Pik Vima 2025-26 Maharashtra :
Pik Vima 2025-26:सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२५-२६ या वर्षासाठी “कप आणि कॅप” मॉडेल (८०:११०) नुसार महाराष्ट्रात लागू करण्यात येत असून या मॉडेलनुसार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्यास विमा कंपन्यावरील आर्थिकभार हा मर्यादित राहातो व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. Pik Vima 2025-26 योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीटक व रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण दिले जाते. अनपेक्षित नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी हि योजना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करते. सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२५-२६ साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून ह्या लेखात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विविध पिकांसाठी आर्थिक संरक्षण दिले जाते. ज्यामुळे शेतकरी बंधूना त्यांच्या शेतात अधिक लवचिक नियोजन साधता येते या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण दिले जाते.
Pik Vima Yojana 2025-26 समाविष्ट पिके :
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत समाविष्ट पिकांची वर्गवारी पुढील प्रमाणे आहे.
१) तृणधान्य व कडधान्य पिके :
- खरीप हंगाम २०२५ : भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मुग, तूर, मका, उडीद इत्यादी एकूण ८ पिकांचा समावेश होतो.
- रब्बी हंगाम २०२५-२६: गहू(बागायती), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात.
२) गळीत धान्य पिके :
- खरीप हंगाम २०२५ : भुईमुग, कारळे, तीळ, सोयाबीन (४ पिके)
- रब्बी हंगाम २०२५-२६: उन्हाळी भुईमुग (१पिक)
३) नगदी पिके:
- खरीप हंगाम २०२५ : कापूस, खरीप कांदा ( २ पिके )
- रब्बी हंगाम २०२५-२६: रब्बी कांदा ( १पिक)
शेतकरी बंधुनो, महाराष्ट्रातील अधिसूचित शेत्रासाठी खरीप हंगामातील भात(धान) व उन्हाळी भात पिक अधिसूचित करण्यात आले असून यासाठी उंबरठा उत्पादन व चालू वर्षाचे सरासरी उत्पादन हे तांदूळ गृहीत धरून निश्चित केले जाईल.
Pik Vima 2025-26 योजनेंतर्गत अन्नधान्य, कडधान्य, व नगदी पिकांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची लागवड करताना अधिक पिकांच्या पर्यायाची लवचिकता मिळते. याद्वारे शेतकरी फक्त पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता कापूस व कांदा या सारख्या अधिक फायदेशीर परंतु जोखमीच्या नगदी पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहित होईल. यामुळे पिकांच्या विविधीकरणाला प्रोत्साहन दिले जाते व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत मिळते. यातून कृषी शेत्रात गतिमान विकास व स्पर्धात्मकता वाढण्यास मदत मिळेल.
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना वैशिष्टे:
१) नैसर्गिक आपत्ती, रोग व किडींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्टे आहे.
२) हवामानातील वाढत्या बदलांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकूवून ठेवणे त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबण्यापासून त्यांचे संरक्षण करणे.
३) विमा संराक्षानामुळे शेतकरी बंधू नवीन तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहित होऊन त्यांचा वापर करण्याचे धाडस करतील ज्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याची व शेती अधिक कार्यक्षम बनवण्याची संधी उपलब्ध होईल.
४) प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना उत्पादनातील जोखमी पासून संरक्षण देते. ज्याद्वारे अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण व कृषी शेत्रात गतीमान विकास आणि स्पर्धात्मकता वाढीस लागेल विमासंरक्षण प्राप्त झाल्यामुळे बँका शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देण्याचा धोका आपोआप कमी होतो. ज्यामुळे पतपुरवठ्यात सातत्य राखण्यास आणखी मदत मिळेल.
५) हि योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एच्छिक स्वरुपाची ठेवण्यात आली असून, अधिसूचित शेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जमीन धारकाव्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील Pik Vima 2025-26 योजनेंतर्गत भाग घेता येतो त्यांना देखील विमा संरक्षण प्राप्त होते अट फक्त एकच कि, भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे राहील.
६) सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण दिले जाते. हि योजना महाराष्ट्र शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूलमंडळ किंवा तालुकास्तरावर लागू केली जाईल.
प्रधानमंत्री पिक विमा योजना विमा हप्ता दर व अनुदान :
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२५-२६ नुसार (Pik Vima 2025-26)
- खरीप हंगामातील पिकांसाठी एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या २%.
- रब्बी हंगामातील पिकांसाठी एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या १.५%.
- खरीप व रब्बी हंगामामधील नगदी पिकांच्या एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ५%
शेतकरी बंधुनो, जो दर प्रत्यक्षात कमी असेल तो दर लागू राहील. ( शेतकऱ्याने भरावयाचा मर्यादित दर / वास्तवदर्शी दर )
Pik Vima 2025-26 सरकारचे अनुदान :
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा वजा केल्यानंतर उर्वरित हप्त्याची रक्कम हि केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाते.
- योजनेंतर्गत कोरडवाहू पिकांसाठी केंद्राचा हिस्सा ३० % पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.
- योजनेंतर्गत बागायती पिकांसाठी केंद्राचा हिस्सा २५ % पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून मिळणारे अनुदान: राज्याच्या अनुदानाची रक्कम आयुक्तालय स्तरावर एका विशिष्ट स्वतंत्र ESCROW खात्यात जमा केली जाईल.
जोखीमस्तर आणि उंबरठा उत्पादान :
सुधारित योजनेमध्ये खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर जा ७० % निश्चित करण्यात आला आहे.
उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षाच्या सरासरी उत्पादनाला पिकांच्या जोखीमस्तराला गुणून सुनिचीत केले जाते.
विमा क्षेत्रिय घटक :
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pik Vima 2025-26) हि “विमा क्षेत्रीय घटक” ( Area Approach) नुसार राबविली जाते. पिक निहाय अधिसूचित विमा क्षेत्र घटक यादी मार्गदर्शक सूचनेत दिली आहे.
सरासरी पिक उत्पादन मोजण्यासाठी प्रत्येक पिकासाठी विमा शेत्र निच्छित करण्यात आले असून त्यापद्धतीने पिक कापणी प्रयोग केले जातात.
- जिल्हास्तरावर : २४ प्रयोग
- तालुकास्तरावर : १६ प्रयोग
- महसूलमंडळ स्तरावर : १० प्रयोग
- ग्रामपंचायत स्तरावर : ४ प्रयोग
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे वेळापत्रक :
शेतकरी बंधुनो, आता आपण अतिक्षय महत्वाच्या टप्यावर पोहचलो आहोत. “शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या तारखा” प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी व संबंधित संस्थांनी ठरवून दिलेल्या तारखांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी अंतिम मुदत देण्यात आली असून ज्याचे पालन न केल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.Pik Vima 2025-26 साठी हंगामानुसार महत्वाच्या तारखा सांगितल्या आहेत व्यवस्थित लक्षात घ्या. योजने संबंधित तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही ह्या माहितीच्या आधारेच जाब विचारू शकता
खरीप हंगाम २०२५ :
१) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे / विमा हप्ता भरणे : ३१ जुलै २०२५ .
२) कार्जदार शेतकऱ्यांनी पिक बदलाची सूचना बँकेला देणे : विमा नोंदणीच्या अंतिम तारखेच्या २ कार्यालयीन दिवसाआधी बँकेला कळवणे गरजेचे राहील.
३) कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी न होण्यासाठी बँकेला सूचना देणे : विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवसा अगोदर बँकेला कळवणे गरजेचे राहील.
४) बँकांनी विमा हप्ता कंपनीकडे पाठवणे व माहिती पोर्टलवर नोंदवणे : शेतकरी सहभागाच्या अंतिम तारखेनंतर १५ दिवसाच्या आत हि प्रक्रिया बँकांनी पूर्ण करणे गरजेचे आहे.
५) विमा कंपन्यांनी बिगर कर्जदार शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर नोंदवणे : अर्ज व हप्त्याची रक्कम मिळाल्यापासून २ दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदवणे गरजेचे आहे.
६)Pik Vima 2025-26 विमा कंपन्यांनी शेतकऱ्याच्या सहभागाची माहिती स्वीकारणे / नाकारणे :
- कर्जदार शेतकरी :- विमा नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर १५ दिवसाच्या आत.
- बिगर कर्जदार शेतकरी:- विमा नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर ३० दिवसाच्या आत
७) सेवा केंद्र/ बँक / विमा प्रतिनिधी ह्यांनी प्रस्तावातील चुका दुरुस्त करणे: विमा कंपनीने सूचना दिल्या पासून ७ दिवसाच्या आत चुका दुरुस्त कराव्यात.
८) विमा कंपनीने दुरुस्त केलेला प्रस्ताव स्वीकारणे : सेवा केंद्र / बँक/ विमा प्रतिनिधी ह्यांनी चुका दुरुस्त केल्यानंतर ७ दिवसाच्या आत स्वीकाराव्यात.
९) बँक / विमा कंपनी ने शेतकऱ्याला पोहच पावती देणे : विमा कंपनीने पोर्टल वर माहिती स्वीकारल्यापासून ७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पोहच पावती देणे बंधनकारक राहील.
१०) विमा कंपनीनी सहभागाची माहिती मंजूर करण्याची अंतिम तारीख : Pik Vima 2025-26 शेतकरी सहभागाच्या अंतिम तारखेनंतर ६० दिवसांच्या आत माहिती मंजूर करणे बंधनकारक आहे.
सरासरी उत्पादनाची आकडेवारी सादर करण्याच्या तारखा :
Pik Vima 2025-26 Maharashtra
सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारखा :-
- मुग व उडीद : १५ नोव्हेंबर
- इतर खरीप पिके ( तूर, कापूस , कांदा वगळता ) : ३१ जानेवारी
- कापूस : २८ फेब्रुवारी
- तूर व कांदा : ३१ मार्च
सरासरी उत्पादनाची आकडेवारी व अनुदान मिळाल्यानंतर ३ आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देणे बंधनकारक राहील.
रब्बी हंगाम २०२५-२६ :
Pik Vima 2025-26
१) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे / विमा हप्ता भरणे :-
- रब्बी ज्वारी : ३० नोव्हेंबर २०२५
- गहू ( बागायती ), हरभरा, कांदा व इतर पिके : १५ डिसेंबर २०२५
- उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग:- ३१ मार्च २०२६
मुद्दा क्रमांक २ ते १० सारखेच नियम आहेत थेट सरासरी उत्पादनाच्या आकडेवारीचा मुद्दा वाचू शकता.
२) कार्जदार शेतकऱ्यांनी पिक बदलाची सूचना बँकेला देणे : विमा नोंदणीच्या अंतिम तारखेच्या २ कार्यालयीन दिवसाआधी बँकेला कळवणे गरजेचे राहील.
३) कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी न होण्यासाठी बँकेला सूचना देणे : विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवसा अगोदर बँकेला कळवणे गरजेचे राहील.
४) बँकांनी विमा हप्ता कंपनीकडे पाठवणे व माहिती पोर्टलवर नोंदवणे : शेतकरी सहभागाच्या अंतिम तारखेनंतर १५ दिवसाच्या आत हि प्रक्रिया बँकांनी पूर्ण करणे गरजेचे आहे.
५) विमा कंपन्यांनी बिगर कर्जदार शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर नोंदवणे : अर्ज व हप्त्याची रक्कम मिळाल्यापासून २ दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदवणे गरजेचे आहे.
६)Pik Vima 2025-26 विमा कंपन्यांनी शेतकऱ्याच्या सहभागाची माहिती स्वीकारणे / नाकारणे :
- कर्जदार शेतकरी :- विमा नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर १५ दिवसाच्या आत.
- बिगर कर्जदार शेतकरी:- विमा नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर ३० दिवसाच्या आत
७) सेवा केंद्र/ बँक / विमा प्रतिनिधी ह्यांनी प्रस्तावातील चुका दुरुस्त करणे: विमा कंपनीने सूचना दिल्या पासून ७ दिवसाच्या आत चुका दुरुस्त कराव्यात.
८) विमा कंपनीने दुरुस्त केलेला प्रस्ताव स्वीकारणे : सेवा केंद्र / बँक/ विमा प्रतिनिधी ह्यांनी चुका दुरुस्त केल्यानंतर ७ दिवसाच्या आत स्वीकाराव्यात.
९) बँक / विमा कंपनी ने शेतकऱ्याला पोहच पावती देणे : विमा कंपनीने पोर्टल वर माहिती स्वीकारल्यापासून ७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पोहच पावती देणे बंधनकारक राहील.
१०) विमा कंपनीनी सहभागाची माहिती मंजूर करण्याची अंतिम तारीख : Pik Vima 2025-26 शेतकरी सहभागाच्या अंतिम तारखेनंतर ६० दिवसांच्या आत माहिती मंजूर करणे बंधनकारक आहे.
सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारखा :-
- रब्बी पिके :- ३१ जुलै २०२६
- उन्हाळी भात व कांदा : ३१ ऑगस्ट २०२६
- उन्हाळी भुईमुग : ३१ ऑक्टोबर २०२६
सरासरी उत्पादनाची आकडेवारी व अनुदान मिळाल्यानंतर ३ आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देणे बंधनकारक राहील.
कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी:
महाराष्ट्रातील जिल्हे | पिक विमा कंपनी |
---|---|
अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे , यवतमाळ, अमरावती, गडचिरोली. | भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स मरोळ, अंधेरी पूर्व मुंबई – ४०००५९ इमेलid- pikvima@aicofidia.com |
धाराशिव , लातूर , बीड | आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. माणिकचंद आयकॉन, ३ रा मजला , प्लॉट नं.२४६ सी विंग, बंडगार्डन पुणे-४११००१ |
प्रधानमंत्री पिक विमा योजना आवश्यक कागदपत्रे :
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक ची प्रत
- स्वयंघोषणापत्र
- करारनामा ( भाडेपट्टीवर असल्यास)
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्जप्रक्रिया :
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खालील ठिकाणी नोंदणी करू शकतात.
- आपले सरकार सेवा केंद्र
- प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था
- बँक
- ऑनलाईन www.pmfby.gov.in

ऑनलाईन अर्जप्रक्रियेची संपूर्ण माहिती / अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
- शेतकरी बंधुनो, आता ह्या योजनेत भाग घेण्यासाठी AgriStack नोंदणी क्रमांक आणि ई-पिक पाहणी मधील नोंद बंधनकारक करण्यात आली असून. ई-पिक पाहणी मध्ये नोंदविलेल्या पिकांचा व विमा घेतलेल्या पिकांमध्ये तफावत आढळून आल्यास विमा अर्ज रद्द केल्या जाऊ शकतो आणि तुम्ही भरलेल्या विमा हप्ता देखील जप्त केला जाऊ शकतो.
हेही वाचा : AgriStack नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा
- कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग आता एच्छिक करण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्याला योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र बँकेला सादर करावे. त्यांना योजनेतून वगळण्यात येईल.
योजनेसंबंधित महत्वाच्या अटी व शर्ती :
Pik Vima 2025-26
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी काही महत्वाचे नियम आणि कायदेशीर तरतुदी ठरवण्यात आल्या असून हे नियम शेतकरी, विमा कंपनी आणि बँका ह्या सर्वांसाठी लागू होतात.
१) विमा हप्ता वेळेत न मिळाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास व त्यामध्ये बँक व वित्तीय संस्थाची चूक आढळल्यास तर, नुकसान भरपाईची जबाबदारी हि संबंधित बँक व वित्तीय संस्थांची राहील.
२) Pik Vima 2025-26 कर्जदार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावात चुकीची माहिती आढळल्यास व ती माहिती बँक वित्तीय संस्थेने पुरविली असल्यास नुकसान भरपाईची जबाबदारीही त्यांचीच राहील.
३) पिक कर्ज मंजूर झाल्यावर, विमा प्रस्ताव सादर केल्यानंतर हप्ता भरल्यावर व पिक उगवण्याच्या उद्देशाने स्पष्ट झाल्यावरच विमा कंपनी कडून जोखमीची स्वीकृती दिली जाते.
४) जर एखाद्या सर्वेनंबरसाठी विमा काढला असेल, परंतु ७/१२ उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याचे नाव असेल किंवा बोगस ७/१२ आणि पिक पेराच्या नोंदी असतील किंवा दुसऱ्याच्या शेत्रावर बोगस भाडेकरार करून योजनेचा लाभ घेताना आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाते.
५) महसूल दस्तऐवजांत फेरफार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास संबंधित तहसीलदार स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करतील.
६) बोगस विमा घेतल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित खातेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल व त्याचा आधार क्रमांक पुढील ५ वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल. व त्याला किमान ५ वर्षासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
निष्कर्ष :
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हि शेतकऱ्यांसाठी नक्कीच मजबूत आर्थिक स्थिती प्रदान करते. विमा हप्त्याचा कमीत कमी दर, विविध पिकांचा समावेश व कप आणि कॅप मॉडेल सारखे महत्वाचे बदल या योजनेत केल्यामुळे ती अधिक प्रभावी बनवण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, जेणेकरून कोणत्याही नैसर्गिक अपात्ती मुळे होणाऱ्या नुकसानीस त्यांना तत्काळ आर्थिक सहाय्य मिळू शकेल त्याच बरोबर महाराष्ट्रातील शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्रवृत्त होतील.
कृषी विद्यापीठाच्या शिफारशी :
सोयबीन उत्पादनात नुकसान ? या रोगांना ओळखा
ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!