप्ती
४) मटकीफुले सरिता
५) चवळीफुले रुक्मिणी , फुले सोनाली
६) राजमाफुले राजमा , फुले विराज
७) कुळीथफुले सकस

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली वाणे:

पिकेविकसित वाण
१) तूर BDN 711, BDN 716,BDN 2013-41 ,BSMR 736
२) मुगBM 2003-2

Crop Insurance

पिकांननुसार खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती:

kaddhanya in marathi list

pulses market

१) तूर:

Pulses Market महाराष्ट्रातील प्रमुख पिका मध्ये तुरीचा समावेश होतो.कडधान्य उत्पादनात तुरीचे पिक सर्वाधिक प्रमाणात उत्पादन देते.तुरीचे पिक घेताना पुढील बाबी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.तुरीची लागवड शास्तोत्र पद्धतीने कशी करावी ह्या संबंधित माहिती आता आपण बघणार आहोत.चला सुरवात करूया !

  • जमिनीची निवड- तुरी या पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी तुरी पिकासाठी जमीन हि पाण्याचा निचरा उत्तम होणारी असावी जमिनीचा सामू ह्या पिकासाठी ६.५ ते ७.५ पर्यंत असणे गरजेचे असते.
  • पेरणीची वेळ pulses sowing पेरणी हि ३० जून पर्यंत पूर्ण करून घ्यावी,पेरणी साठी जास्तीत जास्त १५ जुलै पर्यंत पेरणी करावी. हा उत्तम कालावधी असून उत्पादन वाढवण्यास हि वेळ फायदेशीर ठरते.
  • पेरणीची पद्धत- तुरीच्या पिकाचे सलग पिक घेण्यासाठी नियोजित अंतर ठेवणे गरजेचे असते सलग पिकासाठी ६० x २० से.मी. अंतराने पेरणी करावी. तुरीची पेरणी अंतरपिक मध्ये घ्यावयाचे झाल्यास ९० x २० से.मी. एवढे अंतर ठेवावे. वाणांची निवड करताना १३-१५ किलो/हेक्टार वाण मध्यम मुदतीचे, वाण जर उशीरा घेणाऱ्या वाणाची निवड करत असल्यास ५-६ किलो/हेक्टर.
  • बीजप्रक्रिया- तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.त्यासाठी पुढील उपाय करावा: पेरणीआधी ट्रायकोडर्मा ५ ग्राम किवा थायरम २ ग्राम + काबेन्डीन्झीम २ ग्राम यांचे एकजीव मिश्रण करून १ किलो बियाणास चांगले मुरवावे.
  • Pulses Market हवेमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते त्यांचे स्थिरीकरण करणे गरजेचे असते.त्याच बरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पिकांच्या गाठीच्या संख्येत वाढ होण्यासाठी पुढील उपाय करावा: रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो बियाणास लावल्यास एकत्रित समायोजन साधता येते.
  • खते- प्रती हेक्टरी २५ किलो नत्र ,५० किलो स्फुरद, ३० किलो पलाश, २५ किलो गंधक, १५ किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी शेतात मिसळवावे.
  • तुरीचे पिक घेत असताना आंतर पिकामध्ये तुर+ सोयाबीन (१:३) , तूर + उडीद(१:३), तूर + मुग(१:३) या पद्धतीने आंतर पिक घ्यावे.
  • पाणी व्यवस्थापन- पाण्याचे नियोजन महत्वाचे असते.पिकांना पहिले पाणी हे पिक फुला अवस्थेत असताना द्यावे व दुसरे पाणी शेंगात दाने भरताना द्यावे. पाण्यचे नियोजन करत असताना शेतात पाणी साचणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.
  • कीड नियंत्रण-
  • पहिली फवारणी- ५ % निबोळी अर्कची फवारणी करणे गरजेचे आहे.
  • दुसरी फवारणी- हेलीओकील HNVP 500 EL प्रती हेक्टर ५०० मिली पाण्यातून फवारणी गरजेची असते.
  • तिसरी फवारणी- इडोक्कासाकाब 14.5 AC 350 मिली किंवा इमामेक्तीन बेन्झोएट ५ % S.G. 200 ग्राम ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टार फवारणी करणे गरजेचे आहे.
  • रोग नियंत्रण-तूर पिकाचे नियंत्रण करण्यासाठी सुरवाती पासून विचार करणे गरजेचे आहे. तुरी वर येणाऱ्या रोगांमध्ये प्रामुख्याने मर आणि वांझ ह्या रोगाचा समावेश होतो सुरवाती पासून प्रतिकारक्षम वाणाची निवड केल्यास रोग नियंत्रित राहण्यास मदत मिळते.त्यासाठी पुढील वाणाची निवड शेतकरी बंधूनी करावी.BSMR716 गोदावरी,भीमा हि महात्मा फुले विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची निवड करू शकता.पेरणी पूर्वी वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
  • साठवणूक– तुरी ५-६ दिवस कडक उन्हात वाळवावे.त्यानंतर कोठीत साठवणूक करावी.

खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

pulses market

२) मुग:

  • जमिनीची निवड- मुग या पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी मुग पिकासाठी जमीन हि पाण्याचा निचरा उत्तम होणारी असावी.
  • पेरणीची वेळ pulses sowing- पेरणी हि १५-३० जून पर्यंत पूर्ण करून घ्यावी,पेरणी साठी जास्तीत जास्त ३ जुलै पर्यंत पेरणी करावी. हा उत्तम कालावधी असून उत्पादन वाढवण्यास हि वेळ फायदेशीर ठरते.
  • बीजप्रक्रिया- मुग उत्पादन वाढवण्यासाठी पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.त्यासाठी पुढील उपाय करावा: पेरणीआधी ट्रायकोडर्मा ५ ग्राम किवा थायरम २ ग्राम + काबेन्डीन्झीम २ ग्राम यांचे एकजीव मिश्रण करून १ किलो बियाणास चांगले मुरवावे.
  • हवेमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते त्यांचे स्थिरीकरण करणे गरजेचे असते.त्याच बरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पिकांच्या गाठीच्या संख्येत वाढ होण्यासाठी पुढील उपाय करावा: रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो बियाणास लावल्यास एकत्रित समायोजन साधता येते.
  • पेरणीची पद्धत- मुगच्या पिकाचे सलग पिक घेण्यासाठी नियोजित अंतर ठेवणे गरजेचे असते सलग पिकासाठी ३० x १० से.मी. अंतराने पेरणी करावी.१२-१५ किलो/हेक्टार वाणाची निवड करावी.
  • खते- प्रती हेक्टरी २0 किलो नत्र ,४० किलो स्फुरद, ३० किलो पलाश, हि सर्व खाते पेरणीच्या वेळी देणे गरजेचे असते.
  • Pulses Market मुग पिकासोबत आंतरपीक घ्यावयाचे पिके: तूर + मुग (१ : ३) ,कापूस + मुग (२:१) ,मुग + ज्वारी (२:१) ह्या प्रमाणात घ्यावी.
  • पाणी व्यवस्थापन-मुग पिकाचे वैशिष्ट म्हणजे हे पिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे पिक आहे प्रामुख्याने पिक फुला अवस्थेत असताना व शेंगामध्ये दाने भरताना पिकांना पाण्याचा ताण पडणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे.
  • कीड नियंत्रण- रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मुगावर जास्त प्रमाणात असतो यावेळी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करणे फायद्याचे ठरते.
  • रोग नियंत्रण- मुग या पिकावर विषाणुजन्य रोगांच प्रादुर्भाव उधवतो त्यामध्ये प्रामुख्याने भरी व पिवळा ह्या विशानुज्य प्रादुर्भाव आढळतो. यामध्ये पिवळा विषाणू याचा प्रसार हा पांढरी माशी ह्या किडीन मार्फत होत असतो.त्यासाठी पुढील उपाय करावा: सापळे रचणे एका एकरात १६ पिवळे व ५ निळे चिकट द्रव्याचे सापळे लावावीत.
  • साठवणूक-Pulses Market मुग पिकाची पहिले तोडणी हि मुगाच्या शेंगा ७५-८० % वाळल्यावर करावी व पुढील तोडणी हि ८-१० दिवसांनी करावी.शेंगा पूर्णपणे वळल्यावरच शेंगांची मळणी करावी.

खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

३) उडीद:

  • जमिनीची निवड- उडीद या पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी उडीद पिकासाठी जमीन हि पाण्याचा निचरा उत्तम होणारी असावी.
  • पेरणीची वेळ Pulses sowing पेरणी हि १५-३० जून पर्यंत पूर्ण करून घ्यावी हा उत्तम कालावधी असून उत्पादन वाढीसाठी लाभदायक आहे.
  • बीजप्रक्रिया-उडीद उत्पादन वाढवण्यासाठी पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.त्यासाठी पुढील उपाय करावा: पेरणीआधी ट्रायकोडर्मा ५ ग्राम किवा थायरम २ ग्राम + काबेन्डीन्झीम २ ग्राम यांचे एकजीव मिश्रण करून १ किलो बियाणास चांगले मुरवावे.
  • हवेमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते त्यांचे स्थिरीकरण करणे गरजेचे असते.त्याच बरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पिकांच्या गाठीच्या संख्येत वाढ होण्यासाठी पुढील उपाय करावा: रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो बियाणास लावल्यास एकत्रित समायोजन साधता येते.
  • पेरणीची पद्धत- उडीदच्या पिकाचे सलग पिक घेण्यासाठी नियोजित अंतर ठेवणे गरजेचे असते सलग पिकासाठी ३० x १० से.मी. अंतराने पेरणी करावी.१५-२० किलो/हेक्टर वाणाची निवड करावी.
  • खते- प्रती हेक्टरी २५ किलो नत्र ,५० किलो स्फुरद, ३० किलो पलाश, २५ किलो गंधक, १५ किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी शेतात मिसळवावे.
  • Pulses Market उडीद पिक घेत असताना आंतर पिकामध्ये तुर+ उडीद (२ :४ )
  • पाणी व्यवस्थापन-उडीद पिकाचे वैशिष्ट म्हणजे हे पिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे पिक आहे प्रामुख्याने पिक फुला अवस्थेत असताना व शेंगामध्ये दाने भरताना पिकांना पाण्याचा ताण पडणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे.
  • कीड नियंत्रण- उडीद या पिकावर विशेषता केसाळ अळीचा ,शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव येत असतो यासाठी पुढील उपाय करावा: किनोल्फ्योस २५ % ई.सी. १००० मिली ५०० लिटर पाण्यातून फवारल्यास फायदेशीर ठरतो. फ्लयुबेंडामाईड ३९.३५ % प्रवाही २ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • रोग नियंत्रण- उडीद पिकावर लीफ क्रीकल या रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त आढळत असतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाडावर दिसत असल्यास झाडे उपटून नष्ट करणे फायद्याचे ठरते.
  • साठवणूक- उडीद पिकाची साठवणूक कापणी झाल्यावर मळणी करणे गरजेचे आहे.साठवणूक करत असतना ५ % या प्रमाणात कडूनिमबाचा पाला खालवावा.

खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

pulses market

४)कुलथी व मटकी:

  • कुलथी व मटकी या दोन्ही पिकांसाठी एकसमान नियोजन सुचविल्या जाते.
  • जमिनीची निवड- दोन्ही पिकासाठी जमिनिची निवड करत असताना हलकी ते मध्यम जमिनीची निवड करावी.
  • पेरणीची वेळPulses sowing पिकांच्या पेरणी वेळ हि जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करणे गरजेचे असते.
  • पेरणीची पद्धत- कुलथी व मटकी पिकाचे सलग पिक घेण्यासाठी नियोजित अंतर ठेवणे गरजेचे असते सलग पिकासाठी ३० x १० से.मी. अंतराने पेरणी करावी.१२-१५ किलो/हेक्टर वाणाची निवड करावी.
  • बीजप्रक्रिया-Pulses Market बीजप्रक्रिया दोन्ही पिकासाठी सारखी असून त्यासाठी पेरणीआधी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती किलो बियाणास एकजीव करून चोळावे.
  • खते- खताचे नियोजन करताना १५ किलो नत्र + २५ किलो स्फुरद प्रती हेक्टार शेतात मिसळणे फायद्याचे ठरते.
  • आंतरपीक- बाजरी ह्या पिकाचा समावेश दोन्ही पिक घेत असताना करावा.
  • पाणी व्यवस्थापन- पाण्याचा ताण पडणार नाही (फुले व शेंगा येणाच्या अवस्थेत), ताण पडल्यास पाणी द्यावे.
  • कीड नियंत्रण- कुलथी व मटकी ह्या पिकावर फुलकिडे, तुडतुडे आणि पाने खाण्याच्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.त्यासाठी पुढील उपाय करावा: डायमेथोएट ३० % ५०० मिली + ५०० लिटर पाणी प्रती हेक्टार फवारणी करावी.
  • साठवणूक- पिकाची कापणी केल्या नंतर आपटून मळणी करावी. धान्य ५ – ६ दिवस कडक उन्हात वळवून घ्यावे त्यानंतर कोठीत साठवणूक करावी.

खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

५) राजमा:

  • जमिनीची निवड-राजमा पिकाची लागवड करत असल्यास जमीन हि भारी व काळी कसदार जमिनीची निवड शेतकरी बंधूनी करावी.
  • पेरणीची वेळPulses sowing पेरणीचा कालावधी हा जून च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत पेरणी करावी.
  • पेरणीची पद्धत- राजमा पिकाची लागवड हि ३० x १५ सेमी ह्या अंतराने करावी. १२० किलो प्रती हेक्टार बियाणे पुरेशे असते.
  • बीजप्रक्रिया- राजमा पिकाची बीज प्रक्रिया करत असताना २५० ग्राम रायझोबियम १२-१५ किलो बियाणासाठी गुळाच्या थंड द्रावणातून एकजीव मिश्रण करावे.
  • खते- राजमा पिकासाठी खताचे प्रमाण हे ३० किलो नत्र त्याचबरोबर ८० किलो स्फुरद पेरणी करताना देणे बंधन कारक आहे. पुढील मात्रा हि २० दिवसांनी राजमा पिकास द्यावी,त्यावेळी ३० किलो नत्राची मात्रा ठेवावी.
  • आंतरपीक- राजमा + तूर (२:६) ,राजमा + कापूस (२:६)
  • पाणी व्यवस्थापन- पाण्याचा ताण पडणार नाही (फुले व शेंगा येणाच्या अवस्थेत), ताण पडल्यास पाणी द्यावे.
  • साठवणूक- राजमा पिकाची साठवणूक कापणी झाल्यावर मळणी करणे गरजेचे आहे.साठवणूक करत असतना ५ % या प्रमाणात कडूनिमबाचा पाला खालवावा.

खरीप कडधान्याची शाश्वत लागवड पद्धती

६) चवळी:

pulses market

Pulses Market:

  • जमिनीची निवड- चवळी या पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी चवळी पिकासाठी जमीन हि पाण्याचा निचरा उत्तम होणारी असावी.
  • पेरणीची वेळPulses sowing पेरणी हि १५ जून ते ७ जुलै पर्यंत केल्यास पिकांचे नियोजन करण्यास अधिक फायदा होतो.
  • पेरणीची पद्धत- चवळीच्या पिकाचे सलग पिक घेण्यासाठी नियोजित अंतर ठेवणे गरजेचे असते सलग पिकासाठी ४५ x १० से.मी. अंतराने पेरणी करावी.१५-२० किलो/हेक्टर वाणाची निवड करावी.
  • बीजप्रक्रिया- पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे बंधन कारक आहे त्यासाठी पेरणीआधी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती किलो बियाणास एकजीव करून चोळावे.
  • खते-चवळी पिकासाठी खताचे नियोजन करताना २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पेरणी करताना प्रती हेक्टार द्यावे.
  • आंतरपीक-अंतर पिकामध्ये चवळी + तूर (२:१) किंवा चवळी + कापूस (२:६)
  • पाणी व्यवस्थापन- पाण्याचा ताण पडणार नाही (फुले व शेंगा येणाच्या अवस्थेत), ताण पडल्यास पाणी द्यावे.

शेतकरी मित्रानो, वाढत्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत ढासळल्याचे विविध भागातील मातीच्या परीक्षनातून समोर आले आहे.त्याचा थेट परिणाम हा उत्पादन वर होत असून पिकांची लागवड करत असताना कडधान्य पिकांचा समावेश शेती मध्ये केल्यास जमिनीचा पोत सुधारतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Visit Dr.pdkv site