E Pik Pahani kashi karavi :
E Pik Pahani 2025:महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत ई पिक पाहणी राबवण्यात येत असून हा एक महात्वाकांशी आणि दूरदृष्टी प्रकल्प आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी स्वतःहून , पारदर्शक व अचूक पद्धतीने करावयाची सुविधा पुरवते.”माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पिक पेरा” हे या प्रकल्पाचे घोषवाक्य असले तरी सध्या परिस्थिती बघता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.
E Pik Pahani 2025 / ई पिक पाहणी ॲप हे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे साधन असले तरी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना बऱ्याच आव्हानांना समोर जावे लागत आहे. शेतकरी बंधुनो, काळजी करू नका आम्ही तुम्हाला या लेखात E Pik Pahani 2025 साठी सोप्या भाषेत ई पिक पाहणीची प्रक्रिया सागणार आहोत. तुमच्या तांत्रिक अडचणीसाठी आम्ही पुढे उपाय सुचविले आहेत. चला सुरवात करूया !

kharip pik pahani 2025 :
e- pik pahani 2025:
शेतकरी बंधुनो, डिजिटल प्रणालीद्वारे संकलित केलेली हि माहिती फक्त कागदोपत्री नोंदणीसाठी मर्यादित नसून ती थेट विविध सरकारी योजनांशी जोडण्यात येते. म्हणूनच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची नोंद ई पिक पाहणी ॲप द्वारे करणे आता अत्यंत महत्वाचे झाले आहे. पिक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी , शेतमालाची खरेदी हि किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत करण्यासाठी, नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी त्याचबरोबर कृषी कर्जासाठी पात्र ठरण्यासाठी देखील ई- पिक पाहणीतील नोंदणी आता एक अनिवार्य अट करण्यात आली आहे.
kharip pik pahani 2025 ह्या प्रकल्पाचे महत्व आता इतके वाढले आहे कि, ई पिक पाहणीतील माहितीलाच / नोंदणीला अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य मानल्या जाते. याद्वारे पेरा व प्रत्यक्ष पिक यांच्या मध्ये काही तफावत असल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. हा महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणारा प्रकल्प फक्त डेटा गोळा करीत नसून तो सरकारच्या योजनासाठी पात्र ठरण्याचा एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करतो.
Latest News: नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा ! लगेच तपासा तुमची स्थिती
e pik pahani last date 2025 ( ई-पिक पाहणी मुदत ) :
खरीप हंगाम २०२५-२६ साठी ई पिक पाहणीतील महत्वाचे अपडेट्स :
खरीप हंगाम 2025-26 ई पिक पाहणी प्रक्रियेला सुरवात झाली असून यंदाच्या हंगामासाठी महाराष्ट शासनाने E Peek Pahani (DCS) व्हर्जन 4.0.0.0 हे मोबाईल ॲप अद्यावत स्वरूपात गुगल प्लये स्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल ॲप चे जुने व्हर्जन आहे त्यांनी ते व्हर्जन अनइंस्टोल करून नवीन E Peek Pahani (DCS) ॲप डाऊनलोड करावे किंवा जुने ॲप अपडेट करून घ्यावी असे केल्यास तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता कमी होते.
खरीप हंगाम २०२५-२६ साठीचे पिक पाहणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून शेतकरी बंधूनी स्वतःच्या स्तरावर पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे. या नंतरचा कालावधी म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ ते २९ ऑक्टोंबर २०२५ ह्या काळात तलाठी आणि इतर सहाय्यक स्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी करतील. शेतकऱ्यांनो E Pik Pahani 2025 साठी सहायकावर अवलंबून न राहता स्वतःच शक्य तितक्या लवकर ई पिक पाहणी पूर्ण करावी असे आव्हान महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यानो, पिक विमा व ई पिक पाहणी यांच्यातील संबंध अधोरेखित करणे गरजेचे आहे कारण प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख हि ३१ जुलै २०२५ होती. तर ई पिक पाहणीची अंतिम तारीख हि १४ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे. ह्या दोन्ही तारखा वेगवेगळ्या ठेवण्याचे कारण कि बरेचसे शेतकरी अनेकदा ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
शेतकरी बंधुनो,kharip pik pahani 2025 नोंद वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळेच पिक विमा व ई पिक पाहणी या दोन्ही प्रक्रिया परस्परपूरक आहेत.
E Pik Pahani App 2025:
ई पिक पाहणी ॲप वापरण्याचे सविस्तर मार्गदर्शन :
ई पिक पाहणी कशी करावी ? E-Pik Pahani online Registration

ॲप वापरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असून पुढे सांगितलेल्या पद्धतीने ती सहज पूर्ण करता येते.
पूर्वतयारी: ई पिक पाहणी करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुमच्याकडे चांगल्या इंटरनेटचा मोबाईल फोन आणि त्यामध्ये GPS (Global Positioning System) चालू असणे अत्यंत गरजचे आहे. शेतातून फोटो अपलोड करत असताना नेटवर्कची समस्या येऊ शकते त्यामुळे ज्याठिकाणी नेटवर्क उत्तम असेल अशा ठिकाणी उभे राहून हि प्रक्रिया करणे सोयीस्कर ठरते.
पायरी १- ॲप डाऊनलोड करा
- तुमच्या मोबाईल मधील GOOGLE PLAY STORE APP मध्ये जाऊन E PEEK PAHANI (DCS) हे ॲप शोधा व डाऊनलोड करा किंवा डाऊनलोड करण्यासाठी नावावर क्लिक करा. जुने ॲप असल्यास अपडेट करून घ्या.
पायरी २- ॲप उघडल्यावर तुम्हाला विभागाचे नाव, जिल्हा, तालुका व गाव निवडायचे आहे.
पायरी ३- आता शेतकरी म्हणून लॉगीन करावयाचे आहे. त्यासाठी,
- ” शेतकरी म्हणून लॉगीन करा हा पर्याय निवडा” आता तुमच्या मोबाईल नंबर प्रविष्ठ करा. हे करताच तुम्हाला तुमच्या मोबाईल वर OTP येईल ( ONE TIME PASSWORD) टो प्रविष्ठ करा व लॉगीन करून घ्या.
- येथे तुम्ही E Pik Pahani 2025 साठी लॉगीन ची प्रक्रिया पूर्ण करता.
पायरी ४- खातेदाराची निवड व माहिती नोंदणी
- लॉगीन केल्या नंतर “खातेदाराचे नाव” हा पर्याय तुम्हाला दिसेल किंवा तुमचे नाव आधीपासूनच नोंदणीकृत असल्यास ते निवडा, जर तुमचे नाव नसेल तर “नवीन खातेदार नोंदणी करा” हे बटन दाबून नोंदणी करून घ्या.
- खातेदार शोधण्यासाठी नाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी एक पर्याय निवडा. हि प्रक्रिया पूर्ण होताच ॲप तुम्हाला एक सांकेतिक क्रमांक देईल. जो तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवायचा आहे.(E Pik Pahani 2025 ह्याचा Screenshot काढून घ्या)
पायरी ५- पिकांची माहिती नोंदवणे
- आता तुम्हाला “पिक माहिती नोंदवा” हा पर्याय निवडायचा आहे. ह्या पर्यायात खाते क्रमांक व गट क्रमांक निवडायचा आहे.
- आता “खरीप हंगाम निवडा” त्यामध्ये पिकाचा वर्ग (निर्बळ पिक / मिश्र पिक), लागवडीचे शेत्र व लागवडीची दिनांक प्रविष्ठ करा (नोट: मिश्र पिकांमध्ये एक मुख्य पिकासह तीन दुय्यम पिकांचा समावेश नोंदविता येतो)
पायरी ६- सिंचनाची माहिती.
- तुमची जमीन जर सिंचनाखाली असेल तर जलसिंचनाचे साधन नमूद करा उदा: विहीर , बोरवेल, त्याच बरोबर जलसिंचनाची पद्धत नमूद करा उदा: तुषार सिंचन , ठिबक सिंचन.
पायरी ७- पिकांचा फोटो अपलोड करणे
- E Pik Pahani 2025 च्या अतिक्षय महत्वाच्या टप्यात आपण आता आलो आहोत.
- आता ॲप मधील “पिकाचा फोटो काढा” ह्या पर्यायावर क्लिक करा.
- शेतकऱ्यानो पिकाचा फोटो हा शेताच्या मध्यभागी उभे राहून काढणी महत्वाचे आहे.
- ॲप आपोआपच GPS च्या सहायाने अक्षांश आणि रेखांश (latitude and longitude) नोंदवीत असतो. यामुळे ॲप वरील नोंदविलेली माहिती अचूक असल्याचे सिद्ध होते.
- १.बांधा वरील झाडे व पड जमिनीची नोंद.
- E Pik Pahani 2025 साठी नोंदणी करताना तुम्हाला बांधावरील झाडे व त्यांचा प्रकार उदा: आंबा , नारळ. नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- २.कायम पड आणि चालू पड जमिनीची माहिती भरून त्या शेत्राचा फोटो अपलोड करावा.
पायरी ८- नोंदणीची पडताळणी व दुरुस्ती.
- सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्या व त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
- माहिती सबमिट केल्यानंतर काही दुरुस्ती करावयाची असल्यास ४८ तासांच्या आत एकदाच दुरुस्ती करू शकता.
ई पिक पाहणी ॲप तांत्रिक अडचणी व उपाययोजना :
आम्ही समजू शकतो कि तुम्हाला E Pik Pahani 2025 साठी नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. या अडचणीवर मात करण्यासाठी व प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पुढील उपयोजना केल्या जाऊ शकतात.
१.नेटवर्क किंवा सर्व्हर ची समस्या:
- गाव खेड्यामधील भागात कुमकुवत नेटवर्क असल्यामुळे फोटो अपलोड करताना समस्या येऊ शकतात.
- त्यासाठी, फोटो अपलोड करते वेळी ज्या ठिकाणी मोबाईल चे नेटवर्क उत्तम असेल अशा ठिकाणाहून फोटो अपलोड करावा.
२.GPS आणि लोकेशन ट्रकिंगची समस्या :
- बहुतांश शेतकऱ्यांना हीच समस्या उद्भवत आहे ज्यामुळे फोटोचे अचूक अक्षांश रेखांश नोदाविले जात नाही.
- उपाय: तुमच्या मोबाईल मध्ये GPS चालू आहे व ॲप ने त्याला परवानगी दिली असल्याची खात्री करून घ्या त्यासाठी, मोबाईल च्या Settings मध्ये जा >> App Permission मध्ये जा >> E PEEK PAHANI (DCS) हे ॲप शोधा >> सर्व Permission On करा.
३.गट क्रमांक दिसत नाही.
सर्वेक्षण नंबर अचूक टाकल्यानंतरही गट क्रमांक दिसत नाही. यामुळे पिकांची माहिती भरण्यास अडथळा येतो.
- उपाय: सर्वप्रथम महाराष्ट शासनाने E Peek Pahani (DCS) व्हर्जन 4.0.0.0 हे मोबाईल ॲप अद्यावत स्वरूपात गुगल प्लये स्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल ॲप चे जुने व्हर्जन आहे त्यांनी ते व्हर्जन अनइंस्टोल करून नवीन E Peek Pahani (DCS) ॲप डाऊनलोड करावे किंवा जुने ॲप अपडेट करून घ्यावी असे केल्यास तांत्रिक अडचणी येणार नाही, तरीसुद्धा E Pik Pahani 2025 साठी नोंदणी करताना गट क्रमांक दिसत नसेल तर, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा किंवा पुढील मदत पर्यायांचा वापर करा
४.मदतीसाठी संपर्क कोठे करायचा :
E Pik Pahani 2025 साठी राज्यस्तरीय मदत कक्ष: अधिकृत फोन नंबर ०२०-२५७१२७१२ ह्या नंबर वर कॉल करू शकता.
ई-मेल सपोर्ट: E Pik Pahani App 2025 सपोर्टसाठी app.mahabhumi@gmail.com या ई-मेल आयडी वर तुमच्या समस्यांची माहिती पाठू शकता.
स्थानिक मदत: शेतकऱ्यानो प्रत्येक गावासाठी (E Pik Pahani 2025 साठी) पिक पाहणी सहाय्यक आणि तलाठ्याची नियुक्ती करण्यात आली असून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता ते तुम्हाला प्रत्यक्ष मदत करतील.
वरील उपयोजनाचा वापर करून तुम्ही E Pik Pahani App मधील तांत्रिक अडचणींवर मात करू शकता.
kharip pik pahani 2025 आमच्या कडून मदत लागल्यास Comment मध्ये नक्की सांगा ! आम्ही लवकरात लवकर तुमच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू.! धन्यवाद !
शेतकऱ्यांनो ५०,००० पर्यंतचे बक्षीस जिंका ! पात्रता, नियम, आणि अर्ज प्रक्रिया
हेहीवाचा: शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा | सरकार देणार ५० % खर्च